प्रवास
दक्षिण दर्शन भाग १: रजनीकांतच्या गावात!
झेपावे जरा उत्तरेकडे- भाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन
झेपावे जरा उत्तरेकडे!
भाग १: मानससरोवरच्या मार्गावरील उत्तराखंड दर्शन
हिवाळा ऋतु सध्या शिखरावर आहे. डिसेंबरचा शेवट आणि जानेवारी म्हणजे संपूर्ण देशभर थंडीची लाट मध्य व दक्षिण भारतामध्ये जरी ही थंडी काहीशी सुसह्य असली, तरी उत्तर व उत्तरेकडच्या पहाडी भागांमध्ये बरीच जास्त असते. अशाच उत्तराखंडच्या काही भागात कौटुंबिक भेटीच्या निमित्ताने जाण्याचा योग आला.
माझी कमजोरी
माझी एक विचित्र कमजोरी आहे. बंद वाहन उदा. बस , टॅक्सी, रिक्षा यात बसल्यावर मला बाहेरचा भाग नक्की कोणता आहे हे कळत नाही. त्यामुळे मी बर्याच वेळा चालकाला चुकीच्ं मार्गदर्शन करतो. म्हणजे होतं काय की , समोरचा भाग मला कधी कधी ठाण्यातला वाटतो, तर कधी मुंबईतला, तर कधी मध्य प्रदेश मधे मी फिरलो व राहिलो
आठवणीचे छोटे छोटे तुकडे -मालेगाव क्याम्प .!!
घर नं -. ३३
सोनार गल्ली
मटण मार्केट जवळ
मालेगाव क्याम्प ,मालेगाव
जिल्हा ;-नासिक
पत्ता अजून पाठ आहे. आता आम्ही मोठे झालो होतो. पाचवीत गेलो होतो. मिरजे वरून सरळ मालेगावात आमचा तंबू पडला होता. ट्रकमध्ये सामान नि आम्ही आख्खे कुटुंब.सोनार गल्लीत घर घेतले होते.
एकदम जुने नि अंधारलेले.
आम्ही म्हणालो -
बाबा किती अंधार आहे ..?
छी... कसले हे घर....!!
लदाखची भ्रमणगाथा: भाग ११ (अंतिम): “चुकलेल्या रस्त्यावरून” जाताना
संपूर्ण उत्तर भारतामध्ये तीव्र थंडी पडली असताना आणि कश्मीरची हिवाळी राजधानी जम्मुला हलवली जात असताना भ्रमणगाथेतला अंतिम भाग लिहितोय. खरं तर अंतिम भाग न म्हणता पुढील प्रवासाच्या पूर्वीचा व तात्पुरत्या विश्रामापूर्वीचा अंतिम भाग म्हणणं अधिक योग्य होईल..... संपूर्ण प्रवासामध्ये, प्रवास वर्णनाचं लेखन करताना आणि आत्तासुद्धा “त्या” प्रवासाच्या अनुभवाच्या अत्यंत थरारक व विलक्षण आठवणी सोबत आहेत.......
गिमली ग्लायडर...
तारीखः २३ जुलै एकोणीसशे त्राऐंशी
बोईंग ७६७ हे विमान त्यावेळी नुकतंच तयार झालं होतं.
७६७-२०० हा त्याचा पहिला व्हेरियंट.
त्यावेळी हे विमान हा एक उगवता तारा होता.
असं या विमानात काय विशेष होतं?
..तर हे बोईंग कंपनीचं पहिलंवाहिलं नवसाचं "वाईड बॉडी" ऊर्फ "रुंदछाती" जेटइंजिन विमान होतं.
आठवणीतले गाव- मनमाड...!!
अगदी रखरखीत उन्हाळ्यात आम्ही मनमाडला आलो
फुफाट्यातून नागड्या पायाने चालता चालता तळपाय भाजल्याची अजूनही आठवण आहे
मनमाडला कसे आलो तर फारसे आठवत नाही .
परंतु आम्हाला छत्रे हायस्कूल मध्ये टाकले एवढे आठवते.
छान ईमारत होती. दगडी ईमारत. नि पुढे भव्य पटांगण.
तेव्हा त्या शाळेत सुत-कताई होती.
सुत कताई कशाशी खातात काहीच माहित नव्हते.
एअर क्रॅश-५- टेनेरीफ. (केएलएम आणि पॅन अॅम..)
पुन्हा तेच...
अपघात ही अनेक चुकांची किंवा वाईट घटनांची मालिका असते..
हे मी खूपदा म्हटलंय. नॅट जिओवरही प्रत्येक एपिसोडमधे म्हणतात..
पण माझ्या या लेखमालेतल्या एका लेखावर एका वाचकाने एक शब्द वापरला होता "नियतीचं षडयंत्र.."