दुष्प्राप्य - एक कुरुपकात्मक नीरसग्रहण

0
0

कविता आन रसग्रहन हा आमचा प्रांत नाही पन टारजन च्या रसग्रहानातुन आमचा मनीविकार बळावला. मंग म्हन्ल ल्व्ह्याव आपन बी. ल्वॉक काय म्हंतीन याचा कव्हर ईचार करायचा ? आपल मण निर्मळ आस्ल्म मंजी झाल! हाय काय आन नाय काय?

नीळाभोर इवलासा मखमली खंड्या,
काळा भोर ऐकलाय पन ह्ये नीळाभोर काय ? आन कशावरुन मखमली जस काय हात लावुन पघितलाय. आन ह्यो खंड्या म्हंजी बंड्याचा कोन?
रोज नीळ्या आभाळातून भीरभीरत उतरणारा,
म्हजी वार्‍या वावधानाची कागद उडत्यात आन मंग थोड्या टायमानी वजच खाली येत्यात त्येच्यावानी म्हनायचय का? म्हजी हा मानुस वाटत नाय!
हवेत कविता लिहीत असल्यासारखा.
काही मान्स हवेत येड्यावानी हातवारे करत्यात
तिच्या खिडकीसमोर,
क्वाँच्या समोर म्हन्ले?
तारेवर दिमाखात, ऐटीत बसून जग न्याहाळणारा.
आदुगर तारेत वाचल. बर बरं पाखर बसत्यात तारेवं . मरत्यात बी विलेक्ट्रिकच्या झटक्यानी. धुनी वाळत घालायच्या तारेव बी बसत्यात बाईनी कापड झटाकली कि मंग उडुन जात्यात.
त्याचा तोरा तरी किती म्हणावा!
अहो जाल जगतात बी लई तोरे पघितलेत आमी.आपन म्हंजी लई भारी! यांच्या ताठ माना या खांद्यापासुन त्या खांद्यापर्यंत फिरत्यात. काही लोक याला *डमस्ती म्हंत्यात. नव्या आलेल्या सुनेला छळायाला नंन्दा कशा तोर्‍यात असत्यात.
मैना, बुलबुल यांचा किलबिलाटच फार.
अहो हित जालाव बी आयड्यांचा लईच सुळसुळाट अस्तोय.
हा एकटा शांत समाधीस्थ.
अहो कस्ला शांत बोडक्याचा ह़ळुच मेला डोळा बारीक करुन पघा अस्तोय.
ठरवीक वेळेला येणारा-जाणारा...
अहो ते खर नाय इतर टायमाला वेश बदलुन येतोय. म्हनुन तस वाटत आसनं
मान वेळावून इकडे-तिकडे बघेल.... नाहीसुद्धा!
त्याची मर्जी . मान्स बी असत्यातच की ईक्षिप्त . त्योबी जीवच हाय नव्हं!
ती रोज वाट बघणार.
कोन ती? मगाचीच का ? तुमी काय सांगत नाय रावं ! नीस्ती ती ती करताय? काय समजायच काय मान्सानी?
खिडकीपाशी उभी.
तिची मर्जी
तिला वाटे-त्याच्या
गोजीरवाण्या पंखांवरून हात फिरवावा,

तिला काय वाटाव हे काय आपल्या हातात हाय का?
त्याला हातात घेऊन अलगद घट्ट पकडावं,
यकदा अलगद म्हंताय नंतर घट्ट बी म्हंताय. आल्लाद तरी पकड न्हाईत मंग जाम धरुन ठुवा.
त्याच्या नीळाईचा वर्ख बोटांनी स्पर्शावा,
हॅहॅह अहो कुनीतरी शाई सांडलीय वला! कह्याचा आलाय वर्ख. हाताला लागन तवा समजन.
छातीवरच्या शुभ्र ठीपक्याचं चुंबन घ्यावं.>
अहो चुना लावलाय तो त्वाँड भाजन वठाला लावल्यावं.

अप्राप्य!!!
त्याच्या अप्राप्यतेतच त्याची अनिवार ओढ

लईच वढुन फरपटायला झाल्याव सोडुन द्यायच बगा कस फापालतय!
रोज तळमळवणारा अन...
तरी सुखावणारा
वाट पहायला लावणारा अन ...
तरी मोहवणारा

हॅहॅह खंब्याबद्दल म्हंताय वाटतं! कसंच कसंच!
नीळाभोर इवलासा मखमली खंड्या!!!
अर्रर्र आला का परत तुमचा तो खंड्या! बर बर चालु द्यात

=)) =))

1

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
=)) Laughing out loud
=))
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

रोज तळमळवणारा अन... तरी

2

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

रोज तळमळवणारा अन...
तरी सुखावणारा
वाट पहायला लावणारा अन ...
तरी मोहवणारा
हॅहॅह खंब्याबद्दल म्हंताय वाटतं! कसंच कसंच!>>

आईशप्पथ !!..भावविभोर निळाई च्या विश्वातुन,मुदकखान्यात लाड्वांना वळवावे तसे वळवळलेले..आपले हे वळविलेले दुष्प्राप्य ,खरोखरच दुष्प्राप्य निरसग्रहण

=)) =)) =)) =))

3

Laughing out loud =)) Laughing out loud

Laughing out loud =)) Laughing out loud

Laughing out loud =)) Laughing out loud

Laughing out loud =)) Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पकाकाका

4

वर्ज्य स्वर लागला बरं का. (कान पकडा बरं.)

(सावध) रमताराम.

हॅहॅहॅ .... हास्ता हास्ता

5

हॅहॅहॅ .... हास्ता हास्ता दाताचा टव्का ऊडाला

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

टारझन

6

तु अप्नी मुर्गी को रखना संभाल
पका काका का मुर्गा है दिवाना

रत्नशिरोमणींना फुल टु कांपीटीशन


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

हाण

7

हाण तिच्यामारी...

तुम्हीपण .... _/\_

8

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

तुम्हीपण .... _/\_

लै भारी !!!

9

लै भारी !!!

Laughing out loud Laughing out loud

हॅ हॅ हॅ नी'स्ता हस्तोय

10

हॅ हॅ हॅ

नी'स्ता हस्तोय Laughing out loud

लाहौलविलाकुवत!

11

लाहौलविलाकुवत!

लाहोरलाविलासकुमावत (लाहोरला

12

लाहोरलाविलासकुमावत (लाहोरला विलास कुमावत (कशाला मरायला) गेला होता) म्हनायच का धम्या तुला?

ओ काका, आसलंच नीरसग्रहन तुमी परत्येक धाग्याच करा ना. लय मजा येईल. आन तमाकू हाय का जराशी? डब्बल घ्या मंग.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

एक नंबर.

13

एक नंबर.