"अरेच्या! थेटरात बरीच गर्दी आहे.. आत कोणीच कसं नाहि?"
"स्क्रीन चुकलो बहुतेक"
"नाहि रे स्रीन१ च आहे."
"साब, तिकीट... वो सीटस है आपके.." टॉर्च अंधारात लकाकला
थोड्या वेळात आमच्यासारखे वाट चुकलेले आणखी ८-१० जीव त्या स्क्रीन मधे जमले. आणि त्या ८-१० प्रेक्षकांना पॉपकॉर्न आणि सामोसे विकायला आणखी १२-२० लोक जमले..
"आयपीएल जोरात चालु आहे दिसतंय.." असे बोलत असतानाच तब्बल १६ रिळे दाखवणारे एक सर्टीफिकेट झळकले.( मला ही रिळं बघायला उगाच आवडतं)
आणि पडद्यावर "वेल डन अब्बा" असं नाव झळकलं.. सोबत एका "वेल" चं चित्र होतं. तेव्हाच लक्षात आलं की कथेत "वेल" घडण्याबरोबरच ही "वेल" आहे.
कथेला सुरवात होते ते बोमन इराणीपासून... तो ड्रायव्हर असतो.. त्याच्या मालकापासून १ महिन्यांची रजा काढून तो घरी मुलीचं लग्न करायला जातो. आणि चक्क तीन महिन्यांनी परततो.. मालक वैतागून त्याला काढायचा निर्णय घेतो. त्याला ३ महिने तो काय करत होता हे सबोमन इराणी सांगू लागतो त्याची ती कथा म्हणजे "वेल डन अब्बा"
हैद्राबाद जवळाच्या छोट्या खेड्यात घडणारी ही कथा. गावाला आपल्या मुलीसाठी नवरा शोधायला गेलेल्या बोमन इराणीच्या हाती लागते "कपिलधारा" नावाची योजना. ज्यात दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना फुकट विहिर खोदून दिली जाणार असते. त्यासाठी हा इसम सगळ्या सरकारी नोकरांना, ठेकेदारांना, इंजिनियरला सरकारी पैशातील हिश्शा देऊन सरकारकडून पैसे तर मिळवतो.. मात्र त्या लोकांचे हप्ते देण्यात सारे पैसे संपून जातात आणि त्याच्या हाती विहीर बनल्याचे सर्टिफिकेटही येते मात्र प्रत्यक्षात विहिर बनत नाहि.
अश्यावेळी तो काय करतो? आपले पैसे परत मिळवतो का? त्याला त्याची विहिर मिळते का? हे पहाण्यासाठी चित्रपट बघाच!
चित्रपटाचा सर्वात मजबूत धागा म्हणजे कलाकारांचा अप्रतिम अभिनय. अत्यंत अकृत्रिम अभिनयाने प्रत्येक कलाकार काम करतो. याशियाय कथेतून दिसणारे सत्य सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर छान प्रकाश टाकते. सरकारी योजनांचे पैसे सरकारी अधिकारी खातात म्हंजे नक्की कसे ते अगदी रोचक पद्धतीने - सविस्तर - दाखवले आहे. विहीर परत मिळवण्यासाठी वापरलेली ट्रीक तर लाजवाब.
याशिवाय अर्थपूर्ण गाणी, आंध्रप्रदेशमधील ग्रामीण भागातील नेहमीच्यापेक्षा वेगळी लोकेशन्स, आणि आंध्र-मुसलमानांचा बोलण्याचा लहेजा यांची बेमालूम मिसळण चित्रपटाची लज्जत वाढवते.
उत्तरार्धात चित्रपट लांबला आहे. शिवाय बोमन इराणीचा जुळा भाऊ, त्याची बायको, इन्पेक्टरची, इंजिनीयरची बायको वगैरे पात्रे विनाकारण आहेत. शिवाय फार लॉजिक लावायला गेलात तर कदाचित चित्रपटाची मजा निघून जाईल. मात्र ह्या तृटींसकट जो संदेश चित्रपटाला द्यायचा होता तो चित्रपट बरोब्बर देतो. आणि सर्वसाधारण विचार केल्यास श्याम बेनेगलांचा हा चित्रपट कसा तयार झाला आहे विचाराल तर मी म्हणेन "वेल डन"!
अशाच विषयावरचा मकरंद
अशाच विषयावरचा मकरंद अनासपुरेचा एक मराठी सिनेमा पाहिला होता.. नांव आता आठवत नाही.. पण बोम्मनचा चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळा नि थोडा या चित्रपटापेक्षा सुसह्य असेल असे वाटते..
अवांतरः १००००बीसी हा चित्रपट पाहाताना खूप कंटाळा आला म्हणून सिनेमागृहातली डोकी मोजली तर ती पण इन मीन नऊच होती.. नि परवा रिंग रिंगा पाहताना तर केवळ चार..!!! त्यातलं पण एक मधूनच उठून गेलं..
सिनेमाचे नांव आठवलं.. "जाऊ
सिनेमाचे नांव आठवलं.. "जाऊ तिथं खाऊ"!!! यात बर्याच जणांना अभिनय येत नाही.. ज्यांना येतो.. त्यांनी ओव्हर अॅक्टींग केलीय... नि तर्क वैग्रे गोष्टींना अंमळ **** मारण्यात आलंय.... त्यामुळे बोम्मनचा चित्रपट याहून बरा असेल असे म्हटलेय...
ॠ, ऑनलाईन लिंक असेल तर दे रे या वेल डन् ची!!!
+१
>>ॠ, ऑनलाईन लिंक असेल तर दे रे या वेल डन् ची!!!
+१, मकशी सहमत.
परिक्षण वाचुन चित्रतट पहावा असे वाटत आहे, ह्याच विषयावरचा मराठी 'जाऊ तिथे खाऊ' हा सिनेमा मला कंन्सेप्च्युअली खुप आवडला होता.
अर्थात आता इथे खुद्द 'बोमन इराणी' सारखा अभिनयाचा शेहनशहा असल्याने हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे.
ॠषिकेशचे आभार, छान परिचय दिला आहेस !
परिक्षण की परिचय???? एक काय
परिक्षण की परिचय????
एक काय ते नक्की कर....
अधिक माहितीसाठी कुणाला संपर्क साधायचा तुला ठाऊक आहेच!!!
विरंगुळा
परिक्षण की परिचय? सदर लेखन विरंगुळा सदरात टाकले आहे. ज्याने त्याने आपल्या आवडीप्रमाणे विरंगुळा करून घ्यावा
बाकी ऑनलाईन लिंक नाहि माहित मात्र टोरेंटवर काही कॉपी आल्या आहेत.
मी जाऊ तिथे खाऊ बघितलेला नाहि मात्र इथे सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बोमन इराणीने फारच सुरेख काम केले आहे. मिनिषा लांबाने देखील चांगला अभिनय केला आहे.
-ऋ
-ऋ
अरे हा तिरकस प्रतिसाद डॉनला
अरे हा तिरकस प्रतिसाद डॉनला आहे.. तुला नाही..
त्याला कळाले असेल अशी अपेक्षा आहे.. :|
असो.
>>अरे हा तिरकस प्रतिसाद डॉनला आहे.. तुला नाही..
असो.
आम्ही कळुनही न कळाल्याचा आव आणला आहे हे तुम्हाला कळाले असेलच ही अपेक्षा आहे .. :।
>>>आम्ही कळुनही न कळाल्याचा
>>>आम्ही कळुनही न कळाल्याचा आव आणला आहे हे तुम्हाला कळाले असेलच ही अपेक्षा आहे .. :।
ते लक्षात आले होते रे.. पण त्यात तो बिचारा ॠ अडकला ना.. म्हणून सांगितले...
तुम्ही काय करू शकता याबद्दल आमच्या मनात बिल्कुल शंका नाही!!!
काय चालू आहे हे तिरके तिरके
काय चालू आहे हे तिरके तिरके ???
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अजून हा चित्रपट आठवला नाही,
अजून हा चित्रपट आठवला नाही, पण वरील वाचल्यावर एक मराठी चित्रपट आठवला ज्या मध्ये विहीर खोदलेली नसताना देखील हीरो पैसे घेऊन सामाजिक संदेश देणाचा प्रयत्न करतो.. नाव आठवत नाही आहे त्या चित्रपटाचे..
* मिळाला तर नक्की बघेन.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
इन्टरेस्टींग.
बोमन आपल्या आवडतो. अश्या विषयावर तर तो धमाल काम करतो. साला लै पिच्चर बघायचे राह्यलेत त्याचे. भारतात आल्यावरच जमलं तर.
-Nile
चित्रपट पाहायला
चित्रपट पाहायला आवडेल..
थेटरात जाउन पहावा म्हणतोय..
-निखिल
मराठी वरून हिंदी...
उलटी गण्गा ह्यालाच म्हंतात का वो??
ओ
काय राव आमच्या म्हराटीची च्येष्टा करून र्हायलाय वो. मराठीवरूनच हिंदी पिच्चर बनवित्यात हो. आवो आमचा 'श्वास' आला न मंग हे लोग जल्ला हा आजार नि त्यो आजार धरून पिच्चर काढू र्हायलेत आता. आम्चे नाटक घ्येतले नि '(नवा) गोलमाल' काल्ढा. 'डोंबिवली फास्ट' ची कापी बे क्येली. आमच्या दादा कोंडक्यांच्या पिच्चरवून त्ये गोंद्याचा 'जिस देश में गंगा रहता हय' काल्ढा. आनि किती उधारनं द्याची हो. उगा कायबाय बोलू राहिले गा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
वाह!
>अश्यावेळी तो काय करतो? आपले पैसे परत मिळवतो का?
बोमन इराणी, शाम बेनेगल म्हणजे काहीतरी खास असावा. असो तसा हा फॉर्म्युला काही फार वेगळा वाटत नाही.
वाचताना अमोल पालेकरचा नरम गरम आठवला.
ह्म्म..
परीक्षण वाचून चित्रपट बघावा असे वाटू लागले आहे,
स्वाती
वर मकीने म्हणल्याप्रमाणे ह्या
वर मकीने म्हणल्याप्रमाणे ह्या चित्रपटाचे प्रोमोज पाहुन सगळ्यात आधी 'जाउ तिथे खाऊ'चीच आठवण झाली.]
चित्रपटाचे आणी चित्ररसिकांचे परिक्षण मस्तच [;)]
जास्त बिलंदर
झीट आलेला माणुस ही बाटली संपल्याची खूण आहे!!!
झीट आलेला माणुस ही बाटली
झीट आलेला माणुस ही बाटली संपल्याची खूण आहे!!!
सहजकाका.. परा तुम्हांला छुपा संदेश देतोय पहा काहीतरी!!!