शुक-सारिका

वरदा बुक्सचे प्रकाशक ह अ भावे यांच्या दरबारी आमची हजेरी अधुन मधुन असतेच. आजच बसलो होतो. त्यांना आंतरजालीय वाद व गमतीजमती याबाबत गप्पा मारत माहिती देत होतो. तेवढ्यात त्यांना पुस्तक मागणीचा फोन आला.ग्राहक अधिक माहिती विचारत होता. "शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. ....."भावे नीरगाठउकलतंत्राने फोड करुन फोनवर सांगत होते
तोता मैना कि कहानी तो पुरानी हो गय़ी! आता मला सांगा जुन्या बाटलीत नवी दारु घ्यायला आवडेल कि नव्या बाटलीत जुनी दारु घ्यायला आवडेल. ओ काय लावयल! पहिली बाट्ली फोडा दारु महत्वाची. हॆहॆहॆ आता कसं बोल्लात! चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल असेलच ही शुकसारिका म्हणजे काय?
हम बेवफा हरगीज ना थे ! पर हम वफा करना सके। पुरुष बेईमान कि स्त्री चारित्र्यवान हा वाद आंतरजालावरही जुना आहे व जालाबाहेर ही जुनाच आहे. हा विषय काही क्षणाची सोबत नसुन अनंत काळची सोबत आहे. जालकरी स्त्री पुरुषांना चघळायला तो आवड्तो. काहींना झाडावर बसुन पहायला आवडतो. संस्कृत साहित्यात या वादाविषयी अनेक पुस्तके प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. त्यापैकी शुकसारिका या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद हिंदीत तोता- मैना नावाने फारच लोकप्रिय आहे मुख्यत: या प्रेमाच्या कथा आहेत व प्रेमात शृंगाराला महत्व आहेच. त्यामुळे काही शृंगारकथा या अश्लिलते कडे झुकलेल्या असतात हा आक्षेप असतोच. चटपटीत करताना हिंदी रुपांतरात देखील तसे घडलेले आहेच. मुळ संस्कृत साहित्यात श्लील अश्लिल असा भेदच नाही. सर्व काही स्पष्ट आणि उघड असते. परंतु मराठी अनुवादात हा संयम पाळला आहे. कुटुंबात वाचण्यायोग्य होईल याची काळजी घेतली आहे.
या तेवीस कथात एक कथा सारिका सांगते व त्याला उत्तर म्हणुन शुक चारित्र्यहीन स्त्रीची कथा सांगतो. अशी ही कथांची प्रश्नोत्तरे या तेवीस कथात चालू असतात. शेवटच्या कथेत शुक आणि सारिका यांचे एकमत होते व ते सुखाने संसार सुरु करतात.
मूळ पुस्तक हे संस्कुत असल्याने प्राचिन भारतातील समाजजीवनाचे प्रतिबिंब त्यात पहायला मिळते. शेकडो वर्षांपुर्वीचा भारतीय समाज कसा होता याचेही दर्शन या कथातुन होते. या कथांचा समाजाशास्त्रीय अभ्यास कुणी केला नसावा. या कथेत राजे राण्या प्रधान व प्रधानपुत्र श्रेष्ठी व व्यापारी, नर्तिका व नायिका, साधु व दरोडेखोर अशी नाना प्रकारची व्यक्तिचित्रे आढळतात.
प्रस्तावनेत ह.अ. भावे म्हणतात," संस्कृत साहित्यात शुकबहात्तरी व कोकिलाछत्तिशी असे अर्थ असलेली दोन पुस्तके उपलब्ध आहेत परंतु मला एक शुकसारिका असे नाव असलेले हस्त लिखित प्राच्यविद्या संस्थेत पहायला मिळाले."
" शुकसारिका हे संस्कृत पुस्तक ही मूळ तीनचार संस्कृत ग्रंथांवर आधारित आहे. यातील मूळ कथा जनसमुहात प्रचलित असलेल्या लोककथाच आहेत.भारतीय संस्कृतीत फार पुर्वीपासून कथाकथन होते. त्या कथाकथकांची जमात विसाव्या शतकापर्यंत कथाकथन करुन उदरभरण करणारी आढळली आहे. या चित्रकथीजवळ एक पेटी असते व त्यातील चित्रे दाखवत ती कथा सांगतात असे चित्रकथील मी स्वत: लहानपणी पाहिले आहे"
या कथा चिरतरुणांची मन रिझवतात व चारित्र्य संपन्नतेचे ही महत्व पटवतात किमान तसा प्रयत्न करतात. आताच्या काळात चारित्र्य संपन्नता गोष्ट जरा अवघडच बनत चाललीय असो. कथेची नावे मोठी मजेशीर व सूचक असतात.
उदा. श्रेष्ठीपुत्र श्रीयाळ व भंगीकन्या; मदनपाल, कुत्रा व हिरामण पोपट; राजकन्या पद्मावती व साधु विद्यानंद सरस्वती; नीतिसेन विमला व प्रेमलता.
असो एवढा परिचय बास झाला.
पुस्तकाचे नांव- शुक-सारिका
संपादक - प्रकाशक:- ह. अ. भावे; वरदा प्रकाशन प्रा.लि ३९७/१ सेनापती बापट मार्ग पुणे 411016
फोन 25655654 ईमेल पत्ता- नाही
पृष्ठे- २१६ मूल्य- १५०/- (एकशे पन्नास फकत)
.jpg)
धन्यवाद काका!
या पुस्तकाची खरेदी करायचीच आहे. संमेलनात स्टॉलवर आहे का? असेल तर उद्या तिथंच घेता येईल.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
स्टॉल नाही
वरदा बुक्सचा स्टॉल नाही संमेलनात. त्यांची पुस्तके अप्पा बळवंत चौकात प्रमुख विकेत्यांकडे नक्की मिळतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
या कथा चिरतरुणांची मन रिझवतात
या कथा चिरतरुणांची मन रिझवतात व चारित्र्य संपन्नतेचे ही महत्व पटवतात किमान तसा प्रयत्न करतात. आताच्या काळात चारित्र्य संपन्नता गोष्ट जरा अवघडच बनत चाललीय असो >>>
एक नण्बर !!
कधी वाचेल ते आठवत नाही ..पण आहे क संमेलनात ?
वाचायाला हवेच.
वाचायाला हवेच.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वाचायला हवे. आसेल तर पाठव.
वाचायला हवे. आसेल तर पाठव.
वाचले आहे
आता पुन्हा वाचायचे आहे.