भाषा

मराठी, स्पॅनिश व कातालान

माझ्या बार्सिलोना (स्पेन)च्या दीड-दोन महिन्यांच्या वास्तव्यांत येथील भाषेविषयी काही गमतीदार गोष्टी आढळून आल्या. इथे दोन भाषा चालतात. एक स्पॅनिश, जी स्पेनची राष्ट्रभाषा आहे व दुसरी कातालान, जी बार्सिलोना ज्या काताल्युनिया प्रांतांत आहे त्याची प्रादेशिक भाषा आहे. पैकी स्पॅनिश पश्चिमेकडील सर्व देशांत मान्यता पावलेली भाषा आहे.

इंग्रजी सोपी, मराठी क्लिष्ट !

भाषेचा उपयोग कृति किंवा स्थितीचं वर्णन करण्यासाठी होत असल्यामुळे व हे कार्य मुख्यत्वेकरून क्रियापद करीत असल्यामुळे वाक्यरचनेंत क्रियापद हा सर्वांत महत्त्वाचा शब्द असतो. त्यामुळे कुठल्याही व्याकरणाच्या पुस्तकांत अर्धीअधिक पानं क्रियापदांची रूपं व इतर धातुसाधितं यांवर खर्ची पडलेली असतात.

जीवन, भाषा, साहित्य वगैरे वगैरे

हे लिहायला बसण्‍यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्‍या काळाच्या मंद गतीने आयुष्‍य उलगडत जाते; आणि आयुष्‍याचं सुस्पष्‍ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही.