कथा

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"

9
0

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"

बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी

1
0

देवाचा लाडका

0
0

गेले सहा महिने राधाबाईंचा मिहिर मरणाशी लढत होता. शेवटच्या स्टेजला असलेला त्याचा कॅंसर समजल्या पासून राधाबाईंच्या पाया खालची जमिनच हादरली होती. नवर्‍याच्या मागे त्यांनी या मुलाला फ़ुलासारख वाढवलेल होत. मिहिर एक गुणी मुलगा होता.

कथा एका प्रवासाची........ भाग ७.

4
-1

भाग १ येथे वाचा: http://www.mimarathi.net/node/7144
भाग २ येथे वाचा: http://www.mimarathi.net/node/7186
भाग ३ येथे वाचा: http://www.mimarathi.net/node/7285
भाग 4 येथे वाचा: http://www.mimarathi.net/node/7397
भाग ५ येथे वाचा: http://www.mimarathi.net/node/7511
भाग 6 येथे वाचा: http://www.mimarathi.net/node/7820

राजस आता ६ महिन्यांचा झाला; तेव्हा शमीने परत ऑफिसला जायचं ठरवलं.

जय हो ! ( लघुकथा )

2
0

सेठजींकडे स्वामीजींचे आगमन झाले .
स्वामीजींच्या भरगच्च कार्यक्रमाचा प्रचार अन् प्रसार व्हावा ह्यासाठी पत्रकारांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले .
सर्व काही सुरळीत सुरु होते . शांतपणे .
पण काही नवशिक्या अतिउत्साही तरुण पत्रकारांनी नाक खुपसलेच .
' स्वामीजी ! आपण प्रत्येक ठिकाणी फक्त श्रीमंतांनाच आपल्या आतिथ्याचा लाभ देता असे का ? ' एकाने विचारले .

आमची पिकनीक

4
0

"मी
आधीच सांगतो या जाड्याला मी माझ्या गाडीवर घेणार नाही! " ठाम स्वरात पक्या म्हणाला.
गेला अर्धा तास घरात हा धुमाकूळ चालू होता. चहाचे कपावर कप रिकामे होत होते पण नक्की कोण कुणाच्या गाडीवर जाणार याबद्दल अजूनही एकमत होत नव्हते. कुठून दुर्बुद्धी झाली आणि हा कार्यक्रम ठरवला असे मला वाटायला लागले होते.

जंगलराज

3
0

जेव्हा माकडाला कळले की माणसाचे पूर्वज अगदी त्याच्या सारखेच होते तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही . माझा वंश इथे संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करतोय ! अन इथे ? इथे तो सिंह राज्य करतोय ! काहीही झाले तरी आता मात्र चूप बसायचे नाही , रानात तरी आपले राज्य असेलेच पाहिजे , आपल्या वंशजांचं नाव राखायला नको ? माकडाने विचार केला .
पण सिंहाच्या शक्ती पुढे आपलं कसं चालणार ?
त्याला तर सगळेच घाबरतात .

आवंढा

3
0

मेच्या पहिल्या आठवड्यातला शुक्रवार. भडभुंज्यांच्या कढईत तापवल्यासारख्या गरम मातीतून सायकल मारत घरी आलो. माणसं सगळी घरांच्या सावलीत गुमान पडलेली. गल्लीतली कुत्रीसुद्धा हातपंपाच्या आजूबाजूला गारवा शोधत वीतभर जिभा काढून धपापत बसलेली. अधूनमधून छोट्याशा झुळकींचे भोवरे धुळीची चादर विस्कटत असले तरी त्यात हवेपेक्षा उन्हाच्या झळाच जाणवत होत्या.

गावची गोष्ट

4
0

सुमो चौथ्यांदा बंद पडल्यावर कल्पेशने स्टियरिंगवर बुक्की मारून कानातून आरपार जाईल अशी शिवी हासडली. आणि मागे वळत बाकी कंपूला आवाज दिला

" चला बे, बाहेर निघा परत गाडी बंद पडली. साSSला, पनवतीच लागलीय मागे." .

" कल्प्या, तरी सांगत होतो हा डब्बा नको म्हणून! " तक्रारीच्या सुरात माणिक म्हणाला. माणिक म्हणजे कंपूचा तोफखाना फरक फक्त इतकाच की हा कंपूवरच भडिमार करायचा.

कामथे काका (भाग तेरावा)

2
0

नंतर दादाने डीसीपी गर्दम ना फोन लावला. "सलाम, बडे चाचा! " दादा नम्रतेने म्हणाला. डीसीपींनी ओळखलं असावं. " कोण किशा? " ते तुच्छतेने म्हणाले....... " हां हां किशा, आपको पार्टीमे आमंत्रित कर राहा हूं. आज रात पार्टी है. आप आयेगे तो झगमग आ जायेगी . राह देखता हूं. गाडी भिजवा दूं क्या? " .... "किशा, तूने मुझे क्या तुम्हारा गँगमन समझके रखा है क्या? तुमने मुझे फोन करनेका डेअरींग कैसे किया?