विडंबन

कोर्टटिपा..

2
0

कोर्टरूम या बॉलिवूडमधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "कटहरे में खडा रेह के" अनेक भल्याबुर्‍या लोकांच्या आयुष्याचे फैसले होत असतात. काहीवेळा बाइज्जत बरी तर काहीवेळा मिलॉर्डच्या पेनाचं निब मोडून कांडकं पाडलं जातं.

मुळात सिनेमात असल्याने केस कोर्टात झटपट उभी राहून झरझर चालते..

जंगल बुक

8
-1

एकदा एका जंगलात एका सिंहाला एक शेळी दिसली. तिचं बिचारीचं लक्षच नव्हतं सिंहाकडे. अगदी सिंह जवळ येऊन पोहोचला, तरी पण ती आपलं गवत खात होती. सिंह अगदी खूप जवळ आला, इतक्या जवळ की जर त्याने पंजा मारला असता तर शेळी मरणार.

शेळी घाबरली आणि तिने सिंहाला विचारले, ’तू मला खाणार आहेस का?’

आज रजनी-अवतार दिनानिमित्त ही रजनी-आरती

0
0

प्रात:स्मरणीय आदरणीय रजनीकांतदेव तमिळप्रांतीय चित्रपट-उद्योगाद्वारे आपल्या लीला दाखवून मर्त्य मानवास धन्य जरी करत असले तरी ते मूळचे आपले मराठे माणूसच (हो हो.. शिवाजीराव गायकवाडच..), त्यांचा भक्तवर्ग हा मराठी मुलुखातदेखील असल्याची जाणीव या पामरास आहे, म्हणूनच आम्ही रजनीकांतदेवजींची आरती मराठीमध्ये लिहावयास घेतली.. रजनीकांतदेवजींच्या प्रेरणेनेच ही आरती लिहीली जात आहे..हा त्यांचाच कृपाप्रसाद....

मात्र रात्रीची गोष्ट भाग १

0
0

साडू म्हणे कामच तोडू...

0
0

पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र असलेले व आता एकमेकांचे साडू बनलेले दोघेजण नेमक्या फ्रेंडशिप डे च्या दिवशी एकत्र येतात. त्यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद घडतो...
“काय साडू, लग्नाचे लाडू फुटल्यापासून तू चांगलाच सुटलाय की रे.”
“आणि हे माझ्या प्रिय साडू तुझंही पोट फारच वाढू लागलंय त्याचं काय?”
“अरे आज फ्रेंडशिप डे. विसरलास की काय?”
“छे छे कसा विसरेन?”

मिमवर सुद्धा डोपिंग

0
0

(डिस्क्लेमरः- हे लिखाण पुर्णतः कल्पित असुन त्याचा सत्याशी काहीच संबंध नाही. कुणाला यात सत्य भासल्यास तातडीने मनोविकारतज्ञांना गाठावे. Big smile )

माझं पहिलं व्यंगचित्र: "मॅडम का ढाबा"

0
0

आत्ता पर्यंत या सरकारने कित्येकवेळा सामान्य माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. घोटाळ्यांची तर यादीच निघेल. तरिदेखिल निर्लज्जपणे सगळ चालू आहे! २जी घोटाळा काय नी कॉमनवेल्थ घोटाळा काय, या घोटाळ्यात खाल्लेले पैसे जर चांगल्या कामासाठी वापरले गेले असते तर निश्चितच काहितरी नक्कीच साध्य झालं असतं.

निओ अद्वैती पसायदान - आता भासात्मके देवे

0
0

जनहो, हे निरूपण प्रतिपद टीका (प्रत्येक शब्दावरील भाष्य) स्वरूपाचे आहे.

घोटाळ्यातच करिअर....

0
0

आता आम्ही दररोज पेपर वाचतो आणि चाट पडतो. कारण फ्रँटपेजवरच्या बातम्याच तशा अचाट असतात, कोट्यावधींच्या हिशोब मांडणाऱ्‍या अन् मागणाऱ्‍याही. आम्ही चक्रावून जातो जेव्हा आमचंही नाव 'माथा बडवत्या पोज'मधील फोटोसहीत छापून येतं.

शाब्दिक खोड्या

0
0

आपण भावगीतांच्या वा लोकप्रिय गाण्यांच्या ओळी गुणगुणत असता एक किंवा अनेक शब्द, गाण्याची गेयता न बिघडवता, बदलले तर अर्थाच्या काय गमती होतात त्याचे काही नमुने. (नवीन शब्द जाड अक्षरांत आहेत. गाण्यांतील मूळ शब्द देण्याची गरज नाही असं वाटतं.)

१) कौसल्येचा राम भाई .........

२) घेऊनी एक थाळी खातो कबीर पोहे ..........