आज काही तरी अघटित घडणार असे सकाळपासून वाटत होतेच. सारखी मनात शंकेची पाल चुकचुकत होती. घरातून निघालो चार मजले खाली उतरून आल्यावर कळले आपण आय कार्ड विसरलो... झाssssले!!! परत चार मजले चढून आय कार्ड घेतले आणि खाली आलो. मग काय, आजचा दिवस काही तरी अघटित घडवणार असे वाटतच होते... ऑटो मिळायला वेळ लागला.. मिळालेली ऑटो रस्त्यात दोन वेळा बंद पडली. आज सकाळी कुणाचे तोंड पाहिले असा विचार मनात आला... पण मग तो लगेच काढून टाकावा लागला.. कारण काय विचारता??? अहो, सकाळी सकाळी ब्रश करताना स्वत:चेच तर तोंड पाहिले होते आरशात!!! तसाच ऑफिसला पोहचलो. डेस्क वर सेटल होत होतोच तितक्यात माझा फोन व्हायब्रेट झाला. फोन उचलतच होतो तोच अचानक वीज चमकली(?). मी घाबरलो पण नंतर लक्षात आले की मी बंद ऑफिसात बसलो आहे आणि दिवे चालू बंद झाले होते. असो. फोन हातात घेतला पाहतो तर काय,
"बाळ्या कॉलिंग"...
(बाळ्या कॉलिंग बाळ्या नाहिए हा), तेव्हाच मला कळले, ह्या शुभ(???) शकुनांचे कारण!!!
तर, हा बाळ्या आमच्या कॉलेजातला एक खास दोस्त... कॉलेजात कमी आणि "इंडियन" वर जास्त पडीक.. कोण म्हणतंय रे इंडियन बार आह? अरे इंडियन हे चहा चे फ़ेमस दुकान आहे.... कॉलेजातली सगळी बीडगँग तिकडे पडीक असायची. तर हा बाळ्या भलताच सुपीक डोक्याचा.. त्याच्या म्हणण्यानुसार आमच्या मॅकेनिकलच्या वर्गात अर्ध्यापेक्षा जास्त दगड आहेत... त्याने "दगड गँग" ची पण स्थापना केली होती. आता दगड गँग मध्ये मेंबर बनण्यासाठी नियम होता की एकदा तरी एक्स झाले पाहिजे... ह्या नियमामुळे जेव्हा आमच्या सारख्यांची गोची व्हायला लागली तेव्हा त्याने आम्हाला मानद सदस्यत्व बहाल केले होते. याची अजून एक सवय म्हणजे मुद्दाम बीडात नसणार्या लोकांसमोर बीडा च्या भाषेत बोलायचे... तसे त्याला जमत नाही पण उगाचच... तर असा हा आमचा बाळ्या..(याच्यावर आमचा फार जीव नाहीये!!!!) आता जास्त काही बोलत नाही, फकस्त फोन वरचे बोलणे खाली लिहितोय..
मी:- हॅलो
बाळ्या(माझे वाक्य पूर्णं व्ह्यायच्या आत) :- निख्या, काय करायलास??? बाळ्या बोलतोय बीडातून!!!
मी:- बोल रे बाळ्या, बीडात काय करायलास?, तू तर पुण्यात होतास ना? कोणत्या तरी परीक्षा देत...
बाळ्या:- अरे सध्या इथंच आहे बीडात, करंसी ट्रेडिंग करायलोय राव...
मी:- बाळ्या करंसी ट्रेडिंग?? ते म्हणजे आणखी रे काय???
बाळ्या:- तुझ्या सारख्या निरक्षर लोकांना नाही कळत ते!!! जाऊ दे राव, बरं ऐक. बीडात BPL यायंलय!!!
मी :- काय?? BPL वाले बीड मध्ये प्लँट टाकतायत??
बाळ्या: - अरे ते BPL नाही रे...... आता बीडाला Below poverty Line म्हणू नकोस नाही तर मार खाशील!!!
मी :- मग? हे BPL काय प्रकरण आहे???
बाळ्या:- आरं आता परवा तुझ्या औरंगाबादेत बाबूजींनी भरवली होती ना??? APL(Auranagabad Premier Leauge).... तशीच आमचीबी BPL (Beed Premier Leauge).
मी:- काहीही काय सांगतोस???
बाळ्या:- अरे गेल्या आठवड्यात MPL पण संपली...
मी:- MPL? म्हणजे काय Marathawada Premier Leauge का Maharashtra Premier Leauge???
बाळ्या:- नाही, मांजरसुंबा प्रिमियर लीग!!!
मी:- काय??? काहीही काय सांगत आहेस??? मांजरसुंबा घाटात मॅचेस खेळवल्या काय त्यांनी.
बाळ्या:- ते सोड, मला गेल्या आठवड्यात मोदीचा फोन आलता.
(आता बाळ्याला दुनियेत कुणाचेही फोन येऊ शकतात... अगदी ओबामा पासून ते काकां पर्यंत)
मी:- कोण मोदी.. नरेंद्र??? आता त्याने GPL काढले का कायं???
बाळ्या:- आता तुला GPL देइन, क्रिकेटचे बोलणे चाललंय मग कोण्चा मोदी फोन करणार??? तोच ललित?? आय पी एल वाला..
मी :- ह्म्म (मी मुद्दाम शेरेबाजी करायचे टाळले)
बाळ्या:- अरे तो काय म्हणणार??.. मीच त्याला म्हणालो बाबारे तुझ्या आयपिएल मध्ये जाहिराती साठी टीव्ही वाल्यांना टाइम भेटला नाही म्हणून तुम्ही आणला स्ट्रॅटिजिक ब्रेक पण तो पाच मिनिटे लै जास्त होतो ना....
मी :- तू त्याला असे म्हणालास??
बाळ्या:- अरे हो ना भौ.. त्याला सांगितले की त्या ५ मिनिटाला २ भागात डिवाईड कर आणि मग एक ९ ओव्हर च्या आसपास आणि एक १६ व्या ओव्हरच्या आसपास कंपल्सरी करुन टाक ना.. तेवढा वेळ नाचव तिथे पोरी आणि टीव्हीला दाखव जाहिराती.
मी :- गाढवा, म्हणजे त्यादिवशी ९ विकेट पडल्या नंतर फुकट तुझ्या मुळे जाहिराती पाहाव्या लागल्या ना!!!
बाळ्या:- अरं गप्प, दुसरी आयडिया तर लै भारी व्हती गड्या... त्याच काय आहे... दोन बॉल च्या मध्ये तुम्ही ते स्कीन छोटे करून वैगेरे जाहिराती दाखविता त्या सोबत मध्येच ग्राउंड मधल्या स्क्रीन चा फोटो घ्यायचा अन चिपकावय्ची जाहिरात...
मी:- अरे @#$@$, तो दोन बॉल च्या मध्ये येऊन हसणारा अक्षय कुमार पण तुझंच डोकं तर...
बाळ्या :- हौ न भौ!!!
मी :- बरे तुझे बी पी एल चे काय प्लॅन्स? टीम कुठल्या आहेत..??
बाळ्या:- मांजरसुंबा प्रिमियर लिग च्या चँपियन्स ला बोल्विलय... आणि झालंस तर केज, आंबेजोगाई, परळी, माजलगावं तालुक्याचा टिमी बनवल्यात...
मी:- अरे पण त्याचे मालक, जाहिरातदार??
बाळ्या:- अरं मालक, स्पॉन्सरर सगळ्या पक्षाचे पुढारी... अर्रर्र बीड जिल्ह्याला काय तू कमी समजायलास का??? केज साठी "विमलताईच्या" घरी बोलतोय... आंबेजोगाईला "पापा" परळी ला "काका नाही तर पुतण्या" आणि कप चे नाव "केसरकाकू" स्मृती... अन स्पॉनसरर तर खूप आहेत रे... साखर कारखाने दुधसंघ कश्यापाई काढलेतं... अन मक्याशी पण बोललोय...
मी:- कोण मक्या???
बाळ्या:- अर!! तोच मक्या अनासपुरे तुमच्या पुण्या-मुंबईच्या लोकांचा केशव कुथंलगीरीकर... कुंथल्गीरीवरुन आठवलं बघ.. काल गेलतो कुथंलगीरीला. खवा, कलम आणलीया राव... पाठवु का औरंगाबादला घरी...
मी:- कलम तर पाठवच, पण हे मक्या काय करणार...
बाळ्या:- अरं बीडाचा शाहरुख तो... त्यान भी एक टीम घेतली ना राव...
मी :- खेळाडूंचे काय???
बाळ्या:- अर प्ल्येयर तयार आहेतच राव, साईना बिईना झाल्यात... ६ टिमी आहेत १०० खेळाडूंशी सह्या झाल्यातं.. बाकी उद्या बाजार हाय त्यांचं..!!!
मी :- अरे बापरे म्हणजे ऑक्शन!!! कुठे करताय रं हे सगळे???
बाळ्या:- अरे आपलं मैदान आहे ना... ढोरबाजाराचं. तिथ एक मंडप टाकलाय... स्टेज बन्विलयं.. अन लावलाय ह्या ढोरांचा बाजार...
मी:- बरंय लेका...
बाळ्या:- अरं हो... सगळ्या मराठवाड्यात केबल वर लाईव्ह दाखवणार ना आपणं.... तुमच्या त्या टुबा वर पण टाकायचं भौ..
मी:- वा!!!! मजा आहे... बाळ्या मोदी लगे रहो!!!! बरं ते सगळे सोड मला कसं काय फोन केलास इतक्या गडबडीत...
बाळ्या:- अरं ते नाचायच्या पोरिंचे तसा सेटिंग झालंय पण फकस्त त्यांना जिपाडात बसवायचं.... त्यासाठी माणूस मिळनं...
मी:- कुठून बसवायचंय..
बा़ळ्या:- अरे स्पेशल चिअरगर्ल्स आहेत त्या... त्यांना "व्हाईट हाउस" वरून बोलविलंय... तुला फक्त पनवेल ला जाउन त्यांना जीपात बसवायचयं..
मी:- बाळ्या हलकटा, ठेव फोन...मला असले कामं सांगतोस व्हयं...?
बाळ्या:- अरे एक तर....
(बाळ्या बोलत असताना मी फोन कट केला....)
{ह्या लेखातले सगळे पात्र काल्पनिक आहेत त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्ती शी संदर्भ आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा}
उद्या बाजार हाय त्यांचं..!!!
उद्या बाजार हाय त्यांचं..!!!
>>"व्हाईट हाउस" लै
>>"व्हाईट हाउस"
लै बेक्क्कार रं !
* कॉग्रेस हाउस माहीत होता आता व्हाईट हाउस पण माहीत झाला....
दिल्याने ज्ञान वाढतं असं कुठेतरी वाचलं होते बॉ
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
समझनेवालेको इशारा काफी हय
समझनेवालेको इशारा काफी हय राजेश्री.
-पुण्याचे पेशवे
मांजरसुंबा प्रीमीयर लीग
मांजरसुंबा प्रीमीयर लीग
(विषय दिलेला नाही)
लै भारी
लै लै भारी...
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
हा हा हा नि़ख्या निख्या
हा हा हा
नि़ख्या निख्या ..... कसं रे जमतं तुला... ?
निदे निदे निदे.. लय भारी
निदे निदे निदे.. लय भारी __/\__
मी डेस्कवर कॉफी पित नाहि म्हणून नाहितर...
येऊदेत अजून बिडातल्यांच्या गोष्टी
-ऋ
लेखाबद्दल काय बोलावं!!!!
लेखाबद्दल काय बोलावं!!!! अगदी..
बाकी..
मी डेस्कवर कॉफी पित नाहि म्हणून नाहितर...
या ओळीत आम्हांला आमचे एक आंजा मित्र दिसले!!!
आयला मजा आली
आयला मजा आली
अजुन येउ द्यात तर असा हा आमचा
अजुन येउ द्यात
तर असा हा आमचा बाळ्या..(याच्यावर आमचा फार जीव नाहीये!!!!)
अजुन एक असाच
वा
व्वा व्वा.
फुटलो.
याच्यावर आमचा फार जीव नाहीये!!!!
खुलाशाबद्दल धन्यवाद.
... अगदी ओबामा पासून ते काकां पर्यंत
कोणते काका हो निदे? तेच ते ओबामांचे काका का?
@#$@$, तो दोन बॉल च्या मध्ये येऊन हसणारा अक्षय कुमार पण तुझंच डोकं तर...
माय फीलिंग सेम बॉस. साला मेंट्ली रिटार्डेड वाटतो. माझ्याकडून ही भर *@*%*%@#.
अरं बीडाचा शाहरुख तो... त्यान भी एक टीम घेतली ना राव...
अरारारा. निदे फोन काऊन कट केला बे. फुडची ष्टोरी कोन सांगनार आता?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
कोणते काका हो निदे? तेच ते
कोणते काका हो निदे? तेच ते ओबामांचे काका का?
माय फीलिंग सेम बॉस. साला मेंट्ली रिटार्डेड वाटतो. माझ्याकडून ही भर *@*%*%@#.
मॅच च्या मधेच ते घाणेरडे हसणे... साला खरच मेंटली रिटार्डेड वाटतो.
अरारारा. निदे फोन काऊन कट केला बे. फुडची ष्टोरी कोन सांगनार आता?
ह्म्म, आहो त्या बाळ्याला नाहीत कामं... पुढल्या टाईमला त्याचा फोन येईलच...
-निखिल
लगे रहो....
सुप्पर डुप्पर हिट निखील. वाक्यावाक्याला दणके. लिही अजुन असंच सशक्त, सकस.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
(विषय दिलेला नाही)
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
निख्स ..
लै लै भारी रे ...
कुठल्या कुठल्या वाक्याला कमेंट देवू रे .... अगदी झ्याक लिवलय रे ...
निख्या, 'बीडा' सारखाच टणक
निख्या, 'बीडा' सारखाच टणक विनोदी लेख झालाय.
हा आमचा स्वभाव
हाण तिच्या!
बाळ्याने जोरदार फटकेबाजी केलीये. बाकी मक्याचा उल्लेख झाल्यानंतरचा भाग त्याच्याच टोन मधे वाचला अजुन धम्माल आली.
ज ब र द स्त !!!
ज ब र द स्त !!!
हाण्ण्ण...हाण्ण तिच्यायला......
अग्गायायायायायायायाया..................

खत्रा...खत्रा रे...लै जंक्शान खत्रा लिहिलायस भो!
खुर्चीतून सांडलो ना बे! क्काय एकेक पंच टाकलेत तिच्यायला...नुस्ती धुमशान!
च्याबायलीचं...एकेक कंस म्हणजे नुसता खणखणीत!!!

मांजरसुंबा प्रिमियर लीग काय, केशव कुंथलगिरीकराची टीम काय, मधुनच विमलताई, पापा, काका-पुतण्या चिमटे काय....त्यात कमी पडलं की काय म्हणुन 'व्हाईट हाऊस' काय.... _/\_
ऑबॉबॉबॉबॉबॉबॉ.......... पर्फेक्ट!!!!!
च्यायला, हे बीडाचं नाय, ओतीव पोलादाचं कऽडक लेखन झालंय बे!
आणि, घनगंभीर चर्चांमध्ये रमणारे देशपांडेआन्ना होबासक्या करायला लागलेले पाहुन आमचा ऊर अंमळ भरुन आला
लढ निख्या लढ! लै भारी!!!!!!!
आणी पुढच्यावेळी बाळ्याचा फोन आला तर निवांत गप्पा मार त्याच्याशी
निदे बीपीएल
म्हणजे मला " बारामती प्रीमीयर लिग" वाटलं . कॅप्टन कोण ते आपण ओळखालच
लेख तर लै भारी राव.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
आपल्याला च्यायला क्रिकेटमधलं
आपल्याला च्यायला क्रिकेटमधलं ओ की ठो कळत नाय बॉ!!
(पैसा..पैसा..पैसा...
)
बारामती प्रिमियर लीग असेल तर झाईरातीचं सेक्शन सांभाळतो
क्काय इटीदांडू, सुरपारंब्या, डबडा ऐसपैसच्या म्याचा भरवत असाल तर बोला..आपुन क्यापटनशिप घ्यु
" बारामती प्रीमीयर लिग"
" बारामती प्रीमीयर लिग"
छे!!! आम्हाला हे वाक्य म्हणायलाच लावतां "तुम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरचा महाराष्ट्र माहीतच नसतो"
ह्या वाक्याचे वेगवेगळे वर्जन्स आपल्याला विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांकडुन एकायला मिळतीलच 
तसेही बारामती ईज हिस्टरी....
-निखिल
खॅ खॅ खॅ!!!
>>ह्या वाक्याचे वेगवेगळे वर्जन्स आपल्याला विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांकडुन एकायला मिळतीलच
आता कळलं का स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला तरुणांकडुन जो जोर धरतोय त्याचा स्त्रोत कुठे आहे?
>>तसेही बारामती ईज हिस्टरी....
खरंय! आम्ही पुण्यात आलो ना आता
>>>आम्ही पुण्यात आलो ना आता
>>>आम्ही पुण्यात आलो ना आता
मी तर ऐकले की धमालराव मूळचे बीडातले म्हणून!!!!
ए गप ना... चांगली रंगली असती
ए गप ना...
चांगली रंगली असती तर येऊन बींग फोडलं.. यडपटच्चे
चांगली रंगली
चांगली रंगली असती
छे!!!
आम्हाला हे आधी पासुनच माहित होते...
-निखिल
चूक चूक चूक
>>तुम्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेरचा महाराष्ट्र माहीतच नसतो
चुकताय निखिलराव ...
जाहिर निषेध ...
संग्रामराव निषेध करायच्या
संग्रामराव
निषेध करायच्या आधी.. जरा ते स्माईली बघायचे होते ना राव..
-निखिल
आमी
स्माईली टाकायच विसरलो ना राव 8)
कोण रे हा बाळ्या? बाकी चांगला
कोण रे हा बाळ्या? बाकी चांगला लिहिलय.
जबर्या लिवलंय!
जबर्या लिवलंय! वाक्यावाक्याला हशा आणि टाळ्या.
-अनामिक
लै भारी रे निखिल
खुप मजा आली वाचताना
हॅहॅहॅ.. जबरदस्त
हॅहॅहॅ..
जबरदस्त
जहबरी
लय भारी लिव्हुलालास आजकाल.
मराठवाडी शब्द चांगले पकडलाव.
यायंलय, जिपाड !!!
आन मक्याची नावं तर लय भारी. पुण्या-मुंबईच्या लोकांचा केशव कुथंलगीरीकर,बीडाचा शाहरुख.
असंच लिवत जा बे गाबड्या !
(विषय दिलेला नाही)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)