आठवणी

कतेया करू....कतेया करु.... कतेया करू तेरी रूं......

काही दिवसांपूर्वी आलेल्या 'रॉकस्टार'ने तरुणाईला पुन्हा आपल्या तालावर नाचवलं. खरे तर रणबीर कपूर हा प्राणी फारसा आवडत नसल्याने मी चित्रपट पाहायचा नाही असेच ठरवले होते. पण खुप जणांकडून चित्रपटातील गाण्यांबद्दल ऐकल्यामुळे राहवले नाही आणि शेवटी एक दिवस मुहुर्त लागला. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर रणबीरने अभिनय बरा केलाय. त्याबद्दल त्याला अवार्ड्सही मिळाली.

सोनेरी संध्याकाळ

पंचतारांकित हॉटेलमधला आपल्या ७५ व्या वाढदिवसाच्या समारंभानंतर मालुताई घरी परतल्या. उंची कपड्यात मिरवण्याखेरीज त्यांना दुसरं काहीच करायचं नव्हतं. तरी देखील त्यांना थकल्यासारखं वाटत होतं. आपण का थकलो त्यांचं त्यांनाच कळेना. त्यांना हॉलमधेही चालावं लागलं नाही. जरूर नसताना मुलानी त्यांच्यासाठी व्हीलचेअर आणली होती. त्यात बसून कंटाळा आला की त्या उठून उभ्या राहायच्या.

कृष्णधवल पाने

मंगल कलश

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचं स्मृतिचिन्ह म्हणून एक मंगल कलश मंत्रालयात ठेवला होता. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाला आग लागली आणि वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार तो मंगल कलश गायब तरी झाला असावा किंवा आगीत भस्मसात तरी झाला असावा.

जी ढूँढता हैं

जी ढूँढता हैं फिर वोही फुरसत के रात दिन...

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात..
अंगणात बसून चटईवर...
बेकंबे घोकणे,बाराखडी कोरणे
मग उग्गाच थोडे लोळणे..
आईने केस विंचरून दिले की..
शाळेला पळत सुटणे
दप्तर टाकून पाठीवर..

जी ढूँढता हैं...

उन्हाळ्यात पेंगुळलेल्या दुपारी..
छपरांतून डोकावणारे कवडसे..
ते कासव टाकीतले इवलेसे..
किती गार गार वाटायचं..
हात लावलं त्याला की
ते बेटं अंग चोरायचं..

सेक्सी म्हातारे: १

माझी एक खडूस मैत्रीण काल मला "दादाजी" म्हणाली (#$%@#)
आणि मला वेड्यासारखे एकामागोमाग एक सेक्सी म्हातारे आठवायला लागले:

पहिला आठवला अर्थातच "इफ्तेकार"! कसला होता तो!!
उंच शिडशिडीत,
भव्य कपाळाला शिस्तीत इमानदारीत जागा करून देणारे पाठी वळवलेले केस,
उंचावलेली चीक-बोन्स,
पेरेनिअल पोलीस ऑफिसरला शोभणारे ते करारी पण आधार देणारे डोळे,
दमदार आवाज,

अलविदा....

कॉलेजचे शेवटचे सत्र (मराठीत ’सेमिस्टर’) म्हणजे जरा भावनिकच असते. कॅम्पसमध्ये एकंदरित धमाल असतेच. प्लेसमेंटची गडबड, प्रोजेक्टचे टेन्शन, शेवटचे वर्ष म्हणून आसमंत भरून मस्ती करायची उर्मी, आणि या सगळ्यांचा जोडीला एक हळवेपणाची किनारदेखील असते.. "हे दिवस आता परत येणार नाहीत " ह्याची पुरेपुर जाणीव असते; आणि त्यात हा "फ़ेअरवेल " नावाचा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार असतो..