अटकेपार झेंडे फडकवले - छोटा डॉन यांनी भाषिक भिंती ओलांडल्या..
आमचे मित्र, मी मराठीचे ज्येष्ठ व सन्मान्य सदस्य आणि ब्लॉगर श्री छोटा डॉन यांच्या आयपीएल पुणे टीम आणि पुणेरी पाट्या लेखाने सध्या जालावर आणि माध्यमांमधे धुमाकुळ घातलेला आहे. या लेखाची सर्वत्र प्रशंसा होत असतानाच श्री छोटा डॉन यांच्या लेखाने भाषिक भिंती ओलांडुन मराठी आंतरजालाला मानाचा नवा शिरपेच चढवला आहे. श्री छोटा डॉन यांच्या नावासह व त्यांच्या ब्लॉगच्या युआरएलसह त्यांच्या लेखाचा उल्लेख पुणे मिरर या वृत्तपत्रात आज, रविवार दि. २८ मार्च २०१० रोजी आला आहे. यामधे श्री छोटा डॉन यांच्या लेखाचा कसा झपाट्याने प्रसार होत आहे हे लिहिलेले आहे.
पुणे मिररमधील लेखाची युआरएल: http://epaper.timesofindia.com/Daily/skins/MIRRORNEW/navigator.asp?Daily...
या लेखाचा पेज ग्रॅब http://picasaweb.google.com/prasanna.keskar/ChhotaDon# येथेही आहे.

हा लेख छोटा डॉन ह्यांनी त्यांच्या ब्लॉग वर व मी मराठी संकेतस्थळावर सर्व प्रथम लिहला व नंतर वायू वेगाने हा लेख सर्व महाजालात पसरला !
भाषिक भिंती ओलांडुन मराठी आंतरजालाचा झेंडा इंग्रजी माध्यमामधे फडकावल्याबद्दल श्री छोटा डॉन यांचे अभिनंदन.
.jpg)
(विषय दिलेला नाही)
वाह! डान्या मनापासून
वाह! डान्या मनापासून अभिनंदन!!
आणि अश्या भाषेपार अधिकाधिक झेंडे रोवण्यासाठी अनेक शुभेच्छा
-ऋ
-ऋ
वा...
वा!!!
वा वा! पुणे मिररचेही अभिनंदन
वा वा! पुणे मिररचेही अभिनंदन
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
हाण्ण तिच्यामायला! डान्या इज
हाण्ण तिच्यामायला! डान्या इज लिजंड! ज्यांना इंटरनेटावर बातमी पुर्ण वाचायाची आहे त्यांनी पुणे मीरर च्या वेब वर जाउन पान नं २२ शोधा!
डान्या शिंच्या पार्टी कधी देतोस बोल?
-Nile
पुर्ण बातमी येथे आहे.
पुर्ण बातमी येथे आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सही!
डान्राव लै धमाल उडवलीत राव!!!!!!!
असेच म्हणतो.
>>>डान्राव लै धमाल उडवलीत राव!!!!!!!
-दिलीप बिरुटे
डान्राव हाबिणंदण
ये ढिंगच्यांग ढिच्यांग , ढिंगच्यांग ढिच्यांग
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
रोचक माहीती गुगल ला सर्च
रोचक माहीती
गुगल ला सर्च वर २३० रिझल्ट !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बर्याच वेळा
बर्याच वेळा फॉरवर्डेड इमेलच्या मूळ लेखकाला श्रेय मिळतेच असे नाही. त्यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ह्या लेखाला सकाळ, पुणे मिरर यांनी छोटा डॉन यांच्या नावासकट दिलेली प्रसिद्धी पाहून आनंद झाला.
जबरदस्तऽऽऽऽऽ
जबरदस्तऽऽऽऽऽ
आहा रे डॉण्या..परत एकदा
आहा रे डॉण्या..परत एकदा अभिनंदन.
आता तरी त्या 'सकाळ' वाल्यांचे डोळे उघडतील आशी आशा आहे
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
धन्यवाद मित्रांनो ...
छ्या, लैच्च हिट्ट झाले बॉ हे मजाक मजाकमध्ये लिहलेले आर्टिकल ...
आज सकाळी प्रसनदांचा फोन आला व त्यांनी 'पुणे मिरर'च्या लेखाची बातमी दिली. वाचुन खुप आनंद झाला, एका मराठी ब्लॉगची दखल आता इंग्रजी मिडियाने घेतली ह्या आनंदी बातमीने आमच्या आजच्या दिवसाची सुरवात झाली.
श्री. दिपक अय्यर ह्यांच्याशी माझा त्यांच्या ब्लॉगवर माझी पोस्ट इंग्रजी भाषांतरासाठी वापरण्याबाबत पत्रव्यवहार झाला होता, मात्र त्याचे परिणीती इथपर्यंत होईल अशी कल्पना नव्हती. दिपकचेही आभार ...
बाकी आमच्या लेखनाला नेहमीच प्रोत्साहन देणारे आमचे मित्र व मीमराठी.नेट आणि मिपाचे आमचे जुने दोस्त ह्यांचे आम्ही नेहमीच ॠणी आहोत.
धन्यवाद दोस्तांनो ... !!!
जब्बरदस्त !!
जब्बरदस्त !!
मस्त
मस्त
सही...
सही...
दणदणीत हाबिनंदन डानराव
दणदणीत हाबिनंदन डानराव
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हाबिणंदण
जोरदार हाबिणंदण डान्राव.
छ्या, लैच्च हिट्ट झाले बॉ हे मजाक मजाकमध्ये लिहलेले आर्टिकल ...
च्यायला बघा. मजाक मजाक मध्ये लिहिले तर एवढे हिट झाले. मग शिरीयसली लिवले तर किती हिट्ट होईल बघा. लिहिते रहा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
जोरदार बॅटींग!!! डॉन भाऊ...
जोरदार बॅटींग!!!
डॉन भाऊ... मनापासून अभिनंदन!
- प्राजु
...
अभिनंदन सरकार
झक्कास
पुन्हा एकदा अभिनंदन, डॉण्राव!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
डॉन्राव लै वेळा अभिनंदन! अशीच
डॉन्राव लै वेळा अभिनंदन! अशीच बॅटींग चालू द्या!!!१
डोन्राव,
डोन्राव,
अभिनंदन...
मस्त..!
डानरावांचे परत एकदा
डानरावांचे परत एकदा अभिनंदन..
(यार आता डॉनरावांच्या अभिनंदनाचे टेंप्लेट बनवुन ठेवावे का सारखे वापरावे लागते)
-निखिल
मस्त रे डाण्या. या
मस्त रे डाण्या. या आनंदाप्रीत्यर्थ एक पार्टी झालीच पाहीजे ...
-पुण्याचे पेशवे
हेहेहेहे
म्हणे झालीच पाहिजे! डान्राव काही बोलताहेत का? नाही. मग?
देऊ की ..
रातीच्याला मळयातल्या बंगल्यावर या !
आज बोकडं कापतोय बोकडं ...
थितंच...
थितंच हावोत. या जरा मागल्या बाजूला. थोडा घसा गरम करतो तुमचा. मग कापायचं पाहू... बोकड म्हणतो मी...
अरे वा..
डॉन्या, अभिनंदन.. वाढदिवसाची ही भेट छानच आहे की..
स्वाती
(विषय दिलेला नाही)
काल पुण्याच्या रेडियो सिटीवर
काल पुण्याच्या रेडियो सिटीवर पण आम्ही डान्रावांच्या पाट्या ऐकल्या.... अभिमान वाटला!!
म्हणजे आमचा डॉन्या.. (आमचा
म्हणजे आमचा डॉन्या.. (आमचा बंडू बावळट म्हणा हवे तर
) जग प्रसिध्द झाला तर वा वा !
* खरोखर आनंद वाटला !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
डान्या, पार्टी कधी?
डान्या, पार्टी कधी?
हेच म्हणतो!
हेच म्हणतो!
-Nile
वा वा वा
डानराव अभिनंदन!!!
अभिनंदन !!!
उत्तम!
डानरावांची डंका आणखी दुमदुमली ह्याबद्दल आनंद आहेच
पण जास्त आनंद वाटला तो ह्यासाठी, की, पुणे-मिररच्या श्री.दिपक अय्यर ह्यांनी डान्याच्या ब्लॉगवर रितसर परवानगी मागुन योग्य ते श्रेय देऊन बातमी छापली.
उगाच "अनामिक लेखकाला" वगैरे लिहुन पुर्वपरवानगीशिवाय उचलेगिरी करुन कोत्या मानसिकतेचं प्रदर्शन नाही मांडलं.
उत्तम! अतिउत्तम!!
संतोष..परमसंतोष!!!
डानराव,
आता लवकर हिकडला दौरा जमवाच..तुमच्या शेलिब्रेशनसाटी बिजली नारायनगावकरनीला सुपारी दिऊनच आलोया..वर पुन्ना इंपोरटॅड स्क्वाच हिस्की आनुन ठिवलीया....तुमी फकस्त येनेचे करावे ही णम्र इनंती!
वाह वाह ...
>>..तुमच्या शेलिब्रेशनसाटी बिजली नारायनगावकरनीला सुपारी दिऊनच आलोया..वर पुन्ना इंपोरटॅड स्क्वाच हिस्की आनुन ठिवलीया
हांग्गाश्शी !!!
एकदम खंग्री जंगी इंतजाम केला आहे की, साला आपला दिल खुष झाला एकदम.
अजुन येक इनंती धमालराव, जरा ह्यावेळी 'शिकारीचे ( नाय नाय, तुमच्या कथेबद्दल न्हाई बोलत नी, ती आपली डब्बलबारीच्या बंदुकीची शिकार हो )' जमवाच, लै दिवस झाले तरस मारुन ...
हा हा हा.... आवो तरसं कसली
हा हा हा....

आवो तरसं कसली मारता, म्हनत असाल तर रान उठवु की! काय गवा, डुक्कार घावंलच की हाकार्यात.
ह्या टैमाला दुनाळी कशाला, जरा जुळणी हु द्या, तुमच्या हातात शॉटगनच द्येतो का न्हाई बघा...मग करा तिच्यायला चिंधड्या!
>>एकदम खंग्री जंगी इंतजाम केला आहे की, साला आपला दिल खुष झाला एकदम.
मंग! साला आपुन तुमाला पार्टी मागनार न्हाई...तुमचं कवतिक कराया आपुन देनार जंगी बार उडवुन! च्याबायलीचं..गावकर्यांस्नी म्हनावं "करा मज्जा..."
-धमालराव झेंडे-पाटील.
पाटील?
पाटील? आनी जुळणी हु द्याची भासा? अरारारारारा... पार आबरू काढलीसा राव!
जाव द्या ...
ते ऑलरेडी गेले जुळणी करायला.
तुम्ही बोला, काय खळबळ आहे तुमच्याकडे ?
काही नाही
काही नाही राव. दिवसभर आंतरजालीय दंगा करायची संधी नव्हती. ती आत्ता साधली थोडीशी.
हा हा हा....
ही जुळणी ती जुळणी नव्हंच टिपणीससायेब
संदर्ब पघा की...तरसं, कोल्हे गवे अशा शिकारीबद्दल चाललंय राव
हा वेळेला १-२ ससे मिळवलेत तरी
हा वेळेला १-२ ससे मिळवलेत तरी पुष्कळ.... (संदर्भः सिनेमा'नवरी मिळे नवर्याला' हा सिनेमा)
-पुण्याचे पेशवे
फिकीर नॉट! ह्या टैमाला जे
फिकीर नॉट! ह्या टैमाला जे जमंल त्ये जमंल. जास लोड न्हाई घ्यायचा
पट्ट्यात घावलं तं कुत्तरडं बी फरफटत न्हिऊ की
मग काय झालं??
मोठा तीर मारला की काय डान्रावांनी?? म्हणे अटकेपार झेंडे लावले. गेले चार दिवस ऐकतोय ह्या डान्याचं कवतिक!!
जिथे तिथे प्रसिद्ध झालाय मेला!! आम्हाला काय पुणेरी पाट्या टाकता...आपलं लिहिता येत नाहीत की काय?
हुं!! ह्या पुनेरिंचं आणि डान्याचं काहीतरी साटंलोटं असावं त्याशिवाय लिहितात का हे कौतुकाचे चार शब्द!!
हुश्श!! मनातली मळमळ बाहेर पडली!!!
आता तोंडदेखली प्रतिक्रिया द्यायला मोकळा झालो - वा वा वा!! डान्राव म्हंजे काय विचारता बॉस. अहो ह्याचे आंतरजालीय पाळण्यातले पाय मी कधीच ओळखले होते. असेच लिहा आणि मोठे व्हा!!!
पक्के पुणेरी
रंगाशेठ पक्के पुणेकर शोभलात हो.
सार्वजनिक आणि खासगी बोली कट टु कट बोली जमली आहे, अगदी डिट्टो वरखुंडकर शास्त्रीच !
( ता.क. : नावात चुक असु शकते शास्त्राच्या )
+१
रंगाशेठ फुल फार्मात!
अवांतरः डान्या, येरकुंटकरशास्त्री.
द्या
यांना 'महावस्त्र' द्या, 'शिरिफळ' द्या.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हा हा हा... फक्त
हा हा हा...
फक्त अरण्येश्वरमधला बंगला डोळ्यावर आला नाही म्हणजे मिळवल;)