एक सोडून..... सगळ्या माझ्या...
दाद्या, उठ आता, आठ वाजले शाळेत जायचे नाही आहे, चल लवकर तयार हो - तायडी
शालेय दिवसाची ही हमखास सुरवात, कधी चुकली नाही. मी सोडून बाकी सर्व मानवप्राण्यांना वाटायचे हा दहावी पास करेल का ? ढ नव्हतो पण अभ्यास म्हणजे मला डाव्या हातचा मळ वाटायचा.. अभ्यास हा परिक्षेच्या १२ तास आधी करावयाची कृती आहे ह्यावर दृढ निष्ठा. त्यात माझे पराक्रम असे की शाळेत व गल्लीत बाकीच्या मुलांना सांगायचे की त्या जैनाच्या मुलाबरोबर राहू नकोस, कार्ट कधी काय करेल ह्यांचा नेम नाही. शाळेला जातो म्हणून सरळ शाळेत पोहचेण ह्याची खात्री माझी मला पण नसे, कधी नदीवर जा कधी रंकाळ्यावर.. कधी पतंगाच्या नादी लागून तासंन तास मांजा व पतगं घेऊन गल्ली बोळ वळू सारखं हिंडणे... तर मी हा असा नमुना ! त्यात दहावीचे वर्ष त्यामुळे बाकीच्या मुलाचे आई-वडील डोळ्यात तेल सदैव तयार मुलांना माझ्यापासून दुर ठेवण्यासाठी... असो.
तर दहावीचे वर्ष म्हणून सकाळी शाळेत एकतास आधी बोलवले जायचे व घरच्या अत्याधिक दबावामुळे (मारामुळे) मला ही जावे लागत असे सकाळच्या एक्ट्रा क्लाससाठी. बेंचच्या चार लायनी वर्गात दोन लायनी मुलींच्या व दोन मुलांच्या. एक दिवस अचानक बाजूच्या लाईन मध्ये एक नवीन मुलगी दिसली, गोडशी.. सुंदरशी... तीने देखील माझ्याकडे पाहीले व एक हास्य केले. झाले माझ्या हदयाचा सेंसेक्स गडबडा लोळू लागला, आता पायाच्या तळव्यांना घाम फुटला, कानाची पाळी लालबुंद झाली, नको नको ते भास झाले. तोच कानाखाली काहीतरी वाजले म्हणून ताळ्यावर आलो तर इंग्रजीच्या पंतोजींनी वाजवलेली होती माझ्या श्रीमुखावर. पहिलीच नजरानजर व हा मध्ये दुष्ट मास्तर ! छे ! छे ! आब्रु गेली तीच्या समोर.
माझी ही अवस्था कळली माझ्या वर्गमैत्रीण सिमाला. तीला काही चिंचा, पेरु प्रकारातील लाच दुपारच्या जेवणाच्या वेळी दिली तीने दुसर्या दिवशी नाव-गाव-पत्ता-बापाचे नाव-बापाचे काम धंदा इत्यादी माहीती काय जवळ जवळ तीची जन्मकुंडलीच माझ्याकडे दिली. त्यानंतर जसे नवीन राज जन्माला आला, सगळे उलटे सुलटे धंदे बंद, शाळेत वेळेवर, सर्व क्लास मध्ये हजर व सरांच्या, मॅडमच्या प्रत्येक प्रश्नावर हात वर. ! सगळेच दंग ह्याला काय झाले अचानक. दिवस रात्र फक्त अभ्यास अभ्यास व अभ्यास.. घरी पण हा बदल दिसून आला बाबा कडालले एकदा असेच " अगं ए, हे कार्ट पारं बिघडलं बघ. खरोखर एक्स्ट्रा तासाला जातोय की जातो आहे नदीवर म्हशी सारखं पाण्यात डुंबायला".
माझे सर्व जिवन R मय झाले होते.. R+R ! सगळीकडे तेच, वहीवर, पुस्तकावर, बेंचवर, महाद्वार रोडवर स्पेशल शोधा शोध करुन R लिहलेली टोपी व बेल्ट घेऊन आलो होतो. आता तिला फक्त मनातील माझ्या प्रेमभावना कळणे गरजेचे होते, व ते कसा कळवावे ह्यावर आमच्या मित्र मंडळीचा चांगला कट्टा झाला दोन चार फुकण्या ( ते खाण्याचे नळी असते ना) ची पॅकेट संपली, तीन-चार रुपयांचे शेंगदाणे संपले. एक म्हणाला १४ फेब. ला तीला गुलाब व कार्ड दे... च्यामायला तुझ्या म्हणत सगळ्या पब्लिक ने धप्पाटे घातले एकाच्या १४ फेब. ला अजून ८ महीने !
हे देवा, आता तुच मदत कर, सायकलीवरुन तीच्या घराच्या चक्करा मारुन मारुन अगदी पायाचा तंबोरा झाला, पोरगी बघायचे सोडा साधे वळून बघायला तयार नाही. काय करावे तेच कळत नव्हते, माझ्या पहिल्या वाहिल्या प्रेमाचा अंत मला असा नको होता, नुक्ताच 'कयामत से कयामत तक' पाहिला होता, काहीतरी करायला हवे हा विचार पक्का करुन मी शेवटी हो ना हो ना करत प्रेम पत्र लिहणे व तिला देणे असे ठरले. आठवडाभर दोनचार वह्यांची पाने बळी देऊन शेवटी मला हवे तसे प्रेमपत्र लिहण्यात मी यशस्वी झाली. दिवस रात्र पत्र लिहण्याची माझी खटाटोप घरच्यांना वेगळीच वाटली आई बांबाना म्हणाली " जरा पाहिलंत का, दाद्या किती मन लावून अभ्यास करत आहे, व तुम्ही उगाचच माझ्या पोराला नावे ठेवता."
मेरा प्रेमपत्र पढ कर तुम ना-राज ना होना ! - ही सर्वात मोठी काळजी होती. शेवटी तो वेळ आला, सर्व मित्रांनी मला आधार दिला व शुभेच्छा देऊन मला पुढे केला, एखाद्या विरासारखा मी वर्गात प्रवेश केला (कुठून फुलंबिलं, अत्तर पडले नाही ना कुठून घंटानाद कानावर आला असो.) सगळा वर्ग मला नवीन वाटत होतो.. सर्व कसे सुंदर सुंदर दिसत होते, मनामध्ये एक वेगळीच हुरहुर होती, हातापायाच्या तळव्यांना घाम फुटला होता. बाहेर मित्र मैत्रिणींनी फिल्डींग लावली होती फक्त तिलाच आत सोडायचे व बाकीच्यांना गुंतवून ठेवायचे बोलण्यात असे ठरले होते.
ती आली, सरळ आत वर्गात आली.
मी तीला हाय केले व म्हणालो " हाय, जरा एक मिनिट देखील का तुझा मला ?"
समोरुन काहीच प्रतिक्रिया नाही ना चेहर्यावर काही हावभाव. अरे देवा, माझे पहिलं प्रेम बहिरं तर नाही ना अशी कुशंका माझ्या मनाला चाटून गेली. मी पुन्हा जोर लावून म्हणालो " हाय, जरा एक मिनिट देखील का तुझा मला ?" तीने माझ्याकडे पाहिले, पण ते पाहणे म्हणजे चहाच्या कपात पडलेल्या माशीकडे आपण कसे तुच्छतेने पाहतो तसे होते, काळजात धस्स झाले पण आता माघार नाही.. थोडा इकडता तिकडचा विसकटलेला धीर गोळा करुन मी तिला म्हणालो " मला जरा तुझ्याशी बोलायचे आहे" ती मख्ख चेहरा करुन म्हणाली " बोल राज, काय काम आहे ? " माझी छाती एकदमच आभाळाएवढी झाली, तीच्या मुखातून माझ्यासारख्या पामराचे नाव एकुन मला आनंदीआनंद चोहीकडे असा फिल झाला. मुलींना असे काही विचारले / दिले की मी लगेच रडायला सुरवात करतात असे माझ्या एका अनुभवी मित्राने सांगितले होते म्हणून मी ती काळजी घेत तिला विचारले, "मला तुझ्याशी काही बोलायचे आहे पण तु रागावणार + रडणार नसशील तर" - मी. तीने काही विचित्र प्रतिक्रिया दिली नाही, विचित्र म्हणजे तोंड वेडे वाकडे करणे, पायातील चप्पलाकडे हात घेऊन जाणे त्यामुळे मी जीव एकवटून ते प्रेमपत्र तीच्या हाती ठेवले व म्हणालो " मला जे म्हणायचे आहे ते सर्व ह्यात लिहले आहे वाच." व ती ते पत्र उघडून वाचू लागली. तीचे वाचून झाले काहीच बोलली नाही फक्त म्हणाली " वेट.. उत्तर देते" मी गोंधळलेला होतोच त्यात आता घाबरगुंडी उडली होती पण उधारचा धीर अजून खचला नव्हता म्हणून मी तेथेच पुतळ्यासारखा उभा होतो थोबाडावर स्मित हास्य घेऊन.. नकली !
ती-"काही नाही." तोच सगळा वर्ग आत आला व इतिहासाचा तास सुरू झाला.... देसाई बाईंचा मी आवडता विद्यार्थी ! कारण इतिहास माझा आवडता विषय... १०० पैकी ९० मार्क पक्के. ... देसाई बाई म्हंजे एक गोल-भरगच्च व्यक्ती महत्व. मला हि खूप आवडायच्या... तर तास सुरू झाला... पण तीचा Wait हा माझ्या कानांमध्ये घुमत होता... काहीच कळायला मार्ग नव्हता की तिच्या मनामध्ये काय चाले ले आहे ते.. तासामागून तास संपले.... दिवस संपत आला... शाळा सुटल्या वर मी पळतच खाली गेलो तर... पाहिले की सीमा व ती एकत्र बोलत उभ्या होत्या.... मला पाहताच त्या दोघी निघून गेल्या.... माझा जीव इवल्याश्या चिमणी एवढा झाला.... सारी रात्र जागून काढली...
अरे ! सकाळी उठण्यास वेळ झाला आज.... पळतच आवरा-आवर करून शाळेत पोहचलो.... पण सारा वर्ग भरला होता पण ती नाही दिसली.... माझे मन अनेक शंका-कुशंका ने भरून निघत होते... काहीच कळेना... तोच ती आली.... पण ती च्या चेहऱ्यावर हे विजयी हास्य का ?
थोड्याच वेळाने देसाई बाईचा तास सुरू झाला.... वर्गामध्ये येताच... बोलल्या .... " ह्हम... तर मग आपल्या शाळेतून आता प्रेमवीर देखील बाहेर पडणार तर...."
झालं...... माझ्या डोळ्यांसमोर एकदम अंधकार ! डोके गरगरले एकदा तर... ह्या बये न माझे प्रेमपत्र देसाई बाईंना तर नाही दिल ना ?
माझा अंदाज कधी नव्हे तो खरा ठरला.... देसाई बाईंनी मला उभे केले... व माझेच प्रेमपत्र मला व माझ्या सगळ्या वर्ग मित्रांना एकदम खड्या आवाजामध्ये ऐकवले.... प्रेमपत्र मी येथे देत नाही आहे कारण लांबी हा विषय पुन्हा एकदा चर्चेला येऊ नये असे मला वाटते
.
दे.बा. - " अहो प्रेमवीर, कधी मराठीच्या तासाला बसला आहेस का नाही... पत्रामध्ये १०० चुका."
मी.-"
"
दे.बा.- " ह्या तुझ्या प्रेमपत्राचे प्रताप तुमच्या आई-वडिलांच्या कानावर घालाच हवेत."
मी- "
"
दे.बा.- " चल बोल... आपल्या वर्गामध्ये किती मुली आहेत?"
मी- " १७ "
दे.बा.-" माझ्या पाठोपाठ बोल.... ह्या वर्गातील सर्व मुली मला बहीणी सारख्या आहेत..."
मी- " ह्या वर्गातील सर्व......" हे काय ? काहीतरीच.. माझा पुरुषी स्वभाव एकदमच जागृत झाला... व मी उद्गार लो... " ह्या वर्गातील १ सोडून सर्व मुली मला बहीणी समान आहेत..."
सगळा वर्ग आ वसून माझ्याकडे पाहू लागला.... तोच एकदम कडकडाट झाला... पण तो कडकडाट टाळ्यांचा नव्हता तो होता देसाई बाईचा माझ्या गालावर.....
दुसऱ्या क्षणी मी प्राध्यापकांच्या रूममध्ये... ते व माझे तात (वडील) मित्र हे मला तेथेच सर्व प्रथम कळले... थोड्या वेळाने माझे वडील आले... व तेथून घरापर्यंत माझी वरात निघाली... दे दणादण !
तीन दिवस घरी... १५ दिवस मामाकडे....
२५ दिवसांनी प्रथमच शाळेमध्ये पाय ठेवला.... वर्गात जाताच क्षणी सगळा वर्ग जोरात ओरडला.... "एक सोडून .... बाकी सगळ्या.."
मी हळूच तीच्या कडे पाहिलं तर ती खुद्द करून हसली......
आज त्या मुलीचे लग्न झाले आहे.. दोन मुले हि आहेत... कधी गेलो कोल्हापुरला तर येतो भेटून असेच जुन्या मज्जा गमती जमती पुन्हा अनुभवायला.... !
**********
हे लेखन मी २००५ च्या आसपास मनोगतवर केले होते पण त्याकाळी मनोगत कुठेतरी गचकले मध्येच व ह्याचा काही हिस्सा गायब झाला होता तो परवा आपले निखिल देशपांडे ह्यांनी शोधून दिला व त्यामुळे हा लेख पुन्हा मला लिहता आला त्या बद्दल श्री निखिल देशपांडे ह्यांचे आभार.
धन्यवाद.

.jpg)
आईईईग्ग्ग्ग राजे डिट्टो
आईईईग्ग्ग्ग राजे डिट्टो प्रसंग माझ्या मित्राच्या बाबतीत घडला होता...
=))
=))
=))
बाईंनी असला तासला होता त्याला की बिचारा आठवडा भर शाळेत यायला घाबरत होता.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
तुझ्या मित्राच्या उजव्या
तुझ्या मित्राच्या उजव्या गालावर तिळ आहे ?
तुझ्या मित्राची केसं झिंज्या टाईप दिसतात ?
तुझा मित्र पितो ( जे पिण्यायोग्य आहेत विचारतो आहे मी) ?
तुझ्या मित्राचा कितीदा प्रेमभंग झाला आहे ?
तुझ्या मित्राच्या पायात रॉड आहे ?
ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की मग आपण ठरु तुमचा मित्र म्हण्जे मीच तर नव्हे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
(विषय दिलेला नाही)
" अहो प्रेमवीर, कधी मराठीच्या
" अहो प्रेमवीर, कधी मराठीच्या तासाला बसला आहेस का नाही... पत्रामध्ये १०० चुका." हे भारी
हा हा हा. हि गोष्ट सोडली तर
हा हा हा. हि गोष्ट सोडली तर राजा एकदम भारी माणूस आहे.
-पुण्याचे पेशवे
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
हा हा........... मस्तच......
अरे देवा, माझे पहिलं प्रेम बहिरं तर नाही ना अशी कुशंका माझ्या मनाला चाटून गेली..........
तीच्या मुखातून माझ्यासारख्या पामराचे नाव एकुन मला आनंदीआनंद चोहीकडे असा फिल झाला.......
सुरेख
असेच अनुभव थोड्याफार फरकाने प्रत्येकाला येतात!
फक्त एकच प्रश्न! ज्यावेळी ती दोन मुलांची आई होउन समोर आली त्यावेळी अवस्था काय होती? व भावना काय होत्या? चुक केल्याची भावना की अरेरे काहीतरी मिळाले नाही?
शेक्-हर
हॅ हॅ हॅ ! असले प्रश्न
हॅ हॅ हॅ !
असले प्रश्न आमच्यासारख्या व्यक्तीला कधी पडत नाहीत...
रात गई बात गई.... नया सुरज नया सबेरा ! - हा आमच्या जगण्याचा मुलमंत्र (आता आमचे लेखन बघून कोणाला वाटत असेल की आम्ही इतिहासात रमतो तर.. वाटू दे बापडे.. आम्ही मौजमजेसाठीच लिहतो
)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>>रात गई बात गई.... नया सुरज
>>रात गई बात गई.... नया सुरज नया सबेरा ! - हा आमच्या जगण्याचा मुलमंत्र
सत्कार करूया शनिवारवाड्यावर "पुण्याचे पेशवे" जरा तयारीच बघा तेव्हढ
चांगला अॅटीट्युड.........
>>वाटत असेल की आम्ही इतिहासात रमतो तर.. वाटू दे बापडे.. आम्ही मौजमजेसाठीच लिहतो
हॅ हॅ हॅ !!!!!!!!! त्यांच्या
हॅ हॅ हॅ !!!!!!!!!
त्यांच्या सोबत सुहास यांना पण तयारी करायला सांगा... प्रमुख पाहुण्यांचं ते बघतील....