महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !
17
आवडले!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
जय महाराष्ट्र !!!!!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
जय महाराष्ट्र !!!!!
{महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा}
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील त्या हुतात्म्यांना त्रिवार वंदन...
जैसीं पुस्पांमाजि पुस्प मोगरी | की परिमळामाजि कस्तुरी |
तैसी भासांमाजि साजिरी | मराठिया ||
{महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा}
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{मी मराठी}
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{झालाच पाहीजे}
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
निपाणी, कारवार, बेळगाव, (लंडन, न्यूयॉर्क ?) सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे.
काही गोष्टी न बोललेल्याच बर्या असतात
{करा कष्ट पण होऊ नका नष्ट.. जय}
करा कष्ट पण होऊ नका नष्ट..
जय महाराष्ट्र.. !!!
... तुमचा अभिषेक
{शुभेच्छा. याच दिवशी}
शुभेच्छा. याच दिवशी भारतातल्या एका सर्वात सामर्थ्यशाली राज्याचा पुनर्जन्म झाला.
{जरा याद करो }
संयुक्त माहाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी प्राणार्पण केले. संयुक्त महाराष्ट्र समिति नि त्यातही आचार्य अत्रे नसते तर महाराष्ट्र राज्याची निर्मिति झालीच नसती. पण काँग्रेसनी व त्यांच्या बगलबच्च्या प्रसारमाध्यमांनी एक "मंगल कलश" थिअरी निर्माण केली. तसेच त्याच्याशी इंदिरा गांधींचाही कसातरी संबंध जोडून महाराष्ट्र राज्य निर्मितीचे श्रेय लाटलं.
{संयुक्त माहाराष्ट्रासाठी १०५}
संयुक्त माहाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी प्राणार्पण केले. संयुक्त महाराष्ट्र समिति नि त्यातही आचार्य अत्रे नसते तर महाराष्ट्र राज्याची निर्मिति झालीच नसती.
१००% सहमत.
कॉंग्रेसला संयुक्त महाराष्ट्र व्हावा असे कधीच वाटत नव्हते. ते कायमच मुंबई गुजरातला द्यावी या मताचे होते. आणि त्यांचे म्होरके होते स. का. पाटील. यशवंतराव याच्या विरोधात उभे राहिले असे कधी दिसले नाही. मुंबई महाराष्ट्राला 'द्यावी' लागले हा 'पराभव' कॉंग्रेसच्या जिव्हारी लागला आणि त्यामुळे त्यांनी कधीही मुंबई मनापासून महाराष्ट्राची मानली नाही, मुंबईला मराठी करायची, सरकारी पातळीवर मुंबईत मराठीचा प्रसार करण्याची तसदी घेतली नाही.
पण काँग्रेसनी व त्यांच्या बगलबच्च्या प्रसारमाध्यमांनी एक "मंगल कलश" थिअरी निर्माण केली. तसेच त्याच्याशी इंदिरा गांधींचाही कसातरी संबंध जोडून महाराष्ट्र राज्य निर्मितीचे श्रेय लाटलं.
{श्रेय लाटण चालू आहे}
पण काँग्रेसनी व त्यांच्या बगलबच्च्या प्रसारमाध्यमांनी एक "मंगल कलश" थिअरी निर्माण केली. तसेच त्याच्याशी इंदिरा गांधींचाही कसातरी संबंध जोडून महाराष्ट्र राज्य निर्मितीचे श्रेय लाटलं.
हे लाटण चालूच आहे. अर्थात त्यात त्या पक्षांची चूक आहे अस नाही कारण त्यांना आपणच निवडून दिल आहे.
पर्वाच राहूल गांधीनी विधान केल की सचिनला खासादारकी काँग्रेसमुळेच मिळाली म्हणून आमचा पक्ष महाराष्ट्रविरोधी नाही.
जर मी चूकत नसेन तर एकदा संयुक्त महाराष्ट्र समिती आणि एकदा युती एवढा काळ सोडला तर बहुतेक काळ काँग्रेस महाराष्ट्रात सत्तेवर आहेच. एवढ करुन ५२ वर्षात महाराष्ट्राची मजल फक्त उपपंतप्रधान पदार्यंतच गेली आहे. (अर्थात देवेगौडा आणि नरसिंहराव सोडून मला अ-उत्तर भारतीय पंतप्रधानही आठवत नाहीये हा भाग अलाहिदा.)
आजही याच नेत्यांची नाव सगळ्या गोष्टींना देण चालू आहे. जस काही बाकी कोणी नेतेच झाले नाहीत. डॉ. आंबेडकर सोडून दुसर्या कोणाचीही नाव नाहीत.
काही गोष्टी न बोललेल्याच बर्या असतात
{आणि आता वेगळा विदर्भ मागून}
आणि आता वेगळा विदर्भ मागून विदर्भही महाराष्ट्रापासून तोडायच्या प्रयत्नात आहेत.
नीता आंबेगावकर
{आणि आता वेगळा विदर्भ मागून}
आणि आता वेगळा विदर्भ मागून विदर्भही महाराष्ट्रापासून तोडायच्या प्रयत्नात आहेत.
नीता आंबेगावकर