तुम्ही आम्ही
॥ मीमदर्शनामृत ॥ - अध्याय प्रथम
मी? म्हातारा??
ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली.
का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे..
"मी.. ?? म्हातारा ???"
ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे..
........................
मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध..
हस्ताक्षरातील अक्षर...
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी.
ऑडीटर साहेब !!
"टुमॉरो ऑनवर्द्स् यू विल हॅन्दल द बिझनेस प्लानींग एरीया! धिस इज अ वेरी गुद अपॉर्च्युनिती फॉर यू अॅज यू विल दायरेक्तली रिपोर्त तू जी एम. प्लीज सी अब्दुर्रहमान अॅण्ड गेत यूर ऑफीस रूम सेत अप प्रॉपरली." माझ्या सौदी बॉस नी मला तोंडीच माझी बदली केल्याच सांगीतल.
कोर्टटिपा..
कोर्टरूम या बॉलिवूडमधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर "कटहरे में खडा रेह के" अनेक भल्याबुर्या लोकांच्या आयुष्याचे फैसले होत असतात. काहीवेळा बाइज्जत बरी तर काहीवेळा मिलॉर्डच्या पेनाचं निब मोडून कांडकं पाडलं जातं.
मुळात सिनेमात असल्याने केस कोर्टात झटपट उभी राहून झरझर चालते..
ब्रेक अप...
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस.
एका लग्नाची............ (१)
सत्यकथेवर आधारित, काही पात्रांची नावे बदलली आहेत (अर्थात काही चाणाक्ष मिमकर ओळखतीलच
) , भाषा संयत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण आक्षेपार्ह आढळल्यास क्षमस्व !
कोणे एके काळी, जेव्हा लग्न - संस्थेला ' लव्ह मॅरेज' मान्य नव्हते ....
" राक्याSSS, ती जेलरची पोरगी आहे "
" मुख्य तरुंगाधिकारी !! "
" हा येडा झालाय ! "
" चढलीय भें** ला ! "
१.५ वर्षानन्तर पुन्हा एकदा बटाट्याची भाजी...
तो-: आज काय जेवणात?
ती-: बटाट्याची भाजी.
तो-: काय्!...आज परत?
ती-: आज परत्.....कसं काय?
तो-: अगं...काल सुद्धा बटाट्याचिच भाजी होती.
ती-: अहो..आज वेगळं आहे.
तो-: वेगळं?..वेगळं म्हणजे काय?
ती-: म्हणजे कालच्याच बटाट्यांची नाही केली.
तो-: ते कसं? ...म्हणजे तु नवीन बटाटे खरेदी केलेस?
ती-: नाही. मी कालच ५ किलो खरेदी केले होते.
तो-: मग हे कालचेच बटाटे कसे नाहीत?
ती-: कारण हे वेगळे आहेत.
स्वाक्षरी......आपापली.......!!!!!!!
स्वाक्षरी......प्रत्येकाची एक लकब असते.....काही खास काही असते जे आपण आपल्या स्वाक्षरी तुन जगापुढे मांडतो...
कलाकार लोकांची स्वाक्षरी तर एक दम फर्राटेदार असते......
अशाच काही छान..........सुंदर ....वेगळ्या स्वाक्षर्या सगळ्यांच्या असतात
विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या स्वाक्षरी इथे द्यावी आणि जमल्यास विशेषन द्यावे..
(चेक वर ची करु नये......
)
पावशेर
कॉलेजात असताना नवेनवेच काही उर्दू शेर माहीत झाले होते.
गृप मधल्या बहुतेक पोराना काहितरी हिंदीत दोन ओळी बोलायचे आणि त्याला शेर मानून त्या सगळ्या शेराना उगाचच वाहवाह देत बसायचे. हे सगळे आंखे दिल इश्क दामन आसू बादल हवा बारीश अशाच विषयावर असायचे.
आम्हाला शेर तयार करायचे नियम म्हणजे यमक वगैरे कोणीतरी सांगितले. त्या महात्म्याने आम्हाला शेर दारु प्रेयसी या हमखास विषयावरच तयार होतात असे सांगितले.