प्रेम-बीम

तुला वाटेल, मी प्रेमवेडा, तुझ्या मागे वेड्यासारखा धावणारा
पण एss...इतकाही वेडा नाही मी, प्रेमासाठी काय वाट्टेल ते करणारा!..

बघ..हात पुढे करतोय मी..जगणं होईल सुंदर जर साथ देशील मला
नाहीतर म्हणेन दुर्दैव तुझे...माझ्याहून 'बरा' असा मिळणार कोण तुला?!..

प्रेम आंधळं बिंधळं त्यांच्यासाठी ज्यांना गवसत नाही पुढची वाट
ही वाट मला ओळखीचीच...प्रत्येक वळण पक्क बसलंय माझ्या आत!...

अगं तुझ्याशिवाय जगणारच नाही, इतकाही मी काही हट्टी नाही....
वार्‍यावर डोलणार्‍या पक्षांची काही, फक्त झाडांशीच गट्टी नाही!!..

अगदीच मनात भरून वगैरे राहिलीयेस माझ्या या भ्रमात नको राहूस
कधीचं भरून आलंय आभाळ..थोडा सुटेल वारा...मग सरेल हाही पाऊस!!....

कोण म्हणतं विचारू नये प्रेम म्हणजे काय? अन व्याख्या नाही प्रेमाला....
रक्तात वाढलेल्या रसायनांचा मेंदूवर ताबा!..बाकी काही अर्थ नाही त्याला!!....

N.

{छान कविता!}

छान कविता!


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{धन्यवाद...!}

धन्यवाद...!
हास्य


--निर्धास्त सोडून दिलाय जगण्याचा गाडा..काळाच्या उतारावर..

{छानच कविता ! "कोण म्हणतं}

छानच कविता !

"कोण म्हणतं विचारू नये प्रेम म्हणजे काय? अन व्याख्या नाही प्रेमाला....
रक्तात वाढलेल्या रसायनांचा मेंदूवर ताबा!..बाकी काही अर्थ नाही त्याला!!....
"
>>>> आम्ही ११वीला शिकत असतांना घडलेली एक चर्चा आठवली. हास्य

अवांतर :- "पक्षांची" ऐवजी "पक्ष्यांची" हवे.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{धन्यवाद..!!}

ओह...खरंच की...चूक लक्षातच आली नाही माझ्या...thanx....हास्य


--निर्धास्त सोडून दिलाय जगण्याचा गाडा..काळाच्या उतारावर..

{कसलं भारी लिहीलं आहेस राव १}

कसलं भारी लिहीलं आहेस राव १ नंबर Big smile
हे वाचल्यावर संदीप-सलील जोडीचं 'जा दिले मन तुला' हे गाणं आठवलं..

{धन्यवाद}

ओह...होय..तसलाच काहीसा भाव आहे या कवितेचा....'जा दिले मन तुला' तर classsच आहे..हास्य


--निर्धास्त सोडून दिलाय जगण्याचा गाडा..काळाच्या उतारावर..

{प्रत्येक वळण पक्क बसलंय}

प्रत्येक वळण पक्क बसलंय माझ्या आत!..

सौदाच फक्त पक्का असतो.
सौदागराला कधीच प्रेम सापडत नाही.


विवेकपटाईत

{छान}

Grade


--निर्धास्त सोडून दिलाय जगण्याचा गाडा..काळाच्या उतारावर..

{आवडले }

"कधीचं भरून आलंय आभाळ..थोडा सुटेल वारा...मग सरेल हाही पाऊस!!.."
खूप छान


----------------------------------------------------------------------------
सगळच कसं होणार, आपल्या मनासारखं, आपलं सुद्धा आपल्याला, होत असतं पारखं
निराशेच्या पोकळीमध्ये, काहीसुद्धा घडत नाही, आपलं दार बंद म्हणून, कुणाचचं अडत नाही - पाडगावकर

{छान }

कविता छान आहे. आवडली. आता यापुढे तुमचे "काव्य" प्रकारातलं प्रत्येक लिखाण मी वाचणार आहे.

{धन्यवाद..!!}

थोडा इंग्लिशचा आधार घेतो...
Your compliment has MADE MY DAY...हास्य
धन्यवाद..!!


--निर्धास्त सोडून दिलाय जगण्याचा गाडा..काळाच्या उतारावर..