कविता
कवितेचं अंतर्मन
कवितेसाठीचा श्रोता
रोखून ठेवावा लागतो
जसा भीती वाटल्यावर श्वास
अहेतुक जमलेल्या गर्दीकडे
पाहून कविता वाचणं
कित्ती सोपं.. ऐकतातच बिचारे
अर्थाचे अनर्थ, अनर्थाचे अर्थ
तरीही लय धरण्याची धडपड
किती इमानदार, किती छानदार
बिच्चाऱ्या कवीचे तर
बारा वाजतात
मग तो घड्याळ बंद करतो
कधी न पाहण्यासाठी
कालक्रम, दिनक्रम
कालचक्र, ऋतुचक्र
उत्तरायण दक्षिणायन
त्याला नसते सोयरसुतक
कवितेचा कीड़ा
कवितेचा कीड़ा जेंव्हा डोक्यात शिरतो
करितो यमकांची जुळवा-जुळवी
ताबा तोंडाचा घेतो
फिरतो सैर-भैर तो.
कानात बोळे घालूनी
भयक्रांत बायको वावरते घरी.
पोरे ही म्हणती पपा
होतो अभ्यासाचा हर्जा.
हातात चोपड़ी पाहुनी
मित्रही पळती दूर किती
पाहुण्याची लाट आटली
निस्तब्ध शांती घरी पसरली.
आता रात्रीच्या एकांती बैसुनी
माझी मीच ऐकतो कविता.
मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो...!!
मी सूर लावूनी मस्त जगत गेलो
मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो
मी दुख पाहिले तरीही नाही खचलो
मी शांतपणे दुखही भोगित गेलो
मी होतो कोठे..? नि आलो आता कोठे ..?
का मी उगाच वणवण फिरलो ...?
हे दुख किती नि सुख किती आले गेले ...
ना हिशेब केले की नाही मोजीत बसलो
हरणे,जिंकून जाणे मी गौण समजलो
खोटा डाव कधी ना मी खेळत बसलो
दुख कधी मी कुरवाळीत नाही बसलो
आठवणी- गावाकडच्या
जात्यावरती अजून आजी
गुणगुणते का ग ओवी ?
अंगणामागच्या गोठ्यामधे
हंबरतात का गाई ?
परसदारी तुळशीपाशी
तेवतो आहे का ग दिवा ?
आंब्याच्या फांदीवर अजून
झुलतो का हिंदोळा ?
पडवीमधल्या टोपलीखाली
उरली आहेत का ग बोरं?
उंबराच्या पाराभोवती
खेळतात का पोरं ?
गावाकडची पायवाट माझ्या
पायाखालुन सरकत आहे
ओटीवरती वाळवण तसेच
अजून का ग सुकते आहे?
ओटीवरती वाळवण तसेच
अजून का ग सुकते आहे?
सख्य
आपण ज्या समाजात वावरतो, ज्या संस्कृतीत वाढतो, त्याचा आपल्यावर कळत नकळत - बरेचदा नकळतच! - फार मोठा पगडा असतो. माझ्या कवितांमध्ये जेव्हा जेव्हा कृष्ण प्रकटतो, तेव्हा त्याच्या अचानक येण्याने मी आश्चर्यचकित होते.
सरळ रस्ता
जीवन म्हणजे एक सरळ रस्ता
किती तरी होतात मनाला खस्ता |
आनंदाला हि नाही कुठं कट्टा
दुःखांनी सुधा मांडला सर्वी कडे सट्टा |
रात्र व दिवस ह्यांचा नुसता पोर खेळ
ह्यामध्ये सावलीचा ही कुठं नाही बसत मेळ |
नाला, नद्यांनी बदलला मार्ग
पण रस्ता मात्र सरळ|
--- लाल्या
मुलीचा जन्म आणि कविता
काल माझ्या भाचीचा फोन आला, मामाजी आप दादा बन गये हो, भैया को लाडकी हुई है. इस ख़ुशी में एक कविता हो जाये. खंर म्हणाल तर मी कवी नाही. मराठी भाषेचे शिक्षण ही नाही. छंद, अलंकार कशाशी खातात हे ही माहित नाही. पण हृदयातील भावना शब्दांत उतरविण्याचा प्रयत्न करतो. त्या चिमुकल्या चिमणीच्या जन्माच्या वेळी आजी आणि पणजी सुद्धा तिच्या जवळ होते.
माझ्या मना
माझ्या मना तू माझ्या मना
मला तू तरी समजून घे ना
उगा नको तू प्रश्न विचारू
उत्तर मला माहीत नसेल ना
न ऐकले तुझे अन भेटलो तिला
का भेटलो तेव्हा ते मला कळेना
दुर ती गेली निघूनी सोडून मला
आठवण तिची कधी काढू नको ना
होती का काही तिची मजबूरी?
ती तरी का सांगेल कोणा?
असेल का रे स्थिती तिची अशीच
हे सकलमतिप्रकाशिनी......
हे सकलमतिप्रकाशिनी......
तारकात तूचि दिप्ती कला शशिची दाविसी
प्रकाशू दे मति मदीय ठाव देई मानसी
धरेवरि नभातही विहरसी मनस्विनी
शब्दवस्त्र लेऊनि कधि होई हंसगामिनी
सहज सुलभ सलग सरळ आशयासी येऊ दे
जळ वाहे झुळुझुळु का अर्थवाही शब्द दे
नाद मधुर करित जासी तूचि निसर्गातुनि
पदरव तव येऊ दे काव्यातुनि मधु गुंजुनि
भ्रांति ती नसो कदा "कवि" उपाधी ही जळो
अवतरिता तूचि देवि मतिमंदीर मम उजळो
शुक्राची चांदणी काल चंद्राजवळ आली ...!!
शुक्राची चांदणी काल चंद्राजवळ आली
चंद्राकडे बघून हलकेच हसली
चंद्राने स्वतालाच नीट आवरून ठेवले होते
आठ दिवस झाले डायटिंग केले होते
बापरे बाप खूप वजन कमी झाले होते
चांदणी जवळ आली की
तिला मिठीत घ्यायची
चंद्राने स्वताचिच कोर केली होती
अशी कोर अशी कोर जशे हात पसरत होती
फक्त जवळ येताच तिला मिठीत घ्यायची होती
शुक्राची चांदणी अशी मस्त दिसत होती
काय सांगू मित्रानो