विरंगुळा

गॉसिप

3
0

Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.

आठवणीचे छोटे छोटे तुकडे –

1
0

माहीम ..!!
छान कवितेसारखे दिवस जात होते.म्हणजे निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटातून हे वाचताना जसे छान वाटते तसे दिवस वाटत होते
थोड्याशा पेंशात पुस्तके मिळत होती.किती वाचत होतो
किती हुशार होतो .हा भाग निराळा.
पुस्तके जवळ हवीत.हे व्यसन होते.
तसा पाठांतराला मी अगदी "ठो "होतो .तरी काही कवितेची कडवी मनात साचत गेली
एकपण आरती पाठ नाही नि ह्या कविता पाठ
जे मत्त फुलांच्या
कोशातून पाझरले

(फक्त) मराठी गाण्यांच्या भेंड्या

0
0

मित्रांनो फक्त मराठी गाण्यांच्या भेंड्या खेळूयात.. (खरे तर अंताक्षरी wink )

सुरुवात श्रीगणेशाच्या नमनाने करतो

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित ढवळे अंग, चंदनऊटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया

गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा

जोडींया स्वर्गमें ...

0
0

हेतु : सहज टीपी
नेनेंबाईंनी मध्यंतरी झुल्यावर बसुन एक कमेंट केली होती, कल्पना करतो आहे की त्यावर मान्यवरांच्या कश्या प्रतिक्रिया आल्या असत्या !! wink अर्थात आमच्या चेपुकर मित्रांनी यातल्या काही वाचल्या असतीलच

माधुरी दिक्षीत : सारी जोडींया स्वर्ग मे बनती है.

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"

9
0

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"

आठवणीचे छोटे छोटे तुकडे –

2
0

माहीम ..!!

छोटी छोटी गावे ,शहरे सोडून आम्ही एकदम मुंबईला आलो. थेट अगदी माहिमला.
अगदी छान परिसर
सीतला देवी टेम्पल रोड.
ज्योती सदन .
घरापासून चर्च हाताच्या अंतरावर.
घर आवडले. छोटे परंतु टुमदार. हॉलला ग्यालरी नि एक खिडकी .बेड रूमला दोन खिडक्या.किचनला एक खिडकी.
पण गम्मत अशी की खिडक्याना गज नाही.खिडकीचे दार उघडले कि मोकळ्या मोकळ्या नि नागड्या खिडक्या .

खगोलविश्वः या महिना अखेरीस आकाशात गुरु व शुक्राबरोबर चंद्राची शोभा

5
0

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

येत्या आठवड्यात काही मनोरम अशा सुंदर खगोलीय घटना दिसण्याचा योग येतो आहे.
कोणत्या ते पाहूयात...

२६ जानेवारी २०१२
चंद्र आणि शुक्र यांची युती

२६ जानेवारी २०१२, भारताचा प्रजासत्ताक दिन.
या दिवशी संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान एक विहंगम दृष्य आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे.
सध्या पश्चिम आकाशात दिमाखाने चमकणारा शुक्र सत्ता गाजवत आहे.

आठवणीचे छोटे छोटे तुकडे -मिरज

5
0

मनमाडमधून मिरजेला कधी आलो...? कसे आलो..? ते फारसे आठवत नाही. मनमाडच्या शाळेत एक -दोन महिनेच गेलो असू .आणि बाबांची बदली मिरजेला झाली.
एक मस्त गाभुळलेले गाव म्हणजे मिरज.
मस्त थंड गाव म्हणजे मिरज.
पेरूचे गाव नि टपोरे कुरमुर्याचे गांव म्हणजे मिरज .
मिरज आठवले की मला हे सगळे आठवून जाते. असेच मिरज माझ्यातरी आठवणीत आहे

पतंग उडाने का मौसम...

2
0

मकरसंक्रांत आली की सर्वत्र पतंग बाजी सुरु होते. पतंग उडविणे हा खेळ लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळेच उत्साहाने खेळतात. मला पाचवीत हिंदीच्या पुस्तकात "पतंग उडाने का मौसम" असा एक धडा होता. खरं सांगु का... या धड्यातील मला एक अक्षर ही आठवत नाही. तरी माझ्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या झाल्या त्याच तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.