काही प्रश्न - शाप, उ:शाप, प्रतिशाप यांबद्दल

डिस्क्लेमर - कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायचा हेतू नाही. हा धागा नर्मविनोद व मिश्किल चर्चा करण्याच्या दृष्टीने काढण्यात आलेला आहे.

-----

पुराणात एखादे असे उदाहरण आहे का - की ज्यात एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीस शाप दिला व त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसर्‍या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीस शाप दिला ?

१) उदा. अहिल्या पतिव्रता होती व तिच्याकडे पातिव्रत्याचे तेज व बल होते (असे गृहित धरूया).

१-अ) त्या बलाचा वापर करून तिने आपल्या पतिस शाप का नाही दिला की माझे रुपांतर दगडात करायचा शाप देतोस ! ठीक आहे मी ही तुझे रूपांतर (शाप देऊन) कावळ्यात करते.

१-ब) किंवा तिचे पातिव्रत्याचे तेज व बल एवढे होते तर तिच्या नवर्‍याचा शाप निष्प्रभ होऊन का नाही पडला??

१-क) किंवा रामाने तिला दगडातून परत स्त्री बनवल्यानंतर तिने आपल्या पतिस धडा का नाही शिकवला ? तिच्या मनातली "इंतेकाम की आग" कशीकाय बुझली ?

--

दुसरे उदाहरण - शकुंतलेचे. वो बेचारी फुरसत मे बैठी रही तसव्वुर्-ए-जाना किये हुए. उतनेमे वहा दुर्वास टपक पडे (कडमडायला) व तिने त्यांचे स्वागत न केल्याने चिडून त्यांनी तिला शाप दिला - की तू ज्याचा विचार करत बसलेली आहेस ...दुष्यंत ... तो तुला विसरेल.

पण ती "मानसकन्या कण्वमुनींची" असल्याने कण्व मुनींनी दुर्वासांना शाप का नाही दिला की - माझ्या मुलीची फारशी काही चूक नसताना केवळ तुमच्या इगो पायी तुम्ही तिला शाप दिलात - आता मी प्रतिशाप देतो की तुम्हास भूतली जन्म घेऊन "अँग्री यंग मॅन" च्या १०० भूमिका कराव्या लागतील. म्हंजे - पाप को जला कर राख करदूंगा, आग का गोला, जल्लाद, आग ही आग, नफरत की आंधी अशा १०० चित्रपटात मुख्य हिरोचे काम केल्यानंतरच तुम्ही परत दुर्वास ॠषि बनू शकता.

तर दोस्तानु, अशी शापास प्रतिशाप दिल्याची उदाहरणे माहीत असल्यास त्यांबद्दल लिहा.
.
.
.
-------------------------------------------------------------------------

डिस्क्लेमर - कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायचा हेतू नाही. हा धागा नर्मविनोद व मिश्किल चर्चा करण्याच्या दृष्टीने काढण्यात आलेला आहे.

{ब्रह्मवैवर्त पुराणातलं एक}

ब्रह्मवैवर्त पुराणातलं एक वांगं इथ शिजवतो...

गंगा, सरस्वती आणि लक्ष्मी ह्या तिन्ही विष्णुपत्नी होत्या. पण सरस्वतीमध्ये सवतीमत्सर जागा झाला. ती आणि गंगा भांडत असतांना लक्ष्मी मध्यस्थी करायला आली तर सरस्वतीने तिला वृक्ष बनण्याचा शाप दिला.निर्दोष लक्ष्मीला शाप दिलेला बघून गंगेने सरस्वतीला नदी बनून पृथ्वीवर जाण्याचा शाप दिला. सरस्वती भडकली होतीच. तिनेही प्रतिशाप दिला गंगेला की जा, तू पण धरतीवर नदी बनून मृतदेह वाहा..
विष्णू आले, हा गोंधळ पाहिला, निस्तरायचा प्रयत्न केला. लक्ष्मी बनली तुळस, गंगा आणि सरस्वती नद्या बनून वाहू लागला, मात्र विष्णूच्या कृपेने पवित्र पापनाशिनी नद्या बनल्या.
तसेच विष्णुजींना साक्षात्कार झाला की फ़क्त लक्ष्मीच पत्नी बनून राहण्याच्या योग्यतेची आहे आणि तीच इथे वैकुंठात राहील. एकाहून अधिक बायका घरी असणे हानिकारक आहे.एकच बायको असली की पती सुखी राहतो.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{आटपाट नगरीत एक मराठी संस्थळ}

आटपाट नगरीत एक मराठी संस्थळ होतं. त्या संस्थळाचा मालक अतिशय चालु होता. बारा गावचे पिंपळ उजवून झाल्यावर शेवटी तो पुण्यनगरीत येवुन विसावला. येथे आंतरजालाच्या माध्यमातून त्याची एका सु-कन्येशी ओळख झाली. पहिले काही दिवस गेल्यानंतर त्या कन्येच्या लक्षात आले की या सदगृहस्थांनी आधी २२२२+ ठिकाणी शेण खाल्लेले आहे, त्यामुळे सात्विक संतापाचा उद्रेक होवून तिने संस्थळाच्या मालकाला शाप दिला की "जा, तुझे एका कजाग स्त्रीशी लग्न होइल", हतबद्ध आणि त्रस्त संस्थळ मालकाने रागाच्या भरात तिला प्रतिशाप दिला "जा, तुझेही एका बारा पिंपळावरच्या मुंजाशी लग्न होइल"

आता दोघेही सुखाने संसार करताहेत wink

{(विषय दिलेला नाही)}

Laughing out loud


... तुमचा अभिषेक

{ठ्ठो:}

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
हा वरिष्ठ* होता. विशल्याला काटा किर्रर्रर्र ची एक मिसळ जाहीर करण्यात येत आहे.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{कस्चं कस्चं}

कस्चं कस्चं Evil

{=))}

Laughing out loud =))

{या विशल्याने काय लिहले आहे}

या विशल्याने काय लिहले आहे दिसतच नाही आहे फक्त चौकोन चौकोन दिसत आहेत अ‍ॅडमीन कोण आहे आँ साईटचा... झोपा काढत आहे का तो..


something terribly wrong with this country, isn't there?

{(विषय दिलेला नाही)}

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud


----निवेदिता--------

{(विषय दिलेला नाही)}

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{(विषय दिलेला नाही)}

{गजेंद्रमोक्षाची कथा}

गजेंद्रमोक्षाच्या कथेचे एक व्हर्शन आहे त्यात विष्णूचे द्वारपाल असलेले जय-विजय परस्परांशी भांडले नि त्यांनी एकमेकांना अनुक्रमे 'नक्र' म्हणजे मगर नि हत्ती होण्याचा शाप दिला असे म्हटले जाते. एका क्षणी गंडक नदीत पाणी पिण्यास आलेल्या हत्तीचा पाय ही मगर पकडते नि तो झगडा अनेक युगं चालतो. अखेर विष्णुंना मध्यस्थी करून दोघांना मोक्ष द्यावा लागतो. (हे पं. महादेवशास्त्री जोशींच्या पुस्तकातले व्हर्शन. आणखी एक दोन व्हर्शन्स मधे मूळचे पुरूष वेगळे आहेत.)


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{मी दुसरे वर्शन वाचले आहे.}

मी दुसरे वर्शन वाचले आहे. इंद्रद्युम्न राजा आणि हुहू गंधर्वाची कथा. दोघांनाही वेगवेगळे शाप मिळतात आणि कर्मधर्मसंयोगाने नक्र-गज युद्ध होतं (म्हणजेच हे शापितजीव) आणि विष्णू यांना मुक्ती देतात.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{हे घ्या}

गजेंद्रमोक्षाचे जय-विजयाचे व्हर्शन शोधायला गेलो नि दुसरीच कथा हाती सापडली. गब्बरच्या मूळ धाग्याला सुसंगत अशी. इथे सनकाने जय-विजयांना शाप दिला पण विष्णूच्या आदेशाचे पालन केल्याचा हा परिणाम असून विष्णूने प्रतिशाप दिलेला नाही - कदाचित मूळ शाप त्याला स्वतःला दिलेला नसल्याने - फक्त आपली थोडी पावर वापरून तो शाप फक्त 'मॉडिफाय' करून दिला इतकेच. हास्य खुद्द ब्रह्मदेवानेही आपल्या पुत्रांवरील अन्यायाविरोधात सनकाला शापले नाही.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{शंकर नाही हो, सनकादि मुनींनी}

शंकर नाही हो, सनकादि मुनींनी शाप दिला होता.सनक, सनन्दन, सनातन, सनत्कुमार हे ते चार सनकादि , ब्रह्माचे मानसपुत्र ! वरती दिलेली कथाच तेवढी मला जय-विजय शापासंबंधी माहीत आहे. गजेंद्रमोक्षाची नाही. आपल्या पुराणांत प्रत्येक कथेचे वर्शन्स आहेत. त्यामुळे कोणतीही खरी माना. वांगीच आहेत ना, भरीत बनवून खानेसे मतलब.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{:)}

मी कुठे 'शंकर' लिहिले आहे. हास्य :) हास्य

(अरे हो तंद्रीत शंकरच लिहिले होते. दुरुस्त केले लगेच.)


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{मै तुलसी तेरे आंगन की....}

बाकी या शाप, उ:शाप, प्रतिशापाच्या भानगडी का कोण जाणे 'सेक्स'शी कशाकाय निगडित असतात ते समजायला पुराणात खोलवर डुबकी मारायला हवी केव्हातरी.

उदाहरणार्थ : ही वृंदा नावाची एक पतिव्रता स्त्री, जिच्या पुण्याईवर तिचा ऐतखाऊ आणि उग्र नवरा जालंधर उन्मत्त झाला होता म्हणे. इतका उन्मत्त की पठ्ठ्या चक्क पार्वतीवर डोळा ठेवता झाला {आधुनिक भाषेत "लाईन मारू" लागला]. हे शंकररावांना समजल्यावर त्यांचा नेहमीचा संतापी ट्रेडमार्क स्वभाव जागा झाला आणि त्यानी जालंधररावावर हल्लाबोल केला. पण वृंदेच्या पातिव्रत्याच्या ताकदीपुढे शंकराचे काही चालेना.

नेहमीप्रमाणे अडचणीच्यावेळी भगवान विष्णूकडे जाणे आले. विष्णू महोदयानी ओळखले की, वृंदाचे पातिव्रत्य भंग केल्याशिवाय जालंधरची शक्ती खच्ची होणार नाही. म्हणून मग विष्णूने जालंधरचेच मायावी रूप धारण करून वृंदेचा भोग घेतला....(काय पण आयडीया !!).

परक्या पुरुषाशी संग केला म्हणून तिच्या पावित्र्याच्या तेजात खंड झाला, जालंधरचा पराभव झाला....आपल्या शरीराचा परक्याने भोग घेतला म्हणून इकडे वृंदेने देहत्याग केला...पण मरण्यापूर्वी तिने विष्णूला 'तू दगड होशील' असा शाप दिला, तर त्यावर विष्णू महाराजांनीही तिला पुढील जन्मी तुला मानवयोनी मिळणार नाही असा प्रतिशाप दिला. तरीही तिच्या देहाचा आपण फसवून भोग घेतला याची टोचणी विष्णूच्या मनी होती म्हणून तो शाप त्यानी माईल्ड करून 'पण तू तुळसरुपाने पृथ्वीवर परत येशील' असा उ:शापही दिला.

...पुढे तो विष्णूरुपी दगड म्हणजे 'शाळीग्राम' आणि त्या दगडाचा विवाह तुळशीसोबत लावण्याचा प्रघातही पडला...तोच तुळशीविवाह.

ज्याना पटेल त्याना पटो, ज्याना नाही त्यानी पुराणातील वानगी पुराणातच ठीक म्हणून सोडून द्यावे.

अशोक पाटील

{:)}

ज्याना पटेल त्याना पटो, ज्याना नाही त्यानी पुराणातील वानगी पुराणातच ठीक म्हणून सोडून द्यावे.
हे बरोबर नाय हां. आम्ही बाह्या सरसावून आलो नि तुम्ही थेट पांढरे निशाण दाखवले. छ्या:


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{हे बरोबर नाय हां. आम्ही बाह्या सरसावून आलो नि तुम्ही थेट पांढरे }

हे बरोबर नाय हां. आम्ही बाह्या सरसावून आलो नि तुम्ही थेट पांढरे निशाण दाखवले. छ्या:

वोहीच बोल्या मैने.

की परपुरुषाशी संग केल्यावर तिचे बल्/तेज कमी झाले. पण परस्त्रीशी संग केल्याबद्दल त्या परपुरुषाचे मात्र बल कमी झाले नाही. काय हे !!!

खर्‍याची दुनिया हाय का ... खर्‍याची दुनिया ???


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{औ भौ .. गौतम ॠषींनी इंद्राला}

औ भौ .. गौतम ॠषींनी इंद्राला पण शाप दिला होताच की. हास्य मग शंकराने इंद्रावर दया दाखवून त्याला सहस्त्राक्ष केले.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{मी याबद्दल बोलत आहे}

मी याबद्दल बोलत आहे

अधोरेखित व बोल्ड भाग -

विष्णू महोदयानी ओळखले की, वृंदाचे पातिव्रत्य भंग केल्याशिवाय जालंधरची शक्ती खच्ची होणार नाही. म्हणून मग विष्णूने जालंधरचेच मायावी रूप धारण करून वृंदेचा भोग घेतला....(काय पण आयडीया !!).

परक्या पुरुषाशी संग केला म्हणून तिच्या पावित्र्याच्या तेजात खंड झाला, जालंधरचा पराभव झाला....आपल्या शरीराचा परक्याने भोग घेतला म्हणून इकडे वृंदेने देहत्याग केला..


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{अच्छा.. काय असतं ना.. फॉर अ}

अच्छा.. काय असतं ना.. फॉर अ ग्रेटर इन्टरेस्ट ऑफ मनकाइंड हे विष्णूजींनी केलं, त्यात त्यांचा स्वार्थी हेतू नव्हता, त्यांच्या विषयवासना चाळवलेल्या नव्हत्या म्हणून.. तरीही त्यांना शापदग्ध व्हावे लागलेच. दगड बनणे हा त्यांच्या तेजोभंगच की !
अवांतर :- ही भोग घेणारी कथा खरेच पुराणात आहे का अशी शंका आहे, कारण विष्णू इज ग्रेटर गॉड, त्रिमूत्रींपैकी एक, जबरदस्त भक्तसंप्रदाय असलेला. तो असल्या क्लृप्त्या वापरणार नाही. म्हणजे पुराणांत तसे ठळक लिहीलेले नसणार. पुराणे विष्णूविषयी असले बोल्ड स्टेटमेंट करू शकत नाही. इंद्राविषयी पुराणात लिहीलेले चालते, कारण तो वैदिक देव होता, त्याचे महत्त्व पुराण रचले त्या कालात संपत आले होते.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{मी किंचीत वेगळी कथा वाचली}

मी किंचीत वेगळी कथा वाचली आहे. विष्णू संभोग घेत नाहीत. वॄंदा व्रताला बसली असते. जालंधर आला हे बघून ती व्रत समाप्त करते, आणि तिकडे जालंधराला पुरवली जाणारी व्रताच्या ताकदीची रसद खंडित होते. देव त्याला हरवतात आणि मारतात. ती विष्णूला श्राप देते आणि सती जाते. विष्णू प्रायश्चित म्हणून त्या राखेतून तिला तुळसरूपात पुनर्जन्म देतात आणि सांगतात की हिचे पूजन करावे. माझ्या शालिग्राम रूपासोबत हिचे कार्तिक महिन्यात एकादशीला लग्न लावावे. आणि मला भोग चढवतांना ते तुळशीदळासोबतच चढवावे नाहीतर तो भोग मला लागणार नाही.
आपल्याकडे किती वर्शन्स आहेत ना पर्त्येक कथेचे !!


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{अरे लहान मुलांसाठी वेगळे}

अरे लहान मुलांसाठी वेगळे वर्जन असेल रे


something terribly wrong with this country, isn't there?

{नाही रे बाळा.. माझ्यापाशी}

नाही रे बाळा.. माझ्यापाशी गीताप्रेस गोरखपूर चे पुराणग्रंथ आहेत. लहान मुलांसाठीचे नाहीत तर अ‍ॅडल्ट वर्जन. संस्कृत + हिंदी हास्य


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{हा हा हा}

चुकलो. घाईत भलतेच वाचले. प्रकाटाआ.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{घाईत काय वाचले ? हवं तर व्यनि}

घाईत काय वाचले ? हवं तर व्यनि करा. आणि प्रकाटाआ म्हणजे काय ? मी हे बरेचदा वाचतो पण अजून याचा अर्थ माहीत नाही.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{प्रकाटाआ : प्रतिसाद काढून}

प्रकाटाआ : प्रतिसाद काढून टाकला आहे Cool

{वहूतेक् त्यांनी एक वेलांटी}

वहूतेक् त्यांनी एक वेलांटी जास्त वाचली wink


..............................................................

क्या फर्क पडता है?

{(विषय दिलेला नाही)}

Big smile


something terribly wrong with this country, isn't there?

{आपल्याकडे किती वर्शन्स आहेत ना पर्त्येक कथेचे !! }

आपल्याकडे किती वर्शन्स आहेत ना पर्त्येक कथेचे !!

प्रत्येक व्हर्जन एक नवीन ट्विस्ट आणतो. एक नवीन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट घुसडतो. व जुन्यातल्या एखाद्या प्रश्नाचे अर्धेमुर्धे उत्तर द्यायचा केविलवाणा यत्न करतो.

शेवटी सगळं खापर रिक्वायरमेंट च्या माणसावर फोडले जाते. पण तो ... दुसर्‍या प्रोजेक्ट वर गेलेला असतो.


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{अनेकविध रुपे}

राईट स्वामी संकेतानंद....जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि मग अशी पुराणातील पोथी उलगडणारीही आपापल्या मगदुराप्रमाणे त्या त्या कथेला आपल्याला पटेल असा भंडारा लावून भक्तांसमोर श्रवणासाठी ठेवतात.

सवतीमत्सर आपण मानवातच पाहतो. पण 'देवी'नाही तो असतोच असे प्रतिपादन करणार्‍या अनेकविध कथा पुराणात आहे. 'गंगा' शंकराच्या जटेत २४ तास मुक्काम करताना पाहून पार्वतीला तिचा मत्सर वाटायचा हे वाचल्यावर 'पार्वती' ही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुद्रुक वा खुर्द गावातीलच दळणीकांडप प्रोप्रायटर शंकरराव साळवीचीच बायको वाटू लागते.
मग पुढे तिने चलाखीने त्या 'गंगेला' शंकरापासून कसे अलग केले आणि नंतर संतापलेल्या गंगेने गोदावरीचे रूप कसे धारण केले इ.इ. कथाही तशी रोचक...पण त्याचीही अनेक व्हर्शन्स आहेतच.

@ रमताराम ~ पांढरे निशाण घेऊनच लिखाण करण्याचा विचार केला होता. अगोदरच तोंड धरले आहे, धड बोलता येत नाही, त्यात कशाला उगाच राळ उडवा....म्हणून.

अशोक पाटील

{आयला भन्नाट पावर आहेत एकेक..}

आयला भन्नाट पावर आहेत एकेक..

{अहिल्या आणि वृंदा}

मला समजत नाही की अहिल्या काय किंवा वृंदा काय या जर इतक्या पतिव्रता होत्या तर आपापले पती ओळखायला त्या कशा काय चुकल्या बाबा? आपापली पॉवर वापरून त्या हे सहज करू शकल्या असत्या. म्हणजे त्यांना अनुक्रमे दगड आणि तुळस व्हावं लागलं नसतं. एकूण काय की 'त्या' काळापासूनच स्त्री ही भोग्य वस्तू मानली गेली आहे. हे आदर्श आपल्याच देवांनी आणि ऋषी-मुनींनी घालून दिले आहेत. आता सामान्य माणसांच्या नावाने ओरडा होतो. कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेलं. आता कोणी असं केलं तर त्याला पोलीस पकडतात. म्हणूनच अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं. त्याला कृष्णाचा पाठिंबा होता. दुसर्‍यांच्या बायकांवर नजर ठेवायला यांना बाकी काही कामं नव्हती बहुतेक.


नीता आंबेगावकर

{>> मला समजत नाही की अहिल्या}

>> मला समजत नाही की अहिल्या काय किंवा वृंदा काय या जर इतक्या पतिव्रता होत्या तर आपापले पती ओळखायला त्या कशा काय चुकल्या बाबा? आपापली पॉवर वापरून त्या हे सहज करू शकल्या असत्या. म्हणजे त्यांना अनुक्रमे दगड आणि तुळस व्हावं लागलं नसतं. सब मोहमाया है नीताताई Cool

बाकी हे वाक्य एकूण काय की 'त्या' काळापासूनच स्त्री ही भोग्य वस्तू मानली गेली आहे. हे आदर्श आपल्याच देवांनी आणि ऋषी-मुनींनी घालून दिले आहेत. अगदी वेगळ्या विषयाला उगाचच हात घालणारं होउ शकतं..

{हि दोन्हीही पुराणातील गाजलेली}

<<<दुसर्‍यांच्या बायकांवर नजर ठेवायला यांना बाकी काही कामं नव्हती बहुतेक. >>>
हि दोन्हीही पुराणातील गाजलेली प्रेमप्रकरणे आहेत. इथे रुक्मिणी आणि सुभद्रा दोघींचीही सहमती होती म्हणूनच श्रीकृष्णाने किंवा अर्जुनाने त्यांचे हरण केले. आजच्या काळात देखील कोणी सज्ञान मुलगी एखाद्या मुलाबरोबर, व्यक्तीबरोबर अगदी म्हातार्‍याबरोबर जरी स्वखुशीने पळून गेली असेल तर पोलीसच काय कोणीच काहीही करु शकत नाही.
हा, उदाहरणच द्यायचे असेल तर भीष्माचे द्या. अंबा, अंबिका आणि अंबालिकेचे त्यांनी केलेले अपहरण चौकटीबाहेरचे होते. (अर्थात आता ते तसे आहे, त्याकाळी तेव्हाच्या नियमांनुसार कदाचित चालत असावे. अर्थात तरीही ते समर्थनीय ठरत नाही हे अलाहिदा)

{सहमत रुक्मिणीने कृष्णास}

सहमत रुक्मिणीने कृष्णास पत्रही लिहीले होते म्हणतात.


-पुण्याचे पेशवे

{दत्त}

@ नीता आंबेगावकर

"एकूण काय की 'त्या' काळापासूनच स्त्री ही भोग्य वस्तू मानली गेली आहे. हे आदर्श आपल्याच देवांनी आणि ऋषी-मुनींनी घालून दिले आहेत.'

~ होय. विशेष म्हणजे स्त्री भोग्य आहे आणि ती आपल्याला सहजी वश होते हे मानण्यात अन्य देव राहू देत, पण खुद्द ब्रह्मा विष्णू महेश ही टॉपरची त्रयीही मागे नव्हती. अत्रिमुनींची साध्वी पतिव्रता पत्नी अनुसया हीचे पावित्र्य भंग करण्यासाठी हे तिघेही मोठ्या आत्मविश्वासाने मुनींच्या आश्रमात वेष बदलून गेले आणि त्या देखण्या अनुसयेने 'आम्हास नग्न होऊन भोजन वाढावे' अशी वैषयिक मागणी केली....[ही कथा कित्येक ठिकाणी मुद्दाम सौम्य करून सांगितली जाते. ते योग्यही आहे....पण कोणत्याही रुपातील असो, तिन्ही देव तिचे पावित्र्य भंग करण्यासाठीच आले होते यात सहसा दुमत दिसत नाही]. पुढे त्या पतिव्रता अनुसयेने आपल्या तपाच्या बळावर ही तीन पाहुणे नेमकी कोण आहेत आणि कोणत्या कारणासाठी आपल्या आश्रमात आले आहेत हे ओळखले आणि त्या सिद्धीच्या जोरावर तिघानाही "बालक" करूनच मग स्तनपान करू दिले...इ.इ.

पुढे नारदाकडून लक्ष्मी, पार्वती, ब्राह्मणी या तिघींना आपले 'नवरोबा' कोणत्या महत्वाच्या कामगिरीवर पृथ्वीवर गेले आहेत याचा अहवाल मिळाल्यावर त्यानी अत्रिमुनींच्या आश्रमाकडे धाव घेतली तर बागेत ती तीन बाळे खेळत असल्याचे त्यांच्या नजरेस आले आणि मूळात ते कोण आहेत हेही समजल्यावर अनुसयेची करुणा भाकून त्याना मूळ रुप प्राप्त करून घेतले. या प्रसंगाची आठवण म्हणून मग तिन्ही देवतांचा अंश असलेल्या 'तीन शीरे, सहा हात....' अशा दत्ताचा जन्मही झाला.

दत्तजन्माची ही कथा जरी सती अनुसयेच्या पातिव्रत्याची महिमा सांगणारी असली तरीही तीन मुख्य देवतांचा 'स्त्री' कडे पाहण्याचा दृष्टीकोनही अधोरेखीत करते.

{शंका}

तिन्ही देव बाळे झाल्यावर त्यांचे मेंदु देखील बालकावस्थेतील होते की ते मात्र प्रौढावस्थेतील होते?


प्रकाश घाटपांडे
फलज्योतिष चिकित्सा मंडळ

{वाह}


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{बालकावस्थेतले होते.. बालक}

बालकावस्थेतले होते.. बालक म्हणजे अगदी १००% बालक बनवले होते,शरीर , मेंदू,वागणे बोलणे सगळेच. हास्य


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{- "एकूण काय की 'त्या'}

- "एकूण काय की 'त्या' काळापासूनच स्त्री ही भोग्य वस्तू मानली गेली आहे. हे आदर्श आपल्याच देवांनी आणि ऋषी-मुनींनी घालून दिले आहेत.'
---> यासंदर्भात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी अशी टिप्पणी केली आहे, की अतिप्राचीनकाळी अतिथीला आपली स्त्री अर्पण करणे हा धर्म मानला जात असे. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही संदर्भही दिले आहेत. पुढे ही पद्धत हळूहळू बाजूला पडली आणि निषेधार्ह मानली जाऊ लागली.
याच धर्माचा आधार घेऊन अहिल्येचा उपभोग इंद्राने घेतला, गौतमाने मात्र हे निषेधार्ह मानून (इंद्राला शाप द्यायच्या ऐवजी) फक्त अहिल्येलाच शाप देऊन बहिष्कृत केले.
अशाच प्रकारे वृंदा आणि विष्णूबाबत ऐकून लढणार्‍या जालंधराचे मन विचलीत झाले आणि एकाग्रता ढळल्यामुळे तो मारला गेला.

{इंद्राला पण शाप दिला होता.}

इंद्राला पण शाप दिला होता. त्याच्या शरीरावर सहस्त्र स्त्रीलिंग आलेत त्यामुळे.. मग काय, इंद्र गेला शंकराला शरण. शंकराने त्यांचे रूपांतर डोळ्यांत केले आणि इंद्र सहस्त्राक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{अहिल्या शिळा बनली आणि}

अहिल्या शिळा बनली आणि इंद्राच्या शरीरावर शापाने स्त्रीलिंगे आली, नंतर त्यांचे डोळे बनले ह्या कल्पना कथेत नंतर घुसडल्या गेल्या असाव्यात, असे माझे मत आहे.
कारण -
१. अहिल्येवर प्रत्यक्ष बहिष्कार लादला गेला होता, आणि रामाने तिला पावन मानून तिच्यावरचा बहिष्कार हटवून तिला पूर्वीचा सामाजिक दर्जा मिळवून दिला. तसा इंद्राला बहिष्काराचा सामना करायला लागल्याचे कुठे लिहिलेले दिसत नाही.
२. इंद्राच्या शरीरावर शापाने स्त्रीलिंगे आली, नंतर त्यांचे डोळे बनले, म्हणजे नेमके काय झाले ह्याचे आपण नीट स्पष्टीकरण देऊ शकत नाही.
३. यासंर्भात जे मला पटते, ते असे.... शापाच्या संदर्भात इंद्राला दोन नावांनी संबोधले गेले, भगेंद्र आणि सहस्त्राक्ष. भगेंद्र हे नाव आयुर्वेदात एका रोगाच्या संदर्भात वापरले जाते. एकतर इंद्राला असा काही रोग तीव्र प्रमाणात झाला असावा आणि त्याचा संबंध अहिल्येच्या केलेल्या फसवणुकीशी जोडला गेला असावा.

भगेंद्र ह्याच शब्दाचा दुरान्वयाने "अनेक स्त्रियांचा उपभोग घेणारा इंद्र" असही एक अर्थ लावता येईल.

सहस्त्राक्ष ह्या शब्दाचा अर्थ दुरान्वयाने "ज्याचे हेरांचे जाळे सर्वदूर पसरलेले असल्याने, कोणतीही गोष्ट ज्याच्यापासून लपून राहत नाही, असा" असाही लावता येतो.

कोणीतरी इंद्राला झालेला रोग हा त्याने अहिल्येची फसवणूक केल्याने त्याची शिक्षा म्हणून झाला अशी कल्पना केली असावी आणि त्यासंदर्भात शापाची कल्पना करून कथा लिहिली गेली असावी. नंतर त्यात उ:शापाचे कथानक जोडून त्यात इंद्राच्या सहस्त्राक्ष ह्या उपाधीचा वापर करून घेतला असावा. ह्यामुळे मूळ कथेची रंगत तर वाढलीच, पण बदलत्या नीतीनियमांच्या संकल्पनाही कथेच्या माध्यमातून पक्क्या करून घेतल्या असाव्यात, असे म्हणता येईल.

{सोप ऑपेरा }

गम्मत म्हणून ठीक आहे पण या असल्या पुराण कथा वाचण्यात कधीच मन रमले नाही. या सगळ्या सोप ऑपेरा टाईप स्टोर्या वाटतात. कुठलेही लॉजिक नसलेल्या उगाचच ताणून कुठेतरी नेलेल्या आणि कुणालातरी चीटकवलेल्या. या कथांमधली पात्रे देव असूच शकत नाहीत आणि ज्यांना आपण देव मानतो ते असे करू शकत नाहीत. तेव्हा हिंदू धर्माला या कथांपासून मुक्तीचा उ:शाप कधी मिळणार आहे हे 'ते देवच' जाणोत.

{वाचन प्रक्रियेतील दिवस}

प्रशांतजी ~

होते असे की, एखाद्याला एखाद्या विशिष्ट वयात वाचनाचे वेड लागते आणि ते लागले की समोर जे येईल ते अधाशासारखे स्वाहा करीत राहायचेच. कोल्हापुरात मी ज्या गल्लीत लहानाचा मोठा झालो तो भाग एकतर चित्रपटगृहांनी वा विविध प्रकारच्या छोट्यामोठ्या ग्रंथालयांनी [यात शासकीय आणि नगरपालिकेची ग्रंथालये आलीच...शहराच्या अगदी पोटातच राहतो होतो असे म्हटले तरी चालेल....] वेढलेला होता. सिनेमे ही त्या काळी न परवडणारी चैन होती आमच्यासारख्या कुटुंबाला, त्यामुळे बहुतांशी वेळ मग आजुबाजूच्या ग्रंथलयातच जायचा. गंमत म्हणजे तिथले सेवकही आमच्याच भागातील रहिवासी असल्याने अगदी वर्गणी भरूनच तेथील सेवा वा पुस्तके मिळत असेही नव्हते. केव्हाही जा, पुस्तक मिळायचेच. तशात दिशादिग्दर्शनासाठी नेमके कुणी त्यावेळी नसल्याने 'वाचन हाच माझा गुरु' म्हणून समोर दिसेल ते वाचायचे असा प्रघात पडला. त्यात शालेय वयात असल्याने रामायण महाभारत यांची आवड मनी वसणे साहजिकच. त्या अनुषंगाने मग सखोल वाचन करताना पुराणेही समोर येऊ लागली....अन् त्यावेळी ते योग्य की अयोग्य हा मुद्दा नव्हताच...त्या वयात ते शक्यही नव्हते.

अर्थात योग्य ती जाण आल्यानंतर त्या कथांतील फोलपणा प्रकर्षाने जाणवू लागल्याने तो रस्ता बंद जरी झाला असला तरी त्याच्या प्रतिमा आजही मेंदूत कुठेतरी कोरल्या गेल्या असल्याने अशा धाग्याच्या निमित्ताने त्या पुढे येत राहतात, इतकेच.

आता तुम्ही अपेक्षा करता तो हिंदू धर्माला 'उ:शाप' कधी लाभेल असे वाटत नाही. कारण आज २१ व्या शतकात जग विज्ञानाच्या भरार्‍या घेत मंगळ शुक्राकडे जाण्याची गोष्ट करीत असताना प्रिय भारतवर्षातील बंधूभगिनी साईबाबा, बालाजी, लालबाग, दगडूशेठ इथे बाराबारा तास पाळीत उभे राहतात हे पाहून आपण अजून बैलगाडीतूनच पुढे प्रवास करीत आहोत असे वाटण्याची स्थिती झाली आहे.

असो....जे राहतात ते का राहतात याचे 'प्रॉपर जस्टिफिकेशन' त्यांच्याकडे असल्याने त्याबाबतीत कुठलाही युक्तीवाद थिटाच पडतो.

अशोक पाटील

{कारण आज २१ व्या शतकात जग विज्ञानाच्या भरार्‍या घेत मंगळ शुक्राकड}

कारण आज २१ व्या शतकात जग विज्ञानाच्या भरार्‍या घेत मंगळ शुक्राकडे जाण्याची गोष्ट करीत असताना प्रिय भारतवर्षातील बंधूभगिनी साईबाबा, बालाजी, लालबाग, दगडूशेठ इथे बाराबारा तास पाळीत उभे राहतात हे पाहून आपण अजून बैलगाडीतूनच पुढे प्रवास करीत आहोत असे वाटण्याची स्थिती झाली आहे

अपुरी असेसमेंट.

त्याच भारत देशाने गेल्या आठवड्यात आंतरखंडीय प्रक्षेपणास्त्राची चाचणी केली. व तोच देश रिमोट सेन्सिंग मधे विश्वात अग्रगण्य आहे. (नंबर वन नसेलही पण....)

आता तुम्ही म्हणाल की ते इस्रो चे किंवा डीआरडीओ चे यश आहे. व सामान्य भारतीयाचा कल साईबाबा, बालाजी, लालबाग, दगडूशेठ यांकडेच आहे. त्यास उत्तर - सामान्य भारतीय मोबाईलही वापरतो (मोबाईल चे पेनिट्रेशन पहा). सामान्य भारतीय शिक्षणाप्रति जास्त सकारात्मक दृष्टीकोन बाळगून आहे. व त्याच सामान्य भारतीयाने प्रतिगामी विचाराच्या पक्षांना (उदा. भाजपा) होता होईल तेवढे सत्तेपासून दूर ठेवलेले आहे.

सबब मी भारतवर्षास एखादा उ:शाप देण्याचा विचार करत आहे. किंवा ... शापाच्या विरुद्ध काय असतं ? ... हां .... वरदान .... वरदान देण्याचा विचार करत आहे.


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{+१}

नंबर वन नसेलही पण....)
दुरुस्ती 'नंबर वन आहे'. अस्मितेचे पुजारी ही महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित ठेवतात कारण ही पुराणातली वानगी नाही. भारताचे दूरसंचार उपग्रह जगातील सर्वश्रेष्ठ मानले जातात. नासादेखील (हो संस्कृत ही श्रेष्ठ कम्पूटर भाषा, रामसेतू वगैरेचा नासाशी काऽऽही म्हणजे काऽऽही संबंध नाही असे मानणारे, मानणार्‍यांची टर उडवणारे आम्हीच हे लिहित आहोत) IRS च्या इमेजेस - ज्या ५x५ मीटर अ‍ॅक्युरसी देतात (जी जगात सर्वात जास्त आहे) आपल्या संशोधनात प्रमाण मानतात.

अवांतरः गंमत म्हणजे आपल्याच देशात IRS च्या इमेजेस या पैसे देऊन नि 'नॉईज अ‍ॅड करून' विकणार्‍या भारतीय संस्था NRSA ऐवजी आम्ही नासाच्या साईट्वरून मूळ इमेजेस डाउनलोड करून आमच्या जीआरएस च्या कोर्स मधे वापरल्या होत्या. पिकतं तिथं 'विकतं'.... इतरत्र फुकट मिळतं' अशी म्हण रूढ करावी की काय अशा विचारात होतो आम्ही. ही दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आजचे ठाऊक नाही.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{घ्या}

घ्या.

ररा, भारतवर्षाच्या ह्या यशाबद्दल भारतवर्षास काहीतरी वरदान द्या हो. निदान एखादा उ:शाप तरी द्या.


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{वरील प्रतिसादांसाठी ररा आणि}


वरील प्रतिसादांसाठी ररा आणि गब्बर या दोघांनाही वरदान देण्यार यावे असे मी स्वर्गातल्या देवांना आवाहन करतो. गब्बरजींना कुबेराने आणि ररांना कुमार कार्तिकेय ह्यांनी वरदान द्यावे , असा एक प्रपोजल लवकरच स्वर्गात धाडण्यात येईल.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{किती हल्कत}

उलट कनेक्शन जोडलं असतंस तर काय फासावर दिलं असतं होय तुला. तेवढेच म्हातारपणी चार पैसे हाती लागले असते तर पेन्शनची सोय झाली असती. तो कार्तिकेय काय देणार बोडखं. त्यातच बिचार्‍याला त्या पृथ्वीप्रदक्षिणेच्या बाबत बाप्पांनी गंडिवल्याने रुसलेला बिचारा.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{अहो भांडवलवाद्यांचा देव}

अहो भांडवलवाद्यांचा देव म्हणून कुबेर गब्बरभौसाठी आणि कार्तिकेयस्वामी ब्रह्मचारी म्हणून तुमच्यासाठी निवडले. योग्य देव निवडले की प्रस्ताव पारीत होण्याची शक्यता जास्त असते असा माझा अनुभव सांगतो. हास्य


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{कार्तिकेयाच्या बायका...}

कार्तिकस्वामीन दक्षिणेत जाउन सुंबडीत लग्न केल आहे अस दिसतय. ते देखील दोन दोन जणींशी...
हे पहा

तुमचा रामभाउंच्या बाबतीत काय अनुभव आहे?

{हो हो, ते मला माहीत आहे.}

हो हो, ते मला माहीत आहे. मुरुगनस्वामींना २ बायका असल्याचे दाखवले जाते. मी तसे चित्रसुद्धा पाहिले आहे. पण आपण दाक्षिणात्य मुरुगनस्वामींऐवजी इथे उत्तर भारतीय कुमार कार्तिकेय(एकदम कट्टर ब्रह्मचारी, आमच्याकडे कार्तिकेयच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेशही नसतो.) गृहीत धरले आहे.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{हे बघा}

आता या मुरुगनला बिचार्‍याला दोन दोन बायका म्हणजे शापच की, त्यानेच त्या बायांना तुम्हाला उत्तर भारतात नवरा मिळणार नाही नि कारण त्या 'एरिया'मधे आपुन बरमचारी राहनार हौ असा प्रतिशाप दिला असेल का?


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{अस की तस?}

अस म्हटल असेल की वाजपेयींसारख;
मैं अविवाहीत हूं ब्रम्हचारी नही आणि मग लोकांनीच बळबळच त्याच्यावर ब्रम्हचारी असल्याचा आरोप केला असेल.

{- आणि कार्तिकेयस्वामी}

- आणि कार्तिकेयस्वामी ब्रह्मचारी म्हणून तुमच्यासाठी निवडले.
--> कार्तिकेय उर्फ स्कंदाचा देवसेना नामक स्त्रीशी विवाह झाल्याचा उल्लेख महाभारतात आहे. मग कार्तिकेय ब्रह्मचारी असल्याची कल्पना कुठून आली असावी?

{माहीत नाही नेमके.. ह्याचे}

माहीत नाही नेमके.. ह्याचे उत्तर कार्तिकेय स्वतःच शोधत असेल. wink
उत्तरमहाभारत कालात कदाचित ही कल्पना जन्माला आली असावी.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{उलट कनेक्शन जोडलं असतंस तर काय फासावर दिलं असतं होय तुला}

उलट कनेक्शन जोडलं असतंस तर काय फासावर दिलं असतं होय तुला

उलट कनेक्शन म्हंजे गब्बर कडून कुबेरास वरदान व ररांकडून कार्तिकेयास वरदान मिळावे असे मला वाटते.


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{गब्बर भाऊ, हे सर्व अजून}

गब्बर भाऊ, हे सर्व अजून उ:शापाच्या (antidote)च्याच पातळीवर आहे त्याचे वरदानात रुपांतर व्हायला अजून बराच वेळ जाईल.

विचार करून करून देखील मुलभूत संशोधनाच्या क्षेत्रात इस्रो च्या पलीकडे मजल जात नाही. मोबाईल वगैरेचे उदाहरण अप्रस्तुत आहे कारण आपण यातले केवळ ग्राहक आहोत जसे सर्वच आफ्रिकन देखील आहेत. जसा आपण टीव्ही घेतो तसा मोबाईल घेतो. यात आपले मुलभूत योगदान काहीच नाही सर्वच आयात मामला.
१९१२ साली दादासाहेब फाळकेंनी पहिला मुव्ही कॅमेरा भारतात आणला. १०० वर्षानंतर देखील आपण हा कॅमेरा आयताच करतोय. साधा स्टील कॅमेरा देखील आपल्या कडे अजून बनत नाही.

मुलभूत संशोधन आणि त्यावर आधारित ओद्योगिक उत्पादन या बाबतीत आपण अजूनही मोठ्ठे शून्य आहोत. उत्पादन क्षेत्राचे सोडा पण आय टी मध्ये महासत्ता म्हणवणार्या भारतात सर्व भर बॉडी शॉपिंगवरच आहे. मुलभूत संशोधन करून आपण किती सोफ्टवेअर जागतिक बाजारात उतरवले आहेत?

१२० कोटीच्या या देशात सी व्ही रामन व्यतिरिक्त (ते हि १९३० मध्ये) कुणालाही शास्त्रात नोबेल मिळालेले नाही. इतर तीन चार नावे केवळ म्हणायला भारतीय आहेत. याचाच अर्थ दैववादाच्या शापातून आपल्याला अजून मुक्ती मिळालेली नाही फार तर उ:शापाची स्टेज सुरु आहे. जेंव्हा बहुसंख्य भारतीय निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाची आस धरतील तेंव्हाच त्याचे रुपांतर वरदानात होईल.

{भक्तीचेहि पोलरायाझेशन}

अशोक भाऊ या भक्तीचेहि पोलरायाझेशन होतंय असे वाटतंय. म्हणजे पूर्वी ज्या रामाच्या, शंकराच्या देवळात बर्याचवेळा जायचो ती मंदिरे आता ओस पडलेली दिसतात. आता साईबाबा, विविध गणेश, झालेच तर शनी मंदिरे, बालाजी इथे लोकांची गर्दी वाढती दिसते.
देवस्थानातील गर्दी वाढण्यामागे दळण वळणाची साधने वाढल्याचा आणि पर्यटनाची हौस वाढल्याचा देखील परिणाम आहेच.

बरे हि भक्ती कमी बिझनेस जास्त. म्हणजे जर एखादा देव नवसाला पावत असेल तर तिथे तुडुंब गर्दी होते. बरे हा सुद्धा उधारीचा मामला आधी मला दे मग मी हे करेन अथवा देईन ( ते हि % मध्ये) मला हे १०० कोटीचे काम मिळूदेत मी सोन्याचा मुकुट अथवा सिंहासन ( बजेट २ कोटी) देईन वगैरे. हल्ली तर एखाद्या देवाला बिझनेस पार्टनर म्हणूनच डायरेक्ट घेतात. म्हणजे माझा हा बिझनेस चालव म्हणजे तुला काबुल केलेले ५% देईन. अगदी स्वच्ह पारदर्शी व्यवहार !! याचे कारण परत या पुराण कथाच. देवांना माणसाच्या पातळीवर आणलेले, या न त्या मार्गाने सतत खुश केलेले आपण वाचलेलेच असते तेच मनात घट्ट रुजलेले असते.

बाकी भक्ती वाढलीये असे मला म्हणवत नाही. ज्या घरांत रोज दिवा लावला जायचा, तासान तास पूजा व्हायच्या, व्रत वैकल्ये व्हायची त्या घरांत आज आठवडा आठवडा देव्हारा सुद्धा साफ होत नाही, कधी फुले वाहिली जात नाही. तुळशी वृंदावन म्हणजे काय असते रे भाऊ म्हणायची वेळ आलीये. गुढी म्हणजे काय तरे माहित नाही. जिथे मराठी माध्यमात शिकलेली मुले आहेत ते काही तरी श्लोक वगैरे म्हणतात/माहित असतात. मुले इंग्रजी माध्यमात शिकलेली असतील आणि घराचे कर्मठ नसतील तर सगळाच आनंद असतो.

{@ अशोक पाटील सती अनसूयेला}

@ अशोक पाटील

सती अनसूयेला (अनुसया नव्हे, जिला असूया नाही ती अ नसूया) जे जमले ते अहिल्या आणि वृंदाला का जमले नाही कोण जाणे.

>आज २१ व्या शतकात जग विज्ञानाच्या भरार्‍या घेत मंगळ शुक्राकडे जाण्याची गोष्ट करीत असताना प्रिय भारतवर्षातील बंधूभगिनी साईबाबा, बालाजी, लालबाग, दगडूशेठ इथे बाराबारा तास पाळीत उभे राहतात हे पाहून आपण अजून बैलगाडीतूनच पुढे प्रवास करीत आहोत असे वाटण्याची स्थिती झाली आहे.<

हे पण खरे आहे. आपण विज्ञानात प्रगती करतो आहोत. पण तरीही वडाला प्रदक्षिणा घालणार्‍या भगिनी काही कमी नाहीत. वडच काय पण कोणत्याही झाडाला प्रदक्षिणा घातल्याने नवर्‍याचे आयुष्य कसे काय वाढते हे मला कधीच समजले नाही. त्यामुळे मी ते करत नाही. याच्या मागे काही शास्त्रीय कारण असू शकेल का?


नीता आंबेगावकर

{अनुसया....अनसूया}

अनुसया की अनसूया ? तुम्ही केलेला खुलासा पटत आहेच, पण या संदर्भात मी तो प्रतिसाद लिहिण्यापूर्वी काही संदर्भ पाहात होतो त्यावेळी असेही पाहण्यात आले की या पतिव्रतेच्या आयुष्यावर दोन हिंदी चित्रपट निघाले होते...सन १९२२ व सन १९७४ मध्ये. दोन्हीची टायटल्स "सती अनुसया" अशीच दिसतात....इंग्रजीत त्यांची ओळख करून देतानाही Sati Anusaya-1922 असेच टंकले गेल्याचे दिसत आहे.

असो.

अशोक पाटील

{'अनसूया' हेच योग्य नाव आहे.}

'अनसूया' हेच योग्य नाव आहे. अनुसया हे अज्ञानवश झालेले अपभ्रंश आहे. संस्कृत ग्रंथांत 'अनसूया' हेच नाव आहे.


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{मी म्हणतो नावात काय}

मी म्हणतो नावात काय आहे?
मुद्दा महत्त्वाचा की नाव?


something terribly wrong with this country, isn't there?

{वडच काय पण कोणत्याही झाडाला प्रदक्षिणा घातल्याने नवर्‍याचे आयुष्}

वडच काय पण कोणत्याही झाडाला प्रदक्षिणा घातल्याने नवर्‍याचे आयुष्य कसे काय वाढते हे मला कधीच समजले नाही. त्यामुळे मी ते करत नाही. याच्या मागे काही शास्त्रीय कारण असू शकेल का?

त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नसल्याचे सिद्ध झाल्यास त्या सर्व स्त्रियांना एक उ:शाप देऊन टाका - की तुम्ही या जाचक चालीरीतीतून/रूढीतून लवकर मोकळ्या व्हाव्यात.

आणि समस्त पुरुष वर्गास शाप द्या की - कमीतकमी ५० वर्षे पिंपळ सत्यवान केल्याशिवाय पुरुषांपैकी कोणासही मोक्ष मिळणार नाही.


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{>>त्यामागे कोणतेही शास्त्रीय}

>>त्यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नसल्याचे सिद्ध झाल्यास त्या सर्व स्त्रियांना एक उ:शाप देऊन टाका - की तुम्ही या जाचक चालीरीतीतून/रूढीतून लवकर मोकळ्या व्हाव्यात.

क्या बात है! आवडलं!


something terribly wrong with this country, isn't there?

{वडाला प्रदक्षिणा घालण्यामागे}

वडाला प्रदक्षिणा घालण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे कल्पना नाही पण माझी आजी सांगायची की, आपल्याकडे जे पण सण आहेत ज्यामधे प्रामुख्याने बायकांचा समावेश आहे ते सगळे ह्याकरता लावले गेले की, आधीच्या काळात बायकांची लग्न अगदी लहान वयात करून तिला सासरी धाडलं जायचं त्यानंतर मग घरातली कामं, नंतर होणारी पोरं ह्यातुन त्यांना स्वतःसाठी कधी वेळ मिळायचा नाही. मग अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना दुस-या चार बायकांमधे मिसळता यायचं, त्यांना भेटून गप्पा-गाणी-खेळ अशी दोन घटका करमणूक करता यायची, मुख्य म्हणजे स्वयंपाकघरातून बाहेरच्या दुनियेत जाता यायचं..

माझी आजी अजुन एक मजा अशी सांगते की, आधीच्या काळी स्त्रीया नव-याच्या ताटात का जेवायच्या तर, सासू ही ९९.९९% खाष्ट असायची जिला वाटायचं की आपल्या सुनेने चांगलं-चुंगलं,दुध-तूप खाऊ नये..म्हणून मग नवरे काय करायचे की, ताटात खुप वाढून घ्यायचं आणि बायकोसाठी राहू द्यायचं..तर आपल्याकडे ज्या पण पध्दती आहेत त्या सगळ्याच पुराण-पोथ्यांमधून नाही तर अशा काही सवयींमधून पण पुढे आल्या आहेत.

{विचार पटण्याजोगे आहेत तुझ्या}

विचार पटण्याजोगे आहेत तुझ्या आज्जीचे.

* यावरून आठवले ते मुली आधीच्या काळात काही तरी हदगा इत्यादी खेळायच्या... कोणाला आठवत असतील तर त्या हदगाची गाणी मीमवर येऊ द्या.


something terribly wrong with this country, isn't there?

{आधीच्या काळी स्त्रीया नव-याच्या ताटात का जेवायच्या तर, सासू ही ९}

आधीच्या काळी स्त्रीया नव-याच्या ताटात का जेवायच्या तर, सासू ही ९९.९९% खाष्ट असायची जिला वाटायचं की आपल्या सुनेने चांगलं-चुंगलं,दुध-तूप खाऊ नये..

ती सून खाष्ट सासूच्या तावडीतून मुक्त झाल्यावर स्वतः खाष्ट व्हायची व आपल्या सुनेचा जाच करायची ??? त्याशिवाय हे ९९.९९% चे लॉजिक काम करणार नाही.

पुराणात एखाद्या स्त्री ने आपल्या खाष्ट सासूस शाप दिल्याची कथा आहे का एखादी ?


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{छान चर्चा ..वाचतो आहे !}

छान चर्चा ..वाचतो आहे !

{वडाची पूजा}

@ प्रियंका

तुम्॑चे बरोबर आहे. पूर्वीच्या काळी सासुरवाशिणींना बाहेर पडायला निमित्त या सणांमुळेच मिळायची. पण आताच्या स्त्रीचे काय? ती आज का वडाला फेर्‍या घालते? बरं गंमत अशी की हा उपास २४ तासाचा असतो. पण आजकाल तो संध्याकाळी सोडणार्‍या स्त्रिया माझ्या बघण्यात आहेत. आता मुद्दा हा उरतो की अर्धा उपास आपण आपल्या सोयीने करतो. म्हणजे पूर्ण नाही केला तरी चालतो हा शोध कोणी लावला? त्यापेक्षा करूच नये ना! आपल्या पूर्वजांनी काही कारणाने हे लावून दिले आहे. मग पाळायचे तर पूर्ण पाळा नाहीतर अजिबात पाळू नका. आणखी एक. तुम्ही म्हणता त्या कारणाबरोबरच हे पाळायचे आणखी कारण म्हणजे देवाच्या नावाने तरी लोकं काही उपास तापास करतील ही भावना होती. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न उष्टवायचे नाही हा संकेत का होता की संयम. समोर सुग्रास अन्न आले तरी खायखाय करायची नाही. समोर ताट येईपर्यंत थांबायचे. पण आमच्या सासूबाई ४ भजी, एक चपाती या प्रमाणात सगळे पदार्थ थोडे थोडे काढून ठेवायच्या आणि मुलांना (म्हणजे त्यांच्या मुलांना, आमच्या नवर्‍यांना) खायला परवानगी द्यायच्या. काय म्हणाल याला?


नीता आंबेगावकर

{पॉम पॉम}

आमची रिक्शा रांगेत लावतो आहे. नरोटीची उपासना हा गतवर्षी नागपंचमीच्या मुहूर्तावर लिहिलेला लेख.
अर्थात या चर्चेत शाप-उ:शापाचा काही संबंध नाही, कर्मकांडांबाबत आहे हा.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{आता मुद्दा हा उरतो की अर्धा}

आता मुद्दा हा उरतो की अर्धा उपास आपण आपल्या सोयीने करतो. म्हणजे पूर्ण नाही केला तरी चालतो हा शोध कोणी लावला? त्यापेक्षा करूच नये ना!
बरोबर आहे नीता तुमचं. जी गोष्ट आपल्याला मनापासून पटते तीच करावी असं माझं मत आहे. त्यामुळे मी स्वतःदेखिल वटसावित्रीचा उपवास करत नाही आणि माझ्या नवर्‍यालाही त्यावर काहीच आक्षेप नाही, कारण जेव्हा मी त्याला माझा दृष्टीकोन समजावून दिला तेव्हा त्यालाही तो पटला.

तुम्ही नुसतेच १७६० उपवास करणार, वडाला फेर्‍या मारणार, देव्-देव करणार, पण नवरा-बायको म्हणून एकमेकांना समजूनच नाही घेणार, मग त्यामुळे सतत भांडणं, वादविवाद होणार, एकमेकांचे अपमान करणार, सतत एकमेकांवर डूख धरुन बसणार आणि मग रडणार की "आम्ही एव्हढे उपवास करतो, पण त्याचं फळ काही मिळतच नाही." हे चूकीचं आहे. ज्या नवर्‍यासाठी तुम्ही हे करताय त्याच्याबरोबर किती बायका स्वतःचे views share करतात? आपल्या येणार्‍या अडचणींची चर्चा करतात? उत्तर ५०% असेल.

नुसते उपवास करुन वडाला फेर्‍या मारण्यापेक्षा आपलं नातं आपण कसं मजबूत करु शकतो, ते आणखी कसं फुलवू शकतो ह्यावर जर बायकांनी थोडा विचार केला, तर त्यांचा संसार नक्कीच सुखाचा होईल.


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{परिजा ताई, आणखी एक. समजा}

परिजा ताई, आणखी एक. समजा वडाला फेर्‍या घालून खरोखरच सात जन्म हाच नवरा मिळत असेल तर कठीणच आहे की नाही? मला मात्र चेंज हवा आहे. ज्या नवर्‍याबरोबर एक जन्म निभत नाही त्याच्याशी सात जन्म? त्यालाही बिचार्‍याला चेंज हवाच असेल की नाही?


नीता आंबेगावकर

{त्यालाही बिचार्‍याला चेंज हवाच असेल की नाही?}

समजा वडाला फेर्‍या घालून खरोखरच सात जन्म हाच नवरा मिळत असेल तर कठीणच आहे की नाही? मला मात्र चेंज हवा आहे. ज्या नवर्‍याबरोबर एक जन्म निभत नाही त्याच्याशी सात जन्म? त्यालाही बिचार्‍याला चेंज हवाच असेल की नाही?

थोडक्यात हे गाणं तुम्हास आवडत नाही म्हणा की - हास्य

---


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{गाणी खूप आवडतात हो ऐकायला.}

गाणी खूप आवडतात हो ऐकायला. ऐकून सोडून द्यायचं. पडद्यावर हे गाणं सादर करणारी बबीता स्वतःच नवर्‍यापासून वेगळी रहाते दोन मुलींना घेऊन.


नीता आंबेगावकर