मराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी नेटवर्क !

सदस्य प्रवेश

भाषा निवडा

मराठी
roman

Use Ctrl+\ to toggle

कल्पना

सव्यसाचि

डॉन का इंतजार तो ११ मुल्को की पोलिस कर रही है, पर डॉन को पकडना मुष्कील हि नही नामुंकीन है !!

जेवण

या. आज उशीरा आलात मास्तर. तिकडे नको इकडे बसा की पलंगावर. पंख्याचा वाराही येतो तिथं.

लवकर काय अन उशीरा काय? घरी एकट्या असणार्‍याला वेळेचे काय?

आसं कसं वेळेवर जेवण झालं ठिक असते प्रकृतीला. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे.

तुमचे बरोबर आहे हो. पण वेळेआधी जेवले म्हणजे सगळाच प्रॉब्लेम. अन बाकीचे मेंबरं पण काय म्हणतील?

वंदे मातरम

"नमस्कार मै हु आभा शर्मा और आप देख रहे है 'न्युज चॅनेल' अब हम आपको ले जा रहा है 'ब्लु नाईल' हॉटल के बाहर जहांपर ४ टेरीरीस्ट अभीतक कब्जा जमाये बैठे है."

"आपण पाहात आहात 'चंद्र माझा' आणी आता आम्ही तुम्हाला दाखवतोय 'हॉटेल ब्लु नाईलच्या' ३ र्‍या मजल्याची आमच्या कॅमेरामन 'माधवानी' ह्यांनी टिपलेली दृष्ये."

ती अन तो

कच्च्या मालाचे पुरवठादार : दुवा १, दुवा २ दुवा ३

ती - इ..इ....नको ना.
तो - नको काय नको
ती - धसमुसळा कुठचा!
तो - मी धसमुसळा तर तू कोण?
ती - तिकडे शिरला बघ!!
तो - आता काय करू?
ती - काय करू म्हणजे काय? जरा चपळाई दाखव की.
तो - तेच तर करतोय.
ती - हो पण तुला तेच जमत नाही.
तो - आता तुझा हात आडवा आला. मधे मधे करू नकोस तू.
ती - अरे पण तुला जमत नाही तर असा चिडतोस का? सावकाशीने घे की.
तो - हो ग सावकाशीनेच घेण्याचा प्रयत्न करतोय.

हे बंध रेशमाचे..२

असाच एका विकेंडला आपला चिल्का सरोवर बघायला जायचा प्लॅन होता.... सकाळी मला लवकर उठवायचे कठिण काम तूच फोन करुन केले होतेस. बस तुमच्या बिल्डिंग जवळून सुटणार होती. मी सगळे आवरुन धावत पळतच पोहचलो होतो... बस मधे चढलो तर नेहमी प्रमाणे तु तुझ्या बाजुच्या खुर्चीवरची बॅग उचलून घेतलीस.. नेहमी पेक्षा आज तू वेगळीच वाटत होतीस... बस सुरु झाली आणि एक एक करुन गाणे बजावणे सुरु झाले... बस मधे काय दंगा घातला होता आपण..!!! त्यात सगळ्यात पुढे आपणच दोघेजण होतो हा भाग वेगळा..... मी माझ्या भसाड्या आवजात "प्रथम तुज पाहता" गायला लागताच तुझे ते हसणे आणि नंतर ते लाजणे आजही मला चांगलेच आठवते....

हे बंध रेशमाचे!!!

प्रिय सखे....

तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिअ‍ॅक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावतच नाहीय पण आता याचीहि सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासुन आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार???? माझ्या समोर अजुनही तीन वर्षापुर्वीचीच तू डोळ्या समोर आहेस...

शिमग्याची बोंबाबोंब!!

नमस्कार मंडळी, शिमगा जवळ येतोय. सगळ्यांना हाळी द्यावी म्हणतो. आज एक प्रतिसाद वाचून अशीच कल्पना सुचली. आपण सगळे मराठी स्थळांवर नियमित भेटतो पहातो एकमेकांना, आपले विश्व हेच. आपले विश्व समृद्ध आहे व त्यात आपण खुश आहोत समजुन आपल्याच काही लोकांना मान द्यायचा व जरा कोपरखळ्या काढायचा हा एक यत्न.

कृपया गोड मानून घ्या. बाकी मजेत.

गरीबांचे व्यास - रामदास
गरीबांचे अत्रे - सर्केश्वर
गरीबांचे शंकराचार्य- धनंजय
गरीबांचे अल गोर - विकासजी
गरीबांचे विठ्ठल प्रभू - मास्तर
गरीबांचे प्रा. राम शेवाळकर - मुसु
गरीबांचे पुल - नंदन
गरीबांचे आनंद यादव - ऋषिकेश
गरीबांचे किरण कर्णिक - नीलकांत

मराठी म्हणजे नेमके कोण?

मुंबई कुणाची या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच त्यांची राजकीय शाखा असलेल्या भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि 'मराठी ह्रदयसम्राट' राज ठाकरे यांनी षण्मुखानंद सभागृहात मराठी म्हणजे कोण याची व्याख्याच जाहिर केली. राज यांची ही व्याख्या म्हणजे त्यांच्या वैचारीक गोंधळाचे नवे टोक आहे.

र्‍हदयी वसंत फुलताना

खरे तर वसंत यायला अजून पुष्कळ अवकाश आहे.
त्यावेळे असते तशी फळांची रेलचेल इतर कोणत्याच काळात नसते
हिरव्या पट्ट्याची पण आतून लालभडक असणी कलिंगडे.
मस्त मखमली बसंती/अबोली रंगाची खरबूजे
फिक्कट पिवळ्या रंगाचे अननसाचे काप
हिरव्या गार कैर्‍या
काल एके ठीकाणी फळांची रास पाहिली.
नीट रचून ठेवलेली. रंगीत फळे होते.
धम्मक केशरी रंगाची संत्री
पिवळी जर्द केळी
फिकट गुलाबी लालसर सफरचंदे
लालभडक सफरचंदे
हिरवी टप्पोरी द्राक्षे
फिक्के पोपटी आवळे
मातकट चिक्कू
लालभडक डाळिंबे
जणू काही जमिनीवर असलेले इंद्रधनुष्यच होते.
फळांचा आस्वाद जीव्हेने घेण्यागोदर तो डोळ्यानी घेतला जातो.

Syndicate content