खिडक्या

0
0

चला म्हणल नेहमीप्रमाणे सुदर्शनला जाव. नाटक होत खिडक्या
मूळ जर्मन नाटकाचे मराठी भाषांतर विद्यासागर व सुनंदा महाजन यांनी केलय.
कलाकार- ज्योती सुभाष, असीम पाळंदे
आजी व नातु या दोनच पात्रांभोवती हे नाटक फिरत. कमल आजी वय ७० (ज्योति सुभाष) व तिचा नातु प्रसाद वय २५ (असीम पाळंदे) यांच्या संवादातुन होणारी तीन पिढ्यांचे चित्रण यात आहे. कमल आजी ला प्रसाद मोठी आई म्हणतो. कारण आजी म्हटल्यनी तिला म्हातार वाटत. स्टेनो म्हणुन रिटायर झालेली कमल व तिचा नवरा गोविंद हे दोघेच मुंबईत फ्लॆट मधे राहत असतात. दोघांची मुले अमेरिकेत व मुलगी कानपुरला. मुलांशी फारसा संपर्क नाही. प्रसाद हा मुलीचा मुलगा जर्नॆलिझम शिकायला मुंबईत होस्टेल वर राहतो. तो या मोठ्या आईकडे येत असतो. दोघांचे छान जमते. गोविंदराव हे टीव्ही पाहण्यात मग्न असलेले अदृष्य पात्र. त्यांच नातवाशी फारस जमत नाही. कमल कार्यमग्न. कोडी सोडव घरातील कामे कर, भिशीला जा वगैरे.वयोमानाप्रमाणे कमलचा आता पत्रे लिहिताना हात थरथरतो व अक्षर खराब येते म्हणुन प्रसाद तिला संगणक शिकवतो.ईमेल्स शिकवतो. मग हळु हळु ब्लॊगिंग शिकवतो.संगणकाचे खिडक्या उघडणे चालू होते. संगणकाच्या पडद्याच्या अलिकडे ती व पलिकडे सारे जग ज्यात ती रमत जाते.नाटकात प्रोजेक्टर द्वारा या उघडत जाणार्‍या खिडक्या पडद्यावर दाखवल्या आहेत. एकामागोमाग एक उघडत जातात त्यावेळी तिची तारांबळ होते. सर्फिंग करताना एकदा तर पोर्नो साईटस उघडल्याने घाबरुन दोन दिवस संगणक बंद करते. हळु हळु संगणकाला सरावते.
प्रसाद अजुन वाट न सापडलेला तरुण. तरुणाईत तो पायल नावाच्या तरुणीच्या बळेच प्रेमात पडतो. आजीशी म्हणजे मोठ्या आईशी तो मोकळे पणाने बोलत असतो. त्याच्या आईचे व आजीचे संबंध चांगले नाही हे त्याला माहित असते. तिचा प्रसादच्या वडिलाशी घटस्फोट झालेला असतो. प्रसाद चे आजीच्या घरात जाणे येणे अस्ते. तो आजीला म्हणतो तु म्हातारी म्हणुन तुझ्या ब्लॊगिंगला कुणी उत्तर देत नाही. तु तरुण हो बघ कसे प्रतिसादांचा पाउस पडतो ते. इंटर नेटवर कुणाला वय कळतय? ती मग पायल नावाने काल्पनिक पात्र होउन लिहायला घेते. मग गोविंद नावाच्या पात्राच्या प्रेमात अशी वास्तव जालीय जगताची सरमिसळ करीत लिहित जाते. जालावरील मित्रमंडळी तिला उत्तम प्रतिसाद द्यायला लागतात. मग हळु हळु तिच्या जालीय जगण्याची वास्तवाशी फारकत होते. खर्‍या आयुष्यात डिमेन्शियाने केव्हाच प्रवेश केलेला असतो. तिला गोविंदराव जातात तरी समजत नाही. भ्रमिष्ट पणा वाढत जातो. डोक्टरच्या सल्ल्याने प्रसाद तिला हॊस्पिटल मधे ऎडमिट करतो. मेंदु क्षीण झालेला असतो. प्रसादलाही ती ओळखत नाही वॊर्डबॊयला प्रसाद म्हणते. हळु हळू तिच्या डोक्यात अनेक खिडक्या उघडत जातात व संगणक व ती दोन्ही एकदम बंद होतात व नाटक संपते.
नाटकातील संवाद/ स्वगत विचार करायला लावतात, मेंदुची स्मृती आहे तो पर्यंत जग आहे हा संदेश देत रहातात. डिमेन्शिया विषयी थोडी माहिती नाटकात मिळते. राग, अपमान, नाराजी, अपेक्षाभंग मनात सुक्ष्म अढी निर्माण करतात. मग मी अमुक एक गोष्ट आयुष्यात कधी विसरणार नाही अशी भाषा करतो. शेवटी हे मेंदुच्या स्मृतीचे खेळ आहेत हे प्रसादच्या स्वगतातुन उत्तम व्यक्त होताना दिसत.
विचार करताना तंद्री भंग पावते कारण नाटक संपलेल असत.

तुम्ही जे नाट्य परिक्षण लिहता

1

तुम्ही जे नाट्य परिक्षण लिहता ते केवळ अप्रतिम.. !

वाचता वाचता मनात नक्की एकदा तरी येतंच की हे नाटक पहावयास हवे..

धन्यवाद काका ह्या परिक्षणासाठी.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान... एकदा यायचं आहे

2

छान... एकदा यायचं आहे तुझ्याबरोबर.

अरे वा..

3

वेगळंच नाटक दिसतय...
परीक्षण मस्त लिहिलं आहेतच नेहमीप्रमाणे.
स्वाती

अरे वा

4

छान परीक्षण !!!

अरे वा!

5

चांगले परिक्षण.

नुकतेच कळले एक ओळखीचे जोडपे, दोघांना डिमेंशिया झाला होता तरी एकटे रहात होते व त्यातच गेले. खूप वाईट वाटले त्यांची दोन्ही मुले भारतात रहात होती /आहेत.

पकाकाका

6

आमच्या साठी एक छान खिडकी उघडलीत. मस्त परीक्षण !!!
wi


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

सुंदर परिक्षण

7

सुंदर परिक्षण.. ह्या नाटकाची जाहिरात पाहिली नव्हती.. व्यावसायिक थेटरवरही लागतं आहे का?

-ऋ


-ऋ

नाही

8

महाराष्ट्र कल्चरल सेंटर ची नाटके बहुतांशी सुदर्शन लाच होतात. प्रायोगिक रंगभुमीची पंढरी आहे ती.
त्यांचे काटकोन त्रिकोण नाटक हे आता व्यावसायिक रंगभुमिवर येउ लागले आहे. फारच अप्रतिम नाटक आहे ते.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

उत्तम परिक्षण.

9

उत्तम परिक्षण.

मस्त!

10

मस्त!


- प्राजु

भारीच!

11

वेगळाच विषय घेऊन छान उभारणी केलेली दिसतेय.
तुम्ही दिलेल्या परिचयातुनच बरंचसं नाटक नजरेसमोर उभं राहिलं. अर्थात, आंतरजालावर रमणे, त्यातून प्रसादने सांगितल्यानंतर जालीय कायापालट करुन वावर, वस्तुस्थितीमधून आभासी जगातच अस्तित्व असल्याच्या भासात असणं....ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या कलाकाराच्या अदाकारीतुनच पहाव्या लागतील. ही बाब भाषांच्या पलिकडलीच!

छान परिचय!
धन्यवाद.

(स्वगत: च्यायला, हा पकाकाका इतक्यांदा सुदर्शनला येतो, पण एकदाही घरी येत नाही! जरा सुदर्शनच्या बोर्डावर लक्ष ठेवायला पाहिजे..एकदा किडन्यापच करतो पकाकाकाला Big smile )

ऊत्तम परिक्षण

12

प्रकाशराव,
तुमच्या परिक्षणा वरती आम्ही काय प्रतिसाद देणार?
छान.
नाटक डोळ्यासमोर उभे राहिले.
विषय समजला.
धन्यवाद

नाटक बघावसं वाटत आहे, परीक्षण

13

नाटक बघावसं वाटत आहे, परीक्षण अप्रतिम.

पाहीले नाटक एवढे खास नाही, पण

14

पाहीले नाटक एवढे खास नाही, पण तुम्ही छान लिहले आहे घाटपांडे सर.