कविता

गाय,वाघ आणि स्त्री

2
0

गाय,वाघ आणि स्त्री

शाळेचा मजा काही औरच होता

0
0

उन्हाळयाच्या सुटी नंतर मित्रांना भेटण्याचा ध्यास होता
शाळेचा मजा काही औरच होता
नवं कोर दप्तर नवी नवी छत्री
गावाला घडलेल्या नव्या गमतींची जंत्री
गमती सांगण्याचा आणि ऐकण्याचा काळ होता
शाळेचा मजा काही औरच होता

नव्या कोऱ्या पुस्तकाचा कोरा कोरा वास
नव्या वहीच्या कव्हर ला स्टीकर ची आरास
वहीच्या आत नेहमीच घोळ होता
शाळेचा मजा काही औरच होता

एक रुपयाचा वडा पाव

जे काही आहे ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!

4
0

आज कित्येक दिवसांनी आलोय तुझ्याजवळ निवांतपणे. तुझं हे सौंदर्य नेहमीच मला भुरळ घालतं, आजही घालतंय! हे मोहक रूप डोळ्यांत साठवून घ्यायला उभा जन्मही अपुरा पडावा. तुझ्याजवळ कधीही येऊन बसलो की खूप शांत, प्रसन्न वाटतं. हलकेच तुझ्या कुशीत गाढ झोप लागते नि रोजच्या दगदगीने थकलेल्या मनाला खूप आराम मिळतो.

पंखा २

1
-1

पंख्याच पातं पंख्याभोवती खुपदा फिरलं
त्याला वाटतंय की त्याने सार जग फिरलंय

पंखा ५

0
0

एकदा पंखा बंद झाला
कारण विचारले तर
चक्कर आली असे म्हणाला
हसून हसून लोक वेडे झाले
आणि धक्का देऊन त्यांनी
पंखा सुरु केला

वाट मृत्युची

0
0


जनकपुरीच्या डिस्ट्रीक्ट पार्क मध्ये फिरताना काही पेन्शनर म्हात्याराना पत्ते खेळताना बघत असे. सकाळी नास्ता-पाणी करून पार्कमध्ये येऊन बसायचं ते थेट संध्याकाळपर्यंत पत्ते खेळत. खंर म्हणायच झाल तर छोट्या-छोट्या फ्लेट्स मधे त्यांचा घरच्यांना त्रास होत असेल! कदाचित? हिवाळ्याच्या दिवसांत एखाद दुसरा साथीदार वर गेला तर त्यांच्या डोळ्यात समाधानाची भावना दिसायची, सुटला बेचारा!

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने - भाग -३

1
0

प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.

मैं तैनू फ़िर मिलांगी

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !

0
0

मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. जालरंग प्रकाशनातर्फे आपणही दिवाळीचे स्वागत साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी करूया.
आपण नवोदित असाल किंवा अनुभवी, आपण सगळ्यांना सामावून घेतो. तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता.

समुद्रभेट

0
0

काल समुद्र भेटीस गेलो होतो
अथांग समुद्र लाटा पसरुन पहुडलेला होता
बरीच जोडपी वाळूत बसुन स्वप्नशिल्पे साकारात होती
मीही काही शंख आणि शिंपले जमा केलीत
म्हटलं बनवेन सुरेखशी माळ तुझ्यासाठी
किंवा एखादा दागिना तुला सजवण्यासाठी
एक छोटंसं घरटंही बनवलं वाळूचं
म्हटलं तुला ठेवीन जपून तिथं
मग बराच वेळ फिरत होतो किनार्‍यावर एकटाच
तुझ्या सोबतीची स्वप्नपाखरे मनात उत्तुंग झेप घेत होती

..... आस्मा.... भाग - ५ ...

0
0

किनाऱ्यावर लाटांनी पाण्याची एक तात्पुरती सीमारेषा तयार केली होती. भिजलेल्या वाळूवरून ती नागमोडी रेषा स्पष्ट दिसत होती. लाट येईल तशी नवीन सीमारेषा तयार होत होती...मी त्या रेषेच्या हातभर लांब अंतरावर उभा राहिलो . अथांग पसरलेल्या समुद्राकडे पहात......ती मला आज भेटायला येणार होती....मला ते जुनं मराठी गाणं आठवलं.... जिथे सागरा धरणी मिळते ....