भेंडके / फुंडके खास खानदेशी पदार्थ

0
0

भेंडके किंवा फुंडके किंवा वड्या खानदेशात खास प्रिय आहेत...मी मात्र भेंडकेच म्हणणार...पुर्वी घरी जात्यावर तुरींपासून डाळ पाडत असत, तेव्हा जो डाळीचा चूर पडे त्याचा वापर कसा करावा म्हणून हे भेंडके बनवण्यास सुरूवात झाली...तसे भेंडके बर्‍याच तर्‍हेतर्‍हेने बनतात... साधे कांदा घालून, चिवळीची भाजी (जीला स्थानिक भाषेत चिव्वयी किंवा चिव्वि ची भाजी म्हणतात.) आणि घोळीची भाजी...फॉर अ चेंज माझी आई मेथीची भाजी घालूनही बनवायची...आणि हेल्थ कॉन्शस लोकांसाठी हा वाफवलेला प्रकार आहे म्हणजे अब्सोल्युटली नो ऑइल... हास्य

तर या भेंडक्यांसाठी काय काय लागते...अंदाजे प्रत्येकी ३-४ पुरतील असे ४ लोकांसाठीचे साहीत्य...

२ वाट्या तुरीची डाळीत प्रत्येकी पाव-पाव वाटी चण्याची डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ घ्यावी किंवा नुसतीच तुरीची डाळ घेतली तरी चालेल. या डाळींना ३-४ तास भिजत घालावे. नंतर नीट निथळुन घ्यावे आणि भरड वाटून घ्यावे. वाटताना पाणी घालू नये.
मग जी भाजी घालायची असेल ती २ वाट्या बारिक चिरून घ्यावी...घोळीची भाजी घ्यायची असेल तर १ वाटी घ्यावी, ती जरा बुळचट असते म्हणून...
आता या भेंडक्यांना चटकदार बनवण्यासाठी मिक्सरमध्ये ६-७ हिरव्या किंवा हिरवट-लाल ओल्या मिरच्या, तश्या तिखटपणाप्रमाणे घ्या, कमी झाल्यास वरून ठेचून घालता येतील...पण हा पदार्थ थोडा तिखटच छान लागतो + ५-६ लसूण पाकळ्या + १ इंच आले वाटून घ्यावे. यालाही पाण्याशिवायच वाटावे.
१ मध्यम कांदा उभा चिरून...
एका भांड्यात हे मसाला वाटण + वाटलेली डाळ + धणे-जीरे पावडर् + मीठ + बारिक चिरलेली भाजी + हळद + उभा चिरलेला कांदा नीट मिक्स करुन घ्यावे...मिश्रण खालीलप्रमाणे दिसेल...

मग या पिठाचे हलक्या हाताने गोळे बनवून एका ओलसर कापडावर वाफवण्यासाठी ठेवावे, मी खालीलप्रमाणे एका पातेल्यावर चाळण ठेवून वाफवले होते...झाकण ठेवून वाफवावे...

अंदाजे २०-२५ मिनीटे वाफवल्यावर ताटात काढून घ्यावे.

आणि कढीसोबत सर्व्ह करावे...खाताना भेंडक्यांना थोडे मोडून त्यांवरून तेल घेतल्यास अजून छान लागते...

जर काही भेंडके उरलेच तर त्यांना दुसर्‍या दिवशी हाताने मोडून घ्यावे आणि मोहरी-हिंगाची फोडणी मारून मस्त कुरकुरीत करून खावे...मस्त म्हणजे मस्तच लागतात.

अगाबाब्बो....

1

दिसायला भारी दिसतंय..पण.....

>>मग जी भाजी घालायची असेल ती २ वाट्या बारिक चिरून घ्यावी<<
म्हणजे नक्की कोणती भाजी हे खरं नाही! म्हणजे गेम होणार हे नक्की! Sad

मी खात नसलेल्या भाज्यांचे आई पराठे करायची त्याची आठवण झाली... Crazy angery

अरे नीट वाच ना...चिव्वयी, घोळ

2

अरे नीट वाच ना...चिव्वयी, घोळ किंवा मेथीची भाजी म्हणायचे आहे इथे...

ऑव्व्व....

3

ते अंमळ राहिलंच वाचायचं..
दिपालीचा पाकृवाला धागा म्हणल्यावर वाचनात लक्ष लागतंच कुठे? सगळे आपले फोटोसाठी मरायला तयार Big smile

बाकी,
भाज्यांबद्दल माझा अजुनही निषेध कायम Sick
पालक किंवा बटाटा (ह्यापैकीच एक Big smile ) घालता येईल का?

लैच हुच्च प्रकार...

4

लैच हुच्च प्रकार...

मस्तच रेसीपी

5

खुप दिवसांनी तुमची पा.कृ. वाचली . मस्त आहे हा प्रकार हा कढी बरोबरच खाल्ला जातो की ईतर ही आमटी/कट/रश्या बरोबर चालेल ?


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

हा पदार्थ कढीबरोबरच चांगला

6

हा पदार्थ कढीबरोबरच चांगला लागेल...आधीच चविष्ट असतो त्याला अजून काही लागत नाही...

येथे पण प्रतिसादांची मालिका

7

येथे पण प्रतिसादांची मालिका दिली असती पण तायडी लै मारेल... wink

असो,

फोटो अमंळ जिवघेणे आहेत...

आलोच बादली घेउन येतो... लाळ गाळायल्या Laughing out loud

टारझन - द - राज wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

जबरा दिसतायत भेंडके.शेवटच्या

8

जबरा दिसतायत भेंडके.
शेवटच्या फोटतला तर हात लांब करुन उचलुन घ्यावासा वाटतोय.

आवांतर :@ राजे करा काही तरी अशी नविन सोय उपलब्ध. नाही तरी तुमच टेस्टिंग चालुच आहे.
अशी काही सोय दिल्यास शेकडोंचे दुवे मिळवुन जाल हास्य


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

शेकडोंचे

9

दुवे मिळवुन जाल. येवड्यात कुठे पाठवतोयस राजेंना अजुन भरपुर टेस्टींग करायच आहे त्यांना.
बाकी राजे मस्करीचा भाग सोडा पण गणापाच्या विनंतीवर अवश्य विचार व्हावा.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

खी : खी : खी : !

10

खी : खी : खी : !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

खायला पाहिजेत एकदा... फोटो

11

खायला पाहिजेत एकदा...
फोटो क्लासच्


-निखिल

करुन पहावयास हवी एकदा.

12

करुन पहावयास हवी एकदा.

करुन पाहू नका फक्त खाऊन पण

13

करुन पाहू नका फक्त खाऊन पण पहा Big smile


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अग दिपाली ताई ...मी स्वतः

14

अग दिपाली ताई ...मी स्वतः खानदेशी असून हा पदार्थ मला खूप आवडतो.. .


जीवनाच्या प्रवासात इथे विश्रांती घेणारा मी एक वाटसरू...

मी गन्डले..

15

आज मी करुन पाहिले हे. फोटो सारखे काही झाले नाहित. वाटली डाळ आणि मसाला ईडली च्या मधल लागल. मग मी त्याचे मसाला वडे तळले. ते छान झाले. हास्य

लै भारी..

16

लै भारी..