खरंच जेल भरतील का?

आजच्या काही महानुभावांच्या व्यक्तव्यांचा निकष -

१. जनप्रतिनिधी भ्रष्ट आहेत.
२. त्यांना दंडित करण्यासाठी लोकपाल असणे गरजेजे आहे.
३. लोकपालामुळे जेल भरतील.

माझे मत:

१. जनता जनप्रतिनिधी निवडते.
२. जनप्रतिनिधी बहुमताने 'अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपेणे' इतर लोकांची नियुक्ती करतात. त्यात लोकपाल ही
येईल.
३. जनप्रतिनिधी त्यांना अनुकूल अश्या व्यक्तींनाच लोकपाल नियुक्त करतील. (ते मूर्ख नाहीत किंवा त्यांना
पागल कुत्र्याने ही चावलेले नाही).
४. असा लोकपाल जाळे टाकून तलावातले सर्व 'भ्रष्ट मासे' कधीच पकडणार नाही. अपितु काटे लाऊन हेरलेल्या
'भाग्यहीन भ्रष्ट माश्यानच' दंडित करेल.

अर्थात जेल कधीच भरणार नाही.

आपले मत काय आहे?

{साहेब तुम्ही स्पष्ट नाव}

साहेब तुम्ही स्पष्ट नाव घ्यायला हव होत.
आता राष्ट्रपती पद भूषवलेल्या व्यक्तीला आपली व्यवस्था कशा प्रकारे चालते हे माहित नाही?
तरी बरे अफझल गुरुच्या फाशीच्या शिक्षेवर निर्णय घ्यायला अथवा घ्यायला लावायला त्यांनाच एवढी वर्षे पुरली नाहीत ( त्यांच्या कडे फाईलच आली नव्हती असे कोण पुट पुटल रे?)