मराठी भाषा व शुद्धलेखन - भाग २
व्यंजनांचे प्रकार
स्पर्श व्यंजन - ज्या व्यंजनाचा उच्चार करताना घशातून येणारी हवा जीभ, कंठ, तालू, मूर्धा, दात, ओठ यांना स्पर्श करते त्यांना व्यंजने म्हणतात. क् ख् ते भ् म् पर्यंत सर्व व्यंजने ही स्पर्श व्यंजने आहेत, त्याची पाच वर्गात विभागणी केली जाते. ( क-वर्ग, च -वर्ग, ट -वर्ग, त -वर्ग व प -वर्ग ) प्रत्येक वर्गात ५-५ व्यंजने असतात व प्रत्येकी पाचवे व्यंजन हे अनुनासिक असते.
कठोर व मृदू व्यंजने - पाच वर्गातील व्यंजनाच्या उच्चारावरून त्यांची कठोर अथवा मृदू व्यंजने अशी विभागणी होऊ शकते, जेथे उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने व ज्यांचा उच्चार कोमल, सौम्य होतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. कठोर व्यंजनांनाच श्वास किंवा अघोष वर्ण म्हणतात, मृदू व्यंजनाना नाद किंवा घोष असे म्हणतात.
कठोर व्यंजने - क् , ख् च् छ ट् ठ् त् थ् प् फ्
मृदू व्यंजने - ग् घ् ज् झ् ड् ढ् द् ध् ब् भ्
या बरोबर ड् ण् न् म् ही अनुनासिके सौम्य स्वरूपाची म्हणून मृदूच समजली जातात.
अर्ध स्वर - अंतस्थ य् व् र् ल् यांची उच्चार स्थाने अनुक्रमे इ, उ, ऋ, लृ या स्वरांच्या उच्चारस्थानांप्रमाणे आहेत. म्हणून संधी करताना या वर्णांची अदलाबदल होऊ शकते. उदा. अति + अंत = अत्यंत ( इ -य् ) म्हणून य् व् र् ल् या स्वरांना अर्ध स्वर म्हणतात. स्पर्श व्यंजने व ऊष्मे यांच्या मध्ये ते येतात म्हणून त्यांना अंतस्थ असे म्हणतात.
ऊष्मे - घर्षक - श ष् स् यांचा उच्चार तोंडातून उच्छवास सोडून केल्या सारखा होतो, त्यावेळी वायूचे मुखात घर्षण होते व त्यामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना ऊष्मे म्हणतात. हे उच्चार तीव्रता व उष्णता व्यक्त करणारे आहेत, यांची गणना कठोर व्यंजनात होते.
महाप्राण- 'ह्' हा वर्ण उच्चारताना फुफ्फुसातील हवा मोठ्या जोराने बाहेर फेकली जाते. हा उच्चार मुळात स्वतः प्राणभूत आहे. आपल्या वर्णमालेतल्या क् वर्गापासून प् वर्गापर्यंत पंचवीस वर्णापैकी प्रत्येक वर्गातील दुसरा व चौथा वर्ण त्याच वर्गातील अनुक्रमे पहिल्या व तिसर्या वर्णात 'ह्' मिसळून होतो व त्यामुळेच 'ह्' ला महाप्राण म्हणतात. क ग च ज सारख्या व्यंजनात 'ह्' मिसळून ख घ छ झ हे तयार होतात या सारख्या वर्णांना देखील महाप्राण वर्ण म्हणतात. क ग च ज ट ड त द प ब हे अल्पप्राण व ख घ छ झ ठ ढ थ ध फ भ हे महाप्राण आहेत.
'ह्' प्रमाणेच श ष स यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो म्हणून त्यांना ही महाप्राण वर्ण म्हणतात, एकून १४ महाप्राण वर्ण व २० अल्पप्राण वर्ण मानली जातात. त्यातला 'ळ' हा स्वतंत्र मानला जातो.
मराठी वर्णमाला व वर्णांची वर्गवारी
स्वर - १२
स्वरादी २ (+२)
व्यंजने (स्वरान्त) ३४ +
पुर्ण वर्गवारी पुढील भागात पाहू.
क्रमशः

.jpg)
{छान माहिती!!}
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
दिप्ती जोशी
{उत्तम ! व्याकरणाची उजळणी छान}
उत्तम ! व्याकरणाची उजळणी छान चालू आहे.
Hope is a good thing...
{स्पर्श व्यंजन कठोर व मृदू}
स्पर्श व्यंजन
कठोर व मृदू व्यंजने
अर्ध स्वर - अंतस्थ
ऊष्मे - घर्षक
महाप्राण
हे समजले, पुढील भागाची वाट पाहत आहे.
{छान..}
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
{पुढील भाग लवकर देत आहे.}
पुढील भाग लवकर देत आहे.
{हूश्श्य... आला बाबा एकदाचा}
हूश्श्य... आला बाबा एकदाचा भाग २.
अगदी माहितीपूर्ण (आमचं शूद्द्लेकन सुदारंल बगा नक्की ह्ये लेख वाचून
) लेख... आता पुढचे भागही लवकरात लवकरात येऊद्यात.
मीऽच तो...
{+१}
.
{मराठी स्पेलचेकर आहे का ? असेल}
मराठी स्पेलचेकर आहे का ?
असेल तर कुठे मिळेल ?
{फायरफॉक्सचे अॅड-ऑन आहे ते}
फायरफॉक्सचे अॅड-ऑन आहे ते वापरू शकता तुम्ही.
Hope is a good thing...
{वाह छान. ह् हा वर्ण महाप्राण}
वाह छान. ह् हा वर्ण महाप्राण आहे हे वाचून मजा आली. नाहीतरी आमची वर्गवारी 'अगदीच हा नाही' या प्रकारचीच असते नेहेमी.
चांगला उपक्रम आहे.
-पुण्याचे पेशवे
{पुढील भाग आला का ?}
पुढील भाग आला का ?
{मराठी संकेतस्थळावर शुद्धलेखन}
मराठी संकेतस्थळावर शुद्धलेखन विषयक चर्चा ?
मी स्वर्गात तर नाही ना
{छान .... मराठी शुध्दलेखनाबाबत}
छान .... मराठी शुध्दलेखनाबाबत माझ्याही काही शंका आहेत..... पुढील काही भागां मध्ये त्या दूर होतील अशी आशा आहेच....
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !