मातीचा सुगंध...
मागील काही आठवडे जिवनात कधी नकोत यावे असे गेले. शुक्रवारचा कट्टा झाला मित्रांबरोबर मनसोक्त दंगा केला, रात्री १.३० च्या आसपास घरी आलो, घर.. चार जीने चढले व दरवाजा उघडला की सुरु होणारे घर. अस्ताव्यस्त पडलेले कपडे, इकडे तिकडे काढून टाकलेले मोजे व बुट.. घर झाडून पण दोन-तीन आठवडे झाले.. किचनच्या कट्यावर जसा बाजार मांडला आहे अश्या अनेक वस्तू बेवारश्यासारख्या पडून होत्या. एक मित्र देखील आला होता माझ्याबरोबर मला सोडायला, कितीतरी वेळ बोलत बसलो असेन त्यांच्या बरोबर, डोक्यात काय चालू आहे त्यापासून काय चालू नाही आहे तेथे पर्यंत पण... मनाला काही शांती मिळत आहे असे दिसे ना, थोड्यावेळाने तो आपल्या घरी निघून गेले.. व थोडे घर साफ करु हा विचार करु लागलो पण असून दे मरु दे म्हणत.. ग्लास उचला एक पॅग भरला.. किचन कट्टावरील थोडे सामान एका बाजूला केले व बसलो कट्टावरच बाजूची खिडकी उघडली. समोर एका ईमारतीचे बांधकाम चालू असेल शक्यतो पण सध्या तेथे शांतता होती. काय माहीत कितीवेळ मी ती ईमारत पाहत बसलो होतो.. काय पाहत होतो काय माहीत ! पण शुन्यवत होऊन मी खिडकीतून बाहेर पाहत बसलो होतो. हातात मोबाईल होता व त्याच्याशी चाळा चालू होता, टचस्क्रिन असल्यामुळे नकळत एका डायल्ड नंबरला फोन लागला असावा.. फोन केला आहे तो पण येवढ्या रात्री व काहीच बोलत नाही आहे हे पाहून त्याने कट केला वर परत कॉल बॅक केला. कितीवेळ रिंग वाजत होती, शेवटी लक्ष गेल्यावर कट केला त्याला समजले असेल चुकून लागला असेल फोन ते.
सकाळी जाग आली ती खिडकीतून येणार्या थंडगार हवेमुळे.. रात्री काय माहीत केव्हा डोळा लागला तो तेथे कट्टावरच झोपलो होतो, भिंतीला टेकून. स्वतःवरच हसलो, फोन चेक केला दोन मॅसेज, एक मिस्ड कॉल. न बघता तसाच ठेवला. परत खिडकीतून बाहेर नजर मारली, समोरील ईमारती मध्ये आता काम चालू झाले होते, बायका विटा डोक्यावर ठेऊन वर घेऊन जात होत्या, गवंडी व त्याचा हेल्पर त्या एकाजागी गोळा करत होते, एक लहान मुल तेथेच मातीत खेळत होते त्याच्या दिवसाची सुरवात झाली होती. थोड्यावेळाने शॉवर खाली उभा राहिलो किती तरी वेळ. काय विचार करत आहे, काय नक्की काय करत आहे तेच कळत नव्हते, अंगावरील कपड्यानिंशीच अंघोळ झाली. स्वतःवर परत हसलो.. हातात येईल ते बॅगेत भरले, लॅपटॉप, डाटा केबल, चार्जर, कार्ड, बाईकचे पेपर, गरम पट्टी .. अंगावर एक टि-शर्ट चढवला, जिन्स घातली व बुट घालून सरळ डोअर लॉक करुन खाली पार्किंग मध्ये आलो.
बाईकला कपडा मारला, व किक मारली, पायापासून डोक्यापर्यंत एक जीवघेणी कळ सळसळत गेली, डोळ्यातून झट करुन दोन थेंब पाणी आले, विसरलो होतो पाय दुखावलेला आहे. दोन मिनिट तेथेच जमीनीवर बसलो. थोड्यावेळाने बाईक स्टॅन्डवर लावून डाव्या पायाने किक मारली व सरळ बाईक हायवे वर लावली.. पन्नास, साठ, सत्तर स्पिडोमिटरचा काटा झरझर चढत होता, आजू बाजूला नजर मारली तर सगळेच अनोळखी वाटत होते.. कच्च करुन ब्रेक मारुन बाईक बाजूला घेतली व थोडे नजर खोलून सर्वत्र पाहीले, घरापासून ७ किमी अंतरावर असलेला सातारा रोडवरील बोगदा गेली २५-३० किमी झाली तरी आला नव्हता. डोके सुन्न झाले. बाईक तशीच उभी करुन साईडला किमी च्या दगडावर बसलो. मी उलट दिशेला प्रवास करत होतो, मुंबईकडे. जायचे सातार्याकडे होते.
काहीतरी कुठेतरी गोंधळ चालू होता मनात. परत बाईक योग्य रस्तावर घेतली. प्रत्येक दहा किमी नंतर बाईक थांबवायची व थोडेसे उतरुन पाय मोकळे करुन घ्यायचे असे करत करत सातार्याजवळील एकदम माळरानात असलेल्या एका बारमध्ये बाईक पार्क केली. आता तो मालक देखील मला ओळखू लागला आहे व माझ्या बाईकला देखील. २४-२५ वर्षाचा तरुण असावा तो, एका पोर्याला सांगून मी बाईकवर पाणी मारायला सांगितले व आपले नियमीत असलेले टेबल पकडले. ऑर्डर दिली व तसाच बसून राहिलो. डोक्यात काहीतरी प्रचंड गोंधळ चालू होता का ते माहीत होते पण एवढा गोंधळ माजेल व मी सैराभैर होईन असे कधी वाटले नव्हते हा अनुभव माझ्यासाठी नवीनच. असेच केसातून हात फिरवला तर डझनभर केस हातात आले, डिप्रेशन ! मनसोक्तपणे हसलो एवढा जोरात हसलो की मालक बघायला आला काय झाले म्हणून.. मी त्याला काहीच म्हणालो नाही समोरील ग्लास फिरवत राहिलो पोर्याने बियर भरली व विचारले काही खायला घेऊ का म्हणून. मी मानेनेच त्याला नको म्हणालो.
थोडे मन थार्यावर येऊ दे म्हणून बॅगेतून लॅपटॉप काढला व नेटवर ऑनलाईन झालो, जीमेल वर लॉगईन झालो.. शुन्य नवीन मेल. झट करुन जीमेल बंद केला. मीमवर आलो ! थोड्या गप्पा मारल्या खफवर, एकीशी जीटॉकवर.. पण तरी काहीतरी हरवल्यासारखं वाटत होते पुन्हा जीमेल उघडले व बघितले एखादा तरी मेल आला असेल.. पण नाही. बंद केला. मनात काहीतरी आले म्हणून जीटॉक वर एक मॅसेज टाईप केला इंटर मारु की नको, हा विचार करत करत दिड बीयर झाली होती. इंटर मारला लॅपटॉप बंद केला. बील दिले व सरळ परत हायवे वर बाईक व मी ! ती एकटीच बोलत होती, साईड पॅनेल तुटल्यामुळे त्याचा आवाज ती बोलल्या सारखा येतो मी आपला त्या आवाजातून काय अर्थ निघू शकेल असा खेळ खेळत निशब्दपणे बाईक चालवत होतो.
सातारा क्रॉस होऊन खुप वेळ झाला असेल नसेल पण आचके देत बाईक बंद पडली, चेक केल्यावर समजले आपल्या पोटात आपण तेल घातले पण हिला काहीच दिले नाही म्हणून रागावली आहे. पेट्रोल संपले होते. धुम्रवलय काढत विचार करु लागलो किती लांब असेल पेट्रोल पंप. पुढील पंप जवळ असेल की मागील. मागे दिसला होता का पंप, असे एक ना अनेक प्रश्न स्वतःला विचारुन झाले. शेवटी बाईक वर बसलो व डाव्यापायाने धक्का मारत मारत बाईक हायवेवर ! लक्ष फक्त हायवेवर असलेल्या पांढर्या रंगाच्या पट्यावर ! त्यावरुनच घेऊन चाललो होतो. कितीवेळ किती अंतर धक्के दिले आठवत नाही, रिलायन्सचा एक पंप दिसला तेथे बाईक घेऊन गेलो तेल भरले.
क्रमशः

.jpg)
राजा सांभाळुन रे! लक्षणं काही
राजा सांभाळुन रे! लक्षणं काही बरी दिसत नाहीत!!
हेच म्हणतो
राजे अश्या विमनस्क आवस्थेत कधीही कोणतही वाहन चालवु नका हि आग्रही विनंती. (राजे चा लेख वाचल्यावर पटकन "इजाजत" मधला अनुराधा पटेलचा आपघात आठवला)

*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
पुन्हा तेच भयानक शब्द समोर
पुन्हा तेच भयानक शब्द समोर आले...
क्रमशः
हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
(काय झाले ?)
काही नाही... बियर भर...
गुटुक गुटुक ऽऽऽऽगुटुक... हऽऽऽ ठक.
बिल ?
...
किल्ली कुठे गेली...!@#$^&*%#$
खट्ट... फटर... फटर... फट..
फट फट फट फट...... ढुर्रर्रर्रर्र.....
जिंदगी एक सफर है सुहाना
यहा कल क्या हो किसने जाना...
नाचतय नुसत पाय मोडला तरी !!
नाचतय नुसत पाय मोडला तरी !! आम्ही बी लई मजा केली शनीवरी..पण तुला नाय सांगणार जा
हॅ हॅ हॅ!!!
तब्येत बरी आहे ना?
रविवारी फोन करायचाच राहिला
असो, अधिक विषयांतर प्रिमियम खरडवहीत करु
जपुन रहा भाऊ....
डोक्याला लय शॉट करुन घेऊ नकोस.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हेच
म्हणतो. जरा सांभाळून भौ.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच म्हणतो. जरा सांभाळून भौ
हेच म्हणतो. जरा सांभाळून भौ
सांभाळ रे बाबा स्वतःला !!!
सांभाळ रे बाबा स्वतःला !!!
ए बाब्या....
आरं काय हुतंय तुला? हां?
काय डागदरकडं जायाचं का?
एक सांगु का? बियर अंमळ कमी करा आणि सकाळी प्राणायाम चालु करा!
हाहाहाहा
प्राणवायूची मात्रा वाढवायला सांगताय? बरं, बरं...
बियर अंमळ कमी करा आणि सकाळी
बियर अंमळ कमी करा आणि सकाळी प्राणायाम चालु करा!
+१ सहमत..
-निखिल
तरीच !!! "एका, पायाने बाईक
तरीच !!!
"एका, पायाने बाईक चालवणार्या इसमापासून सावधान!!" असा, बोर्ड नुकत्यातच पुणे बेंगलोर हायवे वर लावल्याचे ऐकिवात आले.
जप राजा स्वतःला.
- प्राजु
वाचुन मन सैरभैर झाले ..
वाचुन मन सैरभैर झाले .. (कदाचित आधीपासुनंच होतं काय ? )

राजे सुंदर लेखन