सदाबहार

0
0

णमस्कार्स लोक्स ,

ऑफिसात कामांच्या व्याप , शेडुल्ड टास्कस इनकंप्लिट राहिल्याचं टेण्शन , बरीच कामं पुर्वी कधीच कोणी केलेली नसतात , आपलं ट्रायल अँड एरर वर चाललेलं गुर्‍हाळ.. हे नाही ते.. ते नाही तर अजुन काही..... बॉसचा वरुन स्टेटसचा मेल , दुसरीकडुन क्लायंटची बोंब .. घरी यावं ते ह्याच टेंशन मधे ..बॅग फेकुन द्यावी... कपडे अक्षरशः ओरबाडुन फाडुन काढावेत. एक लाथ मारुन बाथरुमचा दरवाजा तोडुन आत जावं आणि शंडगार शॉवरचा फवारा अंगावर घ्यावा... तरीही ही चक्र थांबत नाहीत. शिवाय रिस्पाँसिबिलीटीज चे भोगही वाढुन ठेवलेलेच असतात .... शॉवरही चिडचिडतंच घ्यावा... डिओ आडवा तिडवा मारावा , पावशेर पावडर भस्म लावल्यासारखी फासुन घ्यावी ........ आणि आपली लॅपटॉपची पेटी उघडावी ...

कळत नकळत बोट जातं ते सदाबहार.एम३यु फाईल कडे ... गाणी जास्त नसतात १५-१६च .. पण मुड चेंज करायला अगदीच रामबाण. गाणी किती येतात आणि जातात ... इव्हन एखाद्या गाण्याचेही पन्नास रिमिक्सेस येऊन जातात .. पण ऐकतो ते कोणी ? आठवा ... उगाच अपिलींग वाटावं म्हणुन "कांटा लगा.... हाय लगा " म्हणत शेफाली जरिवाला ने केलेला "नाडी दाखवण्याचा" प्रयोग ? असो.

तसा मी वेगळ्या वेगळ्या वेळेला वेगळं वेगळं म्युझिक ऐकतो ही. जसं बाईक चालवतांना बर्‍याच जणांना कर्णकर्कश्य आणि डोकेदुखी वाटणारी हार्ड अँड मेटॅलिक गाणी ,
ब्रायन अ‍ॅडम्स चं समर ऑफ ६९ तर कुठे ठेऊ कुठे नको ठेऊ असं होतं .. ते संपत नाही तोवर स्टिंगचं "डेझर्ट रोज" सुरू होतं ..
इंग्रजी गाण्यांमधे आमचा सर्वांत आवडता बँड म्हणजे बॅकस्ट्रीट बॉईज ! "शो मी द मिनींग " हे गाणं तिसरा पोपट झाल्यावर आमच्या रुम वर दिवस रात्र वाजत असायचं , अप्रतिम .. तशीच "अ‍ॅज लॉंग अ‍ॅज यु लव्ह मी " ,"क्विट प्लेईंग गेम्स " ही काही अजुन गुणगुणन्यास भाग पाडणारी गाणी. फाईव्ह क्विन्स चं "वी विल रॉक यु" एक उत्साह वाढवणारं गाणं .. तर "किप ऑन मुव्हींग " कर्णमधुर .. पफ डॅडीचा " आय'म मिसिंग यु " किंवा आपल्या एमेनिम बाबचा "सो द रियल स्लिम शेडी प्लिज स्टँड अप .. " असो किंवा अजुन कोणता रॅपर .. नेहमीच मजेदार असतो. शॉगी, मँबो,नेली,५०पैसे,एमिनेम आणि आमच्या आवडत्या स्त्रीया जेनिफर लोपेझ्,ब्रिटनी,केली, शानिया ह्यांचे विडिओ युक्त म्युझिक ऐकणे म्हणजे एक सुवर्णसंगम !! गेली दुनिया दोन घटका उडत म्हणुन आम्ही इंग्रजी संगिताचा लुत्फ घेतो. पण ही गाणी आम्ही आमच्या होम थेटरात स्लॅब हालवण्यापर्यंतच्या आवाजात ऐकताना आमच्या इंग्रजी म्युझिक द्वेष्ट्या आई-बाबांचा रोष पचवावा लागतो ... चार शिव्या ही खाव्या लागतात.

"मुड" असेल आणि एकटा असेल तेंव्हा आम्ही चावट व्हिडिओ वाल्या गाण्यांचाही भरपुर लुत्फ घेतो. नर्ड चं "लॅपडँस असो वा शॅगी चं "इट वॉजंट मी" सलमा हयक चा "बेली डान्स" किंवा शकिराचं मादक कंबर हलवणं असो .. कधी कधी ब्रिटनी सुद्धा घायाळ करते , जेनिफर म्याडमचा अपिलींग डान्स .. हाय अल्ला हास्य "आय्ल टेक यु टु द कँडी शॉप .. आय्ल लेट यु लीक दं लॉलीपॉप" मधी ५०सेंट भावाने एवढा खर्च करुन ललना नाचवल्या .. कसे आभार मानावे ? नेली भाऊ पण "डायलेमा" मधुन सुरेख सफर घडवतो हास्य

पण ही गाणी कितीही आवडली तरी सदाबहार नाहीत , कारण ते ऐकण्या साठी एका मुडची गरज असते.

सकाळी सकाळी एखादी आरती किंवा जगजीत सायबाचं "हे राम... हे राम" (इथे मला जगजीत खुप खास वाटतो ) , "इतनी शक्ती हमे देना दाता " सकाळी लावलं की आई-बाबा पण "व्वा .. आपला टारु किती सद्गुणी मुलगा आहे .. उगाच कोणी त्याला हिण आणि हिणकस म्हणुन हिणवतो .. " असं म्हणत त्या दात्याकडे आमच्या नावाने चार मागने मागतात. "केशवा माधवा " च्या नामाचा गोडवा सकाळी अतिशय गोड वाटतो .. " "अल्ला तेरो नाम .... इश्वर तेरो नाम .... " असं चित्त प्रसन्न करणारं गाणं ऐकताना कधीच मी आस्तिक की नास्तिक ? असले फालतु प्रश्न येत नाहीत. "सुखकर्ता दुखहर्ता" ची आरती अंघोळ करतांना ऐकायला आली की त्या दिवशी अगदी दिवाळी विना सात्विक अभ्यंग स्नान होऊन जाते ! "रघुपती राघव .. राजाराम" ऐकताना रामायण कधीच आठवले नाही पण आनंद मात्र अनलिमीटेड भेटला. "हनुमान चालिसा" ,"शनि मंत्र" ,"मृत्युंजय मंत्र ", "साई आरती " ह्या एकापाठोपाट एका गाण्यांचा आनंद लुटावा तो केवळ सकाळीच ... बाकी वेळेस ही गाणी अगदी शुन्य प्रभाव करतात .. म्हणुन हे संगितही सुंदर असलं तरी आमच्या "सदाबहार" क्याट्यागरी मधे येत नाही.

सद्ध्याची बॉलीवुड गाणी ? छे हो ? कधी आणि किती येतात ? आणि कधी जातात ह्यावा ही पत्ता लागत नाही .. फडतुस कंडम माल साला .. उगाच ढिंगच्याक ढिंगच्याक वाजवलं , डिजे इफेक्ट टाकुन व्हॉइस इफेक्ट दिला न हाडकुळ्या पोरी नाचवल्या म्हणजे काय म्युझिक असतं का साला ? शंभरातलं एखादं गाणं लक्षात राहातं ... नाही म्हणायला हिमेस भाईंनी काही लगातार म्युझिक दिले .. पण ते तेंव्हा गाजली .. आज कोण त्यांची ती गाणी आवर्जुन वाजवतो ? हो मान्य आहे सगळाच काही कचरा नसतो.. पण बहुतांश तर कचराच असतो ना ? त्यात तो भिकारडा आणि भुरटा म्युझिक चोर अन्नु मलीक .. अ‍ॅहॅहॅ .. काय एकेक आवदसा दाखवतो .. कंडम साला ..
पण काही गाणी एकदम टची असतात बरं .. पेज३ मधलं "कितने अजिब रिश्ते है यहां पे..." काय सुरेख गाणं ? यात राग कोणता ? सुर कसा लावलाय ? ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसतं .. हे गाणं भिडतं हृदयाला. अजब प्रेमकी गजब कहानी हा कितीही भिकारी चित्रपट असला तरी "तेरा होने लगा हुं .. " आणि " तु जाने ना" ही गाणी गोड गोड आहेत हास्य अगदी रिंगटोन ठेवण्याच्या लायकीचं ! पण नाही ... कॅनॉट बी सदाबहार हास्य

नाही म्हणायला नव्वदाच्या दशकातल्या गाणीही अंमळ सुरेख आहेत. "साजन" मधली गाणी एक से एक आहेत .. तर हम आप के है कौन ? ,बाँबे, राजा हिंदुस्तानी, दिल , कयामतसे कयामत तक ... जो जिता वोही सिकंदर मधल्या "पेहला नशा ... पेहला खुमार .. नया प्यार है .. नया इंतजार " या गाण्याला आपण कसं विसरु ? इट्स द बेस्ट रोमँटिक ट्रॅक एव्हर !

आमच्या सदाबहार गाण्यांमधे अगदीच मोजक्या गाण्यांचा समावेश होतो. जी गाणी आम्ही सकाळ संध्याकाळ , रात्री , दुपारी , एकटे असतांना , दोस्तांमधे , वाहन चालवतांना कधीही ... अगदी कधीही आणि कितीहीवेळा आयुक्षभर ऐकु शकतो. एखादं हिंस्त्र श्वापद अचानक काहीतरी जादु होऊन शांत व्हावं तसं ही गाणी ऐकलं की माझं उद्विग्न मन शांत होतं ! आनंदातही ही गाणी आनंद देतात आणि दु:खी असलो तरी ही गाणी दु:ख तणाव विसरायला लावतात ... जादु आहे नाही ? ह्या गाण्यांचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे सगळीच्या सगळी जुणी हिंदी गाणी आहेत. हास्य
आमची सदाबहार गाणी , सॉर्टेड बिल्कुल नाहीत .. सगळीच एकसे एक .. कोणती तसुभरही कमी नाही की जास्त नाही.
१. बेदर्दी बालमा तुझको.. मेरा मन याद करता है ... बरसता है जो आंखो से .. वो सावन याद करता है .....
२. दो लफ्जो की है ये दिल की कहानी ... या है मोहोब्बत .. या है जवानी ...
३. रिमझिम गिरे सावन .... सुलग सुलग जाये मन ... भिगे आज इस मौसम मे .. लगी कैसी ये अगन ..
४. मै शायर बदनाम .. ओ .. मै चला .. मै चला .. महफिल से नाकाम .. ओ .. मै चला .. मै चला ...
५. मेरा जिवन कोरा कागज ... कोरा ही रह गया
६. मेरा कुछ सामान ... तुम्हारे पास पडा है ....
७. मेरी भिगी भिगी सी ... पलको पे रह गये .. जैसे मेरे सपने बिखर के .. जले मन तेरा भी ... किसी के मिलन को ...
८. अगर तुम ना होते ...
९. जीस गली मे तेरा घर ना हो बालमा .. उस गली से हमें तो गुजरना नही ....
१०. सुरमई अखियों मे.. नन्हा मुन्हा इक सपना दे जायें ...
११. चिठ्ठी आयी है आयी है चिठ्ठी आयी है ....
१२. फुलोंके रंग से ... दिल की कलम से ....
१३. दिल का भंवर करे पुकार
१४. मेरा नाम जोकरची सगळी च्या सगळी ..
१५. प्यार हमें किस मोड पे ले आया ... के दिल करे हांये .. हांये .. कोई ये बतायें हायें .. क्या होगा ..

ही गाणी कोणी लिहीली ? कोणी गायली ? कोणत्या काळात आली ? कोण संगित निर्देशक वगैरे माहिती करुन घेण्याच्या फंदात मी कधी पडलोच नाही .. पण ती गाणी बणवण्यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांचा मी आजन्म ऋणी आहे हास्य गाणी सॅड आणि स्लो आहेत की फास्ट आहेत वगैरे गोष्टींचाही मला काही फरक पडत नाही ... ही गाणी ऐकावी तर ओरिजिनलंच .. कुठल्या येडपटानं त्या गाण्यांचा रिमिक्स ट्राय करुन इस्कोट केल्यावर मी त्याला चार शिव्या घालतो. ती गाणी ऐकतंच नाही.
पण ही गाणी माझ्यासाठी सदाबहार आहेत हे नक्की.. हास्य

(समाप्त)

{परवा मी घरी साधारण ६.१५ ला}

Big smile परवा मी घरी साधारण ६.१५ ला फोन केला कि जरा उशिर होइल यायला तर मागुन बाइ बोलल्याचा आवाज आला, मी म्हणाले कोण आलिये, तसा हा म्हणाला निट ऐक अनुराधा रामरक्शा गातेय. आम्च्या घरी पण सारखे ढाणढाण सुरु असते. Stare

{मस्तच ........}

माझी सदाबहार गाणी.
हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते........
अरे जाने कैसे कब कहा ईकरार हो गया, हम सोचते हि रेह गये और प्यार हो गया Big smile
तेरे मेरे सपने अब एक रंग है.............

{एक अनुभव मी एका प्रोजेक्टवर}

एक अनुभव
मी एका प्रोजेक्टवर काम करत असताना आम्ही जिथे रहायचो तेथे जवळच्या बारमध्ये तो बारमालक ठरावीक वेळेस कायम देवाची भजने / आरत्या लावायच्या. एकदा असाच बसलेलो असताना घरून फोन आला. नन्तर विचारले फोन केला होता तेंव्हा मंदीरात होतास का ? असे दोन तीन वेळा झाले.
नन्तर मी कधितरी घरी हा किस्सा सांगितला.
आता कुठे असलो आणि फोन आला आणि त्या वेळेस जर भजन आरती चालू असेल तर घरी वेगळीच शंका घेतात


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{मस्त लिखाण रे टार्‍या}

मस्त लिखाण रे टार्‍या ...

संगीताच्या बाबतीत आम्ही कोणतीही भेदाभेद ठेवत नाही,,,अगदी ते डी-डी वन वर रात्री दोन मडकी घेऊन " काट-काट,कुट-कुट" करत वाजवतात ते दिखील मी एकतो..म्युझीक ईज द कॉमन लँग्वेज ऑफ वर्ल्ड.....

बाकी राहिली सदाबहार....बरेच आहेत्...सध्यातरी केवळ कार्तीकी आणी कार्तीकी आणी कार्तीकी एकतोय

{टार्या, लै भारी रे लेख..}

टार्या,

लै भारी रे लेख.. आवडला मनापासून.

कुणाच्या तरी भाषेत सांगायचे म्हणजे.. ओरिजनल काही तरी शेवटी तुझ्याकडून आलेच तर wink

असो,

आमच्या मोबाईलमध्ये पण काही खास निवडक गाणी आम्ही ठेवली आहेत जेव्हा जेव्हा जसा जसा मुड असेल तसे तसे ते गाणे आपोआप माझ्याकडून लावले जाते व प्रचंड आनंद देऊन जातं !

टार्या सारखंच माझे ही आहे, गाणे कोणाचे, कोण गाते आहे, संगीतकार - गीत कार कोण ह्याचा आम्हाला काही फरक पडत नाही उगाच त्या फंद्यात पडत नाही... पण जे कानाला आवडते ते खरोखर उच्चच असतं.. म्हणून आमच्या व्यक्तिगत जिवनामध्ये त्यांना स्थान असतं.

कधी भाषेचे बंधन येत नाही की शब्द अडत नाहीत.. मनाच्या उलाघाली मध्ये जे मनाला शांती देईल तेच माझे आवडते गाणे...

काही अशीच खास गाणी...

१. माय री - : तेरी या मेरी या भुल गया.. भुल गया हार ते जीत... हे माये किं करना मै जितनू.. हो वे ना जें मीत..

२. मी हजार चिंता नीं हे डोके खाजवतो.. तो कट्ट्यावर बसतो घुमतो..शीळ वाजवतो !

३. लागी मन की लगन..

४. माय हार्ट विल गो ऑन...

५. सौ दर्द.. सौ राह ते..

६. तरुण आहे रात्र अजूनी.... राजसा निजलास का रे... ( हे आता आताच कानावर आले व प्रचंड आवडले )

७. मन तळ्यात मनात... जाईच्या गळ्यात... मन नाजूकशी मोती माळ... तुझ्या नाजुकश्या गळ्यात..

८. तुम मिले...

९. तुम्ह से ही... तुम्ह ही..

१०. अनब्रेक माय हार्ट

११. हिरो

१२. अडिक्टेड

१३. व्हेअर डू यू गो

१४. रह ना है तेरे दिल में

१५. तु ही मेरी शब है.. सुबह है..

अशी अनेक गाणी... आपले जीवन कोठे ना कोठे आनंदी करत असतात.. !


Hope is a good thing...

{तू लिहीलेली सर्वच्या सर्व}

तू लिहीलेली सर्वच्या सर्व गाणी माझी आवडती!

{मस्त टारूशेठ. लै}

मस्त टारूशेठ. लै भारी.....यातली बरीच गाणी आमच्याही सदाबहार लिस्ट मधे आहेत... हास्य

{वा!}

वा! गाणी मस्तच आहेत. सगळीच आवडतात.
पण आपल्या सदाबहार लिस्ट मधे मात्र काही निवडक क्लासिकल - सेमी-क्लासिकल गाणी आणि बर्‍याचश्या "नाट्य गीतांचा" समावेश होतो.

त्यातली काही गाणी (जमेल तिथे दुव्यासहित):

१) तन मन धन - प्रभा अत्रे
२) लट उलझी - भीमसेन जोशी आणि जसराज
३) केतकी गुलाब - भीमसेन जोशी - मना डे
४) हे सुरांनो चंद्र व्हा
५) आज गावत मन - डी. व्ही. पलुस्कर आणि आमिर खानआज गावत मन - डी. व्ही. पलुस्कर आणि आमिर खान
६) सुरत पियाकी - पं. वसंतराव देशपांडे
७) या भवनातील गीत - पं. वसंतराव देशपांडे
८) प्रेम सेवा शरण
काय बोलावं ह्या गाण्याबद्दल. ह्याची एकूण सहा व्हर्जन्स आहेत माझ्याकडे
- मास्टर दिनानाथ मंगेशकर
- उस्ताद अब्दुल करीम खान साहेब
- पं. भीमसेन जोशी
- पं. वसंतराव देशपांडे
- आशा भोसले
- सुरेश वाडकर
सगळीच्या - सगळी अप्रतिम.
९) नाथ हा माझा - बाल गंधर्व, माणिक वर्मा, पं. कुमार गंधर्व
१०) आज अचानक गाठ पडे - पं. कुमार गंधर्व (निव्वळ अप्रतिम)
११) आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम-राम घ्यावा - कितीही वेळा ऐका. समाधान होतच नाही. हे गाणं ऐकताना एकाच वेळी - त्यातल्या भक्तीरसामुळे खूप प्रसन्न पण वाटतं आणि त्याच वेळी तुकाराम महाराज सोडून जातानाचा तो सीन आणि "आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम-राम घ्यावा" हे शब्द, आणि सुरेख चाल ह्यामुळे अक्षरशः भारावून जायला होतं.
१२) देहाची तिजोरी - सुधीर फडके
१३) स्वये श्री राम प्रभू ऐकती - सुधीर फडके (खरतर "गीत रामायणातली" बरीचशी गाणी)
१४) बाबुजी आणि आशाजींची अजरामर द्वंद्व गीतं
१५) देवा घरचे ज्ञात कुणाला - रामदास कामत
१६) घेई छंद मकरंद - पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे
१७) बसंतकी बहार आई - पं. राम मराठे आणि प्रसाद सावकार

अजून बरीच आहेत. सध्या इथेच थांबतो.
हा धागा काढल्या-बद्दल टारझनचे मनापासून धन्यवाद.

(नाट्य-संगीत प्रेमी) सुमीत भातखंडे

{टारु..}

छान लिहिलं आहेस रे,
स्वाती

{टारूशेठ ...}

मस्त रे..
मी "गानसेन" नसलो तरी "कानसेन" नक्कीच आहे ...
एखाद गाण मनाला भिडल की ते कुणी लिहल, गायलं, अगदी कोणत्या भाषेत आहे, नवीन की जुनं असे काहीच प्रश्न पडत नाहीत,
आमची आवडती काही .. जी गाण्यांच्या बदलाबदलीत पण मोबाईल वर टिकून राहतात ..
१ - अष्टविनायका तुझा महिमा कसा ..
२ - वेंकटेश स्त्रोत्र
३ - केव्हा तरी पहाटे
४ - कॉम्प्लिकेटेड
५ - डेझर्ट रोज
६ - अखियोंके झरोकों से
७ - आओगे जब तु ओ साजना
८ - डक टेल्स हास्य
९ - मायरी
१० - मिले सुर मेरा तुम्हारा ..[जुनं]
११ - यही होता प्यार है क्या ... [मला वाटत हिमेशचं सर्वोत्तम]
१२ - ले जा ले जा - श्रेयाचं
१३ - वादा रहा सनम
१४ - नुवेंटू - आर्या मधील तेलगू
१५ - पाहिले न मी तुला

{४ - कॉम्प्लिकेटेड ९}

४ - कॉम्प्लिकेटेड

Big smile Big smile Big smile

९ - मायरी

संग्राम ह्यावरुन बरेच काहि आठवले...


-निखिल

{टारोबांचे आभार!! अजुन काही १)}

टारोबांचे आभार!!
अजुन काही
१) धीरे धीरे मचल - अनुपमा मधलं अप्रतीम गाणं
२) या चिमण्यांनो परत फिरा रे (कितीही वेळा ऐकलं तरी डोळ्यात पाणी येतंच)
३) एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात
४)दो दिल टूटे दो दिल हारे
५) महलोंका राजा मिला
६) धुंद येथ मी स्वैर झोकितो
आरती प्रभूंची सगळी गाणी.
संपुर्ण तलत,समग्र बाबुजी,

{+१}

सहमत. फक्त 'धीरे धीरे मचल' मध्ये ते फॉ-लाडिक संवाद घुसडण्याची अवदसा का आठवली दिग्दर्शकाला, देव जाणे. 'दो दिल हारे' मधला नि:श्वास क्लासच.

{मस्त लेखन.... सुधारलं की काय}

मस्त लेखन.... सुधारलं की काय पोरगं thinking

{यादी खुप मोठी आहे ....}

पुर्वी कॅसेट होत्या तेंव्हा पण रेडीओ आवडायचा बेला के फुल, सिबाका/बिनाका गीत माला ई. पण टारुभाउ एक सांगु आवडत गाणी एमपी३ वर ऐकण सुरवातीला आवडायच पण नंतर कंटाळा येउ लागला. हल्ली परत रेडीओ एफ.एम. कडे वळलो.कारण इथे आपल्याला माहीत नसत की पुढच गाण कोणत आहे.अज्ञानात सुख असत. रेडीओवर अचानक सुखद धक्का देणारे आवडत गाण लागल की आम्ही धन्य होतो.
आवडती लावणी - नका तोडु पावन जरा थांबा (चित्रपट-पिंजरा), पिकल्या पनाचा देठ की हो हिरवा,तुझ्या उसाला लागल कोल्हा.
(आण्णा) सि.रामचंद्रजींची मराठी + हिंदी सर्व गाणी


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{असचं म्हणते... सुधारला कि काय?}

मस्त लेखन!
ओरिजिनल अन् मनापासून लिहलाहेस वाटतं.!
आवडला

{टार्‍या लै भारी लेख... आता}

टार्‍या लै भारी लेख...
आता सदाबहार ची बी साईड लिहावी का???


-निखिल

{परंपरा}

त्यापेक्षा विडंबनाची परंपरा चालवा की मालक. 'सदाभार' नावाने एकादे विडंबन टाका.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{तो आमचा प्रांत असता तर नक्कीच}

तो आमचा प्रांत असता तर नक्कीच आत्तापर्यंत एक हि & हि विडंबन पाडुन टाकले असते राव


-निखिल

{टारूशेठ हे हो काय?}

हिकडे कुणिकडे वाट वाकडी केली म्हणायची?

{टार्‍या लेख छान आहे. अशी}

टार्‍या लेख छान आहे. अशी सदाबहार गाण्यांची यादी काढणं अवघड आहे. पण अशी यादी काढलीच तर त्यात जवळपास सगळीच गाणी ८० च्या दशकाच्या आधीची असतील हे नक्की. शिवाय गाण्याशी संबंधित आठवणीही असतात. मध्यंतरी पचमढीला गेलो होतो. इंदूरहून तिथे पोहोचयाल बारा तास गाडीने लागतात. सकाळी सकाळी पिपरीया नावाचं गाव आलं, तिथून पचमढीला जायचा स्वतंत्र रस्ता लागतो. तिथून पुढे सगळा घाट आहे. तोपर्यंत बरेचसे प्रवासी उतरले होते आणि आमच्या डायवर साहेबांनी मस्तपैकी येशूदासची गाणी लावली. आणि क्या बात है, सकाळी सकाळी असला मूड तयार झाला. वळणदार घाटावर गोरी तेरा गाव बडा प्यारा, सुनयना, आज इन नजरों को तुम देखो, असली गाणी लागली नि मजा आला. पचमढी म्हटलं की येशूदासची गाणी हे समीकरणच जुळलं गेलं. तोपर्यंत अनेकदा ऐकलेली हीच गाणी इतकी भावली नव्हती, एवढी त्यावेळी भावली. बाकी गाण्याच्या जुन्या आठवणी जागवल्याबद्दल धन्स.

{च्यायला !! लेखकाचे नाव चार}

च्यायला !!

लेखकाचे नाव चार वेळा वाचून खात्री करुन घेतली.

एकदम सदाबहार आणी मस्त लेखन टार्‍या. बर्‍याच जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम तुझ्या लेखनाने केले आहे.

{मी पुन्हा एकदा लेख नि लेखकाचे}

मी पुन्हा एकदा लेख नि लेखकाचे नांव तपासून पाहिले.... क्षणभर विश्वास बसला नाही...
वरती विमो नी म्हटलेले धीरे धीरे मचल हे छान आहेच.. पण त्यातले "कुछ दिलने कहा.." हे मला अधिक आवडते..
'कुछ दिलने कहा' नि 'छुपा लो यूँ दिलमें प्यार मेरा' ही दोन्ही गाणी मला गायिकेने अगदी कानात कुजबुजल्यासारखी गायलेली वाटतात.... (!) त्यातले छुपा लो तर जास्तच... अतिशय मंद संगीत.. नि त्यातच मिसळून जाणारा तो तरल आवाज!!!
झालेच तर :
१.सचिनदांचे 'ओ रे माझी' .... नि त्यातली 'मेरा खिंचती है आँचल' ही जीवघेणी ओळ....
२. 'मोगरा फुलला'
३. जैत रे जैत ची सगळी गाणी..
४. गं साजणीचा ठसका..
५. कहे तोसे सजना हे मैंने प्यार किया मधले पहाडे ढंगाचे गाणं
६. रूठ के हमसे कभी जब चले जाओगे तुम.... ऑफकोर्स जो जिता वोही...
७. आईना मुझसे मेरी पहलीसी सूरत माँगे.. डॅडी..
८. ने मजसी ने...
९. तुम पुकारलो.. अगदी सुरूवातीच्या हाँटींग शीळेसह
१०.यार मेरी धडकन आरे...
११. निंदियासे जागी बहार....
१२ रात्र काळी.. घागर काळी...
१३. गुरूदत्तची गाणी...
१४. ॠणानुबंधाच्या.....
१५. जुल्मे-उल्फतपे हमें लोग सजा देतें हैं.... यातही पार्श्वसंगीत म्हणून फक्त संतूर/जलतरंग/तत्सम काहीतरी आहे...
यादी अमर्यादित आहे... त्यांचा क्रम ही लावणं अशक्य आहे.. ही फक्त पट्कन आठवली ती!!!

{अरे वा , छानच! माझी आवड १.}

अरे वा , छानच!

माझी आवड
१. आनेवाला पल जानेवाला है..
२. न जाने क्यू होता है ये जिंदगी के साथ
३. चदरिया झिनी रे झिनी
४. का रे दुरावा का रे अबोला
५ जुल्मी संग आंख लडी
६ दिल है छोटासा छोटीसी आशा
७ तनहाइ ..( दिल चाहता है )
८ दिवाना हुआ बादल
९ ओ साथी रे


पुष्करिणी

{खल्लास्स्स्स!!!!}

टार्‍या लेका, आश्चर्याच्या सुखद धक्यानं खुर्चीतुन सांडलो!
मस्त लिहिलंयस येड्या! बेश्टच बेश्ट!!

तसं पाहता, गाणं सदाबहार (कोणत्याही वेळी छानच वाटेल ह्या अर्थी!) कसं ठरवावं हा प्रश्नच पडतो मला.
लेखात म्हणल्याप्रमाणे...प्रत्येक वेळेची, प्रसंगाची आपली आपली एक जातकुळी असते, त्यापध्दतीनं येणारी गाणी मला आवडतात. नाय तर, सक्काळसक्काळी झोपेतुन जाग आल्याबरोबर 'तुम्हावर क्केऽली मी मरजी बहाऽऽल' ऐकलं तर कसं होईल? Big smile

पण एकुणातच मला किशोरदाची रडकी गाणी (शॅड सॉन्गं हो..) बर्‍याचदा वेळकाळ पार करुन भिडतात.
येसुदास ऐकायला मात्र थोडासा रिलॅक्स आणि खुललेला मूड लागतो.
*येसुदासने एक अल्बम केला होता, त्यात 'चमक चम चम्के सितारों के संग.' असं गाणं होतं..मला अगदीच आवडलं होतं, कदाचित त्याच्या व्हिडिओमुळे असेल. कुणी देऊ शकेल काय ते गाणं?

बाकी, कातरवेळ उलटुन गेली असेल तेव्हा एकटं किंवा एखाद्या हमशौक मित्रासोबत 'खूब जमेगा रंग..' म्हणुन बैठक जमवताना आवर्जुन गुलाम अली आणि हरीहरनच्या गज़ला हव्यातच!

कोण्या एके काळी विंग्रजी गान ऐकायचो (म्हणजे प्रयत्न करायचो wink ) तेव्हा
वेस्टलाईफ, रोनॅन केटिंग, बॉयझोन, बॅकस्ट्रीट बॉईज, फाईव्ह,बीजीज, एमजे कधीमधी आर.केली हे दिवसरात्र चालायचे Big smile
रिकी मार्टिनचं 'शी'ज ऑल आय एव्हर हॅड..' अंमळ हळव्या मनाला कुरवाळुन जायचं wink

कधीकधी तिर्थरुपांसमोर 'पापा डोन्ट प्रीच...' वगैरे म्हणुन कळ काढून पळ काढायला उपयोगी पडायचं (का कोण जाणे...त्यांना ह्या गाण्याचा भयानक राग! )

हळुहळु "दिव्यज्ञानाच्या पवित्र कवडश्यांनी अंतर्मनाच्या काळकोठडीत प्रवेश करायला सुरुवात केल्यावर" काहीही न कळतादेखील वसंतरावांची गाणी प्रचंड आवडु लागली हास्य

बाकी, आमची आवडही आमच्यासारखीच विस्कळीत! त्यामुळॅ नीट शब्दबध्द काही करता येईना बुवा!

{धमु, यावरुन आठवलं, पॉल}

धमु,
यावरुन आठवलं, पॉल यंगचं"लिव्हिंग इन द लव्ह ऑफ द कॉमन पीपल" तसेच कॅरेन कार्पेंटर चा कुठलाही अल्बम ऐकला आहेस??

{नाय वो... बारामतीसारख्या घोर}

नाय वो...
बारामतीसारख्या घोर खेड्यापाड्यात wink श्येरातुन जे काय झिरपत झिरपत यायचं त्यवडंच वाजवायचु बगा Big smile

पण फार उशीरा कळालं, की बरीच लै भारी गाणी आपल्याला माहितीही नाहीत दोनचार बॅन्ड ग्रुप्सपलीकडे.
पण तोवर विंग्रजीच्या झग्याचा विंटरेश्टच ओसरला बगा हास्य

{हा घे येसूदासचं}

हा घे येसूदासचं गाणं!!!!

http://www.youtube.com/watch?v=XaK8cqg4xv0

बाकी.. अल्बम्स म्हटले की.. मला सगळ्यात पहिल्यांदा आठवते ते... पिया बसंती रे.... सॉल्लीड गाणं आहे... तिचा अल्लड कोवळा आवाज नि त्याचा एकदम मॅच्युअर्ड असा....!!!!!
त्यानंतर कोणत्याही क्रमाने..
आफरीन आफरीन..
ओ सनम--लकी अली
तेरे खयालोंसे महकी सी मेरी तनहाई है..
और अहिस्ता किजिए बातें-- पंकज उधास
सिल्क रूट चा आगळावेगळा प्रयोग म्हणूनचं डूबा डूबा तर आवडतंच पण त्यातलंच बूंदोसे पण तितकंच भावतं..
नि जोर जोरात ओरडून उतमात घालायचा असल्यास... अबके सावन ऐसे बरसे.. यासाठी मात्र पाऊस नि ढॅणढॅण म्युझिक सिस्टीम हवीच हवी.. नि तिचंच थोडंसे हळवं नि रोमँटिक गाणं.. सीखो ना...नैनोंके भाषा पिया तर माझं ऑल्टाईम्फेवरीट!!! इथे ओरिजिनल ची लिंक नाही मिळाली.. Sad
छ्या: ही पण यादी अनलिमिटेड आहे...

{ओहो....}

धन्यवाद धन्यवाद सुश्री मकश्रीदेवीजीमॅडम Big smile

घरुन (मोबाईलच्या कनेक्शनने साथ दिलीच तर) नक्की पाहिन हास्य
देवबाप्पा तुझं कल्याऽऽण करो हास्य

इतरही गाण्यांशी '+१' आहेच!

सहजच कधी मुड आला तर नुसरत फतेह अली ऐकावासा वाटतो. मग 'शहर के दुकानदारों..' वगैरे मध्ये एकदम बुडुन जायला होतं हास्य
आफरीन..आफरीनही छानच! गाण्याहुनही मला आवडतात ते बोल!! पाकी/जुन्या ढंगाचं उर्दु आणि त्यावरची हुकुमत...क्या केहने हास्य आणि हो, त्यातुन मध्ये मध्ये येणारा सरगम...मस्तच हास्य

नुसरत फतेह अलीचं 'तेरे बिन नै लगदा दिल..ढोलना'ही मस्त.. (विशेषतः व्हिडिओ पहात असाल, तर शर्बानी मुखर्जीच्या शराबी नजरेच्या नजरबंदीपलीकडे काहीच दिसत नाही फ्रेममध्ये...विरहगीत असुनही! हास्य )

एके काळी ए.आर.रेहमान आणि नुसरत फतेह अली ह्यांनी गायलेलं 'तौबा तौबा नस्ल मग्रुर..'ही आवडायचं..का कोण जाणॅ, पुढे पुढे त्याची जादू ओसरली!

पिया बसंतीबद्दल काय बोलायचं? हास्य चित्रा गातेय की मधाची उधळण करतेय असं वाटावं..आणि जोडीला सुलतान खानांचा जब्बरदस्त आवाज! वेऽऽड !!!!!

पंकज उधासची अंमळ 'साकी-मैखाना' वर्गातली गाणी गज़लाही मस्त!पण मला वाटतं पंकज उधास रमतात ते रोमँटिक गाण्यात जास्त. 'मैखाने से, शराब से..साकी से जाम से..' वगैरे ऐकताना लय लय मज्जा हास्य पण खरोखर जाम घेऊन बसलं तर मात्र ही जादू अंमळ फिकीच वाटते. त्यासाठी हरीहरनच्या खास 'मैक़दें बंद कर लें जमानेवालें..शहरमें कम नहीं आँखों से पिलानेवाले..' किंवा 'साकी़या, जाऊं कहां..' किंवा 'शराब ला..शराब दे..' किंवा 'वो पिलाये तो जरा लहराके पीना चाहियें..' ह्याच हव्यात हास्य
अन माहौल अंमळ जमला की अचानक गुलाम अली सुरु करावं....ओहोहोहो... कंबख्त! घोटाघोटाला प्याल्याप्याल्याची दर्दभरी नशा चढते! हास्य

असो! ऐन सोमवारीच अशा सुट्टीस्पेशल जपलेल्या गोष्टींची सय जागवल्याबद्दल मकीचा निषेध Big smile

{धमु साधारण १९८६/८७}

च्या आसपास पाकिस्तानी गायकांचा एक अल्ब्म आल होता त्यामधल
हवा,हवा ऐ हवा खुशबु लुटा दे... हे गाण माहीत आहे का ? हे सुध्दा मला खुप आवडायच


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{फिर हाथ में शराब है.. पर सच}

फिर हाथ में शराब है.. पर सच बोलता हूँ मैं... हे रे कसे विसरलास???? त्यातली ती चिमुरडी तर कस्सली गोग्गोड होती रे....
नि तू झूमके जब रिंधोने पिला दी ऐकलेयस का कधी???

{काय चाललंय काय कळाय नाही...}

काय चाललंय काय कळाय नाही...

{आशु दे आँ..... आपन बैठक कलु}

आशु दे आँ.....
आपन बैठक कलु तेंव्वा शांगेन हां...आपन ही श्शग्गली गाणी लाऊ या हां तेंव्वा Big smile

{:(}

ती छोटी परी मस्तच होती..
पण 'फिर हाथ में शराब है..' आणि 'युं मेरे खत का जवाब आया..' ही दोन फार फार प्रयत्नांनी विसरलोय! विसरलेलीच राहु दे! :U

>>झूमके जब रिंधोने पिला दी
जग्गुबाबा?
शायरी अफ्फाट असली तरी वाचण्यापुरतंच आवडते. मला का कोण जाणे, जग्गुबाबा नाही आवडत.कदाचित आमची जाण समज वगैरे वगैरे आड येतं Big smile
काही मोजकी तेव्हढीच आवडतात. 'मुझ से बिछड के खुश रहते हो..मेरी तरह तुम भी झुटें हो..' किंवा, 'तेरे बारें मे जब सोचा नहीं था..' अशी काही!
का ते माहित नाही, पण मदहोश माहौलमध्ये जगजीतसिंग नाय बॉ आवडत! :|

{मदहोश माहौलमध्ये जगजीतसिंग}

मदहोश माहौलमध्ये जगजीतसिंग नाय बॉ आवडत! :|

बॉर्र.... मग कशात आवडतो???

तुमको देखा.. तो ये खयाल आया???
की होटोंसे छू लो तुम????
नाही??? मग? हम तो हैं परदेस में.. देस में निकला होगा चाँद???

{आणी "प्यार का पहला खत लिखने}

आणी "प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है" मधेही आवडतो.

{हा हा हा... असंच फार}

हा हा हा... असंच फार कधीतरी..

तुमको देखा आणि होटोंसे छु लो अंमळ घासुन घासुन गुळगुळीत झालीयेत असं वाटतं. देस मे निकला होगा चाँद हरकत नाही हास्य

वर सांगितलं ना,
'मुझ से बिछड के खुश रहते हो..मेरी तरह तुम भी झुटें हो..'
'तेरे बारें मे जब सोचा नहीं था..'
हास्य

{ओक्के.. अरे मघाशी}

ओक्के.. अरे मघाशी विसरलेच...
ठुकराओ या प्यार करो.. मैं नशें में हूं??? बद्दल काय म्हणायचेय???
झुकी झुकी सी नजर.. बेकरार है के नहीं??
रडवे असले तरी मला व्यक्तिशः कोई ये कैसे बताये खूप आवडते.. नि तेरी खुशबूमें बसे खत मैं जलाता कैसे??? हा प्रश्न तर अगदी जीवघेणा.. ­त्यात त्याच्या आवाजापेक्षा त्या गाण्याचे बोल मला जास्त भावतात...

जगजीत नंतर... गुलाम अलींची काही गाणी...
१ कल चौदहवीं की रात थी
२. ये दिल पागल दिल मेरा...
३. चुपके चुपके तर नेहेमीचेच..
४.­ हम तेरे शहर में..

{स्साला!!! काही लोक फारच न्यान}

स्साला!!! काही लोक फारच न्यान दाखवायलेत, च्यामायला... आपुन गपच र्‍हातो ब्वॉ!!!

{का हो? तुम्च्या प्न लापीव्र}

का हो?
तुम्च्या प्न लापीव्र पुश्कल गानी होति की.. म्ग तुम्हाला दन्यान का नहि?

{अजुन काही आठवलेली गाणी १)}

अजुन काही आठवलेली गाणी
१) छुपा लो यूं दिल मे प्यार मेरा - ममता
२) निगाहें मिलाने को जी चाहता है - आशाबाईंची कदाचित सर्वोत्तम कव्वाली
३) नको ताई रुसु कोपर्‍यात बसु
४) समईच्या शुभ्र कळ्या
५) मलमली तारुण्य माझे.
६) जरासी आहट होती है तो दिल सोचता है
७) इजाजत मधली (गुलझार्+पंचम या जोडीची सर्वच) गाणी

the list is endless!!

{मी पण पुन्हा एकदा.. १. साँझ}

मी पण पुन्हा एकदा..
१. साँझ ढले... गगन तले..
२. डौल मोराच्या मानेचा रे डौल मानेचा..
३. पाहिले न मी तुला..
४. ना तो कारवाँ की तलाश है.. ना तो हमसफर की तलाश है
५. नानी तेरी मोरनी को मोर ले गये..
६.दृष्ट लागण्याजोगे सारे.. गालबोटही कुठे नसे.. बहुतेक माझं घर माझा संसार असं काहीतरी नांव होते चित्रपटाचे..
७. आजा सनम मधुर चाँदनी में हम....
८. छोडो कलकी बातें.. कलकी बात पुरानी....
सध्या बस्स इतकेच... हास्य
नि रडव्या गाण्यांमध्ये मुकेशची सगळीच गाणी..

{मक, उत्सवमधलंच एक अप्रतीम}

मक,
उत्सवमधलंच एक अप्रतीम द्वंद्वगीत - मन क्यों बहका री बह्का आधी रात को.

{अगदी अगदी....!!!! सुरूवातीचे}

अगदी अगदी....!!!!
सुरूवातीचे ह्युमिंग तर अगदी जबरदस्त!!!!

{आय..हाय.. जियो विमो..जियो}

आय..हाय..

जियो विमो..जियो हास्य

{मस्त लिहिलय रे....}

आवडलं. मला सगळ्यात आवडतं ते किसीकी मुस्कराहट पे हो निसार...


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{आरे मग हे घे ना. माझ पण खुप आवडत गाण आहे हे}

http://www.youtube.com/watch?v=52-0BJzNtQk


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{जिन रातोंकी भओर नही}

जिन रातोंकी भओर नही


..............................................................

क्या फर्क पडता है?

{लेख }

लेख आवडला. लेख आणि प्रतिक्रियांच्या निमित्ताने अनेकानेक आवडत्या जुन्या-नव्या गाण्यांच्या आठवणी उजळल्या.

जोवर श्वासात श्वास आहे तोवर गाणी आहेत , त्यांचा सहवास आहे , त्यांच्या आठवणी आहेत. साक्षात टारुला पाझर फुटला तिथे इतर चिल्लरांचा काय पाड ! ;-) "कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले. मुझसे बेहतर कहनेवाले , तुमसे बेहतर सुननेवाले !"

{"कल और आयेंगे नगमोंकी खिलती}

"कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले. मुझसे बेहतर कहनेवाले , तुमसे बेहतर सुननेवाले !"

+१

{सगळ्यांचे मनापासून खुप खुप}

सगळ्यांचे मनापासून खुप खुप खुप आभार ..
गाणी बर्रीच आहेत .. ती आवडतातही खुप .. पण "सदाबहार" चं स्टँडर्ड इतकं वर नेऊन ठेवलं की बरीच गाणी मनावर दगड ठेउन बाहेर ठेवावी लागली ....

बाकी आश्चर्याचा धक्का ज्यांना बसला त्यांचा मी ऋणी आहे हास्य त्यांच्याच साठी केला होता हा उहापोह हास्य

{माझी एक छोटी यादी}

मधुबन मे राधिका नाचे रे - मो. रफी - कोहिनूर
किशोरकुमार, आशा जीं ची बरीच
पिंजरा, जैत रे जैत सगळी गाणी
तू ही मेरी शब (शब्द बरोबर आहे न?) है
वेटींग फोर टूनाइट - जे लो
तड्प तड्प आनि आवारापन - केके
सारेगमप लिटल चेम्प्स ची पण बरीच.. हास्य

{खल्लास}

अप्रतिम आणि मनापासून लिहिलेला लेख, टारोबा. लेख आणि प्रतिसादांतून अनेक गाण्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.

{टार्ज भारी लिहिलस.}

टार्ज भारी लिहिलस. हास्य

{हे गाणं पण सुरेख आहे}

हे गाणं पण सुरेख आहे

{http://www.youtube.com/watch?}