पुस्तक
"निवडक नवयुग" - आचार्य अत्रे
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अनन्यसाधारण योगदान असून त्यात आचार्य अत्रे यांचे नाव प्रामुख्याने येते. उत्तम वक्ता, हजरजबाबी माणूस, सिध्दहस्त लेखक, कवी, पत्रकार, टीकाकार, नाटककार असा बहुआयामी व्यक्तिमहत्त्वाने तो विडाच उचलला होता.
"भिन्नावतरण"
काही 'विषय' अवतरणाबाहेरचे असतात. तर काही विषय इतके भिन्न भिन्नतेने प्रकट होत जातात की त्यांना कोणत्याही पठडीतल्या अवतरणात बांधता येत नाही. किंबहुना ते कधी जमतच नाही. लिखाणासाठीचे ते विषयही असतात अन् चघळण्याचे 'विषय'ही! त्यांना कागदावर उतरवणं कधी खूप जड जातं, कधी फारच अवजड वाटतं, तर कधी कधी ते बोजडही होतं.
१. अध्यात्म : पूर्वभूमिका
१) अध्यात्माचा साधा अर्थ आपण मुळात काय आहोत हे समजणे असा आहे. जे तुम्हाला समजेल ते तुम्ही आत्ता, या क्षणी आहातच त्यामुळे अध्यात्म म्हणजे तुमचा तुम्हाला पत्ता सांगण्या सारखे आहे.
जीवनातली सगळी निराशा, टेन्शन्स, असहायता आणि जे जे काही म्हणून उणे आहे ते आपण मुळात कोण आहोत हे न समजल्यामुळे आहे.
साप्ताहिकी - काव्य संग्रह

मैफलीला रंग येण्या
दाद रसिका यावी तुझी
शब्द माझे हे खरे पण
सर्व कविता व्हावी तुझी.
-अशोक
'चौफेर" प्रस्तावना...
चहूबाजूंनी एखादा विषय कोँडीत पकडला की तो शब्दांचा फेर धरुन नाचू लागतो. अनेक शब्द हा रासगरबा खेळायला येतात. चपखल शब्दांच्या जोड्या तयार झाल्या की मग दांडियाला रंग चढतो. त्या शब्दांच्या पदन्यासाची दर्शकांना, लेखकांना, वाचकांना बेमालूम नशा चढते. त्या नशेची धुंदी काही औरच!
'पुणेरी आजोळ' - प्रस्तावना...
पुण्यासारखं आजोळ लाभणं म्हणजे कोणतंतरी पुण्यकर्मच म्हणायचं. पुण्याशी नातं जोडायला अनेकजण उत्सुक असतात. मग ते राजकीय असो वा सामाजिक अथवा वैयक्तिक. तिचं माहेर पुणं आहे याचा आमच्या आईला पराकोटीचा अभिमान होता. पुण्याशी नाळ जोडलेली होती ती अशी. मराठी वाचक असो वा लेखक पुण्याची हौस अन् आस सर्वांनाच. बहुतेक मराठी 'नेट'कर हे पुणेकरच आहेत.
नॉर्वेच्या दरीखोर्यातून....
खूप दिवसांचा रेंगाळलेला बेत आता सिद्धीस जात होता. ब्रुसेल्सहून ओस्लो ला जाणारे विमान समोर होते. सोबतीला सूर जुळणारे एक जोडपे होते. उद्यापासून ४ दिवस नॉर्वेतल्या दरीखोर्यात राहायचे आहे या कल्पनेनेही शांत शांत वाटत होते. विमानाने हाक मारली. आत जाऊन बघतोय तर मोजून १२ डोकी ! "होल वावर इज आवर" म्हणत आम्ही ऐसपैस जागा घेतल्या. ( तरी त्या खत्रुड हवाईबयेने बिजनेस क्लास मध्ये नाहीच बसू दिले !
गोटुल
गोटुल बद्द्ल लिहायला सुरुवात करण्याचे कारण हे कि ब-याच लोकानी गोटुल बद्दल बरच उलट सुलट ऐकलेलं आहे. गोटुल बद्दलचा संभ्रम दुर करण्यासाठी मी गोटुल हि लेखमालिका सुरु करित आहे.
**************************************
