शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.
आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.
ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.
* ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....
१. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
२. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
४. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
५. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
६. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
७. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
८. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
९. मैदानात विकत मिळणार्या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
14. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
15. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
16. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
17. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
18. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
19. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
20. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
21. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.
*** ह्या पाट्या आहेत त्या ' आयपीएल-पुणे संघाच्या कार्यालयातल्या" ....
१. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी १-३ असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
२. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री ८ वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्या दिवशी खेळता येईल.
३. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
4. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
5. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
7. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
8. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
9. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
10. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
11. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये.
ता.क.: बाकी सुचतील तशा नंतर अॅड करुच. इतरांनीही करायला हरकत नाही.
प्रेरणा : काही फॉर्वर्डेड मेल्स आणि पुणेरीपाटी.कॉम
फस्कलास!!!
फस्कलास!!!
ही घ्या जर्सी पण तय्यार झाली
ही घ्या जर्सी पण तय्यार झाली
सुपर डुपर हिट
जहां पनहा तुस्स्सी ग्रेट हो....

*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
लै भारी रे............
लै भारी रे............
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वा डाण्या )) ले भारी
वा डाण्या
))
ले भारी
हा क्रिकेटचा सामना आहे,
हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे
ठ्ठो!!!!!
हुच्चं पाट्या.. -अनामिक
हुच्चं पाट्या..
-अनामिक
अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह ....
धन्य आहात
फुटलो... लोळलो.. वगैरे वगैरे

महान आहात
-ऋ
-ऋ
डान्याच्या पाट्या प्रथम बझवरच
डान्याच्या पाट्या प्रथम बझवरच वाचल्या, (आगामी धोका पाहुन त्यास उत्तरही दिलेच आम्ही
). पण डान्याचे खास अभिनंदन या करीता की डान्याचा हा लेख आम्हाला अनेक दिशांतुन अनेक वेळा गेल्या काही तासात आलेला आहे. लै भारी!
-Nile
थोड्याश्या व्याकरणात सुधारणा
थोड्याश्या व्याकरणात सुधारणा केल्यात तर तुमच्या पाट्या पुण्यातल्या पाट्या म्हणून चालूनही जातील.
( खुद के साथ बातां: पुण्याबाहेरचा माणूस लगेच ओळखू येतो नै)
-पुण्याचे पेशवे
बोलले
हे अस्सल पुणेकर.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
या विधानातही व्याकरणातल्या
या विधानातही व्याकरणातल्या चुका आहे की!
थोड्याश्या व्याकरणात सुधारणा हे बरोबर आहे का व्याकरणात थोड्याश्या सुधारणा हे बरोबर आहे??
थोड्याश्या, व्याकरणात,
थोड्याश्या, व्याकरणात, सुधारण केल्या...
असे पण चालेल.
खुद के साथ बातां:
खुद के साथ बातां: पुण्याबाहेरचा माणूस लगेच ओळखू येतो नै) >>
मालक ,, जाहीर बोलीभाषेत असे बोलायचे नाही !!
एक सुधारणा
>आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.<
योग्य दखल घेतली जाईल च्या जागी "योग्य त्या फाट्यावर मारले जाईल" अशी पाटी असल्यास जास्त पुणेरी वाटेल
नाय वो
फाट्याचा कोपिराईट दुसरीकडे आहे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
डानराव .... हुच्च!
डानराव .... हुच्च!
एक णंबर्स..........!!!
एक णंबर्स..........!!!
(सौजन्यः बारक्या)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
डॉनराव ओ डॉनराव... तुमच्या
डॉनराव ओ डॉनराव...
तुमच्या सहीत लिहा आता...
ईथे राजकिय विडंबन तसेच पुणेरी पाट्या तयार करुन मिळतील
-निखिल
डानरावानी ओपनींग फॉर्मात
डानरावानी ओपनींग फॉर्मात केलीय.
लै भारी
हा हा हा लै भारी !!!!
हा हा हा लै भारी !!!!
ह. ह. पु. वा.
३. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
खुर्च्या जास्तीत जास्त ७५ कि. वजनाचे लोकांसाठी, त्याहून अधिक वजनाच्या तिकिट्धारकानी जमिनीवर बसावे, त्यासाठी सतरंजी/मॅट घरून आणावी. इथे मिळणार नाही.
फुंके, शिंके नि थुंके...
अरे वा. इथेही 'त्रयी' आहे का.
लै भारी डान्राव. मॅच सुरू होण्यापूर्वीच 'सिटी मोमेन्ट ऑफ सक्सेस' का आता काय ते 'कार्बन्न कमाल' (हो इथे दोन न बरोबर आहेत) मोमेंट.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
>आपण पुण्यासारख्या एका
>आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.<
एक शंका, चिअरलिडर्स मुली आहेत असं गृहित धरुन केलेलं विधान आहे हे. पुण्यामधे चिअरलिडर्स कुठल्या तालमीतले असतील तर???
विमोंची फुल्ल ब्याटिंग
विमोंची फुल्ल ब्याटिंग फॉर्मात!!!
पुण्यात चिअरलिडर्स....
अर्थातच आर्यभुषणच्या.....
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
(विषय दिलेला नाही)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
तरीदेखील ह्याच सूचना लागू आहेत!
फक्त मुलींसाठी लागू होतील इतकेच!
चतुरंग
डॉन्राव, हुच्चं लिहिलंय.
डॉन्राव, हुच्चं लिहिलंय.
हा आमचा स्वभाव
लै भारी डान्राव ! एकदम
लै भारी डान्राव ! एकदम शोल्लेड.
लय भारी...
लय भारी रे डॉन्या... मस्त
स्वाती
चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये
चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये.
आयच्चा घो!!! डान्या लै
आयच्चा घो!!!
डान्या लै दिवसांनी पेटला रे.... (पेटली होती त्याची विडी!)
एकदम कऽडक आहेत पाट्या.
आमच्यातर्फे (हापिसातल्या इमेलवर आलेलं!) भरः
समोर नाचत असलेल्या चिअरलिडर्स जरी मस्तानी भासत असल्या, तरी आपण बाजीराव नाही.
कृपया खाली बसुन सामना पहावा...
समोर नाचत असलेल्या चिअरलिडर्स
समोर नाचत असलेल्या चिअरलिडर्स जरी मस्तानी भासत असल्या, तरी आपण बाजीराव नाही.
कृपया खाली बसुन सामना पहावा...
समोर नाचत असलेल्या चिअरलिडर्स
समोर नाचत असलेल्या चिअरलिडर्स जरी मस्तानी भासत असल्या, तरी आपण बाजीराव नाही.
कृपया खाली बसुन सामना पहावा...>>.
अरे कमीत कमी त्या मस्तानीला तरी सोडा....गौर्या जळुन जमाना झाल तिचा
हा हा हा ...
जबर्या , हे अस्सल पुणेरी झालं !
बाकी त्या जर्सीवरची टॅगलाईन मस्त आहे " इथे अजुन जाहिराती लाऊ नयेत, लावल्यास खेळाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे."

समोर नाचत असलेल्या चिअरलिडर्स
समोर नाचत असलेल्या चिअरलिडर्स जरी मस्तानी भासत असल्या, तरी आपण बाजीराव नाही.
कृपया खाली बसुन सामना पहावा...
हे बाकी अल्टिमेट
पुष्करिणी
चियरलिडर्सना खाणाखुणा
चियरलिडर्सना खाणाखुणा
डान्या अरे तुझं डोकं आहे का युसुफ पठाणची ब्याट? किती चालतंय??
हा माणुस जुनाच असावा
हा माणुस जुनाच असावा
दॉन्या वैग्रे मह्णन्तोय
हिला जगावेगळीच चिंता ये..
हिला जगावेगळीच चिंता
ये.. चुचु !
गप्प बस्स बघू !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
(विषय दिलेला नाही)
+१
हेच म्हणतो.
बेक्कार टाकलाय....
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
असे चिअरलीडर्स चालतील का??
असे चिअरलीडर्स चालतील का??
आय पी एल टीम ची जर्सी....
डान राव लई झकास बघा.
आजच मला एका ढकलपत्रातून पुणे आय पी एल टीम ची जर्सी सुद्धा मिळाली.
एक मंबर ....
एक मंबर ....
=))
बेक्कार हसतोय.
वर्चाच लेख मला मेल मधुन आला
वर्चाच लेख मला मेल मधुन आला आहे... विथ पुणे आय पी एल टीम ची जर्सी सुद्धा...लय बेक्कार लिवलय...ज ब र द स्त..!!!
डॉन्या, लेका तोडलस. अफलातून
डॉन्या,
लेका तोडलस.
अफलातून झाल्यात पाट्या.
अभिज्ञ.
अजुन काही
आजच फॉर्वर्डेड मेल्समधुन आलेल्या अजुन काही पाट्या ...
" खेळाडूंनी रन्स काढल्याशिवाय खेळपट्टीवर थांबुच नये."
" आम्ही तुम्हाला रन्स काढण्यासाठी पैसे देतो, फुकटात टीव्हीवर दिसण्यासाठी नव्हे".
अरे आवरा रे !!
अरे आवरा रे !!
वाचून मजा आली.... मस्तच आहेत
वाचून मजा आली.... मस्तच आहेत पाट्या..

"पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे."
१ नंबर....
हे घ्या
जालावरून साभार
सही आहे....
सही आहे....
सही.. फॉरवर्डेड मेल मधून
सही..
फॉरवर्डेड मेल मधून साभार..
फलंदाजा कडून धावा निघत नसतील तर मैदानावर उगीच टवाळक्या करत बसू नये
गोलंदाजांनी चेंडू जपून वापरावा अन्यथा प्रत्येक नविन चेंडूचे ३ रुपये आकारण्यात येतील
क्षेत्ररक्षकांनी दुपारी १ ते ४ या वेळेत उगीचच Howzzat म्हणून गोंधळ करू नये ,ही स्थानिक लोकांच्या वामकुक्षीची वेळ आहे.
पुष्करिणी
अग्गायायायाया...... शेवटचे
अग्गायायायाया......
शेवटचे दोन खत्तर्रा...
+२
दुसरा खरोखर पक्का पुणेरी आहे. जबरदस्त !
>>> गोलंदाजांनी चेंडू जपून
>>> गोलंदाजांनी चेंडू जपून वापरावा अन्यथा प्रत्येक नविन चेंडूचे ३ रुपये आकारण्यात येतील
--- खल्लास!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
डान्या तुझा लेख आंतरजालावर
डान्या तुझा लेख आंतरजालावर फिरतोय. मी आत्ता मूळ लेख आणि लेखकाचे नाव देऊन आले! ममंच्या इमेलवर आला आहे. त्याच इमेलवर मूळ लेखाची लिंक दिली..
हॅ हॅ हॅ ...
आज दुप्पारच्यालाच आमचाच लेख मला माझ्याच मित्राने पाठवला.
अर्थात कुठेही आमचे किंवा आमच्या ब्लॉगचे नाव नव्हते.
तु जे केलेस ते बरे झाले, च्यायला लोक सरळ उचलतात.
मी फक्त त्या मेलला "छप्परफाड !!!" असा रिप्लाय करुन मोकळा झालो.
अवांतर : मला मालकी हक्क, साहित्यचौर्य, कॉपीराईट वगैरे भांजगडीत इंटरेस्ट नाही. सुज्ञपणे मुळ लेखकाचे नाव द्यावे ही अपेक्षा असली तरी अट्टाहास नाही. ते काय ते "ज्याची त्याची जाण, समज ... वगैरे वगैरे" आहे.
असो, जाऊ द्यात !
अरे हेच..
अर्रे हेच सांगायला हा धागा उघडला, तर निर्मयीने आधीच सांगितले..
स्वाती
लै लै लै भारी!!
डान्राव, ह्या आनंदात आमच्याकडून आणखी काही सप्रेम भेट!!
१ - सामन्याच्या मध्यंतरात खेळाडूंना कोणीही 'प्रेमाने' घरचे पदार्थ आणून भरवू नयेत, त्यांची पोटे बिघडून मैदानावर अनवस्था प्रसंग येऊ शकतो ह्याची जाणीव ठेवावी! असे झाल्यास, त्या खेळाडूवरच्या वैद्यकीय उपचारांचा (आणि त्याचे कपडे धुलाईचा) सर्व खर्च संबंधित दोषी व्यक्ती/व्यक्तींकडून आकारला जाईल.
२ - मैदानाबाहेर दुचाक्यांचे मोठेमोठे आवाज करु नयेत. हे रेसचे मैदान नसून क्रिकेटचे मैदान आहे हे विसरु नये अन्यथा (गाडीच्या) सायलेन्सर मधे उसाची चिपाडे ठासून भरली जातील!
३ - षटकार मारल्यानंतर चेंडू मैदानाबाहेर गेला तरी पळवून नेऊ नये, त्वरित आणून द्यावा. तसा तो आणला नाही तर पकडले जाल. आणून दिलात तरी बक्षीस मिळणार नाही कारण तुम्ही तुमचे कर्तव्यच केले आहे, उपकार नव्हेत!
४ - परवानगी न घेता कोणत्याही जाहिराती मैदानावर किंवा मैदानाबाहेर करु नयेत. करताना आढळल्यास सामना संपेपर्यंत डांबून ठेवले जाईलच, शिवाय शिक्षा म्हणून सामन्यानंतर संपूर्ण मैदानाची साफसफाई करुन घेतली जाईल!
५ - ज्येष्ठ नागरिकांनी सामन्यासाठी येताना योग्य ती काळजी घ्यावी उगाच गर्दीत सापडून जीव गुदमरल्यास किंवा टंच चिअरलीडर्स कडे बघून अतिउत्तेजनेमुळे हार्टअॅटॅक वगैरे आल्यास आयोजक जबाबदार नाहीत!
६ - मोबाईल फोनवरुन ओरडून सामन्याचे धावते समालोचन करुन आजूबाजूच्या प्रेक्षकांना त्रास देऊ नये.
हा हा हा ...
नंबर २, ३ आणि ४ जबरदस्त !
ह्यानिमित्ताने आमची अजुन एक पाटी :
"खबरदार ! हा छोटा डॉन याचा लेख आहे, चोरण्याचा प्रयत्न करु नये. आमचेकडे चोराची धिंड काढायची पद्धत आहे."
अगाई गं ... बाकी आमचे राको
अगाई गं ...
बाकी आमचे राको डान्राव प्रसिद्ध झालेले पाहून अंमळ आनंद झाला.
डॉन्या, अरे तुझा लेख
डॉन्या, अरे तुझा लेख इ-मेलमधूनतर फिरतो आहेच, पण एकाने स्वतःच्या ब्लॉगवरपण टाकलाय... अर्थात तुझं नाव वगळून...
-अनामिक
लै भा हा री ही
प्रसिद्दी बी लै झालीया..रहो
चालूंद्या....
मस्तच
मस्तच
आणखी
येथे सगळ्यात लांब षटकार मारणार्यास कोणतेही बक्षीस मिळणार नाही. उलट षटकार मारल्यावर चेंडू मैदानाबाहेर गेला तर षटकार मारणार्या फलंदाजाला तो भरून द्यावा लागेल. तसेच आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाल्यास तेही भरून द्यावे लागेल.
एका डावाला एकच चेंडू मिळेल. चेंडूचा रंग उडाला/आकार बदलला/शिवण उसवली तरी त्यानेच खेळावे लागेल. नवा चेंडू हवा असल्यास आपल्या घरून आणावा.
एका वेळी दोन्ही फलंदाज उजवे किंवा डावेच असावेत. अन्यथा एक डावा एक उजवा फलंदाज असेल तर साईटस्क्रीन हलवून मिळणार नाही. ती व्यवस्था फलंदाजाने आपली आपण करावी. त्यात वेळ गेल्याने सामना वेळेत न संपल्यास संबंधित खेळाडूकडून पुढच्या पूर्ण दिवसाचे भाडे वसूल करण्यात येईल.
खेळाडूंनी पंचांकडे आपल्या वस्तू सांभाळण्यास देऊ नयेत.
भारतात रात्रीच्या वेळी दव पडतेच. चेंडू पुसायला रुमाल आपलाच आणावा. पंचांकडे/आयोजकांकडे मागू नये.
शेवटी......
या सूचना सर्व खेळाडूंसाठी बंधनकारक आहेत. त्या मराठीत असल्यामुळे कळल्या नाहीत हे कारण चालणार नाही. सूचनांचे भाषांतर करून हवे असल्यास इंग्रजीत भाषांतराचे एका शब्दास १ रु ३५ पैसे व हिंदीत भाषांतराचे एका शब्दास २ रु ४५ पैसे पडतील (सर्व करांसहीत). पैसे सुटे आणावेत व आधी द्यावेत.
ठ्ठ्ठ्ठॉक्क्क्क्क.........
मेलो!!!
अस्सल बावन्नकशी पुणेरी !!
फॉरवर्डेड मेल मधून साभार..
फॉरवर्डेड मेल मधून साभार..
पुणे आय्.पी.एल. टिम चे नाव ...
कात्रज के कातिल
PMPL के पिल्ले
डेक्कन पार्कर्स
येरवडा के येडे
पिंपले के सौदागर
चिंचवड के चिडचिडे
नीता व्हॉल्व्होज
पुणे सेंट्रल
NH4 रेंजर्स
पुणेरी पंटर्स
पुण्याचे भामटे
टम टम XI
पुणेरी सिक्स (सीटर्स) हिटर्स
सॉफ्टवेयर के सुल्तान्स
हिंजवडी हिरोज
बाणेर बॅटर्स
पाषाण पॅशन
लकडी पूल के लडके
वाकड वॉरिअर्स
पुण्याचे छावे
पुणेरी मावळे
पुणेरी वॉरिअर्स
सह्याद्री छावे
पुणे पंटर्स
पुणे पेशवाज
महा१२
कस वाटेल ?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
चे
शेवटी चे वाढवा. मग पर्फेक्ट
डॉन्राव.. तुमच्या लेखाची
डॉन्राव.. तुमच्या लेखाची पीडीएफ प्रत सुद्धा मिळू लागलीये!! चायला उद्या पुस्तक छापायचे! काय असतं एकेक पब्लिक खरंच!!
एका अर्थी हे निनावी प्रशंसापत्र म्हणायचे काय?
-- मेघवेडा
डॉनराव जबरा!
डॉनराव जबरा!
अनामिका
छोटे डॉनराव, मनःपूर्वक
छोटे डॉनराव,
मनःपूर्वक अभिनंदन..!
--सुहास००७
अवांतरः तुमचे "बंगलोर आख्यान" ही वाचले.. मजा आली! त्याचे पुढचे भाग येवू द्यात..