तुझे केवळ दिसणे !!
11
आवडले!
तुझ्यासाठी सखे गं ते सहज चालणे..
इथे कुणी विसरती घराची वळणे !!
तुझ्यासाठी सखे गं ते सहज हासणे..
इथे कुणासाठी राणी थबकती क्षणे !!
तुझ्यालेखी सहजच वळून पाहणे..
इथे प्रिये पिसापरी तरंगती मने !!
काया अशी रुपेरी कि चंद्र सुद्धा लाजे..
नयना सुखवी तुझे केवळ दिसणे !!
नि.
{अहा.. मस्त कविता. छोटीशीच पण}
अहा.. मस्त कविता. छोटीशीच पण गोड ..
*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...
{सुंदर कविता}
सुंदर कविता
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{काया अशी रुपेरी कि चंद्र}
काया अशी रुपेरी कि चंद्र सुद्धा लाजे..
नयना सुखवी तुझे केवळ दिसणे !!
पुढच्या जन्माची वाट पहावी लागेल
तेंव्हा तरी भेटेल का ???
विवेकपटाईत
{(विषय दिलेला नाही)}
--निर्धास्त सोडून दिलाय जगण्याचा गाडा..काळाच्या उतारावर..