लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २ (ज्याला हवा त्याला अर्पण)
वसईचा किल्ला हातुन गेला आणी चवताळुन आई व काकुने ह्या वर्षात लग्न पार पाड्लेच जाईल असा ठराव मान्ड्ला. मी बाबाना व काकाला मधे टाकण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघेही हतबल झालेले दिसले. लोक सुचवतिल तिकडे माझी पत्रिका जात असे पण ती जमत नसे हा भाग वेगळा . असेच एका ठिकाणी आई व बहीण दोघिहि एका ठिकाणी पत्रिका घेवुन गेल्या. मुलाच्या आईने उन्ची जमत नसल्याचे सान्गितले त्यांमुळे पुढे पत्रिका पहाण्याचा काही प्रश्नच उरत नव्ह्ता. पण त्या बाईनी त्याच ईमारतीतील त्यान्च्या एका मैत्रिणीच्या मुलाचे स्थळ सुचविले. त्यानी लगेच २रर्या मजल्यावरुन १ल्या मजल्यावर त्या मैत्रिणीला फ़ोन केला व त्याना ह्या पत्रिका घेवुन येत आहेत असे कळविले. ह्या दोघी लगेच १ल्या मज्ल्यावर आल्या. मुलाच्या आईला जुजबी पत्रिका पाहाता येत असल्य़ाने त्यानी लगेच पत्रिका जमत नाही असे सान्गितले. आणी त्या बाईनी आईला विचारले ह्या मुलीचे म्हणजे बरोबर असलेल्या बहीणीचे पण बघताय का, तसे आई म्हणाली नाही नाही, आधी मोठीचे मग हिचे. आणी दोघी बाहेर पडल्या.
मला जरा बरे नव्हते म्हणुन मी त्या दिवशी ऒफ़िसला गेले नव्हते. तोच एक ऒळ्खीच्या बाई घरी आल्या. आई कुठेय वैगरे विचारुन झाले. मग मलाच म्हणाल्या कि त्यान्च्या बहीणीचा नातु परदेशातुन आलाय आणी तुझी पत्रिका तिकडे जमलिये. मी म्हणाले, आई येउ दे मग काय ते तिच्याशी बोला, तर त्या म्हणाल्या तिच्याशी बोलुन झालय़. मला म्हणाल्या कि मुलगा शिकलॆला आहे, त्याच्या घरि काम्पुटर का काय ते पण आहे न त्या गोल क्यासेट तो ऎकतो आणी बाई गेल्या. तोवर ह्या दोघी घरी आल्या. तोच एक फ़ोन आला, आईनेच घेतला. मग कळ्ले त्या १ल्या मजल्यावरच्या बाईना बहिण खुप आवड्ली होती न तिला चक्क मागणीच घातली गेली होती, जुजबी पत्रिका पाहुन पुढे जायचे होते. आईने फ़ोन बाबाना दिला, मुलाचे वडिल बोलत होते त्यावर माझे बाबा म्हणाले कि नाही हो, मग माझ्या मोठ्या मुलीला वाईट वाटेल, त्यावर ते म्हणाले कि अहो काळ्जी करु नका, मी तुम्च्या मोठ्या मुलीकरिता स्थळ शोधेन. आई बाबा दोघेही कात्रित सापडल्य़ासारखे झाले होते. मग मीच त्याना म्हणाले कि व्हा पुढे. आणी दुसर्याच दिवशी बहिणीची पत्रिका पाठवली, जमली म्हणुन फ़ोन पण आला. आता दोघीन्च्या पत्रिका जुळ्ल्या होत्या, फ़क्त मुलगा पहाणे बाकी होते.
काय योगायोग असतात, दोघीना एकाच दिवशी दोन्ही घरी बोलावले गेले. नाही पण म्हणता येत नव्ह्ते मुलाना वेळ होता तसा कार्यक्रम आखला गेला होता. मी आईला म्ह्ट्ले बरे झाले, आप्ल्या घरी पसारा नाहि तो चहा पोह्यान्चा ते. ती त्यावर म्हणाली गप्प बस, कळ्ली तुझी अक्कल. ति बिचारी तणावाखाली असावी, असले २ नमुने वट्वायचे म्हणुन. सकाळी बहिणीला घेवुन आई बाबा मुलाच्या ओफ़िसला गेले, रविवार अस्ल्याने स्टाफ़ला सुट्टी होती. घर तर बघुन झाले होते म्हणुन आज ओफ़्फ़िस. पणशीकरान्क्डुन साबुदाणे वडे, पियुश वैग्रे मागवले गेले. कार्यक्रम आटोपला आणी हे लोक घरी आले. मी बहिणीला विचारले, मुल्गा कसा दिस्तो वैग्रे, तर हि बाव्ळी बरा दिस्तो एव्धेच म्हणे. मी म्हणाले होकार आला तर ही म्हणाली मग मिहि होकार देइन. मला मेलीला अन्दाज्च लागत नव्ह्ता. आईला विचार्ण्याची हिम्मत नव्ह्ती, ती परत तणावाखाली कारण मेन किल्ला तर सन्ध्याकाळी लढवायचा होता. मुलाच्या आईचा फ़ोन आला, मुलगी पसन्त होती तर आई म्हणाली पण तुम्चा मुल्गा कमी बोलला, समोरुन उत्तर आले कि तो निरिक्शण खुप करतो व कमी बोलतो. आई बहिणीला म्हणाली बघ बाइ मुलगा सावळा आहे मग कट्कट चालणार नाही, तसा हिचा होकार ठाम होता.
सन्ध्याकाळ झाली, मी, काकु, आई व बाबा पोहोचलो. मुलाचे घर छान होते, एका बेडरुम मधे मस्त झोपाळा होता. मुलाची आई म्हणजे चक्क मनिमाउ, घार्या डोळ्यान्ची. बहिण दिसायला सुरेख, लग्न झालेली. मुलगा बाहेर गेलेला होता. मी झोपाळ्यावर बसले, हे सग्ळे बोलत होते. मुलगा आला व मला काकु बोलवायला आली. मुलगा मला जरा पात्रच वाट्ला, गचाळ टी शर्ट घालुन होता. त्याच्या बहिणीचा नवरा व हा सारखा हसे, त्यामुळे बाबाना पण तो पोरकटच वाट्ला. मग मला व त्याला बोलायला बेडरुमात पाठ्वले, मी त्याला मला झोका द्यायला लावला व मी मनोसोक्त झोपाळ्यावर बसुन घेतले. मी त्याला विचारले, काही व्यसन वैग्रे नहि न? तसा म्हणाला कि सुपारीच ही नाही. मग मुलाच्या आईने मुलाला आत बोलावले. आणी बाहेर येउन मनिमाउ म्हणाली, मुल्गी पसन्त.
आता लग्नाची तयारी सुरु झाली. जवळच राहाते म्हणुन बहीणीचे होणारे सासु सासरे माझ्या आजीला भेटायला गेले होते. ती त्याना म्हणाली कि हे बघा, तुम्ही म्हणाल कि १०००-१२०० लोकाना जेवायला घाला तर ते मुळीच जमणार नाही. आम्ही मुलीना भरपुर शिकवलेय न ब्ला ब्ला ब्ला. ते म्हणाले अहो आमच्या काहीच अटी नाहित आम्ही सहजच तुम्हाला भेटायला आलोय. माझ्या बहिणीचा नवरा तिला भेटायला बोलवायचा. नविन नविन ड्रेस घेवुन द्यायचा. आमच्या ध्यानाने काहिहि दिले नाहि मला. उलट बावळट मला एकदा गाडीवरुन पाडणार होता. म्हणजे मी मागे बसायच्या आत ह्याने गाडी सुरु करुन पुढे नेली, नशिब मी बसले नव्हते नाहितर रस्त्यात फ़तकल मारले असते. लग्नानतर हा बियर का काय ते पितो हे कळ्ले तेव्हा मी विचारले काय रे तु तर म्हणाला होतास सुपारीच ही व्यसन नाही, तर म्हणाला होय मुळी मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे..... आता बोला.
दोन्ही लग्न ठरुन ६ महिन्यात आटोपली सुद्ध्धा. आणी पुढील ६ महिन्यात माझे बाबा अचानक गेले, कन्यादानाचे पुण्य मिळ्वुन. हेच लग्न न होता गेले असते तर आई वर केव्ढी जबाबेदारी आली अस्ती. स्वामी समर्थान्ची क्रुपा दुसरे काय.
.jpg)
हे बाकी छान..मुलगा बघयला जाउन
हे बाकी छान..मुलगा बघयला जाउन झोके घ्यायचे..
पुष्करिणी
चुचू ताईचा आत्ताचा फोटो
चुचू ताईचा आत्ताचा हा फोटो त्या वेळचा असावा.. झोके घेतानाचा...
लग्नानतर हा बियर का काय ते
है...ढिंच्यांग ढिच्यांग....

गंडिवलं रे गंडिवलं..... कसं गंडिवलं....
(विषय दिलेला नाही)
धमु सहमत रे
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हेहेहेहे...
>>है...ढिंच्यांग ढिच्यांग....
>>गंडिवलं रे गंडिवलं..... कसं गंडिवलं....
काय धमालराव? तुम्ही असं म्हणावं? तात्कालीक आनंदात इतकं मश्गुल व्हावं? अहो, उगाच नाही नंतर त्या भिंतीचा आधार घेतलेल्या शिंव्हाची वेळ येते ती...
लै भारी मोडक साहेब हल्ली
लै भारी मोडक साहेब
- श्वापद सोडक
तुझी अवस्था कळलीये रे 'कागज
तुझी अवस्था कळलीये रे 'कागज के शेर' ...
लग्नाच्या पैलेच तू भिंतीला चिकटलायस
लेका ... ते अश्रु नावाचं
लेका ... ते अश्रु नावाचं ब्रम्हास्त्र असतंना त्यांच्याकडे ... सगळा राग उत्साह इगो वगैरे मोडुन पडतो
वैविध्य तेवढंच
बाकी भिंतीला कधी एकाने कधी दुसर्याने चिटकावं
- भिंतीत चिकटते
>>दोन्ही लग्न ठरुन ६ महिन्यात
>>दोन्ही लग्न ठरुन ६ महिन्यात आटोपली सुद्ध्धा. आणी पुढील ६ महिन्यात माझे बाबा अचानक गेले, कन्यादानाचे पुण्य मिळ्वुन. हेच लग्न न होता गेले असते तर आई वर केव्ढी जबाबेदारी आली अस्ती. स्वामी समर्थान्ची क्रुपा दुसरे काय.
हसावे असे प्रचंड वाटले होते.. लोळलो देखील असतो... पण वरील ओळी वाचल्यावर वाच्याच बसली.. माऊलेचे काय झाले असे असे देखील नाही व तुझे काय झाले असते ह्याचे देखील नाही.. पण कुठेतरी कोपर्यात मनाच्या एक ओरखडा ह्या ओळीमुळे नक्कीच निघाला..
चूचु म्हणजे मज्जा, दंगा व वेडेवाकडे अगदी माझ्या मराठीला देखील लाजवेल असे शब्द व वाक्य रचना पण.. ह्या ओळी पुन्हा पुन्हा वाचल्या की वाटते चुचु दिसते / वाटते तेवढी सोपी नाही आहे, कुठेतरी ह्या हसण्यामध्ये, दंग्यामध्ये एक वेगळाच वास आहे.. समोरच्याला दिसावे म्हणून हसायचे असे वाटते कधी कधी मला.. तुझ्या खरडी, तु इतरांना पाठवलेल्या खरडी.. तुझे प्रतिसाद, तुझे लेखन हे सगळे वाचले की मला खरोखर मनापासून वाटतं तु काहीतरी लपवते... !
असो,
माझ्या शब्दात,
वेडा काही तरी बोलला व काहीतरी लिहला म्हणजे वाईट वाटून घ्यावे असेच नाही ना... त्यामुळे..
हा जिंदादिल प्रतिसाद तुला !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राजे डोक्यावर पडलेला आहे असं
राजे डोक्यावर पडलेला आहे असं माझं उगाचंच मत होतं !
- माझे
सहमत ...
>>चूचु म्हणजे मज्जा, दंगा व वेडेवाकडे अगदी माझ्या मराठीला देखील लाजवेल असे शब्द व वाक्य रचना
अगदी ...
खरच जेव्हा काही लेख ,प्रतिसाद वाचले होते तेव्हा असच वाटत होत ...
>>पण.. ह्या ओळी पुन्हा पुन्हा वाचल्या की वाटते चुचु दिसते / वाटते तेवढी सोपी नाही आहे, कुठेतरी ह्या हसण्यामध्ये, दंग्यामध्ये एक वेगळाच वास आहे
+१
चूचु म्हणजे मज्जा, दंगा व
चूचु म्हणजे मज्जा, दंगा व वेडेवाकडे अगदी माझ्या मराठीला देखील लाजवेल असे शब्द व वाक्य रचना पण.. ह्या ओळी पुन्हा पुन्हा वाचल्या की वाटते चुचु दिसते / वाटते तेवढी सोपी नाही आहे, कुठेतरी ह्या हसण्यामध्ये, दंग्यामध्ये एक वेगळाच वास आहे.. समोरच्याला दिसावे म्हणून हसायचे असे वाटते कधी कधी मला.. तुझ्या खरडी, तु इतरांना पाठवलेल्या खरडी.. तुझे प्रतिसाद, तुझे लेखन हे सगळे वाचले की मला खरोखर मनापासून वाटतं तु काहीतरी लपवते... !
सहमत ....तसेच चुचुसारखी बिनधास्तही कोणी नाही.....आनी मला त्याचे नेहमी विशेष वाटते...बाकी हाही लेख मला आवडला ...विशेषता झोपाळ्याचा उल्लेख.........
चायला हे काय नविन आता...मी
Affidavit
I, the above named deponent, solemnly affirm and state on oath as under:
I know a person named Chuchu who is a member of various marathi interent sites of the nature of "Open Forum" and this site also happens to be one of them and also undertake that I know her Sasu Sasare though not directly but through another acquaintance who happens to be the acquaintance of the said Chuchu's said Sasu Sasare. I hereby also confirm that I have met her in person once and only once and some other members of the said forum(s) were also present at such a meeting.
The said person does not sell policies or any other financial instrument thereof and otherwise which may endanger any person's safety or the public safety and security in general.
This undertaking being taken up today the 17th inst. of the month of March in the year of our lord 2010 before the honorable members of the said forum.
-Seal
-Signed
-Witenss 1 - One Ms. Maki
-Witenss 2 - One Mr. Nikhil Deshpande
(Ladies First)
-----
(डिसक्लेमर : हे सगळं गंमतीत लिहिलं आहे, च्यायला... नाही तर उद्या कोणी पण यावरून नियम आणि कायदे वगैरे मुद्दा काढायचा... आणि हो, त्या acquaintance च्या स्पेलिंगाने अंमळ त्रास दिला ब्वॉ... असो.)
__/|\__
__/|\__
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बिका, वाचुन पडलो!! >The said
बिका, वाचुन पडलो!!
>The said person does not sell policies or any other financial instrument thereof and otherwise which may endanger any person's safety or the public safety and security in general.<
हे म्हणजे कळस!!!!!!
हाईट्ट...
हाईट्ट...
-निखिल
:ड
साक्षीदार
साक्षीदार कोणेत? सही कुठंय? आयकार्ड पगू...
रजिस्टर केलय का डॉक्युमेंट.....
स्टॅम्प ड्युटी काढा......
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
(विषय दिलेला नाही)
_/\_ The said person does not
_/\_
The said person does not sell policies or any other financial instrument
Witenss 1 - One Ms. Maki
one ???? आणखी दोन-चार हव्या आहेत का???
नको... एकच दोनचारजणींच्या
नको... एकच दोनचारजणींच्या बरोबरीची आहे.
(विषय दिलेला नाही)
>>Witenss 1 - One Ms.
>>Witenss 1 - One Ms. Maki
-Witenss 2 - One Mr. Nikhil Deshpande
(Ladies First)
भन्नाट आहे अॅफि.!
चुचू, छान लिहिले आहेस, खूप आवडले.
तुझ्या वडिलांविषयी वाचून वाईटही वाटले...
पॉलीस्या विकुन नाही पण नोकरी
पॉलीस्या विकुन नाही पण नोकरी करुन का होइना आम्ही नव्रा बायको अम्ची पोटे भरतोय >>
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>बरे ध्यानाला इथे आणले तर मग
>बरे ध्यानाला इथे आणले तर मग जरा मला कॉम्प्लिकेश्न्स येतिल म्हनुन आणट नाहिए<
नवर्याला कुठेही नेण्याचा प्रश्न आला की प्रत्येक बायको हेच म्हणते का??????
ह्या वव एक वेगळा धागा काढा
ह्या वव एक वेगळा धागा काढा
>> नवर्याला कुठेही नेण्याचा
>> नवर्याला कुठेही नेण्याचा प्रश्न आला की प्रत्येक बायको हेच म्हणते का? <<
माझ्या नवर्याला इथे आणून दाखवा आणि त्याच्याकडून चार ओळी वाचून घ्या तर माझ्या हातचं जेवण मिळेल!
तर माझ्या हातचं जेवण मिळेल ते
तर माझ्या हातचं जेवण मिळेल
ते माहित असल्यानेच कधी ट्राय केला नाही... करणार पण नाही. असो. ज्याचे त्याचे गैरसमज ज्याचा त्याचा भ्रम इ. इ.
या एकदा गरीबाच्या हॉस्टेल
या एकदा गरीबाच्या हॉस्टेल रूमवर आणि जेवून पहा पुन्हा एकदा!
जिथे एन्सीआरेचं कॅण्टीन संपतं तिथे (औंधातल्या) जोशांचं स्वयंपाकघर सुरू होतं!
तर माझ्या हातचं जेवण मिळेल!
तर माझ्या हातचं जेवण मिळेल! >>.
ईकडे आड तिकडे विहीर
पळा आता...
जो हे महान कार्य (अदितीच्या
जो हे महान कार्य (अदितीच्या हातच जेवण खाण्याचं म्हणतोय) करेल त्यास, all the very best!
-Nile
चक्क
पॉलीस्या विकुन नाही पण नोकरी करुन का होइना आम्ही नव्रा बायको अम्ची पोटे भरतोय >>
सासर्याचे अवमूल्यन.
माफ करा सासरेबुवा... अहो हा
पॉलीस्या विकुन नाही पण नोकरी
पॉलीस्या विकुन नाही पण नोकरी करुन का होइना आम्ही नव्रा बायको अम्ची पोटे भरतोय >>
यातले तुम्ही कोण? नव्रा की बायको?
भेटायला या कि कळेल
अय्या!!! खर्रर्रंच!!!
अय्या!!! खर्रर्रंच!!!
अय्या तू चुचुला भेटणार??
अय्या तू चुचुला भेटणार??
(अवलिया आणि बिका ही नावे आकारान्त असल्यामुळे 'माला' सारखी चालवायची ना?)
चुचु===
चुचु===
मला म्हणाल्या कि मुलगा
मला म्हणाल्या कि मुलगा शिकलॆला आहे, त्याच्या घरि काम्पुटर का काय ते पण आहे न त्या गोल क्यासेट तो ऎकतो आणी बाई गेल्या.
(आमच्याकडे सर्व प्रकारच्या लेखांना झोडपून मिळेल)
मजेशीर...
मी आईला म्ह्ट्ले बरे झाले, आप्ल्या घरी पसारा नाहि तो चहा पोह्यान्चा ते.
घरोघरी पुणेरी चुली
मजेशीर...
मी आईला म्ह्ट्ले बरे झाले, आप्ल्या घरी पसारा नाहि तो चहा पोह्यान्चा ते.
घरोघरी पुणेरी चुली
घरोघरी एलपिजीचे गॅस
विनोदी अनुभव
मुलगा मला जरा पात्रच वाटला.----तो पोरकटच वाटला.
लग्नानंतरचा अनुभव विनोदीच का?
वडिलांविषयी वाचुन वाईट वाटले.
.
तुस्सी ग्रेट हो जी!
छान लिहिलय..
छान लिहिलय..
१ नम्बर ग झोक्यावाला सीन लइ
१ नम्बर ग
झोक्यावाला सीन लइ आवडला
छान लिहिलेय...
छान लिहिलेय...
"आमच्या ध्यानाने काहिहि दिले नाहि मला. उलट बावळट मला एकदा गाडीवरुन पाडणार होता. "
"मला सुपारीच व्यसन नहिच आहे बियर पितो अधेमधे....."
आवडले..
मस्त.
लेख आणि प्रतिसाद दोन्ही मस्त.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
आवडेश !!!!!!!!!!!
आवडेश !!!!!!!!!!!
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !