दिपालीताईने परवा दुधीचे पराठ्याची पा़कृ टाकली, आमचं तोंड खवळलं...
आता असं नाही की मला दुधीचे पराठे आवडतात..आवडतो दुधीचा हलवा. तर पेश करतो आहे दुधी हलवा.
साहित्य :
१. १ दुधी - धुवून आणी साल काढून.
२. २५० ग्रॅम खवा किंवा २ मोठे ग्लास दुध
३. ३-४ चमचे साजूक तूप
४. ८-१० मोठे चमचे साखर
५. सजावटीसाठी काजू, बदाम, बेदाणे.
कृती:
सर्वप्रथम साल काढलेला दुधी किसून घ्या.
एका नॉन स्टीक पातेल्यात अथवा लोखंडी कढईत ३-४ चमचे साजूक तूप घ्या.
तूप गरम झालं कि त्यावर दुधीचा किस टाका.
दुधीचं सगळं पाणी अटेपर्यंत हालवत रहा.
पाणी अटल्यावरही २ मिनिटे दुधी खरपूस होईपर्यंत भाजा.
आता त्यात खवा हाताने चुरून टाका. खवा नसल्यास २ मोठे ग्लास दुध टाका.
हे मिश्रण मध्यम आचेंवर हालवत अटवा.
दुध पुर्णपणे अटल्यावर त्यात साखर घाला.
सगळं मिश्रण एकजीव होऊ द्या. थोडा वेळ अटवा.
थंड झाले की वरून काजू-बदाम-बेदाण्यानी सजवून खा.
(हा हलवा गरम गरम खायलाही मस्त लागतो.)
बनवण्यासाठी वेळ : एक ते सव्वा तास.

हा प्रभो काय गणपा काय अगदी
सुरेख झालाय हो हलवा
अवांतर : द्रुश्ट काढुन झाली कि हा हलवा सगळ्याना वाटता येइल
लै भारी रे प्रभो ! मस्तच. (
लै भारी रे प्रभो !
मस्तच.
( चुचु शी सहमत
)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लै भारी !
लै भारी !
वाह भाई वाह!
लै भारी प्रभो!!
वा
आधी वाटलं एका लटकत्या दुधीचं चित्र देऊन सांगताय की काय आता दुधी हलवा.
बाकी चुचुतैंशी "आम्हा" हा शब्द वगळून अवांतरासह सहमत
-ऋ
-ऋ
+१
चुचुतैंशी असलेल्या अपवादासहित-सहमतीसह.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
च्यायला ..
च्यायला प्रभो तर लै भारी कुक निघाला.
बाकी आम्हाला भोपळ्याचे काहीच आवडत नसल्याने केवळ फोटो आवडला.
खाऊन बघ रे डॉन्या...... मलाही
खाऊन बघ रे डॉन्या......
मलाही भोपळ्याची ही एकच गोष्ट आवडते.
बाकी आम्हाला भोपळ्याचे काहीच
बाकी आम्हाला भोपळ्याचे काहीच आवडत नसल्याने केवळ फोटो आवडला.
डॉनरावाशी सहमत
बाकी प्रभ्या म्हणजे गरिबांचा गणप्या!!!!
-निखिल
प्रभो
खतरनाक फोटो आला आहे.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
वाहवा!!! मस्त रे.. जोरदार
वाहवा!!!
मस्त रे..
जोरदार दिस्तोय.
गेल्या महिन्यातल्या माझ्या दुधीहलव्याच्या 'कटु' आठवणी जाग्या झाल्या:(
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा