क्षमा करा.....
गेल्या काही दिवसात मी इथं दोन कथा लिहिल्या - चांदनी आणि जिंदगीसे छुटकारा. आज सकाळी जिंदगीसे छुटकाराचा शेवटचा भाग इथं आणला अन त्यावरच्या काही प्रतिक्रिया पाहुन जाणवलं की असा अंत असलेली कथा सकाळी सकाळी आणणं चुकलं असेल कदाचित. लोकांना खिन्नता यावी, त्यांनी हादराव, त्यांना चटका लागावा, त्यांच्या हृदयाला भो़कं पडावीत, त्यांनी सुन्न व्हावं, सेंटिमेटल व्हावं असा मुळीच उद्देश नव्हता. पण तसं झालं खरं.
मी आधी चांदनी आणि नंतर लगेचच मीना असे विषय का हाताळले? यावर लोकांची मते वेगळी वेगळी असु शकतील, त्याचे अर्थ वेगवेगळे लागु शकतील. पण हे सगळं मी इथं लिहिलं त्याला काही कारणं होती आणि ती साहित्यिक नक्कीच नव्हती. मी साहित्यिक नाही. माझ्या मर्यादांची मला जाणिव आहे.
पाचवीच्या वर्गात जशी स्कॉलर मुलं असतात तसा एखादा टग्या पण असतो. तो टग्या एखाद्या शामळु मुलाला आपल्याला ब्रम्हज्ञान झालंय असं दाखवत असं काहीतरी सांगतो की त्या बिचार्या मुलाचं भावविश्वच उध्वस्त होतं. तो टग्या नाहीये मी. हे लिखाण त्याकरता नाहीये.
एखादे उतारवयातले आजोबा असतात. बरंच काही त्यांनी पाहिलेलं, भोगलेलं, सोसलेलं असतं. त्यांच्या घरात मुलगा, सुनेला रोजच्या धकाधकीत काही ऐकायला-बोलायला वेळ नसतो. नातवंडांना कॉम्प्युटरवर गेम खेळण्यातच जास्त रस असतो अन आजीनी तर आधीच आजोबांचं पाणी जोखलेलं असतं. मग ते अंगणात बसतात अन येणार्या जाणार्यांना पकडुन पकडुन त्यांच्या जवानीतल्या मोठेपणाच्या कहाण्या सांगतात. मी तो आजोबा नाहीये, वय जरासं वाढलेलं असलं तरी. अन लोकांना शिकवण्याकरता स्वतःजवळ जे असावं लागतं ते शहाणपण सुद्धा नाहीये माझ्याकडं. माझ्या आयुष्यातला हा कालखंड माझ्या बायकोला, अत्यंत जवळच्या अनेक मित्रांना माहिती पण नाहीये. मला ते सांगण्याची गरज कधीच वाटली नाही.
मग हे सगळं इथं का लिहीलं मी?
उत्तर सोपं आहे, बर्याच महिन्यांपुर्वी अश्याच एका गप्पाष्टकात एका बेसावध क्षणी मी याबाबत एक सुचक विधान मित्रांपुढं केलं होतं. त्या मित्रांनी मला याबाबत लिहावं असा आग्रह पण बर्याचदा केला होता. पण मला तेव्हा लिहावसं वाटलं नव्हतं. पण आत्ता अचानक हे लिहावसं वाटलं.
हे मतपरिवर्तन अचानक नाही झालं. याबाबत बराच विचार केला मी. अन मला लक्षात आलं की हा या माहितीकरता आयडीयल टार्गेट ऑडियन्स आहे. इथं बरेचसे लोक तरुण आहेत. जग बदलण्याची त्यातल्या अनेकांना इच्छा आहे; त्यासाठी लागणारी जिद्द, तळमळ, कळकळ पण आहे अन त्यांना शक्य आहे त्या मार्गानं ते तसं करतात पण. नसतील सगळे प्रत्यक्षात रस्त्यावर वणवण करत पण इथं आपली मतं लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करतात. अन इथंच माझ्या मते परिवर्तनाची प्रक्रिया सुरु होते.
परंतु ही प्रक्रिया पुढे चालु ठेवायची तर त्याला अनेक गोष्टी लागतात. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगाबाबतचा अनुभव, वास्तवाचं ज्ञान अन भान. अन बहुतेक सगळे बुद्धीवादी एका मर्यादित परिघातलं आयुष्य जगतात. त्यामुळं त्यांच वास्तव पण मर्यादित रहातं. अर्थातच त्यांची मतं त्या मर्यादित वास्तवापुरतीच असतात. त्याबाहेर जे विशाल जग आहे त्याचा कधी मग विचारच होत नाही. सामाजिकदृष्ट्या हा विचार होणं अत्यावश्यक असतं. हाच तर फरक असतो आर्मचेअर थिंकर आणि सोशली इन्क्लाईन्ड माणसांमधे.
मी जे पाहिलं ते जग वेगळं. तिथलं वास्तव वेगळं. मी ज्या दृष्टीनं ते वास्तव पाहिलं अन स्वीकारली ती माझी वेगळी दृष्टी. कदाचित योग्य असेल, कदाचित अयोग्य असेल, बरोबर असेल किंवा चुकीची. पण त्या जगाची, तिथल्या मी पाहिलेल्या वास्तवाची ओळख लोकांना व्हावी हा उद्देश होता हे सगळं लिहिण्यात. अन लिखाणात जे आलंय ते खरं वास्तव नाहि आहे. तो फक्त वास्तवाचा एक आभास आहे.
या विषयावर बर्याच जणांनी बरच काही लिहुन ठेवलंय. त्यावर मसाला सिनेमा, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरीज पण झाल्यात. प्रत्येकानं त्यातुन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलात. मला सांगायचं काहीच नाहीये. जत्रेत एक तंबु असतो, आरश्यांच्या खेळाचा. त्यात प्रत्येक आरशात आपलं वेगवेगळं प्रतिबिंब दिसतं. ते पाहुन कुणी घाबरतं, कुणी स्वतःच्याच प्रेमात पडतं तर कुणी सेंटीमेंटल किंवा फिलॉसॉफिकल होतं. मी फक्त तो आरसेवाला आहे. इथं प्रतिबिंब पहा अन त्यानंतर त्याचा अर्थ हवा तसा लावा. ते स्वातंत्र तुम्हाला नक्कीच आहे. पण कृपया खिन्न, सुन्न, विषण्ण, निराश, उदास होऊ नका. तो माझ्या लिखाणाचा उद्देश नाहीये.
सख्यांनो मी लिहिलं ते वास्तव पण अस्तित्वात आहे कुठंतरी हे समजुन घ्या. आपली मतं या वास्तवाच्या कसोटीला लावण्याची वेळ आलीच कधी तर कच खाऊ नका. एव्हढंच मला सांगायचंय. म्हणतात ना `न्यु ब्रुम स्वीप्स क्लीन बट ओल्ड वन नोज ऑल द कॉर्नर्स' तसं मी ते लपलेले कोपरे फक्त दाखवतोय. हा माझ्यासारख्या आध्याअधुर्या माणसाचा तोकडा प्रयत्न आहे जुनं, जे कधीतरी मरणालागुनी जाणारच आहे ते, अन नवं यांचा संगम साधण्याचा. पण यानं जर मानसिक त्रास होत असेल तर तो करण्यात मला अर्थ वाटत नाहीये. माफ करा असा मनस्ताप परत नाही होणार माझ्यामुळं. याचा अर्थ असा नाही की मी लिखाण करणार नाही. पण केलंच तर विषय, मांडणी, भाषा याबाबत जास्त काळजी घेईन.
हे प्रयोग करायला मला इथं संधी मिळाली म्हणुन मी या स्थळाचा अन मालकांचा आभारी आहे. हे करायला मला प्रोत्साहन, उत्तेजन दिलं त्या श्रावण मोडक, राजे, बिपिनदा, डान्राव, धम्या, सुहास, पेशवे, निखिल, मक, विमो अश्या मंडळींचा अन अर्थातच माझे हे भयानक प्रयोग सहन करणार्या अन तरीही माझं कौतुक करणार्या तुम्हा सगळ्यांचा.
धन्यवाद!
.jpg)
आभार आणि क्षमा?
च्यायला, मी स्वार्थी आहे या मामल्यांत. मला वाचायला, डोक्याला ताण द्यायला आणि त्यातून वेगळा विचार करत जमल्यास एखादं पाऊल टाकायला तुझ्याकडून तगडं असं काही मिळतं हा स्वार्थ त्या प्रोत्साहनामागं आहे हे सांगून टाकतो. त्यामुळं आभाराची गरज नाही. क्षमेचा मुद्दा माझ्यापुरता येत नाही.
जे काही आत्तापर्यंत लिहिलंयस ते सकस आहे. जगण्याच्या कक्षा याही मार्गानं विस्ताराव्यातच. त्यामुळं अशा लेखनाचं मी तर स्वागतच करेन.
+ १
+ १
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
+१
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
किंचित असहमत
लेखातल्या खालील वाक्यांशी असहमत आहे -
--- तुम्ही विषय, मांडणी, भाषा यांत बदल करण्याऐवजी फार तर काही वृत्तपत्रं/संकेतस्थळं देतात तशी 'ग्राफिक कंटेंट' असल्याची एक ओळ (अर्थात याने रसभंग होणार नसेल तर) लिहिलीत तरी चालून जावे. माझं वैयक्तिक मत विचाराल तर त्याचीही गरज नाही, पण एक सर्वसमावेशक धोरण म्हणून चालू शकेल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
>>लोकांना खिन्नता यावी,
>>लोकांना खिन्नता यावी, त्यांनी हादराव, त्यांना चटका लागावा, त्यांच्या हृदयाला भो़कं पडावीत, त्यांनी सुन्न व्हावं, सेंटिमेटल व्हावं >>
लिखाणात ताकद असेल तरच होईल ना असं? अतिशय उत्तम लिहिता तुम्ही. अजूनही वाचायला मिळेल अशी आशा आहे. माफ्या वगैरे काय मागता?
+१ हा असा काय वागतोय,
+१
हा असा काय वागतोय, माफ्या कस्ला माग्तोय?
नाही करत माफ जा !
पळ ए जा माफि बिफि काही नाही...
फर्मास लेखन येवु दे लवकर... विषय, मांडणी तुझ्या पद्धतीने...
बाकी धाग्याला चुकीचे टाचण दिले आहे... संपादक ठरवतील काय करायचे ते...
+१
पळ ए जा माफि बिफि काही नाही...
फर्मास लेखन येवु दे लवकर... विषय, मांडणी तुझ्या पद्धतीने...
प्रसन्नदा, तुम्ही असे धागे
प्रसन्नदा, तुम्ही असे धागे सकाळी सकाळी टाकु नयेत असं मुळीच म्हणणं नाही. पण असं वाचुन जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असल्यास क्षमस्व.
लेखन असंच चालु राहुदे!! कदाचित यामुळे तरी आम्ही स्वतःची बेगडी दु:ख विसरायला शिकु.
ए पळ्ळे!!!
ए पळ्ळे!!!
ओ मालक... काय हा धागा???? माफ
ओ मालक...
काय हा धागा????
माफ करा असा मनस्ताप परत नाही होणार माझ्यामुळं.
तु जे विषय ज्या पद्धतीने हताळले ते अतिषय समर्पक होते असे मी म्हणेन... आणि जरी हा मनस्ताप झाला असेल तर अजुनही करवुन घ्यायची तयारी आहे... त्यामुळे पुढचा लेख लगेचच यावा.
-निखिल
निदे शी
१०१ % सहमत.
तु तुझ्या स्टाइलनेच लिहावस अस मनापासुन वाटतय.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मनातल बोललात प्रसनदा ...पन
मनातल बोललात प्रसनदा ...पन तरीही मी म्हणेन लिहीते रहा...
तुम्ही लिहिता ते वास्तव आहे..
तुम्ही लिहिता ते वास्तव आहे.. नि कुठेतरी इथेच या, आपल्या जगात अस्तित्वात आहे.. त्यामुळे ते नाकारून चालणार नाही.. सुहास नि टारझन यांनीही या जगाच्या दोन वेगवेगळ्या बाजू उलगडून दाखवल्या.. त्याही अर्थातच त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत... त्यामुळे लेखन थांबवा असे मी बिल्कुल म्हणणार नाही..
राहता राहिला प्रश्न विषयांचा.. जरी विषय अल्मोस्ट उघडपणे चर्चिला न जाणारा निवडला असला, तरी त्या मांडणीमध्ये कुठेही सवंगपणा/ खटकणारे शब्द्प्रयोगही नाहीत.. त्यामुळे श्रामो म्हणतात
"जे काही आत्तापर्यंत लिहिलंयस ते सकस आहे. जगण्याच्या कक्षा याही मार्गानं विस्ताराव्यातच. त्यामुळं अशा लेखनाचं मी तर स्वागतच करेन. "
असेच मी ही म्हणेन !!!
प्रसनदा, हा धागा मात्र ही&ही
प्रसनदा, हा धागा मात्र ही&ही आहे.
तूही लिहीणार नसशील तर ए.सी. ऑफिसातल्या गुबगुबीत खुर्च्यांवर बसणार्या आमला या समाजाची ओळख होणारच नाही... दुपार असली तरी आत्ता मात्र जास्त अस्वस्थ केलंस!
काळजी नको
हा मानसिक त्रास झाला नाही तर जगण्याचे नवे आयाम समजणार नाही. त्रास झाला तरच आनंद समजतो.
अशी काळजी घेतली तर लिखाणाचे उस्फुर्तपणा नाहीसा होतो. अमुक शब्द येता कामा नये ,तमुक त्याचा अर्थ काय काढेल. या विवंचनेत गुडी गुडी लेखन होण्याचा धोका असतो.
हवा तसा अर्थ लावण्यात आपल्याला अभिप्रेत नसलेला अर्थही असण्याचा धोका आहेच. आणी खिन्न सुन्न विषण्ण, निराश उदास होणे जर घडत असेल तर तो लिखाणाचा उद्देश नसला तरी ती लिखाणाची ताकद आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
???
मला वाटलं हे मीमराठी.नेट आहे..गृहशोभिका/माहेर्/सासर वगैरे नाही. त्यामुळे नाही ती चिंता नको! कसे?
इथला ऑडियन्स परिपक्व विचारांचा नक्कीच आहे. त्यांना ह्या लेखांमध्ये काहीही वावगं दिसलं नाही, मग उगाचच असा काही ग्रह का करुन घेतोयस?
चिलॅक्स मॅन...
आम्हाला गरज आहे, तुझ्या नजरेतुन 'डिफरन्ट वर्ल्ड्स अंडर अवर नोज' पहाण्याची! वस्तुस्थिती...नाही, नागडी वस्तुस्थिती समजावुन घेण्यासाठी, करपलेली जगणी जाणुन घेण्यासाठी, असलेली नजर, ती बुध्दी, तो समजुतदारपणा आमच्या 'तुपकट मध्यमवर्गी गुळमुळीत' आणि 'मला काय त्याचं' अश्या संस्कारांमुळे अजुनतरी आमच्यापाशी नाही!
बाकी, श्रामोंनी काय ते सांगितलं आहेच पहिल्याच प्रतिक्रियेत. अधिक काय बोलु?
एक दोनदा हा लेख वाचला व विचार
एक दोनदा हा लेख वाचला व विचार केला की पुणेरी नीं हा लेख टाकला असावा ? मग मी दोन्ही लेख व प्रतिसाद वाचले तेव्हा समजले की आपण ( प्रतिसादकर्ते ) अजून देखील + १ च्या तिकडच्या मानसिकते खाली अडकलेलो आहोत अथवा आपण जेवढी चर्चा जोमाजोमाने मराठी, परप्रांतीय अथवा गांधी विषयावर तावातावाने करतो त्याच्या १ % देखील आपण दोन्ही धाग्यावर चर्चा केली नाही. फक्त वाईट वाटले.. अरे रे.. अथवा रडके स्मायली टाकून आपण ह्या अगळ्यावेगळ्या विषयातून हात काढून घेतला की काय इतपत मला शंका आली. आपल्या चर्चेतून काही होणार नाही असे समजू नका कोणी तरी सुजाण वाचक हे सर्व वाचत असेल व एखादा त्या प्रश्नावर मार्ग शोधत असेल तर आपल्या चर्चे मुळे त्याला मदत होऊ शकते हे नक्की. प्रसन्नदा काही लेखक / कथाकार नाही आहेत त्यांनी ललित लेखन नाही केले आहे ते लेखन जरा वेगळ्या पध्दतीचे आहे व आपण शक्यतो त्याला समजून घ्यायला चुकलो की काय असे वाटले हा लेख वाचून.
असो,
जरा स्पष्टच लिहले आहे क्षमा असावी.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ओ पुणेरीबाबा, तुम्ही तिकडच्या
ओ पुणेरीबाबा, तुम्ही तिकडच्या रात्री टाकलं तर आम्हाला आमच्या सकाळीच वाचायला लगतय... म्हणून मनात आलं की टाकायचं....टायमाचा इचार नाय करायचा...
ए प्रभ्या.. लेका आधी लेख
ए प्रभ्या..
लेका आधी लेख वाचुन मग प्रतिक्रिया देत जा की!
ते वेळेबद्दल बोलत नाहीयेत, हाताळलेले विषय, त्या विषयांचा आवाका आणि त्यांचे वाचकांवरचे परिणाम ह्याबाबत बोलताहेत.
श्री धमाल मुलगा जी, लेखाच्या
श्री धमाल मुलगा जी,
लेखाच्या सुरुवातीचा मुद्दा..खालीलप्रमाणे आहे.
असा अंत असलेली कथा सकाळी सकाळी आणणं चुकलं असेल कदाचित.
माझं म्हणनं मी त्या मुद्द्याबाबतीत मांडलेलं आहे.
जर माझा प्रतिसाद वाचला तर
जर माझा प्रतिसाद वाचला तर कळेल धमू काय म्हणत आहेत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राजे, आपला प्रतिसादही मी
राजे,
आपला प्रतिसादही मी वाचला. पण सध्या मी त्या एका मुद्यावर प्रतिक्रिया दिलेली होती.
*बाकीचे मुद्दे विचाराधीन
अर्रर्र... आसं हाय व्हय?
अर्रर्र... आसं हाय व्हय?
मग तुपण लिव्हायचं ना "ए धम्या..लेका आधी प्रतिक्रिया लेखासकट वाचुन मग उत्तर देत जा की!"
काय गमजा चाल्लाय नक्की ?
काय गमजा चाल्लाय नक्की ?
आयला हे वाचलं नव्हतंच.. पण या
आयला हे वाचलं नव्हतंच.. पण या लेखात ज्या इतर लेखांविशयी उल्लेख आहेत तेही लेख वाचावी लागतील आता..
कुणीतरी लिंका द्याल का... खोदकामात अंमळ कमी आहे मी.. मालक बघा हो जरा..
हे काम सध्या खोदकामसम्राज्ञी
हे काम सध्या खोदकामसम्राज्ञी परीतै करीत आहेत. त्यांना साकडं घाला हवं तर... (नाही घातलंत तरी २-४ दिवसात ते धागेही येतीलच वर, काय परीतै.
)
मीऽच तो...
:)
चांदणी
चांदणी http://mimarathi.net/~mimarath/node/779
चांद्णी २ http://mimarathi.net/~mimarath/node/807
चांद्णी ३ http://mimarathi.net/~mimarath/node/820
जिंदगीसे छुटकारा - १ http://mimarathi.net/~mimarath/node/857
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तुमचं लिखाण अतिशय सरस, पारदर्शी असतं!!
मी बरचसं वाचलय्....एका वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणत.
खिन्नता, उदासिनता म्हणाल तर लेखकाचे लेखन तेवढ्या उंचीचे असेल तर त्या भावात घेउन जाण्याची ताकद असतेच त्यात्...मग त्या दृष्टीने ही तुमच्या लिखाणाला मिळालेली complimment च आहे.
माफी वैगेरे नको लिखाण चालु ठेवा जसे तुम्ही नेहेमी लिहिता तसेच!!!
दिप्ती जोशी