कोहं.....???

0
0

"परवा एका मित्राकडे गेलो होतो. त्याच्या वडिलांचे नुकतेच ऑपरेशन झाले होते. आम्ही त्याना काका म्हणतो. मधुमेहामुळे पाय गुडघ्याखालपासून काढावा लागलाय.
मला प्रश्न पडलाय, मी ज्या काकाना बघत आलो आतापर्यंत ते पूर्ण होते, १००% होते. आता त्यांचा एक भाग कमी झालाय. तरीही ते 'आहेतच' ना...
आणि इन द सेम लाईन मी ज्याला 'मी' म्हणतो तो नक्की कोण...???
उद्या कदाचित माझे ऑपरेशन होईल, माझा कुठलातरी भाग जाईल....कोण जाणे?"
..........वरील संवाद आपण करु शकतो/करतो स्वत:शी......
उत्तर आहे का हो मी कोण या प्रश्नाचे?
आहे. निश्चित आहे. पण त्या पूर्वी मी कोण नाही ते बघायला हवे.
तर्क वापरु.
माझा शर्ट मला आवडतो. शर्ट कुणाचा....??? माझा. मी शर्ट....??? येडा आहे का??? मी शर्ट ना.....ही. असणे शक्य नाही.
आता....
माझा चेहरा मला आवडतो. चेहरा कुणाचा....??? माझा. मी चेहरा....??? गोन्धळ झाला.
माझे शरीर मला आवडते. शरीर कुणाचे....??? माझे. मग मी शरीर.....???
तू बोलणारा नसशील... आम्ही आहोत.

जर हात, पाय (किंवा इतर अवयव) नसताना आपण 'असतो', तर मग आपण शरीर असणे शक्य आहे का हो....???
आपण निश्चित कोणीतरी वेगळे आहोत..... मान्य असेल नसेल तरी हे सत्य आहे. कोण ते सांगतो पुढे.

एक सोपा मंत्र आहे... 'जे माझे आहे ते मी नाही'

का सांगतोय हे सारे....????

डोके माझे असते ते दुखते.... बघता येईल वस्तुनिष्ठपणे...??? उगाच त्रागा नाही होणार ना....
नाव माझे असते... अनेक प्यारे, टारझन, अवलिये आपण बघतो... मग मी म्हणजे नावही नाही.... उगाच 'फुकट्चे फुगणे' नाही...
'मन' माझे असते... संकल्प विकल्प करते ( हे करु का ते करु) .... काय करायचे ते येईल ना ठरवता....??? उगाच कुठलाही विचार आला आणि त्रास देऊन गेला असे नाही होणार.
'बुद्धी ' ही माझी असते.... निश्चय/ निर्णय करते. हे करु का ते करु चा गोंधळ संपला की मनालाच बुद्धी म्हणतात.
मग निर्णय जर 'माझी' बुद्धी करत असेल तर दोष देऊ का कुणाला आपण...???
'चित्त' ही आपलेच.... त्यामधे काय साठवायचे ते आपणच ठरवू की मग....

तर आपल्या आता लक्षात आले असेल की 'मी' कोण नाही ते....

(आधारः दासबोध, साधकसोपान आणि इतर ग्रंथ)

क्रमशः (हवे आहे का?)

को हम हा विचार सतत चालू आहे.

1

को हम
हा विचार सतत चालू आहे. त्याचा शोध हा आत्म शोध आहे. त्याला अंत नाही


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

(आधारः दासबोध, साधकसोपान आणि

2

(आधारः दासबोध, साधकसोपान आणि इतर ग्रंथ)>>>
?????? ईतर ???

क्रमशः (हवे आहे का?)>>

अर्थातच हवे आहे !!

उगाच 'फुकट्चे फुगणे' नाही...>>>

जगण्याचा मुलमंत्र

कोहं....

3

हा मुलभुत प्रश्न आहे. त्याची दोन उत्तरे येतात ती अशी - सोहं (मीच तो) आणि अहं ब्रम्हांसी (मीच ब्रम्ह आहे.) ही उत्तरे सापडली की सगळा शोध बंद होतो आणि मग आपण सच्चिदानंदाची अनुभुती घेतो अशी धारणा वेदांतींची आहे.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

पुढचा भाग???

4

पुढचा भाग???


-निखिल

तुझे आहे तुजपाशी परि तु जागा

5

तुझे आहे तुजपाशी
परि तु जागा चुकलाशी.....

येवु दे आत्मशोध ! हास्य

व्वा!!! प्यारेभाऊ, उत्तम!! नक

6

व्वा!!!
प्यारेभाऊ,
उत्तम!!

नक्की आणखी येऊ द्या हास्य

'कोऽहम्', 'अहं ब्रम्हास्मि' आणि सर्वात महत्वाचे 'इदं न मम्' ह्यावर असेच आणखी वाचायला आवडेल. हास्य

प्रतिक्षेत..
ध.

+१ असेच म्हणतो.

7

+१
असेच म्हणतो.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुढे ???

8

पुढे ???


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."