गीता जशी आहे तशी

0
0

अस्वस्थ होवुन महालात फे-या मारत धृतराष्ट्र संजयची वाट पहात होता. युद्ध सुरु व्हायची वेळ झाली होती आणि अजुन त्याचा पत्ता नव्हता. कुरुक्षेत्रावरील सगळी हकीगत संजय सांगेल या भरवशावर युद्धभुमीवर येवुन लुडबुड करणार नाही असे कबुल करुन धृतराष्ट्र महालातच राहिला होता. तेवढ्यात सेवक धावत पळत येवुन धृतराष्ट्राच्या कानात काही सांगु लागला. 'अरे हो... एवढ्या काय जवळ येतोस? जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही, दुरुन बोल...' असे बोलुन त्याने सेवकाला दुर लोटले.

तेवढ्यात लगबगीने संजय आला, बरोबर काही लोक होते. 'पटापट लावा सगळे.. युद्ध सुरु होईल आता.. पटपट... अरे अरे नीट... पाडु नका.. भाड्याचे आहे... परत द्यायचे आहे.. सावकाश..' असे बोलत एक एक टीव्ही चालु करुन पहाणे सुरु झाले. जसजसा वेळ जात होता तस तसा अस्वस्थ झालेला धृतराष्ट्र फे-या मारत मारत संजय होता त्याच्या बरोबर विरुध्द दिशेला पहात काही दिसते का हे खाचा फाडुन फाडुन पहात होता.

'अरे लवकर सुरु कर आणि सांग मला काय चालु आहे ते... मला अजिबात धीर धरवत नाहीये..' धृतराष्ट्र अधीर होवुन म्हणाला.

'तुम्हाला तसाही कुठल्याच गोष्टीचा धीर नसतोच...' संजय पुटपुटला

हे ऐकुन खीक खीक करुन हसणा-या दासीकडे खाचांच्या डोळ्यांनी नजर टाकुन धृतराष्ट्र म्हणाला 'हसु नका फिदीफिदी... जा ! चा आणा दोन स्पेशल आणि शिग्रेट हाफ पाकिट विल्स मला आणि ह्या संज्याला गोल्डफ्लेक लाईट...आणि हो, पाकिटे वरजीनल आणा. डुप्लिकेट पाकिटांनी शंभर समस्या तयार झाल्या आहेत ' आणि संजयकडे वळुन म्हणाला 'च्यायला, तुला त्या दिव्यडिशटिव्ही शिवाय दुसरे नव्हते का रे मिळाले? सगळे लाईव्ह टेलिकास्टचे हक्क त्या कृष्णाला दिले. तो स्वतःच्याच भोवती सगळे कॅमेरे फिरवेल आणि बिचारा माझा दुर्योधन... त्याला काही सुद्धा फुटेज मिळणारच नाही.'

'महाराज, तुमच्याकडे नाही रोकडा हक्क विकत घ्यायला लागणारा... त्याने भरले, मिळाला त्याला हक्क...सरका बाजुला मधे मधे येताय. बसा एका जागी मुकाट्याने... उगा आपली वलवल... वय झाले गुमान बसा. युद्ध चालु होइल आता, त्याच्याआधी टॉयलेटला जावुन यायचे असेल तर जावुन या... नंतर धावपळ होईल उगाच.'

वैतागलेला धृतराष्ट्र शांतपणे संजयकडे पाठ करुन बसुन राहीला. त्याच्याकडे पाहुन डोक्याला हात लावुन संजयने सर्व टिव्ही चालु केले आणि सर्व युद्धभुमीचा आढावा घेतला. कोण कोण कुठे आणि कसे उभे आहेत हे पाहुन त्याने तसे धृतराष्ट्राला सांगायला सुरवात केली.

इकडे युद्धभुमीवर एका बाजुला दुर्योधन आणि दुस-या बाजुला भीम हातातल्या कागदांवरुन नजर टाकुन प्रत्येक जण हजर आहे की नाही हे पहात होता. एकेकाला नेमुन दिलेल्या जागी उभे करुन दोघेही आपापल्याच जागी जावुन उभे राहिले. युद्ध अजुन का सुरु होत नाही म्हणुन अनेकांनी शंख करायला सुरवात केली. तो आवाज ऐकुन कृष्णाने शिट्टी काढुन वाजवली. कृष्णाने शिट्टी वाजवली म्हणुन अर्जुनाने शिट्टी वाजवली. शिट्टीचा आवाज ऐकुन नकुल सहदेवाने घाबरुन पळायला सुरवात केली. नंतर चुक उमगल्यावर काही नाही पाय मोकळे करत होतो असे पुटपुटत परत आपली जागा पकडली.

अर्जुनाने कृष्णाला 'काय रे भावड्या? करायची का सुरवात?' असे विचारल्यावर कान काडीने कोरत 'थांब जरा. आपण मधे जावुन नीट पाहुन येवु ...' असे म्हणुन रथ युद्धभुमीच्या मध्यभागी न्यायला सुरवात केली. ते पाहुन आता हा काहीतरी काड्या करुन युद्ध थांबवणार या भितीने धर्मराज पांढराफटक पडला.

रणभुमीच्या मधे रथ आल्यावर कृष्णाने सगळीकडे नजर फिरवली आणि अर्जुनाला म्हणाला 'अरे अर्जुना ! ही तर सगळीच आपली आप्त आणि मित्र मंडळी आहेत. हे सगळे युद्धाला जमुन एकमेकांच्या नरड्याचा घोट घेण्यासाठी आसुसलेले पाहुन मला फार वाईट वाटत आहे. अरे आपली भव्य दिव्य संस्कृती अशाने रसातळाला जाईल. कुटुंबव्यवस्था डळमळीत होईल. यांना मारुन तुला नक्की काय मिळणार ह्याचा मी विचारच करु शकत नाही. त्यापेक्षा चल माझ्याबरोबर. द्वारकेला जाउ. तुला एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद देतो, वर लाल झेंड्याचा रथ देतो. पण हा नाद दे सोडुन. अरे तुझा रथ हाकतांना एखादा बाण चुकुन मला लागला तर सोळा सहस्त्रांचे काय होईल? घेशील का तु त्यांची जबाबदारी? आणि तु या कौरवांना मारु शकशील याची काय खात्री ? तुच मेलास तर हे मला पकडुन राजकैदी बनवुन नेतील तर माझे काय होईल? नको ! नको ! असला गैरविचार काढुन टाक, युद्ध रद्द कर. सगळ्यांना युद्धासाठी बोलावले म्हणुन त्यांची माफी माग आणि चल माघारी'

कृष्णाचे बोलणे ऐकुन अर्जुन हसुन म्हणाला ' कृष्णा ! युद्ध तर आता टाळता येणारच नाही. एकतर युद्धाला मी नाही, तुच बोलावले आहेस सगळ्यांना'

'मी? ते कधी ?'

'तुझी डिजीटल सिग्नेचर वापरुन मी इमेल केले होते. त्यामुळे तुला जबाबदारी टाळता येणार नाहीच. आणि तसेही आपल्याला युद्धाशिवाय पर्याय नाही. वनात जायच्या आधी केलेल्या यज्ञात सगळी संपत्ती वाटुन टाकली असतांना कर्ण दुर्योधन यांच्याकडुन कर्ज घेतले. १३ वर्षे वनात असतांना अनेकांकडुन घेतलेल्या उधारीला, कर्ण दुर्योधनाच्या कर्जाला चुकवता येत नाही म्हणुन तर युद्ध सुरु केले. जिंकलो तर परतफेडीची गरज नाही. मेलो तर सुटलो. म्हणुन युद्ध हे व्हायलाच हवे. एक तर ते तरी मरायला हवेत नाहीतर आपण तरी मरायला हवे'

हे कटु शब्द ऐकताच असहाय परिस्थितीची जाणीव होवुन कृष्णाच्या अंगाचा दाह होवु लागला. जीभ कोरडी पडुन मागे खेचली जावु लागली. डोळे गरगरा फिरायला लागले. अंग थरथर कापु लागले. हातातील लगाम सुटायला लागला. आणि भावनावेग असह्य होवुन कृष्णाने रथातच बसकण मारली.

यानंतर अर्जुनाने विविध प्रकारे कृष्णाची समजुत घालुन युद्धास तयार केले. शेवटी हो नाही करता करता तु जे म्हणशील तेच मी करेन असे म्हणुन कृष्णाने हातात लगाम घेतले आणि परत आपल्या जागी नेवुन रथ उभा केला. आता युद्ध होणारच याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती.

जिथे जिथे कृष्ण आणि अर्जुन असतील तिथे तिथे कर्ज आणि युद्ध हातात हात घालुन असतील याबद्दल माझ्या मनात संशय नाही असे बोलुन संजयने टिव्ही बंद केला

{नानुस तुला बरे एवढे माहिती}

Sick नानुस तुला बरे एवढे माहिती गिताबद्द्ल...

{आणि हो, पाकिटे वरजीनल आणा.}

आणि हो, पाकिटे वरजीनल आणा. डुप्लिकेट पाकिटांनी शंभर समस्या तयार झाल्या आहेत '

जल्ला त्याच्या मायला Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
जबरा मजा आली Laughing out loud

एक जोग आठवला .. "कोणी म्हणाले , म्हाभारतातल्या धृतराष्ट्राला १०० मुलं होती .. आणि पंडु ला केवळ पाच .. "
तावर कोणी ओरडला ... "ओ .. ज्यान्ला डोळे आसत्यात त्यान्ला बाकीची बी कामं आसत्यात .. Laughing out loud "

असो .. लेखात II शिखंडी II दिसले नाहीत .. कृपया अजुन येऊन द्या !!

आणि हो .. हिडिंबा म्हणुन आयेषा टाकिया हवी हास्य

- भिमं

{अशक्य}

अशक्य
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{सही}

सही भिडु

{नान्या... हम्म.... }

नान्या...
हम्म....
धृतराश्ट्राकडे क्रेडीट कार्डेसुद्धा नव्हती?
बाकी लै भारी लिवलयस रे.
बाय द वे.... द्रौपदीच्या वस्त्रहरनाचा सीन कोणा स्पॉन्सर करणार आहे
जरासंध वध , कर्ण वध , द्रोण वध , याना दोन नायतर तीन एपिसोड मध्ये आटप
उत्तरा अभिमन्यू यांच्यावर एक गाणे पण ठेव त्याच्या वधाच्या प्रसंगासाठी जरा जास्त माणसे लागतील डिजीटल डमी तयार ठेवूया
कर्ण वधा च्या वेळेस कुंतीला जरा थोडे फुटेज दे...आणि कुंती जरा तरुणच दिसु देत.
शिखंडीला भीष्माकडे क्रेडीट कार्डाची उधारी वसुलीसाठी पाठव
आणि हो .....फ्लॅशबॅक मध्ये द्रौपदीला गाणे दिलेस तर प्रत्येक गाण्यात पाचपाच कडवी ठेव्... धर्म्/अर्जून्/भीम/ नकुल /सहदेव सगळ्यांची सोय व्हायला हवी.
दर कडव्याला हीरॉईनचा ड्रेस आणि हीरो पण बदलायला हवा तरच तो इफेक्ट येईल


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{ओ भाउ लेखाचे नाव "गीता जशी}

ओ भाउ लेखाचे नाव "गीता जशी आहे तशी" आहे महाभारत नाय काय.. Big smile

{मला क्रुषान्च्या बायकोचा रोल}

मला क्रुषान्च्या बायकोचा रोल हवाय्...तो तिकडे अफेअर्स करायला मो़कळा.. अन मी इकडे Shy

{हाण्ण तिच्यायला!!! काय गं}

हाण्ण तिच्यायला!!!

काय गं ए...तुझे एक सासरेबुवा इथेही येऊन वाचतात ना?

{मस्त...}

मस्त...

{जिथे जिथे कृष्ण आणि अर्जुन}

जिथे जिथे कृष्ण आणि अर्जुन असतील तिथे तिथे कर्ज आणि युद्ध हातात हात घालुन असतील याबद्दल माझ्या मनात संशय नाही

च्यायला, कर्जाचा रेफरन्स काही केल्या कळेना झालाय! जरा प्रकाश टाका राव. आधीच आमची दृष्टी थोडी अधू, त्यात हे क्रिप्टिक!
लेखकाने संदर्भ लक्षात आणून दिला. फेरवाचनात तो नीट लागला.

{छान..टीव्ही परत कधी चालू}

छान..टीव्ही परत कधी चालू होणार?


पुष्करिणी

{भयानक !}

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

भयानक !


Hope is a good thing...

{ह्यात काय भयानक हो??? (काहिही}

ह्यात काय भयानक हो???

(काहिही न कळणारा)


-निखिल

{छान!!!}

हास्य

{नाना कहर आहे}

नाना कहर आहे Laughing out loud

{अर्जुनाने कृष्णाला 'काय रे}

अर्जुनाने कृष्णाला 'काय रे भावड्या? करायची का सुरवात?' असे विचारल्यावर कान काडीने कोरत 'थांब जरा. आपण मधे जावुन नीट पाहुन येवु ...' असे म्हणुन रथ युद्धभुमीच्या मध्यभागी न्यायला सुरवात केली. ते पाहुन आता हा काहीतरी काड्या करुन युद्ध थांबवणार या भितीने धर्मराज पांढराफटक पडला.

हाईट आहे! Laughing out loud


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

{नान्या,काय लिहील सांगत येत}

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud

नान्या,काय लिहील सांगत येत नाही....

{आणि हो, पाकिटे वरजीनल आणा.}

आणि हो, पाकिटे वरजीनल आणा. डुप्लिकेट पाकिटांनी शंभर समस्या तयार झाल्या आहेत
हे मात्र अती झालं. Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{आयचा घो! स्वगतःसगळ्यांना खरंच}

आयचा घो!
स्वगतःसगळ्यांना खरंच कळलं का उगाच लोळताहेत?


-Nile

{+१}

+१

{ते}

ते काही मध्ये गरिबांचा प्रकरण चालल होत..तेव्ह ह्यांना..
गरिबांचा व्यास..ह्यांना नाव दिल नव्हता का कोणी?

Grade Grade Grade Laughing out loud =)) Laughing out loud =))


राधा
Grade Innocent Quest

||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||

{नान्या लेका तु 'इकडचा' संजय}

नान्या लेका तु 'इकडचा' संजय का 'तिकडचा' ??

परांजय

{+१ रे परा... मला नाना हा}

+१ रे परा... मला नाना हा माणूस नेहमीच संशयास्पद वाटतो.

{(विषय दिलेला नाही)}

{चुचु ...ईथे हाताची घडी}

चुचु ...ईथे हाताची घडी तोंडावर बोट असणारी स्मायली कल्पावी...

{तेल्+चुना घालुन...}

ऑबॉबॉबॉबॉबॉबॉ.....

एकेक पंच कऽडक!!!

बाकी, द्रौपदी फिल्स इंटरनॅशनल प्रा.लि. मधुनही काही सोय झाली नाही काय? डायरेक्ट युध्दं?

{एम एफ हुसैन}

मक्बूल फिदा आपले कोण म्हणायचे....???


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

{जरा जास्तच टवाळी झाली.}

जरा जास्तच टवाळी झाली.

{जावु द्या हो... चिलमाड्डी..}

जावु द्या हो... चिलमाड्डी.. हास्य

{हा.....}


स्वरालि

{अवलिया, मला वाटलं जोशी बाईंनीच गोल्डन कव्हर मधे मिळालेल्या}

`गीता जशी आहे तशी' वर काही तरी लिहिलंय म्हणून ही पोस्ट उघडली! त्यांनी वाचलं तर त्यांना `एकदम फ्रेश' वाटेल किंवा कसं ते सांगता येत नाही.

तुम्ही संतोष पवारचं `यदा कदाचित' पाहिलंय का? आता जरी ते बंद झालं असलं तरी त्याची सीडी मिळते एकदम धमाल आहे, जरूर पहा.

असंच लिहित रहा.


संजय
www.sanjayunlimited@yahoo.com

जे जगतो तेच लिहितो!

सत्य समजणं आणि आपण स्वत:च सत्य आहोत हा बोध होणं यात अंतर नाही

समोर : http://sanjaynowhere.blogspot.com/