चीज मश्रुम्स


राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे. हास्य

साहित्य : अळंबी (मश्रुम्स) ,

सारणासाठी : क्रीम चीज, लहान कांदे / पाती कांदा, २-३ लसुण पाकळ्या, चवी नुसार लाल तिखट, काळीमिरी पुड. (कांद्याची आणि लसणाची पुड मिळाली तर उत्तम.)
आवरणासाठी: मैदा, पावाचा चुरा (ब्रेडक्रम्स्), १ अंडे. चवी नुसार मीठ
(अंड न आवडणार्‍यांना अंड्या ऐवजी कॉर्नस्टार्च पाण्यात मिसळुन ते दाट मिश्रण वापरता येईल.)

तळण्यासाठी तेल.

कृती :

फ्लेवर्ड चीज मिळालं तर उत्तम. पण नाही मिळालं तर मग लहान कांदे आणि लसुण बारीक चिरुन घ्यावे.
चीजमध्ये कांदा, लसुण, लाल तिखटं, काळीमिरी पुड टाकुन एकजीव करुन घ्याव.

अळंबीचे देठ काढुन, स्वच्छ धुवुन आणि पुसुन घ्यावी. पोकळी मध्ये चीजच सारण भरावं.

ब्रेडक्रम्स् , फेटलेलं अंड , मैदा यांच्यात चवी नुसार मीठ घालुन तयार ठेवावं.

सारण भरलेली अळंबी अनुक्रमे मैदा, अंड, ब्रेडक्रम्स्, परत अंड आणि ब्रेडक्रम्समध्ये घोळुन घ्यावी.

तेल तापवुन त्यात आवरणात घोळवलेल्या अळंब्या मंद आचेवर खरपुस तळुन घ्याव्या.

चटणी सॉस सोबत गरमागरमच वाढावं.

{वाह!}

वाह!


something terribly wrong with this country, isn't there?

{वा!!! क्या चीज बनायी है आपने.}

वा!!!
क्या चीज बनायी है आपने. हास्य
आज मी.म.उघडल्याचं चीज झालं! हास्य


..............................................................

क्या फर्क पडता है?

{चीज मशरुम्स छान जमले}

चीज मशरुम्स छान जमले आहेत.
शेवटाचा फोटो तर सुरेख आला आहे.

{मस्त रे गणपाभौ!!!}

मस्त रे गणपाभौ!!!

{खा खा सुटली}

खा रे खा गणपाची रेसिपी बघुन खा खा सुटली बुवा


राजेंद्र मेहेंदळे

{मस्त रेसिपी}

मस्त रेसिपी


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{एकदम कातील रेसिपी}

एकदम कातील रेसिपी हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

I couldn't wait for success, so I went ahead without it !!

मन उधाण वार्‍याचे…

{मस्त फोटो}

शेवटुन दुसरा तर ग्रेटच फोटोनेच तोंडाला पाणी सुटलं Big smile


राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

{गणपा भाउ लयी भारी.}

गणपा भाउ लयी भारी. हास्य

{मस्तच रेसिपी!}

मस्तच रेसिपी!