लो आ गयी उनकी याद...
कधीतरी ....निवांत क्षणी....तुझी आठवण येते...
आठवण येते म्हणजे विसरलो आणि मग तु आठवलीस असे नाही...
तशी तु सतत माझ्या मनात असतेस...
चालता चालता भास होतो...
तु माझ्या बाजुने चालत आहेस...
मान वळुन पहावे तर सगळेच अनोळखी चेहरे...
कधी अचानक हाक ऐकु येते.... पण...
आवाज कुठुन आला हेच कळत नाही...
कधी तरी अचानक मोबाईल थरथरतो...
वाटते तुझाच फोन असेल...
किती युगे झाली तुझा आवाज ऐकुन...
कधी दारावरची बेल वाजते...
उठावेसेच वाटत नाही दार उघडायला...
माहित आहे तु येणारच नाहीस, दार तरी कशाला उघडायचे...
माझाच हात माझ्या डोक्यावरुन हळुवार फिरवत बसतो...
जसा काही तुझाच हात आहे असे समजुन...
दिवसांचे महीने आणि महिन्यांचे वर्षे झाली...
आपण न भेटलेले बरे सांगुन तु निघुन गेलीस...
अजुन आठवतात ते दिवस...
ती केलेली मनधरणी...
चौकटी मोडण्यास तुझ्या वडिलांचा असलेला नकार...
आणि वडिलांना न दुखावण्याचे तुझे हळुवार मन...
आणि म्हणुन आयुष्यभर एकटेपणाचा घेतलेला वसा...
नदीच्या दुस-या तीरावरुन मी पण तुला दिलेली साथ...
परत कधीच भेटणार नाही बोलुन सोडलेला हात...
कितीदा समोर आलीस नंतर अनोळखी बनुन...
मला माहित आहे...
पुढे जावुन, मागे वळुन पहाण्यासाठी माझ्याइतकीच तु पण आतुर असशील...
मी नाही पाहिले कधी वळुन...
खात्री आहे तु पण नसशील पाहिले...
पण मला सांग, नेहमी डोळ्यांनीच पाहिले पाहिजे असे कुठे असते का ?...
आयुष्याची वाटचाल करता करता पाय थकले...
वाट पाहता पाहता डोळे थकले...
कधी थरथरत मिटतील माहित नाही...
तुझे माझे प्रेम आता केवळ स्वप्न आहे...
या जन्मी मिलन झाले नाही...
पुढील जन्मात होईल की नाही माहित नाही...
पण....
एकदा तुला भेटायचे आहे...
एकदा भरभरुन तुझ्याशी बोलायचे आहे...
एकदा डोळे भरुन तुला पहायचे आहे...
एकदा हातात हात घ्यायचा आहे...
पण...
मला माहित आहे..
हे कधीच शक्य नाही...
कदाचित...
कदाचित नंतर तु येशील...
येशील ना ? ये च..
जिवंतपणी नाही भेटलीस...
निदान नंतर तरी भेट...
कधीतरी निवांत क्षणी तुझी आठवण येते...
अन ओठावर हलकेच शब्द येतात.....
लो आ गयी उनकी याद, वो नहीं आए....
(पुर्वप्रकाशित)

.jpg)
आठवण येते म्हणजे विसरलो आणि
आठवण येते म्हणजे विसरलो आणि मग तु आठवलीस असे नाही...
तशी तु सतत माझ्या मनात असतेस...
चालता चालता भास होतो...
तु माझ्या बाजुने चालत आहेस...
मान वळुन पहावे तर सगळेच अनोळखी चेहरे...
कधी अचानक हाक ऐकु येते.... पण...
आवाज कुठुन आला हेच कळत नाही...
कधी तरी अचानक मोबाईल थरथरतो...
आयचा घो !
%&&^&$## %^%%$%# !!!!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आज कवटी भिरभिरण्याचा दिवस आहे
आज कवटी भिरभिरण्याचा दिवस आहे का??
सकाळी प्रसन्नदा मग सुहास आता नाना!
पुढे जावुन, मागे वळुन पहाण्यासाठी माझ्याइतकीच तु पण आतुर असशील...
मी नाही पाहिले कधी वळुन...
खात्री आहे तु पण नसशील पाहिले...
पण मला सांग, नेहमी डोळ्यांनीच पाहिले पाहिजे असे कुठे असते का ?...
आहटसी कोई आये
आहटसी कोई आये तो लगता है...
दुसरी एक द्विपदी आठवली -
रातभर पिछलीही आहट कानमें आती रही,
झांककर देखा गलीमें कोई भी आया न था...
मस्त नान्या .... अवांतर : परत
मस्त नान्या ....
अवांतर : परत ब्रेक-अप झाला का रे ?
नान्या....
नान्या....
-निखिल
लई भारी नाना...
नाना ... क्या बात है...
लई भारी...
****
एकदा तुला भेटायचे आहे...
एकदा भरभरुन तुझ्याशी बोलायचे आहे...
एकदा डोळे भरुन तुला पहायचे आहे...
एकदा हातात हात घ्यायचा आहे...
पण...
मला माहित आहे..
हे कधीच शक्य नाही...
****
खरेच 'लो आ गई उनकी याद......'
)
दिल को टच कर के गई.... (मराठीत ... काळीज कापून गेली
अजून येऊ देत...
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
हम्म
>>चौकटी मोडण्यास तुझ्या वडिलांचा असलेला नकार...
हम्म सगळे म्हातारे सारखेच. आयचा घो यांच्या. चौकटी आपल्या आयुष्याचा आधार म्हणून आपणच निर्माण करतो, त्यांचा आधार होण्याऐवजी जाच होऊ लागला तर त्या आपणच मोडीत काढून नव्या सुसह्य चौकटी आपणच बनवायच्या असतात हे कधी कळणार यांना.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अय्या...नाना मला पण पहायचिये
अय्या...नाना मला पण पहायचिये ति नदी..ने़क्स्ट कट्टा नानाच्या नदिकाठी
जरासी आहट होती है और दिल...
जरासी आहट होती है और दिल...
नाना
अनेकदा ऐकुन ही परत परत भारवुन टाकणा-या माझ्या त्या गाण्याची आठवण करुन दिलीस यातच सर्व काही आलं. खुपच ,खुपच छान लिहल आहेस
दुवा
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
जबरदस्त.
जबरदस्त.
स्टँडिंग ओव्हेशन !
स्टँडिंग ओव्हेशन !
चालु दे...!
एकदा तुला भेटायचे आहे...
एकदा भरभरुन तुझ्याशी बोलायचे आहे...
एकदा डोळे भरुन तुला पहायचे आहे...
एकदा हातात हात घ्यायचा आहे...
मित्रा शुभेच्छा रे........!!!
-दिलीप बिरुटे
आता कुठे ह्या वयात
>>आता कुठे ह्या वयात चुचुमॅडम
>>आता कुठे ह्या वयात
चुचुमॅडम , प्रेमाला कुठे वय असतं. [प्रेमा हे कोण्या व्यक्तीचं नाव नाही]
राहिला नानाच्या वयाचा प्रश्न. त्या विषयावर जीमेलवर बोलू...!
-दिलीप बिरुटे
मोस्ट वेलकम
मोस्ट वेलकम