मी मराठी

मराठमोळा's picture

पुप्याचा २४ कॅरेट वाढदिवस


दुपारी १:३० वाजता अचानक फोन खणखणतो. लॅपटॉप मधे खुपसलेले डोके उपसुन बघतो तर ह्यावेळी फोन म्हणुन विस्मयचकित.
"आज संध्याकाळी काय करतोयस रे?" तिकडुन प्रश्न.
"आज सोमवार आहे ना, मग संध्याकाळी वातावरण बघुन भातावर वरण घेउन टीवी बघत झोपी जाण्याचा विचार आहे." माझं उत्तर.
"अरे आज पुप्याचा वाढदिवस आहे, संध्याकाळी प्यार्टीचा प्लॅन आहे.७:३० ला २४ कॅरेट ला ये". प्रतिसाद.

पाषाणभेद's picture

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे


पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे
लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे.
प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे.
मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे.
प्रकाशित: १९८३
मुल्य: रू. ६५/-

बोलघेवडा's picture

माझी पुणेरी ऑरकुट प्रोफाइल


माझी पुणेरी ऑरकुट प्रोफाइल

ही प्रोफाइल वाचण्या आधी हे नियम वाचा.

  1. ही जोश्यांची प्रोफाइल नाही. वारंवार चौकश्या करू नयेत. अपमान होईल !
  2. स्क्रॅपबुक वर विनाकारण स्क्रॅप टाकु नयेत. उत्तरे मिळणार नाहीत.
  3. स्क्रॅपबुक वर थिललर वा आचरट प्रश्न विचारल्यास तशीच उत्तरे दिली जातील.स्क्रॅपबुक वर जाहिराती अथवा आचरट मजकूर टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
पाषाणभेद's picture

महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!


महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या मराठी जनांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र दिन चिरायू होवो!
आजच कामगार दिन ही आहे. कामगार दिनाच्याही शुभेच्छा!

महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकत्र येतो हा योगायोग छान आहे. मराठी जनता कष्ट करणारी आहे हे अध्यारूत होते.

छोटा डॉन's picture

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...


शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.
आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.
ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

* ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....

आर्तबंधू's picture

नियम


तुम्ही जवळ जवळ सर्व सामान्य नियम तोडत आहात.

आज ईथल्या मालकाने आम्हाला हे वाक्य सुनावले. नियम काय आहेत सांगायची तयारी नाही. पराईव्हसी पॉलिसि अजुन बनत आहे????

हा धागा ही मालकाच्या आग्रहास्तव.
तर मला जाणायचे आहेत ईथले सामान्य नियम. मी अजुन चार ठीकाणीही प्रतिसाद दिल्या नव्हत्या तर लगेच ह्यांच्या धमक्या सुरु... ईथे हुकुमशाही चालत असल्यास माझे खाते त्वरित रद्द करण्यात यावे.

राजे's picture

कट्टा - रंगपंचमीचा !!!


पहाटेचे ९-९.३० वाजले होते, कुठेतरी दुरवर "Bailamos" tonight we dance, I leave my life in your hands. वाजत होते व मी मस्त पैकी लोळत होतो गादी वर तोच मनात एक कुशंका आली आपली रिंगटोन पण हेच गाणे आहे नाही... आपला फोन तर वाजत नाही आहे ना ?? एखाद्या भय स्वप्रातून वेगाने व्हावे ह्या पध्दतीने मी झटापट करुन फोन हाती घेतला... ओह गॉड.. थॅक्यु... आईचा नाही आहे फोन...

पाषाणभेद's picture

'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!


आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन.

तमाम मराठी बांधवांना 'मी मराठी' च्या माध्यमातून 'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

मस्त कलंदर's picture

आई.. आणि आठवणीतील गाणी!!!....३


या चटोर शब्दावरून आणखी आठवलं... शाळेत असताना नाचकामात.. म्हणजे तेच ते हो.. स्नेहसंमेलनात, हिंदी गाणी एवढी बोकाळली नव्हती तेव्हाचं म्हणतेय मी.. तेव्हा कृष्ण-राधेची गाणी चांगलीच पॉप्युलर होती.. मला लहानपणी 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे गाणं पुन्हा एकदा त्यातल्या चटोर शब्दांमुळं आवडायचं.. पण जेव्हा हे गाणं टीव्ही वर पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा कृष्ण म्हणून धुमाळांना बघून बिचार्‍या कृष्णाची कीव आली..

मस्त कलंदर's picture

गाणी.. आईच्या आठ्वणीतली .. २


भा. रा. तांबेंशी ओळख तशी खूपच लवकर झाली.. घरी एक पाठ्यपुस्तक होते... सगळी चित्रे हिरव्या रंगात छापलेली होती.. (अंमळ हिरवा माज त्याकाळी पण अस्तित्वात होता की काय!!!) नि त्यात कविता होती:

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll