घरी दरोडा पडला......
सकाळ सकाळी दंगा ऐकून जाग आली तर कळाले की घरात दरोडा पडला आहे. आम्ही आमच्या सोयीसाठी दोन बीएचके घेतले आहेत भाड्यानी. तर वरच्या घरात आम्ही राहतो व खालच्या घरात आमचे सामान, आईची खानावळ चालते. तर खालच्या घरात दरोडा पडला
चोरांनी आधी अपार्टमेंट मधील सर्व घरांना बाहेरून कड्या घातल्या व दरवाज्यावर असलेल्या होलवर तुळशीची.. होय होय.. तुळशीची पाने चिटकवून टाकली. मग अगदी आरामात कटावणीने घराचे कुलुप तोडले. समोर च्या काकींना जाग आली व कोणीतरी दरवाज्याला कडी लावली असे त्यांना वाटले देखील, त्यांनी मुलाला उठवले पण आमच्या अपार्टमेंटमध्ये वेळी-अवेळी येणारे अनेकजण असल्यामुळे त्याला कोणीतरी आले असेल असे वाटले व त्यांनी दुर्लक्ष केले.
इकडे चोरांनी/चोराने घरात प्रवेश केला.... व सगळे घर शोधल्यावर त्यांना एक जोड चप्पल तेवढी मिळाली
तेवढीच घेऊन गेले.. कारण भांडी, गॅस व अन्न धान्याची पोती यात त्यांना "इंटरेस्ट" नसावा 
असो,
सकाळ सकाळी सगळ्यांचे बौद्धिक घेऊन झाले आहे, नशीब बलवत्तर म्हणून काही अघटित घडले नाही पण, आता काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे. थोडी जरी शंका आली होती तर तेव्हाच दरवाजा उघडण्याचा प्रत्यत्न करुन किंवा थोडा आरडा ओरडा केला असता तर शक्यतो ते चोर सापडले असते.

{>>>दरवाज्यावर असलेल्या होलवर}
>>>दरवाज्यावर असलेल्या होलवर तुळशीची.. होय होय.. तुळशीची पाने चिटकवून टाकली.
अत्यंत सात्विक चोर असावेत.
चोरांपैकी ज्या कोणी चोरी करायचे घर निवडले असेल तो इतरांकडून चपलेनी मरेस्तोवर मार खाणार आहे.
मीऽच तो...
{मिस्कीलपणे लिहिले असले तरी}
ही एक धोकादायक बाब आहे. काळजी घ्या.
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{मायला .. चप्पलचोर दरोडेखोर}
मायला .. चप्पलचोर दरोडेखोर ...कोणाची चप्पल नेली ?
{अबे! एवढी तयारी केली म्हणजे}
अबे!
एवढी तयारी केली म्हणजे नक्कीच चप्पलचोर दरोडेखोर नव्हते ते.
चप्पल घरगुती वापरातील होती, अजून काही गेले असेल तर अंदाज नाही, आई पहात आहे, जर आईचे एखादं भांडे तो चोर घेऊन गेला असेल तर मग मात्र त्याचे काही खरं नाही
something terribly wrong with this country, isn't there?
{(विषय दिलेला नाही)}
{काही नाही रे}
रात्रीची भूक लागली असेल. त्यांनी घरांना कड्या घालून मस्त पिठलं-भात शिजवून खाल्ला असेल, ताट-वाटी धुवून पुसून ठेवली म्हणून तुला कळले नसेल. डाळीच्या पिठाचा डबा उघडून पाहिलास का?
पण आमच्या अपार्टमेंटमध्ये वेळी-अवेळी येणारे अनेकजण असल्यामुळे
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{डाळीच्या पिठाचे २५ किलोचे}
डाळीच्या पिठाचे २५ किलोचे पोतं आहे, जर त्यातील अर्धा किलो गेलं जरी असेल तरी आम्हाला कसे कळेल
something terribly wrong with this country, isn't there?
{(विषय दिलेला नाही)}
{बापरे! जपा!}
बापरे! जपा!
-ऋ
{राजाभाउ जपुन..... बाकी चपला}
राजाभाउ जपुन.....
बाकी चपला घेवुन चालु पडा हा डायलॉग चोराना ऐकु आला म्हणे...
{बाकी चपला घेवुन चालु पडा हा}
बाकी चपला घेवुन चालु पडा हा डायलॉग चोराना ऐकु आला म्हणे... >>>> आयल्या झक्या, पार्टटाईम बिझनेस चालु केलास की काय?
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{बादवे.. हलवायाच्या घरावर}
बादवे.. हलवायाच्या घरावर तुलसीपत्र म्हण बदलावी काय?
-ऋ
{खिक्}
खिक्
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{लेका, राज्या.. "पादुकांना"}
लेका, राज्या..
"पादुकांना" चपला म्हणतोस ?? कुठे फ़ेडशील हे पाप ? अरे ’पवित्र पादुका पळवल्या’ सांगायचे सोडून ’चपला गेल्या’ काय सांगतोस ?
*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...
{आता स्वामी कसे होणार हो}
आता स्वामी कसे होणार हो पादुकाचे
something terribly wrong with this country, isn't there?
{(विषय दिलेला नाही)}
{विनोद वगैरे ठीक आहे पण गंभीर}
विनोद वगैरे ठीक आहे पण गंभीर बाब आहे. पुर्वी माझ्या घरात चोरी झाली होती, आम्ही गावाला गेलो होतो तेव्हां. १० तोळे सोने गेले. पण सोन्यापेक्षा सुध्दा आपल्या घरात कोणी घुसले, वावरुन गेले हे जास्त क्लेशदायक आसते,पुढे कितीतरी दिवस मी, बाइकला सुध्दा चाकाला लावायचे कुलुप लावात होतो. पोलिसांनी त्रास दिला तो वेगळाच. त्रासदायक असते फार. तुमचे काही नुकसान (आर्थीक) झाले नाही हे उत्तम.
{सहमत}
वरील प्रतिसादाशी शतप्रतशत सहमत. माझी थोरली बहीण अशा चोर आणि त्यानंतर पोलिस चक्रातून गेली असल्याने किती मनस्ताप (आर्थिक नुकसानीशिवाय अतिरिक्त) भोगावा लागतो हे मी अगदी जवळून पाहिले असल्याने अशा प्रसंगाला पुन्हा सामोरे न जाण्यसाठी काय करावे यावर राजे यानी विचार करून योग्य ती खबरदारी घ्यावी. काल आर्थिक नुकसान काहीच झाले नाही म्हणून समाधान मानून घेऊ नये.
दरोडेखोरांच्या नावे निदान बोटे तरी मोडू शकतो...पण पोलिस ससेमिर्याला सामोरे जाताना तोंडाला फेस येतो.
अशोक पाटील
{पोलिस ससेमिर्याला सामोरे जाताना तोंडाला फेस येतो.}
सहमत.
something terribly wrong with this country, isn't there?
{जुन्या चपलाच गेल्या ना.. बाकी}
जुन्या चपलाच गेल्या ना.. बाकी काही गेलं नाही हे चांगलच..
- पिंगू
माझ्यातला मी उरला फक्त व्याकरणापुरता...
{आं ? दरोडा पडला ? मी}
आं ? दरोडा पडला ? मी मराठीच्या कॊणत्या सभासदावर संशय आहे?
..............................................................
क्या फर्क पडता है?
{हॅ हॅ हॅ!}
हॅ हॅ हॅ!
something terribly wrong with this country, isn't there?
{बाकी घरी दरोडा पडला हे वाचून}
बाकी घरी दरोडा पडला हे वाचून मला Fish called Wanda ह्या चित्रपटातील एक हास्यास्पद प्रसंग आठवला.मी फक्त त्या प्रसंगासाठी बर्याचवेळा तो चित्रपट बघितला आहे.त्याची हिंदी आवृत्ती म्हणजे 'लालू प्रसाद यादव' हा चित्रपट (महेश मांजरेकर) हा जरी बघितला असेल तरी मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल
..............................................................
क्या फर्क पडता है?
{वाटल्यास हा व्हिडिओ पहा आणि}
लक्षात आलं तर राजे मारतील मला!
..............................................................
क्या फर्क पडता है?
{(विषय दिलेला नाही)}
something terribly wrong with this country, isn't there?
{(विषय दिलेला नाही)}
{क्या फर्क पडता है?}
क्या फर्क पडता है?
ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात. वरच्या फ्लॅटमधली चप्पल खालच्या फ्लॅटमधे, खालच्या फ्लॅटमधलं बटाट्याचं पोतं वरच्या फ्लॅट्मधे. टेक्निकली दोन फ्लॅटमधे चोरी झाली. हाकानाका.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{(विषय दिलेला नाही)}
हा फ़ारच वरिष्ट आहे.मानलं तुम्हाला!
..............................................................
क्या फर्क पडता है?
{एकूणच बिनधास्त पडत असलेले}
एकूणच बिनधास्त पडत असलेले दरोडे पाहून, पुणे हे दरोड्यांचे माहेर घर आहे असे म्हणायची वेळ आली आहे.
{फारस नुकसान न झाल्याने प्रसंग}
फारस नुकसान न झाल्याने प्रसंग विनोदी वाटतोय.
दोन महिन्या पुर्वीच सासरी अशीच घरफोडी झाली. सासुसासरे तळमजल्यावर रहातात तर वरच्या मजल्यावर घरातली बाकीची मंडळी. पहाटे ३-४च्या सुमारास कसलासा आवाज आला म्हणुन सासरेबुवा उठले आणि हॉलकडे जाउ लागले तोच चोरांचा सुगावा लागला त्यांनी शिताफिने बेडरुमला आतुन कडी लावली आणि बेल वाजवुन वरच्या मजल्या वरच्यांना उठवलं. (बर जायला आतुन जिना आहे. आणि जिन्याला दार जे बाहेरच्या बाजुने बंद केललं असत.) वरची मंडळी कुलुप उघडुन खाली येई पर्यंत चोरांनाही सुगावा लागला आणि ते जिथुन आले (खिडलीचे गज तोडुन) तिथुनच पसार झाले व पुढचा अतिप्रसंग टळला.
मागाहुन कळलं की त्याच रात्री समोरच्या इमारतिमध्ये पण घरफोडी झाली.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{खरं आहे गणपा, काहीच नुकसान}
खरं आहे गणपा, काहीच नुकसान झालं नसलं तरी आमच्या घरचे व आसपासचे मनापासून घाबरले आहेत हे मात्र १००% सत्य आहे
something terribly wrong with this country, isn't there?
{पुढचा अतिप्रसंग टळला. गणपा}
पुढचा अतिप्रसंग टळला.
गणपा युगांडात एखादी मराठी भाषेची शिकवणी लाव रे.
प्रसंग आणि अतिप्रसंग ( खरे तर अतीप्रसंग असे हवे) यांच्या लाक्षणीक अर्थात फरक आहे.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{तरी लिहिताना शंका आली होतीच.}
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{अहो गणपाभौ, व्हि.डि.ओ.जरा नीट}
अहो गणपाभौ,
व्हि.डि.ओ.जरा नीट बघा तरी!!राजेंनी नक्की काय केले आहे ते तुमच्या लक्षात येईल
..............................................................
क्या फर्क पडता है?
{अर्रर्र ते पाहिलच नाही.}
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{घराला बाहेरुन कडी लावता येउ}
घराला बाहेरुन कडी लावता येउ नये म्हणुन कडी उघडल्यावर बाहेरुन ताळ लावता येईल अशी सोय असायलाच हवी.
जैसीं पुस्पांमाजि पुस्प मोगरी | की परिमळामाजि कस्तुरी |
तैसी भासांमाजि साजिरी | मराठिया ||
{चोर...}
चोर मराठी होता का?
{भाषिक वाद पेटवण्याचा}
भाषिक वाद पेटवण्याचा केविलवाणा प्रयत्न
something terribly wrong with this country, isn't there?
{अजून एक...}
चोर पुणेकर होता का?
{' घर एक मंदीर '}
फक्त चपलांची चोरी झालीय म्हणुन म्हणतो. चोरांना तुमचे घर मंदीर अन तुम्ही देव वाटला असावात, एका प्रकारे त्यांनी तुमचा सन्मानच केलाय की.
{ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ}
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
something terribly wrong with this country, isn't there?
{चोरीचा मामला म्हणजे गंभीर}
चोरीचा मामला म्हणजे गंभीर प्रकरण! राजे काळजी घ्या....