वैज्ञानिक परिकल्पना आणि मानवतेने चुकवलेली किंमत
वैज्ञानिक परिकल्पना आणि मानवतेने चुकवलेली किंमत
डार्विन चा जवळ चा मित्र Professor Adam Sedgwick त्या थोड्या लोकांपैकी होता ज्याने डार्विन च्या सिद्धांताचे भयानक स्वरूप ओळखले होते. The Origin of Species वाचल्या नंतर तो म्हणाला होता
"If this book were to find general public acceptance, it would bring with it a brutalisation of the human race such as it had never seen before."
A.E. Wilder-Smith, Man's Origin Man's Destiny, The Word for Today Publishing, 1993, p.166
डार्विन ने आपल्या परीकल्पनेत असे सांगितले कि सजीवाची प्रगती हि त्याच्या अस्तित्वाच्या लढाई वर अवलंबून आहे. Fight for survival. आणि या संघर्षात फक्त शक्ती शाली चा विजय होणार आणि कमजोर नष्ट होणार. या अवैज्ञानिक परीकल्पने नुसार निसर्गात अस्तित्वासाठी एक निरंतर असे क्रूर संघर्ष आहे ज्या मध्ये शक्तीशाली नेहमी कमजोर वर काबीज होणार आणि अश्या तर्हेने विकासाची एक पायरी चढली जाते. पुढे जाऊन तो सांगतो कि हाच नियम मनुष्य प्राण्याला देखील लागू पडतो. त्याच्या म्हण्या नुसार तो शक्तिशाली आणि लायक "युरोपिअन गोरा" हा वौंश आहे, आणि या व्यतिरिक्त एशियन आफ्रिकन व इतर हे कमजोर आणि नालायक आहेत कालांतराने हे वंश नष्ट होतील व युरोपिअन वंशाचा विजय होईल.
Sidney Fox, Klaus Dose, Molecular Evolution and The Origin of Life, New York: Marcel Dekker, 1977, s.
थोडक्यात या रानटी विचारांना युरोपातील वैज्ञानिकांनी मान्यता देवून टाकली आणि त्याला विज्ञानाची जोड देवून त्याला योग्य कायदेशीर नैसर्गिक असे सम्भोदित करण्यात आले.
खरे म्हणजे डार्विन ने हे विचार माल्थस कडून घेतले होते हा एक ब्रिटीश इकोनॉमीस्ट होता. ह्याने एक पुस्तक लिहले होते An Essay on the Principle of Population त्याचे असे म्हणणे होते कि जागील लोकसंख्या जेंव्हा वाढते तेंव्हा युद्धे, रोगराई, दुष्काळ ह्या नैसर्गिक आपत्ती त्याला काबूत ठेवतात. त्याच्या या रानटी परीकथेनुसार काही लोकांना जगण्या साठी दुसर्या काही लोकांना मरणे आवश्यक आहे. १९ शतकात युरोमधील उच्च वर्गातील बुद्धीवाद्यांनी ह्या बेगड्या तत्वज्ञानाला मान्यता दिली.
Theodore D. Hall चा एक लेख "The Scientific Background of the Nazi "Race Purification" Programme मध्ये मानवतेच्या दुर्दैवाचे सत्य अश्या प्रकारे सांगतो:
“In the opening half of the nineteenth century, throughout Europe, members of the ruling classes gathered to discuss the newly discovered "Population problem" and to devise ways of implementing the Malthusian mandate, to increase the mortality rate of the poor: "Instead of recommending cleanliness to the poor, we should encourage contrary habits. In our towns we should make the streets narrower, crowd more people into the houses, and court the return of the plague. In the country we should build our villages near stagnant pools, and particularly encourage settlements in all marshy and unwholesome situations," and so forth and so on.”
New Evidence on Evolution of Early Atmosphere and Life, Bulletin of the American Meteorological Society, cilt 74, Kasım 1982, s. 1328-1330
१९ व्या शतकाच्या पूर्व अर्ध्या मध्ये संपूर्ण युरोपातील साशक वर्गातील सदस्य ह्या लोकसंख्या वाढीच्या नवीन प्रश्नाचे समाधान शोधण्या साठी एकत्र जमले आणि काय काय उपाय योजना करता येईल ह्या साठी चिंतन सुरुकेले. जास्तीत जास्त गरीब लोक मेले पाहिजे त्यासाठी काही ठराव केले गेले ते असे होते: गरीब लोकांसाठी रस्ते अरुंद ठेवा, त्यांना छोट्या घरात जास्त लोकांना राहणे/जगणे भाग पाडा, त्यांना अस्वच्छ, घाणेरडे राहण्यची सवय घाला, छोटे छोटे खेडे पाण्याच्या डबक्या जवळ वसावा. प्लेग सारखे रोग पसरेल यासाठी प्रयत्न करा.
Thomas R. Malthus, An Essay on the principle of population as it affects the future improvement of society, Reprint, London: Reeves and Turner, (1798) 1878, p. 412. (emphasis added)
विज्ञानाच्या नावावर किती खालच्या पातळीला जाऊ शकतात हे तथाकथित बुद्धीवादी. मानवतेच्या दुर्दैवाने हि उपाय योजना इंग्लंड मध्ये अमलात आणली गेली. औद्योगिक संस्था स्थापून गरीब मुलांना कोळश्याच्या खाणीत दिवसातून १६/१६ तास काम करवून घेतले. अतिशय विपरीत भयानक अश्या परीस्थित काम करून हजारो लोक आपल्या जीवास मुकले. माल्थस च्या सिद्धांत "जगण्यासाठी संघर्ष" च्या मागणी नुसार लाखो गरिबांना अत्यंत विपरीत परिस्थितीत जगावे लागले.
अश्या या माल्थस च्या कार्याने प्रभावित होऊन डार्विन ने सुद्धा आपले "मोलाचे योगदान" दिले. माल्थस च्या ह्या संघर्ष च्या सिद्धांत ला त्याने संपूर्ण निसर्गावर लागू केले आणि सांगितले कि सशक्त आणि योग्य/लायक फक्त ह्या संघर्षात टिकतात बाकी नष्ट होतात आणि हे एक उचित आणि न टाळता येणारे नैसर्गिक नियम आहे. ह्या अश्या रानटी विचारांच्या प्रचार प्रसाराने २० शतकतिल मानवतेला निर्दयता आणि क्रूरते कडे घेवून गेले. आणि मानवतेला त्याची भारी किंमत चुकवावी लागली.
युरोप वर डार्विनवादाने आपली पकड मजबूत केलेली होती. हळू हळू Struggle for survival ह्या भ्रमाचा प्रभाव दिसुलागला आणि विशेषतः सत्तापिपासू साम्राज्यवादी युरोपीय शक्ती त्यांच्या अधिपत्यखालील गुलाम देशांना "Evolutionary backward nations" म्हणून तर्कसंगतते साठी डार्विन कडे बघू लागली.
डार्विन वादाचा भयानक राजकीय प्रभाव म्हणजे पहिल्या महायुद्धाचा भडका...
पहिल्या महायुधासाठी डार्विनवाद कसा कारणीभूत आहे हे समजावून सांगताना इतिहासाचे प्रख्यात प्रोफेसर James Joll असे म्हणतात:
“…it is important to realise how literally the doctrine of the struggle for existence and of the survival of the fittest was taken by the majority of the leaders of Europe in the years preceding the First World War. The Austro-Hungarian chief of staff for example, Franz Baron Conrad von Hoetzendorff, wrote in his memoirs after the war:
Philanthropic religions, moral teachings and philosophical doctrines may certainly sometimes serve to weaken mankind's struggle for existence in its crudest form, but they will never succeed in removing it as a driving motive of the world… It is in accordance with this great principle that the catastrophe of the world war came about as the result of the motive forces in the lives of states and peoples, like a thunderstorm which must by its nature discharge itself.”
Stanley Miller, Molecular Evolution of Life: Current Status of the Prebiotic Synthesis of Small Molecules, 1986, s. 7
हे समजून घेणे महत्वाचे आहे कि कश्या प्रकारे युरोप च्या राजकीय नेत्यांनी डार्विन चे सिधात्न्त Struggle for existence आणि Survival of the fittest ह्यांना शब्दशा घेतले होते. Friedrich von Bernhardi, पहिल्या महायुद्धातील एक जनरल युद्ध आणि युद्धाचे नियम बद्दल असे काही सांगतो
"War, is a biological necessity"; it "is as necessary as the struggle of the elements of nature"; it "gives a biologically just decision, since its decisions rest on the very nature of things."
Leslie E. Orgel, "The Origin of Life on Earth", Scientific American, cilt 271, Ekim 1994, s. 78
ह्या व इतर अनेक उदाहरण वरून अनुमान काढू शकतो कि पहिल्या महायुध्याच्या भडका होण्यात डार्विन च्या सिद्धांताचा किती मोठा वाट आहे.
दुसरे महायुद्ध:
डार्विन च्या प्रभावा खालील फसिस्ट भक्तांनी युद्धाला एक आवश्यक घटक मानले आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आणि जगातील इतर मानव जातीला अनन्वित छळ आणि मानवी संहाराला कारणीभूत ठरविणारे दुसरे महायुद्धाची मुहूर्त पेढ रोवली. त्यांच्याच युकीवादावरून किंवा कबुली जबाबावरून निघणारा निष्कर्ष ऐकून एक सर्व साधारण मनुष्याला आश्चर्य युक्त दुखद धक्का बसतो कि या सर्व ऐतिहासिक दुर्दैवाला डार्विन चे विचार, युक्तिवाद जबाबदार आहेत.
डॉ. जेरी बर्गमन डार्विन वादाच्या प्रभावाचे विश्लेषण करताना असे म्हणतात.
“The evidence is very clear that Darwinian ideas had a tremendous impact on German thought and practice… In fact, Darwinian ideas had a tremendous influence on causing World War II, the loss of 40 million lives, and the waste of about 6 trillion dollars. Firmly convinced that evolution was true, Hitler saw himself as the modern savior of mankind… By breeding a superior race, the world would look upon him as the man who pulled humanity up to a higher level of evolution.”
http://www.fixedearth.com/hlsm.html
तो अगदी स्पष्ट आणि सरळ भाषेत सांगतो कि “जर्मनी च्या विचारात आणि आचारात डार्विनच्या विचारांचा प्रभाव होता आणि एवढेच नव्हे तर दुसरे महायुद्ध घडून येण्या मागे डार्विनवादी विचारांचा प्रत्यक्ष सहभाग होता. ४० लाख लोकांचे जीवन, ६ ट्रीलीयन डॉलर चा चुराडा, डार्विन च्या परीकल्पनेने भारावून हिटलर एक नवीन आर्यवंशा चे निर्माण करून स्वतःला मानवतेचा रक्षक समजत होता कि ज्याने मानवतेला उत्क्रांतीच्या एका उच्च पायरीवर नेहले आहे”.
याच्यात वाद नाही कि आधी देखील इतिहासात अनेक युद्धे झाली मानव संहार झाला परंतु डार्विन च्या परीकल्पनेच्या प्रभाव खाली इतिहासात पहिल्यांदा युद्धातला विज्ञानाच्या संमतीने कायदेशीर करण्यात आले.
एका लेखाने अमेरिकेत बरेच वादळ उठले होते, त्या मध्ये लेखक मॅक्स नॉरडाउ दुसर्या महायुद्धसाठी किंवा नरसंहारासाठी डार्विन वादी विचार कशे जबाबदार होते ते अगदी स्पष्ट भाषेत सांगतो...
“The greatest authority of all the advocates of war is Darwin. Since the theory of evolution has been promulgated, they can cover their natural barbarism with the name of Darwin and proclaim the sanguinary instincts of their inmost hearts as the last word of science”.
Max Nordau, The Philosophy and Morals of War, North American Review 169
(1889):794, cited in Hofstadter, Social Darwinism, p. 171.
हिटलर:
हिटलर वर डार्विनवादाचा खोलवर प्रभाव होता. आणि याचे प्रतीबिंब त्याचे पुस्तक माझा लढा या मध्ये अगदी स्पष्टपणे जाणवते. तो काबुल करतो कि तो डार्विन च्या Struggle for survival या युक्तीवादाने कश्या प्रकारे प्रभावित झालेला आहे. तो म्हणत असे कि जगाच्या इतिहासातून उत्तर जर्नामिच्या युरोपियन समाजाला काढून टाकले तर खाली काय शिल्लक राहील ...फक्त माकडांचा नाच. या वाक्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो कि तो किती पक्का डार्विन भक्त होता.
१९३३ मधील न्युरेम्बर्ग पार्टी ऱ्याली मध्ये तो म्हणतो...
"Higher race subjects a lower race to itself… a right which we see in nature and which can be regarded as the sole conceivable right…"
www.trueorigin.org/holocaust.asp
हे वाचून लक्षात येते कि डार्विनच्या विचारांचा तो फक्त समर्थकच नव्हता, तर त्याने केलेल्या जुलूम अत्त्याचार आणि हत्याकांडाला जणू काही ह्या डार्विनच्या तथाकथित वैज्ञानिक विचारांचा आधार घेतला होता..
हिटलर चा आर्य वंश च्या तथाकथित उच्च असण्याच्या मतावर ठाम विश्वास होता. त्याचे मानने होते कि आर्य वंशाला हि देणगी निसर्गाने दिली आहे. आणि हेच नाझी पार्टी चे तत्व होते कि ज्या मुळे जगाने ऐतिहासिक हत्याकांड पहिले. आणि हि गोष्ट एखादा शालेय विद्यार्थी देखील सांगू शकेल कि हि तत्वे डार्विनच्या Natural selection आणि Survival for the fittest चा अर्क आहे म्हणून.
कम्युनिस्ट जग :
डार्विनवादाचे कम्युनिइज्म इतके महत्व होते कि जेंव्हा डार्विन चे पुस्तक पहिल्यांदा छापले गेले, Engels आपला मित्र Marx ला पत्र द्वारे लिहतो...
“Darwin, whom I am just now reading, is splendid."
Conway Zirkle, Evolution, Marxian Biology and the Social Scene, Philadelphia: The University of Pennsylvania Press, 1959, p . 527.
१९ डिसेंबर १८६० मध्ये या पत्राच्या प्रती उत्तरात Marx असे लिहतो...
"…This book contains the basis in nature for our view."
…ह्या पुस्तकात आपल्या विचारांना निसर्ग देखील पुस्ती जोडतो असे सांगितले आहे (थोडक्यात कम्युनिजम ला डार्विनवादाचा संपूर्ण (वैज्ञानिक) पाठींबा आहे.)
J. D. Bernal, Marx & Science, New York, International Publishers, 1952, p. 17.
१६ जानेवारी १८६१ मध्ये Marx त्याचा अजून एक सोशालीस्ट मित्र Ferdinand Lassalle ला एका पत्रा द्वारे असे सांगतो कि…
“डार्विन चे हे पुस्तक माझ्या साठी खूप महत्वाचे आणि माझ्या विचारांचे समर्थन करणारे आहे कारण हे ऐतिहासिक वर्ग संघर्ष या तत्वज्ञानाला नैसर्गिक विज्ञानाचे समर्थन मिळवून देणारे आहे”.
"Darwin's work is most important and suits my purpose in that it provides a basis in natural science for the historical class struggle"
http://www.marxists.org/archive/marx/works/1861/letters/61_01_16.htm
इतकेच नव्हे तर Marx डार्विन च्या कार्याने इतका प्रभावित झाला होता कि त्याने स्वतःच्या सर्वात उल्लेखनीय प्रसिद्ध पुस्तक Das Kapital डार्विनला समर्पित करताना पुस्तकाच्या जर्मन आवृत्तीवर स्वतःच्या हस्ताक्षरात असे लिहिले होते.
"To Charles Darwin, from Karl Marx, a true admirer."
Conway Zirkle, Evolution, Marxian Biology, and the Social Scene, Philadelphia:
University of Pennsylvania Press, 1959, p. 85-87.
Engels देखील डार्विन ची स्तुती करतांना एका ठिकाणी असे म्हणतो…
"Nature operates not as metaphysics, but as dialectic. In that regard, the name of Charles Darwin must be remembered above all others."
Engels, Utopik Sosyalizm-Bilimsel Sosyalizm (Utopian Socialism-Scientific Socialism),
Sol Publishing, 1990, p. 85.
आणि एका दुसर्या ठिकाणी Engels डार्विन आणि Marx ची तुलना करताना त्यांच्यातील साधर्म्य अश्या रीतीने अधोरीखीत करतो...
"In the same way that Darwin discovered the universal law in organic nature, so Marx discovered the universal law in the history of mankind."
28 Gertrude Himmelfarb, Darwin and the Darwinian Revolution, London: Chatto & Windus, 1959, p. 348.
खरे तर डार्विनिज्म आणि कम्युनिज्म ह्यांच्यातील घनिष्ट नाते हे सर्वमान्य आहे. इतकेच काय तर Marx च्या अनेक आत्मचरित्र मध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अश्याच एका आत्म चरित्र मध्ये लेखक डार्विनिज्म आणि कम्युनिज्म यांच्या तील घनिष्ट संबंध अश्या प्रकारे उलघडून दाखवतो...
"Darwinism presented a whole string of truths supporting Marxism and proving and developing the truth of it. The spread of Darwinist evolutionary ideas created a fertile ground for Marxist ideas as a whole to be taken on board by the working class… Marx, Engels, and Lenin attached great value to the ideas of Darwin and pointed to their scientific importance, and in this way the spread of these ideas was accelerated."
Karl Marx Biography, Ankara: Oncu Publishing, p.368
थोडक्यात डार्विनच्या परिकल्पना मुळे कम्युनिजम विचारांना तथाकथित वैज्ञानिक पाठींबा मिळाला आणि त्यामुळे कम्युनिजम विचारांचा प्रसार जोरात झाला.
माओ, चायना:
माओ, जगातील मोजक्या भयानक मानव संहार पैकी एक, मानवतेला काळिमा फसवणारे कार्य करणारा कट्टर कम्युनिस्ट कि ज्याच्या प्रत्यक्ष आदेशानुसार १० लाख लोक मारून टाकण्यात आले. आणि इतर २० लाख लोक तुरुंगात सडत, किंवा गायब केले गेले, अगदी सरळ आणि स्पष्टपणे सांगतो चीन चा सोशियालीज्म हा डार्विनिजम वर आणि त्याच्या थेरी ऑफ ईवोल्युशन वर उभा केला गेला आहे…
"The foundation of Chinese socialism rests upon Darwin and the Theory of Evolution."
30 K. Mehnert, Kampf um Mao's Erbe, (War about Mao's Legacy), Stuttgart: Deutsche Verlags-Anstalt, 1977.
एक पक्का Marxist निधर्मी आणि ईवोल्युशनिजम चा सच्चा भक्त होण्याच्या नात्याने त्याने डार्विन चे पुस्तके व त्याला पूरक असे वाचन साहित्य प्रचाराचे आदेश दिले...
http://www.fixedearth.com/hlsm.html
१९५० च्या दशका मध्ये जेंव्हा कम्युनिस्ट शक्तींनी चीन काबीज केले आणि थेरी ऑफ ईवोल्युशन विचारांचा तत्वांचा पाया बनविला परंतु त्याच्या बर्याच आधी साधारणता १८९८ मध्ये Thomas Huxley's चे पुस्तक Evolution and Ethics छापले गेले होते त्याच काळात चीनी बुद्धिवाद्यांनी डार्विन च्या परीकाल्पनांचा स्वीकार केला होता.
Robert Milner, Encyclopedia of Evolution, NY: Facts on File, 1990 p. 81.
Latin America: . . . . . . . . . . . . . . . . .150,000 dead
Eastern Europe: . . . . . . . . . . . . . .1 million dead
Vietnam: . . . . . . . . . . . . . . . . . . . .1 million dead
Afghanistan: . . . . . . . . . . . . . . . .1.5 million dead
Africa: . . . . . . . . . . . . . . . . . . . . .1.7 million dead
Cambodia: . . . . . . . . . . . . . . . . . . .2 million dead
North Korea: . . . . . . . . . . . . . . . . .2 million dead
USSR: . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .20 million dead
China: . . . . . . . . . . . . . . . . . . . . .65 million dead
डार्विन ने प्रेरित कम्युनिस्ट राजवटीत एकूण १०० मिलियन पेक्षा जास्त लोकांना प्राणास मुकावे लागले.
Andrzej Paczkowski, Cenk Odakan, Engin Sunar, Isil Ozcan, Jean-Louis Panne,
Karel Bartosek, Kolektif, Nicolas Werth, Stephane Courtois,Yavuz Topoyan,
Komunizmin Kara Kitabi, (The Black Book of Communism), Istanbul: Dogan Publishing,p.17.
एउजेनिक्स:
एउजेनिक्स हा एक सोशल डार्विनिजम चा प्रकार आहे. Sir Francis Galton हा चार्ल्स डार्विन चा चुलत भाऊ होता. त्याने १८८३ मध्ये एउजेनिक्स हि शाखा निर्माण केली. मानव जाती मध्ये हेरफेर करून, बदल घडवून त्यांची अनुवांशिक संरचनेत सुधारण घडवून आणणे ह्यालाच एउजेनिक्स असे म्हणतात. चार्ल्स डार्विन च्या Origin of Species हे पुस्तक वाचून त्याने ह्या विषयाचा पाया रचला.
Galton, Francis (1883). Inquiries into Human Faculty and its Development. London: Macmillan. p. 199.
"Correspondence between Francis Galton and Charles Darwin". Galton.org.
http://galton.org/letters/darwin/correspondence.htm. Retrieved 2011-11-28.
सोप्याशब्दात एउजेनिक्स म्हणजे मानववंशाची सफाई, स्वच्छता करणे. त्यासाठी वेग वेगळ्या पद्धतीचा अवलंबत करण्यात येतो. जसे सुधृढ पिढी जन्माला येण्यासाठी फक्त सुधृढ, तपासून घेतलेल्या स्त्री पुरुषांच्या संबंधातून नवीन पिढी जन्माला घालणे किंवा जे लोक कमजोर, आजारी, व्यंग असलेले किंवा समाजावर ओझे असलेल्या सर्व स्त्री, पुरुषांची नसबंदी करून टाकणे, किंवा अश्या लोकांना अमानुष पणे मारून टाकणे. अश्या या विज्ञानाशी प्रभावित होवून हिटलर ने जर्मन वंशाची सफाई करण्या हेतू १९३० ते १९४० च्या दरम्यान ४ लाख पेक्षा जास्त लोकांची नसबंदी करून टाकली होती. आणि याही पेक्षा भयंकर म्हणजे जे लोक असाध्य रोगी किंवा संपूर्ण ठार वेडे अश्या लोकांना तर सरळ सरळ निर्दयी पणे मारून टाकण्यात आले होते. "Euthanasia programme" च्या अंतर्गत Action - T4 म्हणून एक प्रकल्प राबविला गेला ज्या मध्ये सप्टेबर १९३९ ते ऑगस्ट १९४१ पर्यंत ७०२७३ आणि पुढे १९४५ पर्यंत असे संपूर्ण मिळून २७५००० निर्दयी पणे मारून टाकण्यात आले.
Proctor, Robert N. (1988). Racial Hygiene: Medicine under the Nazis. Library of Congress: Harvard College p.191
Estimated by objective evidence and condemned by the Nuremberg Military Tribunal and subsequently ratified many times, for example, recently by Ryan, Donna & Schuchman, John S. : p.62.
परंतु याहि पेक्षा आधी म्हणजे १९ व्या शतकाच्या पूर्व अर्धेत अमेरिकेत देखील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एउजेनिक्स च्या नावाने १९०७ ते १९६३ दरम्यान ६४,००० लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली होती ज्या मध्ये ६०% स्त्रियांची नसबंदी करण्यात आली.
Lombardo, Paul; "Eugenic Sterilization Laws", Eugenics Archive
http://www.eugenicsarchive.org/html/eugenics/essay8text.html.
आधुनिक साम्राज्यवाद आणि सामाजिक डार्विनवाद:
डार्विनच्या हि बर्याच आधी म्हणजे १६ व्या शतकात युरोप मध्ये वसाहतवादाला सुरुवात झाली होती. परंतु डार्विन च्या सिद्धांत मुळे वसाहत वादाला एक नवीन शक्ती मिळाली आणि एक नवीन लक्ष्य मिळाले. विशेषता औद्योगिक क्रांती नंतर आर्थिक उद्देशाने युरोपियन देशांना इतर खंडात, इतर देशावर नवीन बाजारपेठ आणि कच्या मालासाठी आक्रमण करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी इतर खंडा मध्ये शोषण चालू ठेवले परंतु या १९ व्या शतकातील या शोषणाची प्रेरणा वेगळी होती. आणि म्हणूनच याला आधुनिक साम्राज्यवाद या नावाने ओळखले जाते. सामाजिक डार्विन वादाचा प्रभाव या नवीन साम्राज्यवादा च्या उगमामध्ये होता. डार्विनवादि करणा पैकी एक कारण वंशाची श्रेष्ठता चा सिद्धांत होता जो कि ह्या आधुनिक साम्राज्यावादासाठी कारणीभूत ठरला. ब्रिटीश, फ्रेंच, जर्मन आणि इतर साम्राज्ये असा विचार करत होती कि सर्व श्रेष्ठ वंश सिद्ध होण्यासाठी नवनवीन जमिनीवर कब्जा करून सर्वाशाक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयास येणे गरजेचे आहे.
Encyclopedia Britannica च्या १९४६ च्या प्रकशन मधे स्पष्टपणे सांगितले आहे की डार्विनवाद त्याचे सिधांत वंशवाद आणि साम्राज्यवादासाठी काश्य प्रकारे जबाबदार आहेत:
“This new period of imperialism at the end of the 19th century found its spiritual support in Bismarckism and social Darwinism, in all the theories glorifying power and success, which had swept over Europe... Racial theories seemed to give to this new attitude, which was in opposition to all traditional [i.e. Christian] values of morality, a justification by “science” and “nature,” the belief in which was almost becoming the dominant faith of the period.”
Encyclopedia Britannica, 1946 edition, vol. 12, p. 122A
जिम नॅप आपल्या एका लेखात म्हणतो:
“They were also driven by the mistaken goal of proving their superiority over other races. The Anglo-Saxons and Aryans regarded it was their natural right to assume control over the Africans, Asians and native Australians, whom they regarded as “inferior races,” and to exploit their workforces and natural resources. Thus 19th-century imperialism developed more as a result of Darwinist aims than out of any economic concerns”
“ते लोक आपण दुसर्या पेक्षा श्रेष्ठ वंशाचे आहोत हे सिद्ध करण्याच्या (चुकीच्या) धेयाने प्रेरित होते. अंग्लो सॅक्सन आणि आर्य वंशीय यांचा असा समाज होता की अफ्रीकन, एशियन आणि मूळ ऑस्ट्रेलीयन लोकांवर त्यांच्या कार्यशक्ती आणि नैसर्गिक संपत्तीवर देखील आमचा तर नैसर्गिकरित्या अधिकार आहे कि ज्यांना ते कनिष्ट वौंशाचे मानत. आणि अश्या प्रकारे १९ व्या शतकातील साम्राज्यवाद हा आर्थिक कारण पेक्षा डार्विनवादी उद्देश मुळे उगम पावला.
Jim Knapp, Imperialism: The Struggle to Be Superior,
http://www-personal.umich.edu/~jimknapp/papers/Imperialism.html
वरील संदर्भ वाचून आपल्या लक्षात येते कि युरोपियन साम्राज्य विस्तार आणि वसाहतवाद त्यांनी केलेले दमन, अत्याचार, जुलूम. हजारो मानव जाती/जमाती समूळ नष्ट केल्या. लाखो लोकांना गुलाम बनवून जनावरानपेक्षा वाईट दुर्दश करून त्यांना नष्ट केले. एकूण किती मनुष्य त्यांचा ह्या साम्राज्य वादाचे बळी पडले याची गणती करणे शक्य नाही. सध्या तो माझा विषय हि नाही. इथे मी फक्त हे दाखवू इच्छितो कि कश्या प्रकारे डार्विनच्या "वैज्ञानिक" सिद्धांत मुळे मानवजातीला नुकसान झाले.
सामाजिक डार्विनवाद आणि वौंशिक संघर्ष:
जागे अभावी मी इथे वौंशिक वादामुळे मागच्या शतकात किंवा आजही देखील ह्या जगाने काय भोगले आहे आणि भोगत आहे याचे तपशील देवू शकत नाही परंतु एकवाक्यत सांगायचे झाले तर २० व्या शतकात सर्वात मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली असेल तर त्या पैकी वौंशिकवादाचा प्रश्न हा एक आहे. ह्या लेखात मला फक्त वौंशिक वादाला सामाजिक डार्विनवाद कसे जबाबदार होते हेच सांगायचे आहे. डार्विन च्या सिद्धांतामुळे वौंशिक संघर्षाला कसा "वैज्ञानिक" पाठींबा मिळाला आणि डार्विनच्या भक्तांनी, वैज्ञानिकांनी, बुद्धिवाद्यांनी, राजकीय नेत्यांनी पूर्ण पाठींबा देत आप आपले हेतू सध्या करून घेतले.
ईश्वराने विभिन्न वंश, काबिले, राष्ट्रे हे सौन्कृतिक देवान घेवानासाठी बनविले आहे. एकमेकांना समजुन घेण्यासाठी/ओळखन्यासाठी बनविले आहे असे कुरान सांगतो (सुरे हुजरात : १३ )
परन्तु सामाजिक डार्विनवादा नुसार मानव एकमेकाला समजुन घेण्यासाठी नव्हे तर एकमेकांशी लढ़न्यासाठी जन्माला आला आहे. आणि त्यानुसार मानवजातीच्या प्रगतिला गति मिळन्या साठी विभिन्न वंशात जमाती मधे संघर्ष होणे गरजेचे आहे. ह्या अतर्कसंगत सिधानतानुसार विविध वंशाच्या संघर्षात जिंकन्यासाठी नवनवीन शोध लावले जातील त्या मुळे सभ्य आणि प्रगत वंश वर येतील अश्या तर्हेने मानवतेची प्रगति होइल. थोडक्यात सांगायचेतर मानवाची प्रगति जर लोकांना मारून किंवा हत्याकांड करून अथवा उत्पीडन आणि दमन करून होते तर हे रानटी, जंगलीपणेचे लक्षन होय. वादविवाद आणि समस्या तर नेहमी होतील परंतु ह्याचे समाधान शांततापूर्ण पद्धतीने काढता येते.
आज काल काही डार्विनवादी डार्विनचा बचाव करण्याचा केविलवाणी प्रयत्न करात कि तो वंशवादी नव्हता वगैरे वगैरे परंतु त्याच्या The Descent of Man ह्या पुस्तकतील हे वाक्य सत्य लपवूशकत नाही
“When civilised nations come into contact with barbarians the struggle is short, except where a deadly climate gives its aid to the native race... The grade of their civilisation seems to be a most important element in the success of competing nations.”
Darwin, The Descent of Man, p. 297
डार्विन नंतर अनेकांनी ह्या वौंशिक संघर्षाच्या परीकाल्पनेला विज्ञान समजून तिचा प्रचार आणि प्रसार केला. डार्विन च्या अश्या अनेक भक्ता पैकी एक कार्ल पीयर्सन.
National Life from the Standpoint of Science ह्या पुस्तकात प्रसिद्ध वैज्ञानिक Karl Pearson सांगतो:
“There is a struggle of race against race and of nation against nation. In the early days of that struggle it was a blind, unconscious struggle of barbaric tribes. At the present day, in the case of the civilized white man, it has become more and more the conscious, carefully directed attempt of the nation to fit itself to a continuously changing environment. The nation has to foresee how and where the struggle will be carried on... I have asked you to look upon the nation as an organized whole in continual struggle with other nations, whether by force of arms or by force of trade and economic processes. I have asked you to look upon this struggle of either kind as a not wholly bad thing; it is the source of human progress throughout the world's history”
Karl Pearson, National Life from the Standpoint of Science, Cambridge: Cambridge University Press, 1900, pp. 11-16, 20-23
किंवा
“What I have said about bad stock seems to me to hold for the lower races of man. How many centuries, how many thousand of years, have the Kaffir or the negro held large districts in Africa undisturbed by the white man? Yet their intertribal struggles have not yet produced a civilization in the least comparable with the Aryan. Educate and nurture them as you will, I do not believe that you will succeed in modifying the stock. History shows me one way, and one way only, in which a high state of civilization has been produced, namely, the struggle of race with race, and the survival of the physically and mentally fitter race.”
Karl Pearson, National Life from the Standpoint of Science, Cambridge: Cambridge University Press, 1900, pp. 36-37, 43-44.
प्रसिद्ध भारतीय Anthropologist ललिता विद्यार्थी सांगतात कि डार्विनच्या या युक्तिवादामुळे वंशवाद कश्या प्रकारे सामाजिक विज्ञानाशी जोडला गेला...
"His (Darwin's) theory of the survival of the fittest was warmly welcomed by the social scientists of the day, and they believed mankind had achieved various levels of evolution culminating in the white man's civilization. By the second half of the nineteenth century racism was accepted as fact by the vast majority of Western scientists. "
Alexander I. Oparin, Origin of Life, (1936) New York, Dover Publications, 1953 (Reprint), s.196
वरील परिच्छेदावरून आपण अंदाज बांधु शकतो कि डार्विनच्या सिद्धांताला, वौंशिक संघर्षाला नैसर्गिक, वैज्ञानिक, काळाची गरज समजून काळ्या दगडावरची रेघ मानून बुद्धिवाद्यांनी पाठींबा दिला आणि मानवीय इतिहासाला काळिमा फासणारे घटना २० व्या शतकाने बघितल्या.
मनुष्याच्या मानसिकतेवरील परिणाम:
प्रख्यात Geneticist, Evolutionary Biologist, आणि Evolutionary Biology मधील एक नामवंत वैज्ञानिक Theodosius Dobzhansky डार्विन वादामुळे समाजावर काय दुष्परिणाम झाला याची माहिती देताना सांगतात कि…
“हा सिद्धांत मानव समाजात अहंकार, भौतिकवाद, भित्रेपणा, फसवणूक / दगाबाजी आणि शोषण ची शिकवण देतो या उलट जगातील सर्व समाज सामुहिक नैतिकतेची शिकवण देत ह्या सर्व "नैसर्गिक" व्यवहार च्या उलट गोष्टींची शिकवण देतात. जसे दया, उदारता, बलिदान ज्या कि कोणत्याही कबिल्या साठी, राष्ट्र साठी किंवा संपूर्ण मानवजाती साठी चांगली गोष्ट आहे.”
“Natural selection can favor egotism, hedonism, cowardice instead of bravery, cheating and exploitation, while group ethics in virtually all societies tend to counteract or forbid such "natural" behavior, and to glorify their opposites: kindness, generosity, and even self-sacrifice for the good of others of one's tribe or nation and finally of mankind.”
Theodosius Dobzhansky,
"Ethics and Values in Biological and Cultural Evolution," in Los Angeles Times, June 16, 1974, p. 6.
Ken Ham, author of The Lie: Evolution. draws attention to the irreligiousness to which Darwinism leads: "If you reject God and replace Him with another belief that puts chance, random processes in the place of God, there is no basis for right or wrong. Rules become whatever you want to make them. There are no absolutes–no principles that must be adhered to. People will write their own rules..."
जर तुम्ही परमेश्वराचा अस्वीकार करून त्याच्या ऐवजी अश्या गोष्टीन वर आस्था ठेवता कि ती परमेश्वरा च्या जागी तुम्हाला शक्यता, संभावना आणि उद्धेश नसलेली प्रक्रिया यांना बसवते, अश्या वेळेस मग चांगले आणि वाईट ला काही आधार राहत नाही. मग तुम्ही बनवताल तसे कायदे बनतील. तेथे कोणत्याही गोष्टीची निरपेक्षता अथवा नितीतत्व राहणार नाही. लोक त्यांचे नियम स्वतः लिहतील.
Ken Ham, The Lie: Evolution, Master Books, 15th ed. April 1997, p. 84.
{धमाल आहे.}
डार्विनिजम ही परिकल्पना आणि कोणत्याही पुराव्याशिवाय मानलेला देव नि त्याच्या नावावर माणसांनीच खपवलेले - अपडताळणीय - धर्मग्रंथ मात्र सत्य. लैच भारी. डार्विनिजमच्या नावावर झालेल्या संहारापेक्षा देव-धर्म यांच्या नावावर झालेल्या हत्या कैक पटीने अधिक आहेत, मोजणीचीही गरज पडणार नाही. नैसर्गिक मृत्यूंपेक्षाही कदाचित ही संख्या अधिक असेल. मग देव धर्म या संकल्पनाही मोडीत काढू या की.
बाकी कम्युनिजमचा बेस डार्विनिजम आहे हे वाचून ह.ह.पु.वा. दोन्ही जरा नीट वाचून मग असले फटाके फोडा हो. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला.
बादवे: ते 'एउजेनिक्स' नाही उच्चार 'युजेनिक्स' असा आहे.
बाकी लेख मनोरंजक वाटला. लै दिसांनी येणं झालं.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{काही निश्कर्श निघाला असेल}
काही निश्कर्श निघाला असेल लेखातून तर तेवढाच मात्र सांगता का झहीरसाहेब.
{एक प्रश्न आहे:}
उत्क्रांती झाली का झालीच नाही?
झाली तर मग डर्विन (किंवा इतर कोणी) त्यासंदर्भात सिद्धांत मांडल्यामुळे युद्ध झाली का? सिद्धांत मांडल्यानंतर युद्ध टाळण्याचे प्रयत्न झाले नाही का? सिद्धांत मांडण्याआधी लोकं वंशश्रेष्ठत्व मानत नव्हते का?
उत्क्रांती झालीच नसेल तर हे सगळं देवाने निर्माण केलं का? केलं तर मग युद्धसुद्धा देवानेच निर्माण केली आणि डार्विनसुद्धा! देवालाच डैरेक दोष द्या; अधल्यामध्हल्या डार्विनटाईप लिंबूटिंबूना सोडून द्या.
{३-४ वेळा लेख वाचला}
पन अज्जाबात म्हंजे अज्जाबात काही कळलं नाही.
डार्विन ने आपल्या परीकल्पनेत असे सांगितले कि सजीवाची प्रगती हि त्याच्या अस्तित्वाच्या लढाई वर अवलंबून आहे. Fight for survival. आणि या संघर्षात फक्त शक्ती शाली चा विजय होणार आणि कमजोर नष्ट होणार. या अवैज्ञानिक परीकल्पने नुसार निसर्गात अस्तित्वासाठी एक निरंतर असे क्रूर संघर्ष आहे ज्या मध्ये शक्तीशाली नेहमी कमजोर वर काबीज होणार आणि अश्या तर्हेने विकासाची एक पायरी चढली जाते.
डार्विनने सिद्धांत मांडायचा आधी आपल्याकडे "बळी तो कान पिळी" ही म्हण होतीच. तिचा मतीतार्थ तोच. श्रेष्ठ-कनिष्ठ इ. वाद फार आधीपासून चालू आहेत. डार्विनवर त्याचे खापर फोडणं बरोबर नाही वाटत, आणि बलवानाने निर्बलावर विजय मिळवणे हे नैसर्गिकच आहे, जसे कुपोषित शरीर आजारी पडते. बलवानाने निर्बलावर बळजोरी करावी का हा तात्विक प्रश्न आहे. ती मानसिकता असतेच काही ठिकाणी त्याला नाईलाज आहे. आपल्या देशात तर नेहेमी जेत्यांनीच जितांवर अत्याचार केलाय.अलेक्झांडर, वास्को-द-गामा, गझनीचा मेहमूद, घोरी हे काय पिकनिकला आले होते इथे? पॄथ्वीराजाने ३ वेळा जीवदान दिलं तरी अल्लाउद्दीन खिलजीने (तोच ना?) त्याला नंतर दगाबाजीने मारलच. गोव्यातील राजांनी ज्यांचे स्वागत केले त्याच पोर्तुगीजांनी त्यांना मारले. द.अमेरिकेत स्पेनने तेच केले.माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं १८०९ च्या आधी म्हणजे डार्विनच्या जन्माच्याही आधी झालंय.
आता माल्थसविषयी...माझ्या माहितीप्रमाणे त्याची जी थिअरी आहे जिला थिअरी ऑफ पॉप्युलेशन म्हणतात ती ढोबळपणे अशी आहे:- "जर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढत गेली तर मागणीपेक्षा पुरवठा वाढतो आणि त्याचा परिणाम बेकारीत आणि मग गरिबीत होतोआणि मग रोगराई वाढण्यात होतो. गरिबी वाढली की मग लोक लग्न इ. करू शकत नाहित त्यामुळे कालांतराने परत पुरवठा कमी होतो आणि मग परत बेकारी कमी होऊन नोकर्या मिळतात आणि हळूहळू परत स्थिती पूर्ववत होते" (हे मी ढोबळ रूपांतर केलंय). त्याने ह्याच नावाचे जे पुस्तक लिहिलं त्याची उजळणी करून त्याने तब्बल ६ आवॄत्त्या काढल्या. दुसर्या आवॄत्तीत त्याने असं म्हटलं होतं की"जर एखादी व्यक्ती आपल्या आई-वडलांकडून किंवा अन्य कोणाकडून आपले पालन पोषण करून घेऊ शकत नसेल तर त्याला ह्या जगात जागा नाही. जर कुणी दयेने त्याच्यासाठी काही सोय केलीच तर त्याच्यासारखेच इतर लगेच पुढे येतात आणि मग अशी रांगच लागून परिस्थीती बिघडते". थोडक्यात त्याने बेसुमार लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगितले होते.
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{अभिजित}
३-४ वेळा लेख वाचला
अभिजिता, महान आहेस बाबा...
काही गोष्टी न बोललेल्याच बर्या असतात
{(विषय दिलेला नाही)}
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{अल्लाउद्दीन खिलजीने (तोच ना?)}
अल्लाउद्दीन खिलजीने (तोच ना?) >> नाही नाही, मो. घोरी होता तो !
*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...
{थ्यांकू}
बाकी स्वामींना सगळंच माहित असणार...
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{दुरुस्त्या...}
डिस्क्लेमरः- प्रतिसादातील भावना समजू शकतो. फक्त तपशिलात दुरुस्त्या केल्यात.
पॄथ्वीराजाने ३ वेळा जीवदान दिलं तरी अल्लाउद्दीन खिलजीने
खाली दिल्याप्रमाणं खिल्जी नाही, घोरी. घोरीनं पहिल्यांदा दिल्ली जिंकली ११९२ च्या आसपास.त्याच्या शंभर वर्षानंतर खिल्जिंचं राज्य आलं १२९४ च्या आसपास. त्यांनीच प्रथम पंजाब्-युपी इतकाच मर्यादित असणारा सल्तनतीचा पट्टा थेट वाढवत अगदि मदिरै पर्यंत नेला. मध्ये येणारे गुजरात्,एम पी, महाराष्ट्र, बिह्रार, आंध्र, कर्नाटक, निम्मा तामिळनाडू असे सर्व भाग त्यानं जिंकले.
त्याला नंतर दगाबाजीने मारलच.
हे आपण हरलो की सतत म्हणतच असतो. "दगाबाजीने " हरलो म्हणून.विजयनगरवाले पण १५६५ च्या तालिकोट युद्धाबद्दल असच म्हणतात. अॅक्चुअली, पृथ्वीराज भलताच गाफिल होता; अतिआत्मविश्वास, बेफिकिरी त्याला नडली. भरीला भर म्हणून त्याचा सासरा का काका होता जयचंद, त्यानं ऐनवेळी टोपी फिरवली, पृथ्वीराजाचा सत्यानाश झाला.
गोव्यातील राजांनी ज्यांचे स्वागत केले त्याच पोर्तुगीजांनी त्यांना मारले.
वास्को द गामा प्रथम कालिकतला उतरला. तिथल्या राजांना झामोरिन म्हणत. वास्कोनं सर्वप्रथम त्यांचा गेम केला. गोवा वगैरे थोडं नंतरचं. गोव्याला त्याला आश्रय बहुतेक एकदा विजयनगर वाल्यांकडून आणि नंतर आदिलशहाकडून मिळाला, त्यांना त्यांनी इतका उपद्रव केला नाही.
द.अमेरिकेत स्पेनने तेच केले.
हो. त्या द. अमेरिकेत ह्या हैवानी कारवाया करणारा स्पॅनिश कमांडर/ खलाशी होता पिझारो. त्यानं हे केलं.
--मनोबा.
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही !
{आभार मनोबा}
माझा प्रतिसाद समजून घेतल्याबद्दल आभार आणि तपशीलातील चुका अधोरेखीत केल्याबद्दल पुन्हा आभार...
हे आपण हरलो की सतत म्हणतच असतो. "दगाबाजीने " हरलो म्हणून. हा मुद्दा सुद्धा मान्य. माझीच चूक आहे. वास्तविक मला असं लिहायचं होतं की ज्याने ३ वेळा जीवदान दिलं त्याला घोरीने पहिल्या संधीतच मारून टाकलं. पॄथ्वीराजाचा मूर्खपणा त्याने केला नाही.
पोर्तुगीजांबाबत मला असं वाटतं की पोर्तुगीज शांत होते कारण विजयनगर आणि आदिलशाही बलाढ्य होती..पण नंतर त्यांनीही अनन्वीत अत्याचार केलेच!!! असो...
परत एकदा आभार. तुमची प्रतिक्रीया जरूर द्या.
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{धन्य आहात अभिजित :)}
मी खरे तर सुरुवातीचे दोन पॅरा वाचूनच नाद सोडला........
पुढे हिटलर, माओ सुरू झालेले पाहुन आणखी कीव आली.
लेखकांना नम्र विनंती,
अजून जरा वाचन वाढवा. Friedrich Nietzsche याचे लिखाण्/विचार वाचा. आणि इथे केले तसे अर्धवट वाचून त्यालासुद्धा दोष देत फिरू नका.
माझा ब्लॉग
{भुशभुशीत लेख}
आणि या संघर्षात फक्त शक्ती शाली चा विजय होणार आणि कमजोर नष्ट होणार.
मूळात शक्तीशाली विजयी होणार आणि कमजोर नष्ट होणार, असा डार्विनचा सिद्धांत अजिबात सांगत नाही. तो म्हणतो सर्वायवल ऑफ द फिट्टेस्ट. सर्वायवल ऑफ द स्टाँगेस्ट नव्हे!
कारण जर शक्तीशालींचा विजय आणि कमजोर नष्ट होत असते तर, डायनॉसोर नष्ट आणि मुंग्या-झुरळे कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात, असे घडलेच नसते!
थोडक्यात, चुकीच्या कल्पनेवर आधारीत असलेला हा एक भुसभुशीत लेख आहे!!
{बेसुमार संदर्भाच्या परिमाणात}
बेसुमार संदर्भाच्या परिमाणात व्यासंगाची खोली मोजणे आताच्या जमान्यात कालबाह्य झाले आहे. तसेच सर्वमान्य संदर्भ दिल्याने आपल्या स्वसंशोधित निष्कर्षांना सत्याचे स्वरूप प्राप्त होते ही कल्पनाच वृथा आहे.
सदर लेखात त्याचीच (म्हणजे बेसुमार संदर्भ आणि हॅलोजन भरलेल्या फुग्यासारखे निष्कर्ष) रेलचेल दिसते.
..................................................................................
जो भी मै,कहना चाहू, बरबाद करे अल्फ़ाज मेरे
क्या फर्क पडता है?
{डार्विन महती}
मूळ लेखावर काही लिहिण्याचे धाडस करण्यापेक्षा या निमित्ताने आमचे परममित्र निवांत पोपट जागे झाले हे या लेखाचे महत्व होय असे मी मानतो.
जय डार्विनबाबा !
अशोक पाटील
{माझा प्रतिसाद ढापला तुम्ही}
माझा प्रतिसाद ढापला तुम्ही
something terribly wrong with this country, isn't there?
{"सर्वायवल ऑफ द फिट्टेस्ट".}
"सर्वायवल ऑफ द फिट्टेस्ट". असं डार्विनबाबाच सांगून गेलेत त्यामूळे...
..................................................................................
जो भी मै,कहना चाहू, बरबाद करे अल्फ़ाज मेरे
क्या फर्क पडता है?
{नाय हो}
हे विधान/निष्कर्ष 'हर्बर्ट स्पेन्सर'चे. या विधानाचा आधार घेऊन युरोपिय धनदांड्ग्यांनी आम्ही श्रेष्ठ आहोत म्हणून यशस्वी आहोत असा उलटा तर्क लढवून आपल्या हपापलेपणाचे समर्थन करायला सुरुवात केली होती. याचा आजचा अवतार म्हणजे तथाकथित 'स्पर्धात्मक अर्थव्यवस्था'.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{बर्याच अंशी सहमत}
स्पर्धा(इथे तरी)निकोप नसते.
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{मोठी लोक सांगून गेली आहेत, की}
मोठी लोक सांगून गेली आहेत, की ज्यातलं कळत नाही त्यासाठी तोंड उघडू नये. म्हणून मी गप्प
something terribly wrong with this country, isn't there?
{ज्यातलं कळत नाही त्यासाठी तोंड उघडू नये.....}
कळलं....पण ह्यातलं कळत नसलं तरी जे लिहिलय त्यात गडबड आहे हे नक्की कळलं म्हणून गप्प नाय रह्यलो.
च्यायला....तुम्हाला ह.घ्या हे लिहायचंच राहिलं...मालकांशी पंगा बरा नव्हे.
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{अरे नाही, खरोखर! मला हे}
अरे नाही, खरोखर!
मला हे डार्विन इत्यादी सगळे नवीन आहे. या बद्दल वाचन शुन्य (झिरो, काय समजला)!
something terribly wrong with this country, isn't there?
{वोक्के}
छान आहे एकूण लिखाण. अर्थात मी गोषवारा इ.इ. वाचलाय, नॉट द ओरिगिनल वन. डार्विनच्या सिंद्धांतावर असा ही एक आक्षेप आहे की मानवाच्या एकंदर उत्पत्ती विषयी त्यातून फार कळत नाही. म्हणजे मार्जार गटात एकाहून जास्त प्राणी आहेत, श्वान गटाचे तेच, घोडयासारखे प्राणी आहेत्,पण माणूस एकमेवाद्वितीय कसा? म्हणजे तो वेगळा आहे. प्राण्यांसारखे तीक्ष्ण नख्या, दात नाहीत, तुलनेने ताकद कमी, तो पळू अथवा उडू शकत नाही, सतत चालूही शकत नाही, पण मेंदू तूफान विचार करतो, त्याला रंग कळतात, दिवसा आणि रात्री दिसतं, शाकाहार-मांसाहार दोन्ही करू शकतो, भुतकाळाची आठवण आहे आणि भविष्याचा विचार करू शकतो..त्यामुळे माणूस इतका वेगळा कसा ह्याचं उत्तर डर्विनकडे नाही म्हणे (किंवा नव्हतं)
सो आवर पुराण्स आर बेस्ट..मत्स्य, कुर्म , वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम्,कॄष्ण उत्क्रांती कशी नीट कव्हर झाल्येय पहा....
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{या प्रश्नांच्या उत्तरासाठी}
या प्रश्नांच्या उत्तरासाठी 'पृथ्वीवर माणूस उपराचं' हे पुस्तक वाचावे असा आग्रह मी धरतो
(युफओवादी) राजे
something terribly wrong with this country, isn't there?
{वाचलंय...}
पण समाधान नाही झालं...ते पण काहि थोर पुरावा देत नाही. एरिख वॉन डॅनिकेनच्या लेखनाचं विस्कळीत संकलन असं मी म्हणीन फारतर...
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{मग हिस्ट्री चॅनेलचे "ऐन्शंट}
मग हिस्ट्री चॅनेलचे "ऐन्शंट ऐलियेन" नावाच्या माहितीपटाचे ४ ही सिझन पहा.
पहिला सिझन -५ भागांचा आहे, २रा सिझन १० भागांचा, ३रा १६ भागांचा व ४था सध्या चालू आहे.
something terribly wrong with this country, isn't there?
{नक्की बघेन...सध्या केनेथ क्लार्कचे सिव्हिलायझेशन चालू आहे}
ते संपल की हे बघेन...तोवर तूनळीवरचे दुवे घेऊन ठेवतो.
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{सायबा}
अहो तुम्ही त्या राजेचं काय ऐकता. तो स्वतःच अँड्रोमिडा गॅलेक्सीमधला ग्यामा-१ ग्रहावरून आलेला आहे. अँटेना काढून ठेवल्यात नि कपाळावरच्या मधल्या डोळ्यावर ते हिंदी चित्रपटातले विलन लावतात तसे कातड्याचे - त्याच रंगाचे - आवरण लावले आहे म्हणून कळत नाही इतकच. परवा पौर्णिमेच्या रात्री डिश्-टीवीच्या एन्टीनावर बसून काहीतरी अगम्य भाषेत मेसेज पाठवताना पकडला होता मी त्याला, सावध रहा बरं का.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{(विषय दिलेला नाही)}
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{राजे 'उत्कांत' झाले आहेत असं}
राजे 'उत्कांत' झाले आहेत असं काही म्हणायचं आहे काय तुम्हाला?
..................................................................................
जो भी मै,कहना चाहू, बरबाद करे अल्फ़ाज मेरे
क्या फर्क पडता है?
{उ त्कां त???}
र विसरलात का मुद्दामच नाही टाकलात?
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{बरोबर प्रश्न विचारलात.}
बरोबर प्रश्न विचारलात. निपोंनी 'उ'चा 'कांत' झाले आहेत का असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचे उत्तर सूनबाईच देऊ शकेल.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{साईटीच्या मालकाचे असे धिंडवडे}
साईटीच्या मालकाचे असे धिंडवडे काढणे शोभते का तुम्हाला आँ
something terribly wrong with this country, isn't there?
{उदार आहात तुम्ही}
म्हणून मोकळेपणाने लिहीताहेत ते.
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{@ अभिजित, मी 'र' विसरलो खरा,}
@ अभिजित,
मी 'र' विसरलो खरा, पण जिथे उत्क्रांतीच आपले अधले मधले टप्पे विसरते तिथे आमच्या 'र'चे काय घेऊन बसलात!
@ रमतारामजी,
तुमची 'उ' आणि 'कांत' वरची कोटी खासच! तुमच्या एका कोटी भास्कर मित्राची आठवण करून देणारी!
..................................................................................
जो भी मै,कहना चाहू, बरबाद करे अल्फ़ाज मेरे
क्या फर्क पडता है?
{एकोणीस}
एकोणीस मूर्खासारख्या आलेल्या प्रतिक्रियांचे वाईट वाटून न घेता लेखकाने जनसामान्यांच्या भल्याचाच विचार करत असे उद्बोधक, नवदिशादर्शक, विज्ञानाच्या कचाट्यातून व प्रगतीच्या भ्रमातून सोडावण्यासाठी लिहित रहावे ही विनंती. विज्ञानातून व असले भिकार तर्क्-वितर्क करण्याच्या बेअदब सवयीपासून सुटका झाल्याशिवाय समाजाचे भले होणे नाही. भले म्हणजे काय हे खरे तर ह्या मंडाळींनाही ठाउक नाही. भले होणे म्हणजे काय, योग्य रस्त्यावर जाणे म्हणजे काय, हे ही तुम्ही समजावून सांगितलेत तर किती बरे होइल.
--मनोबा.
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही !
{ लिहित रहावे ही विनंती..... }
लिहित रहावे ही विनंती..... >>>>मन यांच्याशी सहमत. मी तर लेखकाच्या "कुक्कुटपालनाचा भुईमूग आंतरपीक व्यवस्थापनात उपयोग व त्यांचे परिणामी भारतातील हिंदुत्ववादी राजकारणाचा उदय" या विषयावरील पुढल्या लेखाची आतुरतेने वाट पाहतोय.
{क ह र }
हा कहर होता...
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{आभार...}
विज्ञानाच्या कचाट्यातून आम आदमीला वाचवण्याची आज गरज आहे असेच माझे मत आहे.
--मनोबा.
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही !
{चार्ल्स डार्विनने}
चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिध्दांत मांडला दीडशे वर्षांपूर्वी. अनेक सूक्ष्म निरीक्षणे, विविध तपशीलवार नोंदी आणि या साऱ्यांची तर्कशुध्द गुंफण यांच्या वैज्ञानिक बैठकीवर रचलेला हा सिध्दांत -उत्क्रांती (सुमती जोशी)
something terribly wrong with this country, isn't there?
{डार्वीन ने मांडलेल्या}
डार्वीन ने मांडलेल्या सिद्धान्तात तृटी होत्या.
कीटक हे स्वतःची तीकून रहान्याची क्षमता वाढवत नेतात.( उदा जुन्या कीटकनाशकाना दाद न देणे वगैरे) पण त्या तुलनेत मानव अजूनही मलेरीया सारख्या त्याच रोगाना बळी पडतो. कीटकांच्या तुलनेत मानव निर्बलच म्हणावा लागेल
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{विजुभाऊ, पहिले वाक्य नि पुढची}
विजुभाऊ, पहिले वाक्य नि पुढची दोन यात १००% विसंगती आहे हे लक्षात येते का? कि परस्परसंबंध नसलेली दोन वाक्य लिहिणेच अपेक्षित आहे तुम्हाला?
कीटक हे स्वतःची तीकून रहान्याची क्षमता वाढवत नेतात.( उदा जुन्या कीटकनाशकाना दाद न देणे वगैरे)
हे उदाहरण एक प्रकारे उत्क्रांतीवादाचे समर्थक आहे. पण असे असूनही हे 'डार्विनचे' नाही किंवा डार्विनच्या अभ्यासकांचे नाही. तसेच हे उत्क्रांतीवादाचा भाग होत नाही. हे विधान 'लमार्क'चे आणि ते चुकीचे आहे. किंबहुना निरीक्षण योग्य पण निष्कर्ष चुकीचा कसा असू शकतो याचे हे उत्तम उदाहरण मानले जाते.
प्रतिकून परिस्थिती निर्माण झाली असताना तिला विरोध करण्याची क्षमता विकसित होत नाही! उलट ती मुळातच ज्यांच्यात असते ते टिकतात - इतर नाहीसे होतात!- त्यामुळे पुढची पिढी ही असा प्रतिरोध करण्याची क्षमता असलेल्यांचीच असते. या कारणाने पुढल्या पिढीत नि त्याहीपुढच्या पिढ्यांमधे ही क्षमता अधिक दिसते. याचे कारण ती वाढली म्हणून नव्हे, तर ज्यांच्यात नव्हती ते संपले, नाहीसे झाले म्हणून.
दुष्काळी परिस्थितीत अन्नसंघर्षात झाडाच्या शेंड्यावरची पाने खाता यावीत म्हणून जिराफाची मान लांब होत गेली असे नसून ज्यांची मान इतरांपेक्षा अधिक उंच्/लांब होती ते खालच्या पानांसाठी अन्य शाकाहार्यांशी संघर्ष न करता आरामात वरची पाने खाऊ शकले, टिकू शकले.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.