गमन !!

0
0

णमस्कार्स लोक्स ,,,

येस .. "गमन" म्हणजे मिमवर डावीकडे मार्गदर्शक रकाण्यातला लॉग आउटचं बटण नव्हे... गमण .. म्हणजे "गमनं" च ! बारावी नंतर काही सरकारी कागदपत्रांच्या कामासाठी मला गणेशपेठ च्या एका सरकारी कार्यालयामधे जावं लागे. अर्थात त्या काळी ऑटो फिटो चे खर्च परवडत नसायचे .. बस ने जाण्या ऐवजी एखाद वडापाव चापता येईल म्हणुन बसने ही जाणे टाळायचोच ! कॉर्पोरेशन ला उतरलं की पदयात्रा. वाटेत पुण्याचा "फोरास रोड" लागत असे. त्या वयात ह्या गोष्टींच भलतंच आकर्षण असे. पण तिकडे जाणे कधी स्वप्नातही आणले नव्हतं. एक कुतुहलवजा आकर्षण मात्र असायचं .. नक्की तिकडं असतं काय ? कोण लोकं येतात कोणत्या प्रकारची लोकं येतात ? कोणत्या प्रकारच्या बाया असतात ? पण पावलं तिकडे वळवण्याच्या विचारानेही अंगाला कापरं भरत असे.

एकदा मनाचा हिय्या करुन गेलोच त्या वाटेने. श्रिकृष्ण थेटराच्या बाजुने कोणत्यातरी गल्लीत घुसलो आणि घामंच फुटला, १७ वर्षांचा असेन तेंव्हा. फक्त ऐकुन असलेल्या भागात मी पहिल्यांदाच आलो होतो. अरुंद रस्ता .. दोन्ही बाजुंनी दोन-तीन मंजली माड्या .. आणि प्रत्येक खिडकीत; गॅलरीत उभ्या त्या ! यांच्या त्वचेचा रंगं नेमका कोणता ? कोणी गोरी असावी, ती तर चक्क गुलाबी दिसते, कोणी काळी सावळी असेल तर ती चिक्कार पावडर किंवा अजुन काय ?थापुन चक्क चक्क करड्या रंगाचीच झालीये ? वर हे काय ? डोळ्यात आख्खी काजळाजी डब्बी रिकामी केली की काय ? चमकी काय मारलीये .. गजरा काय लावलाय ? कपडे पण कसले ? श्श्शी .. आणि वर हाईट म्हणजे रस्त्यातल्या कोणालाही "ए शुक्शुक..","ए चल्ना .." ,"क्या रे ..मस्ती करेगा क्या ?" वगैरे कमेंट्स टाकणं ! खोल्यांच्या दरवाज्यातंच थोबाड लाल झालेली , छाती कुठे न पोट कुठे ह्याच्या पत्ताच नसलेली अत्तिशय उर्मट आणि रागिट भासणारी .. चालक असावी बहुदा ! मी पुर्णंच घामाघुम झालो होतो. कुठेसं पाणी प्यावं म्हणून थांबलो..
अशा वातावरणात काही करण्याची इच्छा तर सोडाच पण अल्मोस्ट उल्टी होईल असं वाटत होतं,
तोच माझ्या शेजारुन माझ्याच वयाचं एक पाच फुटाचं मिसरुड फुटलेलं कार्ट सेकंदांत माडीपाशी पोचलं आणि तिथे उभ्या एकीला काहीतरी बोललं , आणि ती त्याला आतंही घेऊन गेली,

मी आपली सरळ धुम ठोकली .. पुण्हा इकडे चुकूनही भटकायचं नाही.

कधी नव्हे तो मी वैचारिक झालो ! हास्य Sex is not something mechanical , it has to be emotional ... its not just an insertion of organ ! And of course how could it be paid ? हास्य मी जे दृष्य पाहिलं त्या वातावरणात माझी पाणी प्यायची इच्छा होत नव्हती तर बाकी इच्छांचं काय ? पण च्यायला, इथे सगळे लोकं तर एकाच उद्देशानं येतात.. केवळ वासना शमवण्यासाठी ? ह्यांच्या खोल्यांतली स्ट्रक्चर्स कशी असतात ते माहित नाही , (पण ऐकीव माहितीच्या आधारे) छोट्याश्या रुम मधे ... एकाचा इकडे कार्यक्रम चालु , दुसर्‍याचा तिकडे .. जणु काही कटिंगच्या दुकाणात आपण शेजार-शेजारच्या खुर्च्यांत बसुन हेयरकट करत आहोत. दोन घटका गाडीच्या ब्लॉकपिष्टन प्रमाणे मेक्यानिकल हालचाली करून पुन्हा आपले कपडे घालुन चला पुढे .. तीही लगेच गॅलरीत लॉगिन करून उभी.. पण ह्यात सुख भेटतं का ? नो नो .. ह्यात सुख सापडेल असं ह्यांना वाटतं तरी का ? असं कोण-कुठली .. स्वच्छतेचा प्रश्न दोन कोस लांबंच ! नजरेत नजर घालुन बघायची इच्छा कशी होते ? की फक्त माझीच होत नाही ? ते स्पर्शज्ञाने प्रत्येक सजीवाला असावं इव्हन गेंड्यालाही हास्य पण 'तो' स्पर्ष असा कुणाकडुनही कसा मिळेल ? आई-वडील-भाऊ-बहिण-मित्र-मैत्रिणी-नातेवाईक ह्यांना स्पर्ष करतो .. त्यात प्रत्येकाचं फिलींग वेगळं असतं .. त्यात 'ती' भावना कधीच नसते ! लहानपणी जेंव्हा सर्दी व्हायची तेंव्हा नाकाला- छातीला विक्स लाऊन द्यायची .. त्या स्पर्षानं एक समाधान भेटायचं .. एक फिलींग यायचं जे केवळ आणि केवळ आईच्याच स्पर्षाने यायचं! बहिणीबरोबर बर्‍याचदा मारामारी करायचो अंगमस्तीही करायचो एकदा तर डोकं फोडून घेतलं होतं हास्य ... पण त्यात कधी "तसं" भासलंच नव्हतं.

आपल्या मनात एक फँटसी असतेच की ( नाही म्हणता ? खोटं बोलताय हास्य ) पण ती भावना अशी कोणत्याही व्यक्तीसाठी येत नाही .. किमान मिपा मुखपृष्ठावरच्या व्यक्तिंसाठी तर नाहीच नाही. गप्पा-गोष्टी वाचनं , समाजात वावरताना बर्‍याच गोष्टी आपण ऐकतो. मग हे "गमन" करणारे लोकं कोण ? त्याविषयीही उद्बोधक चर्चा झालेलीच असते. मला आश्चर्य वाटतं ... ह्यांची इच्छाच कशी होते ?
बरं वरचा फोटू तर झाला भारतातला .. त्यातही एकदम रोड-लेव्हल बिजनेस हास्य आम्ही परदेशातही हे पाहिलं .. हो आता तिकडे काही असा स्पेशल झोन असावं असं काही नाही. किंवा तुम्हाला त्या साठी फक्त "व्यावसायिक" बायांकडेच जायला हवं असंही काही नाही. चालु चालु हँडशेक करतो तश्याच सगळ्या गोष्टी शेक केल्या जातात नो वंडर !
पण इथेही असा हाय-फाय शो असला तरी भावना कुठून विकत आणता येत नाही.. भले काही करा. एक क्षणिक आनंद आणि त्यानंतर केवळ पश्चाताप असं काहीसं ! Was it really that needed ? हा विचार आधी कधीच येत नाही हास्य असं का होतं ? जे रेग्युलर क्लायंट असतात अशांची मानसिकता काय असावी असा प्रश्न मला नेहमीच पडतो. प्राण्यांत आणि माणसात हा एक मोठा फरक असावा असं मला वाटतं ! माणसाच्या भावना अधिक प्रगल्भ आहेत आणि त्या भावनांतला फरक समजण्याची जाण निसर्गतःच आहे.

बोलण्यासारखं बरंच काही आहे , पण ते काही नविन नाही.. थोड्या फार फरकाने बरेच जण असा विचार करत असतीलंच ! असो !!

सर्व "गमन" करणार्‍यांना हा लेख अर्पण हास्य

Sex is not something

1

Sex is not something mechanical , it has to be emotional ...
टार्‍या हे खरे नाहीरे. संभोगाची सुद्धा सवय होते. त्यातला सम भोग संपतो. आणि नुस्ते भोग सुरु होतात. भोग सुद्धा संपतात तेथे मग केवळ रुतीन सुरू होते.
माझे अरोरा सर म्हणायचे की
सेक्स आणि सम्भोगाबद्दल तुम्हाला कुतूहल असेल. तुमच्या मनात कल्पना येत असतील की लग्नाच्या पहिल्या रात्री स्वर्गातून अप्सरा यक्ष वगैरे आकाशातून फुले उधळतील....
तसे काही नसते........ ते कसे असते म्हणून साम्गू....... अगदी फीलिंग्स प्रमाणे सांगायचे तर...... कल्पना करा तुम्हाला खूप घाईची लागली आहे.....संडासात अगोदरच कोणीतरी गेलेय. आतला माणुस बहुतेक तेथे वीकांत साजरा करत असल्याप्रमाणे निवान्त आहे. तुम्ही अगदीच घाईला आला आहात. अचानक एकदम संडासातला माणूस बाहेर येवून तुम्हाला वॉक ओव्हर देतो....... तुम्ही हा..श्श....एकदम मोकळे होता.
तेच "मो़कळे झाल्याचे" फिलिंग तेथे ही येते.
डॉ अरोरानी सगळ्यांचीच हवा काढून टाकली होती.....


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

नॉलेज आणि अनुभव शेयर

2

नॉलेज आणि अनुभव शेयर केल्याबद्दल धन्यवाद विजुभाऊ !

मग हे रुटिन असे पैसे देऊन गलिच्छ वातावरणात असं कोणत्याही सडकछाप बरोबर कसे चालते ? प्रश्न हा आहे .

टारझनने जणु काही माझ्या

3

टारझनने जणु काही माझ्या मनातलेच लिहिले आहे.
मला सुद्धा आश्चर्य वाटते, ह्याना भावना नसाव्यात का?
गेले आपले तिकडे नि आटोपले.
त्या बायकांच एक वेळ समजु शकतो, पोटापाण्यासाठी....

प्राण्यांत आणि माणसात हा एक मोठा फरक असावा असं मला वाटतं

4

आगदी योग्य बोललास टारझन. माणसांच्या बाबतीत
"sex is not between to legs it is between to ears".
इतर प्राण्यांमधे माजावर येण्याचा ठराविक कालावधी असतो आणि(केवळ या नैसर्गीक प्रेरणेमुळेच) निव्वळ प्रजोत्पादनासाठी त्यांचा संग होत. हेच मनुष्याच्या बाबतीत त्याच्या प्रगत मेंदुमुळे तेवढ्या पुरत मर्यादीत रहात नाही, तो कल्प्ना विलासात(फॅन्टसी) रमु शकतो आणि त्याला हवी तेंव्हा कामेच्छा जागृत करु शकतो.
एखाद्या हाटेलात कुणी गरज अथवा नाइलाज म्हणुन जेवायल येतो तर कुणी चैन म्हणुन (भुक आणि चोचले). तस बघितल तर हे बाजार फार पुरातनकाला पासुन समाजाच्या गरजा भागवत आहेत आणि म्हणुनच मी त्यांना "shock absorbers" किंवा " punching bag" म्हणीन. हे बाजार जर या समाजात नसतील तर मिडीयाला रोज एक नवा विषय / बातमी चघळायला मिळाली असती.

पण एक मात्र खर "निसर्ग फक्त दोनच नाती जाणतो नर आणि मादी"


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

sex is more psychological

5

sex is more psychological than physical हे मात्र खरे. शेवटी तुमच्या मेंदुतील रसायन "तो "संदेश देतो. हे रसायनच निर्माण झाले नाही तर ती वासना होणारच नाही.
गणिका या समाजाच्या सेफ्टी व्हॉल्व आहेत. या आहेत म्हणुन तुमच्या आमच्या आया बहिणी व्यवस्थित जगु शकतात.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

+१. हे सगळे नैसर्गीक आहे.

6

+२.
हे सगळे नैसर्गीक आहे. फक्त काही झाडे मोठी, काही छोटी, काहींची पाने हिरवी तर काहींची पोपटी, काहींची पाने पिवळीही, काहींवर लाल तर काहींवर शेंदरी फुल असते त्या प्रमाणे निसर्ग व्यक्तिप्रमाणे आपली करामत दाखवतो.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

चांगला लेख लिहिला आहेस

7

चांगला लेख लिहिला आहेस टारुभाउ....

हॅ हॅ हॅ.. उत्तम 'लेख' लेखक

8

हॅ हॅ हॅ.. उत्तम 'लेख' लेखक होण्यासाठी हा विषय हाताळणं अत्यंत जरूरी आहे. अनेक आंतरजालीय लेखकांनी हा प्रयोग केल्या आहे. (त्यात आम्हीही आलोच). आंतरजाल ह्या लेखकीय उत्क्रांतीला साक्ष आहे. टारूभाऊ छान. असेच छाण छाण लिहीत रहा.


-पुण्याचे पेशवे

छान लिहिलंस मनोगत.....

9

Sex is not something mechanical , it has to be emotional ... हे अगदी बरोबर पण.....
लैंगिकता ही बहुतेक लोकांबाबत भावनीक असते तेव्हढीच शारिरीक गरज देखील असते. त्यापासुन सुटलेला विरळाच. शेवटी ती पण एक भुकच आहे अन ती भागवण्यात मला तरी काहीच गैर वाटत नाही. ही भुक भागवण्यासाठी अनेकदा माणसं - त्यात स्त्री-पुरुष दोन्ही आले - अनेक उपद्व्याप करतात. पैसे देऊन अशी भुक भागवणे हा त्यातलाच एक. अर्थातच हा आदर्श पर्याय नाही आहे पण हा पर्याय इतर अनेक पर्यायांपेक्षा समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने जरा बरा वाटतो.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

प्रसन्न दा, भुक भागवण्यात गैर

10

प्रसन्न दा, भुक भागवण्यात गैर ते काय ? पण त्या वातावरणात इच्छा जागृत कशी होते ? आणि ते ही नियमीत ? हे इतकं मेक्यानिकल का असतं यांच्या साठी ? प्रवृत्ती कशी बॉ निर्माण होते.
प्रतिसादाची १००% सहमत आहेच.

होतं रे.....

11

अन जरा खोलात शिरलास तर लक्षात येईल की त्या बायकांवर जिवापाड प्रेम करणारी पण गिर्‍हाईकं असतात. अनेक वेश्यांच्या कडे तर त्यांच्या गिर्‍हाईकांच सगळं सामान सुमान कायम असतं. बहुतेक वेश्या धंद्यात येतात्त कर्जफेडीसाठी. कर्ज फिटलं की अश्या गिर्‍हाईकाबरोबर त्या `संसार' पण थाटतात.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

अगदी छान हाताळला आहेस

12

अगदी छान हाताळला आहेस विषय...मनापासून लिहीतोस तेव्हा खरच छान लिहीतोस...

दिपाली Smile

वा ! चांगल्या पध्दतीने विषय

13

वा !

चांगल्या पध्दतीने विषय हाताळला आहेस रे टार्या..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

उत्तम लेखन. लिहित रहा.

14

उत्तम लेखन. लिहित रहा.

लिहीत रहा..

15

चांगल्या पध्दतीने विषय हाताळला आहेस.

टारबा... उत्तम

16

टारबा... उत्तम हाताळणी..
नावावरुन वेगळेच काहि असेल असे वाटले होते....


-निखिल