बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका


सर्व मीमराठीकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा....!!!!!!!
.

ही कविता आता आपण ऐकू शकता.
.
ऐकण्यासाठी क्लिक करा.

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबैले, लुगडं घेवुन गेला…

त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन,
म्हुन तिले आंगभर, कपडे भेटत नसन,
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते,
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते,
म्हुन त्यानं कपड्याचा, थैला भरुन नेला….

जुहुच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली,
तिले पाहुन शाम्याची, बंदी विकेट गेली,
तिले म्हणे चोळी घाल,घे लुगडं नेसुन,
थे म्हणे आवमाय, हे भुत आलं कुठुन ?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरु झाला…

लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे,
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थे पुढं पळे,
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले,
कॅमेरेवाले पोझ घेवुन,कॅमेरे रोखुन थांबले,
पोलीसायनं बैनमाय,नावकुल विचका केला…
आनं त्याच्यापुढचा एपीसोड, राहुनच गेला….

.
…….. गंगाधर मुटे

(पुर्वप्रकाशित.)
……………………………………………………………
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली.
बंदी = पुर्ण,संपुर्ण.
आवमाय = अग्गबाई
मांगं = मागे
नावकुल = पुर्णपणे.
………………………………………………….........
.
. नववर्षाच्या निमित्ताने...
सर्वांना अंगभर कपडे मिळावेत यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. हास्य

No votes yet

विवेक मोडक's picture
अजुन हसतोय!!

अजुन हसतोय!!
Grade Grade


निखिल देशपांडे's picture
त्याले वाटलं मायबाप, भलते

त्याले वाटलं मायबाप, भलते गरिब असन,
म्हुन तिले आंगभर, कपडे भेटत नसन,

अरारा....
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
लै बेक्कार फुटलोय


-निखिल

सुहास's picture
कवितारुपी,काल्पनिक तडका आवडला

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

कवितारुपी,काल्पनिक तडका आवडला !!


संग्राम's picture
(विषय दिलेला नाही)

Grade Grade
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


बिपिन कार्यकर्ते's picture
मस्त... (विदर्भाचा जावई)

मस्त...

(विदर्भाचा जावई) बिपिन. Big smile


विवेक मोडक's picture
बिकापण विदर्भाचा जावई??

बिकापण विदर्भाचा जावई??


बिपिन कार्यकर्ते's picture
हाव ना भौ!!! तुमी पण का?

हाव ना भौ!!! तुमी पण का?


श्रावण मोडक's picture
अन्याय

अन्याय, अन्याय असं विदर्भवाले उगाच ओरडत नाहीत!


विवेक मोडक's picture
आता विदर्भ आणि पश्चिम

आता विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामघे भांडण लावता काय??


बिपिन कार्यकर्ते's picture
च्यायला... आम्ही विदर्भाचे

च्यायला... आम्ही विदर्भाचे जावई हा काय विदर्भावर अन्याव झाला? Sad


रमताराम's picture
नक्कीच

अधिक माहितीसाठी व्य. नि. करा. (कुणाला ते ठाऊक आहेच)


श्रावण मोडक's picture
दशमग्रह

अर्थात, दशमग्रह!


गंगाधर मुटे's picture
घेऊनच गेले

<< च्यायला... आम्ही विदर्भाचे जावई हा काय विदर्भावर अन्याव झाला? >>
रामराम जावईबापू.
अन्याय झाला की नाही हे नाही सांगू शकत.

पण तुम्ही विदर्भातून काहीतरी घेऊनच गेले ना?
विदर्भाला काहीतरी देऊन थोडेच गेलेत ? हास्य हास्य


सुहास's picture
अन्याय, अन्याय असं विदर्भवाले

अन्याय, अन्याय असं विदर्भवाले उगाच ओरडत नाहीत! >.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

अब आया दुबईका ऊंट विदर्भके पहाडके निचे !!


बिपिन कार्यकर्ते's picture
अब आया दुबईका ऊंट विदर्भके

अब आया दुबईका ऊंट विदर्भके पहाडके निचे !!

तुमच्या वहिनीबद्दल असं बोलता? कधी भेटलात तर मारेल तुम्हाला... wink


श्रावण मोडक's picture
सारखं

सारखं वहिनीच्या मागं लपतं राव हे! wink


चतुरंग's picture
'वहिनींच्या बांगड्या' म्हणावं का?

(बांगडा)चतुरंग


राजे's picture
हा ह हा हा !

Big smile

Laughing out loud

Laughing out loud

हा ह हा हा !


चुचु's picture
मस्तच...

Big smile मस्तच...


रमताराम's picture
एक नंबर

एकदम स्टेडियमच्या बाहेर.
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud (लोळणारी स्मायली कोपिराईट - श्री. राजे)
सद्गुरु Grade Grade Grade


निखिल देशपांडे's picture
आपण जे शब्दार्थ देता.. त्याचे

आपण जे शब्दार्थ देता..
त्याचे एखादे कलेक्शन बनवता येईल का???
एखादा वेगळा धागा वैगेरे...


-निखिल

गंगाधर मुटे's picture
वेगळा धागा

अशा तर्‍हेचा एखादा वेगळा धागा तयार करणे योग्य राहील.


अवलिया's picture
जबरा

जबरा


धमाल मुलगा's picture
बाप्पा...बाप्पा.....

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

शाम्याले सांगा ना बाप्पा...कशाले भैताडागत करुन र्‍हायला?
त्या बिपाशाले कपड्याची अ‍ॅलर्जी ना....


गंगाधर मुटे's picture
जयपालजी...
पुष्करिणी's picture
झकास!

झकास! Star


पुष्करिणी

प्रभो's picture
जबरदस्त

जबरदस्त Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


पुण्याचे पेशवे's picture
हा हा हा. लै भारी. शाम्या

हा हा हा. लै भारी. शाम्या भलताच प्रोअ‍ॅक्टीव दिसतो आहे.


-पुण्याचे पेशवे

पाषाणभेद's picture
लय भारी कल्पना हाये शाम्याची.

लय भारी कल्पना हाये शाम्याची. बिपाशाला वहिनी करून घ्यायची इच्छा हाय का शाम्याची? लय काळजी करूं र्‍हायलाय तिच्यावाल्या कपड्याची.


------------------
मी मराठी! जय मराठी!!
माझी जालवही

गंगाधर मुटे's picture
धन्यवाद.

सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे सर्वांचा. हास्य


नाना विघ्ने's picture
जबरा!

जबरा! च्यायला शाम्याला आवरा!!!! Laughing out loud


सहज's picture
हा हा हा

हास्य


मिंटी's picture
(विषय दिलेला नाही)

Laughing out loud Laughing out loud


गंगाधर मुटे's picture
धन्यवाद.
डॉ अशोक कुलकर्णी's picture
रापचिक

रापचिक कविता


आपला स्नेहांकित...
-अशोक