ड - डलहौसीचा...(१)

0
0

बर्‍याच वर्षात कुठे फिरायला असा गेलोच नव्ह्तो. काय करणार रजेची नेहमीची बोंब. कंटाळून गेलो होतो, सौ. तक्रार करून करून थकली होती. परिस्थिती गंभीर होण्याआधी बेत नक्की करणे (किमान हास्य ) जरूरी होते. बँकॉक, मलेशिया, सिंगापूरला वगैरे आजकाल लोक अगदी सहज जाऊन येतात. त्या दृष्टीने मग पर्यटन विषयक संस्थळे पाहायला सुरुवात केली. त्यामधे मग निरनिराळ्या विमानसेवा, थॉमस कूक, इनक्रेडिबल इंडिया, जे.के.टूरिजम, हिमाचल टूरिजम, महाराष्ट्र, राजस्थान, केरळ आदी वेगवेगळ्या राज्यांची पर्यटन संस्थळे पहातांना लक्षात आले की अरे!, आपण जग पहायला जायचे म्हणतोय, आपला देश तरी आपण कुठे नीट बघितलाय? (तसे म्हणाल तर आपला महाराष्ट्र ही नीटसा पाहिला नाहीये.)
हिमाचल टूरिजम ची दोन संस्थळे पाहून व एका मित्राशी सल्ला मसलत करुन डलहौसी येथे जायचे ठरवले अन आठ दिवसांची आखणी केली. मेक माय ट्रिप.कॉम वर एक फ्लाइट + हॉटेल डील मिळाले त्यामुळे विमानभाड्याच्या रकमेतच डलहौसी येथे ४दिवस मोफत हॉटेलची सोय झाली. उरलेले ३ दिवस धरमशाला, मॅकलिओड्गंज फिरायचे ठरवले.
दिवाळी झाली, भाऊबीजेच्या दुसर्‍या दिवशी मुंबई-जम्मू विमान पकडण्या साठी पहाटे साडेचार वाजता सांताक्रूज विमानतळ गाठले. सुरक्षा तपासण्या पार करून वाट बघत बसलो होतो तेव्हा तिघे जण येउन बसले, त्यातल्या एकाजवळ गिटार एकाजवळ मेंडोलिन. विमानाला वेळ होता, केली की राव त्यांनी जुगलबंदी सुरु. मला पाश्चात्य संगीतामधले काहीही ओ की ठो कळत नाही पण ते दोघे जे काही वाजवत होते ते फार सुंदर होते. पाउण तास ते भान हरपून वाजवत होते. तिसरा त्यांचा मॅनेजर होता, ब्राझील हून आले होते. मुलाला घेऊन त्यांच्या समोर पाउण तास मी ही उभा होतो, त्यांचे वादन संपल्यावर मी व मुलाने टाळ्या वाजवून दाद दिली व भारतीयांना अरसिक पणाच्या आरोपातून वाचवले कारण बाकी लोक अगदी मख्खपणे आपले (तथाकथीत) स्टेटस सांभाळत बसले होते Sad . त्या दोघांशी व मॅनेजर शी थोड्या गप्पा मारल्या त्यांना आसाम ला व चेन्नई ला जायचे होते मग थोडा भारताचा भूगोल समजाउन दिला व विमानात बसण्या आधी आमच्या ट्रिप ची इतकी मस्त सुरुवात केल्याबद्द्ल त्यांचे आभार मानले.
सकाळी ६ वाजता निघालेले विमान दिल्ली मार्गे जाउन पावणे अकरा ला जम्मू ला पोचले. मंदीराच्या चौकोनी कळसा सारखे दिसणारे घुमट असलेली इमारत असणारे जम्मू विमानतळ छोटे असले तरी लष्कराच्या ताब्यात असल्याने नीटनेटके छान होते. (ही बाब नंतर हिमाचल मधेही लक्षात येण्याजोगी होती की जो भाग आर्मीच्या ताब्यात तिथे चांगले रस्ते, बागा सगळे आखीवरेखीव !!) ऑटोरिक्षा पकडून "बस अड्डा " गाठला. तिथे एस टी बसेस व खाजगी बसेस यांचा अभूतपूर्व गोंधळ सुरु होता, बस कोणी कुठे लावायची, तू मागे घे-मला पुढे काढू दे वगैरे नित्याचे यथासांग चालले होते. जम्मू-डलहौसी थेट बस नेमेकी केव्हा ते कळू शकले नाही,गर्दी प्रचंड. तेव्हा पहिले पठाणकोट ला तर पोहचू असे म्हणून एका बस मधे कसेबसे घुसलो. दोन अडीच तासाचा प्रवास उभ्याने केला, बायको ला बस च्या इंजीन जवळ बसायला मिळाले. इंजिनाच्या गरमी ने ती वैतागली. मुलाला ड्रायव्हरच्या शेजारी जागा मिळाली त्यामुळे तो खूष ! पठाणकोटला रेल्वेने गेलो असतो तर बरे झाले असते. दोन अडीचच्या सुमारास पठाणकोट ला पोचलो. जाम भूक लागली होती, बस स्टॅण्ड समोरच्या एका अतिसामान्य हॉटेलात अतिउत्कृष्ट दर्जा व चवीचे मटार पनीर, कढी पकोडा हाणला ( म्हणजे मराठीत सांगायचे तर "अगदी ऑथेंटीक पंजाबी!"), सोबत खायला जहाल मिरच्यांची चटणी व हवा तेवढा काकडी/ मुळा. हॉटेलवाला समोरच गरमागरम गव्हाच्या रोट्या तंदूर मधून काढून वाढत होता मुलगा तर नुसता सुटला होता. शेवटी थोडा दालचावल. तिघांचे बील फक्त ८० रुपये. एकंदरीत वरलीया रंगाला भुलू नये हे माझे म्हणणे बायकोला पटले (फार दुर्मीळ योग! हास्य ), तसे माझ्याशी लग्न केले तेव्हाच हे पटले होते हे ती नंतर म्हणालीच.
चार वाजता हिमाचल राज्य परिवहन मंडळाची बस आली गर्दी फारशी नव्हती, मस्त झोप लागली पण लवकरच घाट सुरु झाल्यावर मोडली कारण बस वेगात जाताना डावी-उजवी कडे सारखी झुलत होती. यथावकाश रात्री आठ वाजता डलहौसी ला एकदाचे पोचलो. जोरदार थंडी होती, हॉटेलची रूम चांगली होती, प्रवासाने आम्ही तिघेही खूप दमलो होतो म्हणून रूमवरच सूप नि पुलाव मागवला, थोडा थोडा खाऊन उबदार ब्लँकेट मधे गुडुप झालो.
दुसर्‍या दिवशी तेथे फिरायला हॉटेल मॅनेजर च्या मदतीने कार ठरवून घेतली होती तो कारवाला आला(साधारण ८००रु प्रतिदिन पडले), सुभाष चौकात पराठ्यांचा नाश्ता उरकून निघालो आणि बनीखेत या टुमदार गावाच्या वाटे वर हे सुंदर दृष्य दिसले

आणि मग थोड्या उंचावर गेल्यानंतर रस्त्यावरून दिसलेले रावी नदी वर बांधलेले हे धरण 'चमेरा डॅम'

आणि हे त्या धरणाचे साठलेले बॅकवॉटर...

आणखी थोडे पुढे गेलो तर ही छान खळखळ वाहणारी अगदी निळेनिळे पाणी असलेली रावी नदी. पंजाब मधे वाहणार्‍या पाच नद्या रावी, झेलम, सतलज, चिनाब, बियास पैकी एक.( म्हणून पंच आप = पंजाब)

असे इतके निळेशार पाणी असलेली नदी मी पहिल्यांदाच पाहीली. पाण्यात पाय घातला आणि एक मिनिटात बधीर! असे गारेगार पाणी!!. नदी मधे एका भल्या मोठ्या दगडावर चिरंजीव लगेच आडवे पसरले. फोटो बघतांना "दगडावर दगड कसा छान दिसतोय बघा " असे म्ह्टल्यामुळे मला बरेच गुद्दे खावे लागले.

मग आम्ही पोचलो चंबा या सुंदर गावात. इथे भगवान विष्णू चे भव्य मंदीर आहे. शिखर शैलीतील या मंदीरासोबतच शिव, भवानी,गणेश असा एक मंदीर समूहच आहे. नक्षीकाम अगदी अप्रतीम ! पण फोटो काढायला मनाई Sad शेवटी बाहेरून रस्त्यावरून झूम करुन कसेतरी दोन-तीन काढले.


अजुन बरेच फोटो व वर्णन बाकी आहे तुम्हाला आवडले तर टाकेन. क्रमशः चा राग येउ देउ नका ही विनंती.

क्रमशः

ड - डलहौसीचा...( २ )

सुंदर ! फोटोही अप्रतिम

1

सुंदर !

फोटोही अप्रतिम ...पुढिल वर्णन जरूर टाका..लवकर!


पुष्करिणी

काय राव तुम्हाला पण हा रोग

2

काय राव तुम्हाला पण हा रोग झाला का ?
क्रमश चा बाकि जरा वर्णन लिहा कि

मस्त फोटु..

3

मस्त फोटु..


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

सुंदर आहेत फोटो. चमेरा धरण

4

सुंदर आहेत फोटो. चमेरा धरण आणि बॅक वॉटर अतिशय आवडले.

तुम्हाला आवडले तर टाकेन???????

5

वल्लाह? काही च्या काही बोलता राव तुम्ही!!
इतकं मस्त वाचायला मिळतंय, तर कोणाला नाही आवडणार?

झक्कास!! हास्य
मला तो दगडगोटे वर दिसत असलेल्या उथळ नदीचा फोटो प्रऽचंऽडऽ आवडला हास्य शिंपली ब्युट्टीफुल्ल Big smile (दोन मिनिटं 'राम तेरी गंगा मैली' मधला शीन आठिवला ना राव Big smile )

त्यांचे वादन संपल्यावर मी व मुलाने टाळ्या वाजवून दाद दिली व भारतीयांना अरसिक पणाच्या आरोपातून वाचवले कारण बाकी लोक अगदी मख्खपणे आपले (तथाकथीत) स्टेटस सांभाळत बसले होते

हा हा...हे भारीच ! धन्यवाद आपली अब्रु वाचवल्याबद्द्ल!
पुर्वी निर्मयीने एक पुण्याच्या कि बंगळुराच्या विमानतळावर लहान मुल खेळत असताना 'आपलं स्टेटस जपण्याचा हव्यास' करणार्‍या लोकांचा किस्सा आठवला.

तिथे एस टी बसेस व खाजगी बसेस यांचा अभूतपूर्व गोंधळ सुरु होता, बस कोणी कुठे लावायची, तू मागे घे-मला पुढे काढू दे वगैरे नित्याचे यथासांग चालले होते.

ओय्ये कुलदीऽऽऽप्पाऽऽ...भैण दी टकी..क्मिशन नै दुंगा ओये.... गड्डी लगा लियो.छेत्ती कर ओय....पॅसिंजर आ ग्ये ओये भूतनी के!!!!!

तिघांचे बील फक्त ८० रुपये. एकंदरीत वरलीया रंगाला भुलू नये हे माझे म्हणणे बायकोला पटले

देवाऽऽ तिकडचे ढाबे म्हणजे काय बोलावंऽ? अतिटापटिप आणी स्वच्छतेचं भूत जरा गुंडाळुन ठेवलं तर शंभराच्या पत्तीमध्ये मस्त स्वर्गसुखाची अनुभुती मिळते हास्य

सहल छान चाललीये...येऊ द्या बाकीचंही वर्णन हास्य
जरा ज्वाला मंदीराबद्दलही येऊ द्या शेठ हास्य

>>जरा ज्वाला मंदीराबद्दलही

6

>>जरा ज्वाला मंदीराबद्दलही येऊ द्या

+१ असेच म्हणते....

तुमचे फोटो अप्रतीम आहेत. हास्य

मी लास्ट इयरला असताना आमची स्ट्डी टुर गेली होती डलहौसी, चंबा, खज्जियार, ज्वालाजी, कुलु आणि मनाली ला......

ज्वालाजी बरोबरचं खज्जियारचे पण फोटो आणि माहिती टाकु शकाल का ?

वावा...

7

खूप खूप वर्षांपूर्वी डलहौसी, धरमशाला, कुलू, मनाली अशी सहल केली होती त्याची आठवण करुन दिलीत,
तुमचे वर्णन मस्त!!
क्रमशः जास्त न लांबवता ताबडतोब टाका,
स्वाती

झक्कास!!! पण आवरतं घेतलं राव

8

झक्कास!!! पण आवरतं घेतलं राव तुम्ही...

मस्त!!

9

क्रमशः जास्त न लांबवता लिहा ....

सुरेख फोटो व लेखन. आवडले.

10

सुरेख फोटो व लेखन.

आवडले.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सुरेख फोटो व लेखन.

11

सुरेख फोटो व लेखन.

'आवडले.' नाही?

12

'आवडले.' नाही?

मस्त ...

13

खूप छान लेखन आणि फोटो पण जबरा ...
मंदिर लै भारी .. अप्रतिम ..
आणखी येवू द्या

अच्छा

14

हे ठिकानाचे नाव हाय व्हय आमाला वाटल कि त्यो विंग्रज सरकारच्या काळातला लॉर्ड डलहौसी बद्दल बोलताय


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

त्योच तो.

15

व्हय हो परकाश भौ,
त्योच लार्ड डलहौसी, त्येनच त्या जागी सैन्याची छावनी उभारली म्हून त्याचं नाव हाय त्या जागंला. पर आपल्या करताबी लय म्हत्वाची जागा हाय, लिव्ह्तोच बघा आता लवकरच, डिट्टेल मंदी.

लवकर टाका पुढचा भाग.

16

लवकर टाका पुढचा भाग.

चांगले फोटो

17

चांगले फोटो आणि वर्णन.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

अजुन येऊ द्यात..हा भाग आवडला

18

अजुन येऊ द्यात..हा भाग आवडला आहे

मला पाश्चात्य संगीतामधले

19

मला पाश्चात्य संगीतामधले काहीही ओ की ठो कळत नाही.

फार हायसे वाटले बुवा. माझे मित्र (उदा. निवांत पोपट) प्रयत्न करून करून थकले ... मला पाश्चात्य संगीताची (म्युझिक ची) आवड लावण्याचा प्रयत्न करून करून थकले.

पण या घोर पापी संसारात ... समुद्र लंघुन जाऊनही पाश्चात्य संगीतातले (म्युझिक) काहीही समजत नाही असा मी एकटाच नाहिये हे वाचुन फार बरे वाटले.

----------------

बस स्टॅण्ड समोरच्या एका अतिसामान्य हॉटेलात अतिउत्कृष्ट दर्जा व चवीचे मटार पनीर, कढी पकोडा हाणला

हॉटेल जितके कळकट्ट तितका तिथल्या भज्यांचा स्वाद उत्कृष्ठ (इति. पु. ल.)

-----------------

ते चमेरा धरणाचे फोटो मस्त आहेत.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.