मी मराठीची उद्दिष्टे धोरणे व ध्येय

मी मराठी हे संकेतस्थळ ( ह्यापुढे ह्याचा उल्लेख मीम असा होईल) मराठीचा प्रसार व प्रचार करणे, सदस्यांना अभिव्यक्ती करता व्यासपीठ मिळवून देणे व सदस्यांना आपापसात संवाद साधण्याची सुविधा पुरवणे ह्यासाठी आहे. मीमच्या कार्य पध्दती व वापरा संबधातील धोरणे व नियमावली अशी ;

१. मीम हे संकेतस्थळ खाजगी मालकीने नोंदणीकृत झालेले आहे परंतु ह्याचे मालकी हक्क बदलणे, हस्तांतरीत करणे, ते चालवण्यास देणे, भागिदारी करणे, त्याचे आर्थिक व्यवहार ह्या बाबतचे सर्वाधिकार ह्याच्या नोंदणीकृत मालकाकडेच राहतील.

*****

२. मीम हे कोणतीही व्यक्ती, पक्ष अथवा संघटना ह्यांचे मुखपत्र म्हणून काम करणार नाही.

*****

३. मीम च्या सुविधेचा वापर करण्याचे अधिकार त्याच्या नोंदणीकृत सभासदांना असतील. सभासदत्वाची नोंदणी मीमची धोरणे व नियम मान्य केल्याची खात्री पटवून दिल्या नंतरच होईल. ह्या धोरणे व नियमांचे पालन करणे हे ही ती अस्तित्वात येण्यापुर्वी नोंदणीकृत झालेल्या सभासदांना बंधनकारक राहिल.

*****

४. सभासदत्व नोंदणी करताना सभासदाने मीमला दिलेली माहीती सत्य आहे ह्याची संपुर्ण कायदेशीर जबाबदारी त्या सभासदाची राहील, सभासदाचे किमान वय १८ वर्षे पुर्ण असणे अनिवार्य राहिल. संकेतस्थळाने सभासदत्व देताना अथवा त्यानंतर वेळोवेळी मागवलेली माहीती पुरवणे सदस्यास बंधनकारक राहिल.

*****
५. नोंदणीकृत सभासदाचे सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याचे अधिकार संकेतस्थळाकडे राहतील. सभासदत्व खालील परिस्थीती मध्ये स्थगित अथवा रद्द होऊ शकते.

५.१ संकेतस्थळाची ध्येय, धोरणे, उद्दिष्ठे व नियम ह्यांच्याशी विसंगत असे कोणते ही वर्तन करणे.

५.१ / अ मी मराठी ह्या संकेतस्थळाची निर्मिती उत्तमोत्तम मराठी साहित्याला आणि नव्या लेखकांना एक लेखनमंच तसेच त्यांच्या कष्टांचे कौतुक व्हावे ह्या हेतुने झाली आहे. तसेच मी मराठी संकेतस्थळ हे इतर बाकीच्या संकेतस्थळांशी खेळीमेळीचे वातावरण कायम ठेऊन आपापसात सुसंवाद कायम रहावा ह्यासाठीच नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे/राहिल. ह्याच अनुषंगाने इथुन पुढे मी मराठी ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळावरील चर्चा/वाद्/विसंवाद/मतभेद आदी बाबींचा संदर्भ घेऊन त्याची टिप्पणी इथे करणे व इथे त्यावरुन वादंग माजवणे ह्याला मनाई राहिल. ह्याच धोरणाला अनुसरुन इतर संकेतस्थळावरचे अनावश्यक संदर्भ असलेले प्रतिसाद त्वरित अप्रकाशित करण्यात येतील अशा घोषणा इथे मी मराठी व्यवस्थापन करत आहे. सदर नियम "खरडफलक" ह्या मंचावरही लागु राहिल.

५.१ / ब एखाद्या सदस्याकडुन वारंवार सदर गोष्टी घडत असतील तर त्याला जाब विचारण्यात येऊन मी मराठी व्यवस्थापन सदर सदस्याच्या सदस्यत्वाविषयी गंभीर विचार करेल.

५.२ सभासदत्व घेताना दिलेली कोणतीही माहीती खोटी अथवा चुकीची आहे हे सिध्द झाले.

५.३ सभासदाने अन्य सभासद / वाचक अथवा अन्य कोणीही सन्मानीय व्यक्ती, पक्ष, संघटना, जाती, धर्म, विविध धर्मातील देव देवता, भारताची राज्य घटना, राष्ट्रगीत, राष्ट्राची मान चिन्हे, राष्ट्र ध्वज, राष्ट्र पुरुष, श्रध्दा व संकेतस्थळ (मीम) ह्याबाबत उपमर्दकारक, अवमानकारक अथवा द्वेषमुलक किंवा भावना भडकवणारे अथवा चिथावणी देणारे, अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचे उदात्तीकरण करणारे, लिखाण केल्यास अथवा अश्या प्रकारचे कोणतेही कृत्य केल्यास अथवा अश्या कृत्यांना प्रोत्साहन दिल्यास.

५.४ सदस्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास. अथवा अन्य सदस्यांना खोटी आश्वासने देऊन अथवा भुलथापा मारुन फसवणूक अथवा आर्थिक गैरव्यवहार केल्यास.

५.५ स्त्री सदस्यांशी सामाजिक संकेत व सभ्यता यांना धरून नसणारे संभाषण , वा अन्य कोणत्याही प्रकारे गैरवर्तन केल्यास अथवा त्यांच्या भावना दुखावतील असे कृत्य केल्यास त्या संबधीत स्त्री सदस्यांने सबळ पुरावे दिल्यावर कोणतीही चौकशी न करता सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याचे सर्व अधिकार संकेतस्थळाचे असतील.

५.६ सदस्याने देश/ राष्ट्रद्रोही वा प्रक्षोभक विधानाच्या योगे कोणत्याही प्रकारे हिंसाचारास उत्येजन अथवा प्रोत्साहन मिळेल असे विधान अथवा वर्तन केल्यास.

*****

६. संकेतस्थळावर सदस्यांने सादर केलेले लिखाण / छायाचित्रे / नकाशे / प्रतिक्रिया / प्रतिसाद / खरडी / व्यक्तीगत निरोप / कविता ह्या प्रकारचे लिखाण व अन्य कोणत्याही प्रकारचे लिखाण अथवा कोणत्याही प्रकारे सादर केलेली माहीती ( ह्यापुढे ह्याला साहित्य असे संबोधले जाईल) या बाबत;

६.१ सदस्यांने सादर / प्रकाशीत केलेल्या साहित्याच्या सत्यतेची संपुर्ण जबाबदारी सदस्याची असेल व ह्याबाबत मीम जबाबदार नसेल.

६.२ सदस्यांनी सदर केलेले साहित्याचे मुद्रण अथवा पुर्नमुद्रण / कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क स्दस्यांचे व केवळ त्या सदस्यांचे असणे आवश्यक आहे, तसे नसल्यास ते हक्क हस्तांतरित केलेले असणे आवश्यक आहे, ही जबाबदारी सदस्यांची असेल व ह्यासाठी मीम जबाबदार राहणार नाही.

६.३ सदस्यांचे साहित्य संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर सर्व मुद्रणाधिकार / प्रतीअधिकार/ पुर्नमुद्रण अधिकार आदी सर्व अधिकार त्या सभासदाचेच राहतील.

६.४ संकेतस्थळावर प्रसिध्द अथवा प्रकाशीत केलेल्या साहित्यामुळे होणार्‍या कायदेशीर परिणामाची जबाबदरी संबधीत सभासदाची असेल. ह्या बाबत संकेतस्थळाची कुठल्याही प्रकारे जबाबदारी नसेल.

६.५ सभासदत्व रद्द अथवा स्थगित झाल्यावर संकेतस्थळावरील साहित्य मिळवण्याचा सभासदाचा अधिकार ही रद्द अथवा स्थगित करण्यात येईल.

६.६ सभासदांचे वरील सर्व अधिकार लक्ष्यात घेऊन सुध्दा कोणतेही आक्षेपार्ह साहित्य कोणत्याही आणी संबधीत सभासदाला न विचारता अप्रकाशीत करण्याचे अधिकार मीमचे राहतील व ह्या बाबतची कार्य पध्दती निश्चित करण्याचे व तिच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार मीमचे असतील.

६.७ एखाद्या सदस्याचे सदसत्व जर रद्द अथवा स्थगित झाले तर त्याने प्रकाशीत केलेले साहित्य संकेतस्थळावर तसेच राहील. व सदस्यांने केलेल्या सुचनांचा विचार केला जाईल.

*****

७. मीमची मांडणी त्यावर वापरण्यात येणारी प्रणाली / मोड्युअल / स्क्रिप्ट / तांत्रिक व अन्य सुविधा वाढवण्याचे अथवा बंद करण्याचे सर्व अधिकार मीम कडेच राहतील. तसेच मीमवर सध्या वापरण्यात आलेल्या पायाभुत सुविधा व सभासदांसाठी असलेल्या सुविधा सध्या गमभन, ड्रुपल व ड्रुपल मोड्युल्स ग्रुप ह्यांच्या सौजन्याने पुरवण्यात येत आहेत ह्याची नोंद घ्यावी.

*****

८. मीमच्या सर्व सदस्यांकरता सर्व स्थानिक कायदे बंधनकारक असतील. सदस्यानी दिलेली माहिती पोलिसांनी कुठल्याही तपासाकरता मागितल्यास पुरवण्यास संकेतस्थळ बांधिल आहे.

*****

९. ह्या संकेतस्थळाचा वापर सदस्यांनी त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर करावयाचा असून कुठल्याही प्रकारच्या नुकसानीला / तोट्याला / अडचणीला मीम जबाबदार असणार नाही. संकेतस्थळावर पुरवण्यात आलेल्या सर्व सुविधा as is, where is बेसिस वर पुरवण्यात येतील.

*****

१०. तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळावरील साहित्य नष्ट झाल्यास, गहाळ झाल्यास, गायब झाल्यास अथवा त्याचे विकृतीकरण झाल्यास मीम जबाबदार राहणार नाही, तसेच संकेतस्थळावरील ताण नियंत्रित करण्यासाठी साहित्य अथवा माहिती नष्ट करण्याचे अथवा खोडण्याचे सर्व अधिकार मीमकडे राहतील, शक्यतो असा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी सदस्यांना सुचना देण्याचा प्रयत्न केला जाईल.

*****

११. मीमवर साहित्य प्रकाशीत करताना सदस्यांने अन्य संकेतस्थळे / स्रोत / प्रणाली / दुवे ह्याचा वापर केल्यास तो वापर संबधीत सदस्य व संबधीत संकेतस्थळ / प्रणाली / स्त्रोत्र / दुवे ह्यांचे मालक ह्यांच्यातील संबधानूसार असेल त्यासाठी मीम जबाबदार नाही.

*****
१२. वरील पैकी कोणतेही धोरण / नियम एखाद्या विवक्षित स्थळी बेकायदा ठरत असल्यास तेवढा भाग वगळता ऊर्वरित सर्व भाग सदस्यांना बंधनकारक राहील.

*****

१३. मीम व सदस्य ह्यांच्यातील संबध हे चिक्कोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक, भारत येथे अस्तित्वात असलेल्या व भविष्यात जस जसे अस्तित्वात येतील तस तसे कायद्याच्या आधिन असून सभासदत्व व अन्य संदर्भातील सर्व कायदेशीर प्रकरणे तेथील स्थानिक न्यायालयाच्या कार्य कक्षे खाली येतील.

*****

१४. मीम च्या मालकीचे ट्रेडमार्क / लोगो / बोधचिन्हे व सुविधा ह्यांचे सर्वाधिकार संकेतस्थळाकडे राहतील व त्यांचा गैर वापरा करता कायदेशीर कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार मीमचेच राहतील.

*****

१५. मीमच्या नोंदणीकृत सभासदाला स्वतःचे साहित्य प्रकाशीत करणे व अन्य सभासदांशी संपर्क साधणे, परस्पर सहकार्याचे, सामजंसाचे व विश्वासाचे वातावरण पुरवणे व त्यासाठी योग्य त्या सोई पुरवणे ह्याची हमी मीम देते.

*****

१६. मीमचा सदस्यांशी असलेले सहकार्य व सामजंस्य खालील परिस्थीत बंद होऊ शकते;

*****
१६.१ सदस्यांचे सभासदस्त्व स्थगित अथवा रद्द झाल्यास.

१६.२ सदस्यांने सभासदत्व रद्द / बंद केल्यास.

१६.३ सदस्यांने सभासदत्व रद्द अथवा स्थगित करण्याची विनंती केल्यास.

१६.४ मीमला तात्पुरती अथवा कायमस्वरुपी हानी झाल्यास.

१६.५ मीमचे मालकी हक्कांची विक्री / हस्तांतरण / भागीदारी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे बदल झाल्यास.

१६.६ कोणत्याही कारणाने मीम बंद पडल्यास.

१६.७ मीम व्यवस्थापनाला सदस्याची खरी ओळख न समजणे किंवा सदस्यांने खरी ओळख देण्यास नकार दिल्यास.

*****

१७. वरील सर्व नियम व धोरणे लक्ष्यात घेऊन व त्याचा मतीतार्थ ध्यानात ठेऊन देखील मीमची ध्येय, उद्दिष्टे व नियम कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही व कोणत्याही प्रकारे बदलण्याचे हक्क मीम व्यवस्थापनाचे राहतील.

*****

धन्यवाद.
मी मराठी.नेट
व्यवस्थापक
www.mimarathi.net
www.sahityayatri.com
bloggers.mimarathi.net
hosting.mimarathi.net

मीमराठी.नेटचा मीमराठी.टीव्ही (www.mimarathi.tv) यांच्याशी कसलाही संबध नाही याची नोंद घ्यावी.

{निर्णयावे स्वागत आहे.....}

अश्या गोष्टींचा वापर करायला लागु नये, तशी वेळ येऊ नये ही अपेक्षा.

धोरणे व नियमावली बनवुन कारभार नीट चालावा असे प्रयत्न केल्याबद्दल मीम चे अभिनंदन.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{धोरणे व नियमावली बनवुन कारभार}

धोरणे व नियमावली बनवुन कारभार नीट चालावा असे प्रयत्न केल्याबद्दल मीम चे अभिनंदन.

अगदी मनापासुन अभिनंदन!!!

अश्या गोष्टींचा वापर करायला लागु नये, तशी वेळ येऊ नये ही अपेक्षा.

रास्त अपेक्षा हास्य
सदस्य म्हणुन वरिल सर्व नियमांचे पालन करण्यास तयार!!!


-निखिल

{धोरणे व नियमावली बनवुन कारभार}

धोरणे व नियमावली बनवुन कारभार नीट चालावा असे प्रयत्न केल्याबद्दल मीम चे अभिनंदन

+१

{धोरणे व नियमावली बनवून कारभार}

धोरणे व नियमावली बनवून कारभार नीट चालावा असे प्रयत्न केल्याबद्दल मीम चे अभिनंदन.

+१

{आर्‍या बाप ... दम लागला नियम}

आर्‍या बाप ... दम लागला नियम वाचुन ...
आपण सगळी ती मदत देण्याचे आश्वासन देतो मिमराठी चालकांना हास्य

- (नियम प्रेमी) टारोबा रुलर

{उत्तम आणि अभिनंदन!}

अतिशय व्यावसायिक पध्दतीने बनवलेल्या सदर नियमावलीशी पुर्ण सहमत!

ह्या नियमावलीच्या देखरेखीखाली मीमचे खेळीमेळीचे वातावरण टिकुन राहुन गैरवर्तन तसेच गैरहेतुंनी प्रेरित हालचालींना आळा बसेल अशी आशा करतो.

{ह्या नियमावलीच्या देखरेखीखाली}

ह्या नियमावलीच्या देखरेखीखाली मीमचे खेळीमेळीचे वातावरण टिकुन राहुन गैरवर्तन तसेच गैरहेतुंनी प्रेरित हालचालींना आळा बसेल अशी आशा करतो.

हीच अपेक्षा आहे.


something terribly wrong with this country, isn't there?

{+१}

सहमत

{अभिनंदन !!!}

सहमत !!!

{ह्म्म्म..}

ह्म्म्म..
संबंधित नियमावलीची नोंद घेतलेली आहे.
निखळ-निकोप भरभराटीस सहकार्य आणि शुभेच्छा.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{हेच...}

हेच ते. धागा प्रकाशित झाल्यानंतर आता तीन तासांहून अधिक काळ होत आला. इतक्या काळात इथं केवळ आठ प्रतिसाद आहेत. आणि या सार्‍या सदस्यांची जी ओळख मला आहे त्यानुसार त्यांना कधीही नियम कोणते, ध्येय कुठले आणि धोरणे काय असे प्रश्न पडलेले नव्हते. निदान त्यांनी ते जाहीरपणे उच्चारले नव्हते. हे प्रश्न ज्यांना पडतात त्यांच्यापैकी एकाचीही अद्याप येथे येऊन काही कॉण्ट्रिब्यूट करण्याची हिंमत झालेली नाही. बोलके?
असे लोक या विश्वात आहेत हे वास्तव स्वीकारून म्हणतो, या नियमांखाली पहिली कारवाई याच संकेतस्थळावर व्हावी.
नियम क्रमांक ६.५ आणि ६.७ सॉल्लीडच. एरवी, काहीही झालं की "माझं सदस्यत्व रद्द करा आणि माझे सारे साहित्य उडवा," असं म्हणून आपल्या वर्तनाचे पुरावे नष्ट करण्याची एक सवय लागण्याचा धोका होताच.
एक विनंती - मीमराठीवर कोणतेही साहित्य उडवू नका. ते फक्त अप्रकाशीत होईल अशीच सोय करा.
अवांतर: एकंदर आंतरजालावरील बदलत्या परिस्थितीचा विचार करता, वाचकांच्या अपेक्षा ध्यानी घेत आणि लेखकांमध्ये थोडे अनुशासन यावे यासाठी wink 'क्रमशः'बाबत काही नियम करता येतील का?
मला अशी खात्री आहे, की या अवांतरासाठी या प्रतिसादाला चुकीचे टाचण मिळेल, पण त्याचवेळी मोठ्या संख्येत पाठिंबाही मिळेल. इतके बोलून मी आपली रजा घेतो.

{व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी.....}

आहे ही श्रामो. प्रतिसादाशी पुर्णता सहमत.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{ते तर होणार होतेच मालक }

हास्य

ते तर होणार होतेच मालक wink

असो,

बाकी तुमच्या ह्या "क्रमशः'बाबत काही नियम करता येतील का?
मला अशी खात्री आहे" सल्ल्यावर काही करता येतं का ह्याची चर्चा आज नक्की करु आपण wink


something terribly wrong with this country, isn't there?

{श्रामोंशि बाडिस}

श्रामोंशि बाडिस


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{धागा प्रकाशित झाल्यानंतर आता}

धागा प्रकाशित झाल्यानंतर आता तीन तासांहून अधिक काळ होत आला. इतक्या काळात इथं केवळ आठ प्रतिसाद आहेत. आणि या सार्‍या सदस्यांची जी ओळख मला आहे त्यानुसार त्यांना कधीही नियम कोणते, ध्येय कुठले आणि धोरणे काय असे प्रश्न पडलेले नव्हते. निदान त्यांनी ते जाहीरपणे उच्चारले नव्हते. हे प्रश्न ज्यांना पडतात त्यांच्यापैकी एकाचीही अद्याप येथे येऊन काही कॉण्ट्रिब्यूट करण्याची हिंमत झालेली नाही. बोलके?

+१ सहमत! हास्य

बाकी, कार्यबाहुल्यामुळे म्हणा, किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा, त्या प्रश्नकर्त्यांना आज सवड मिळाली नसेल असं आपण तुर्त समजु wink काय म्हणता?

{+२}

+२

{हेच...}

कार्यबाहुल्यामुळे म्हणा, किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा, त्या प्रश्नकर्त्यांना आज सवड मिळाली नसेल असं आपण तुर्त समजु
हेच, अगदी हेच. याचाच अर्थ 'एरवी रिकामपणाचे उद्योग चालतात' असा होतो काय, पटतंय का?

{कुणाच्या खांद्यावरऽऽ कुणाचे}

Laughing out loud Laughing out loud

कुणाच्या खांद्यावरऽऽ कुणाचे ओझेऽऽ..............

{+१ सहमत आहे}

+१
सहमत आहे

{अभिनंदन}

छान.

मीम मालक, व्यवस्थापनाचे अभिनंदन.

{पूर्ण नियमावली वाचून दमलो}

पूर्ण नियमावली वाचून दमलो ब्वॉ!

सभासदाचे किमान वय १८ वर्षे पुर्ण असणे अनिवार्य राहिल.
म्हणजे रंगकर्मीचं खातं उडालं का रे भौ?

-अनामिक

{कबसे बैठे है आस लगाये....}

कबसे बैठे है आस लगाये....


©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairytales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

{कबसे बैठे है आस}

कबसे बैठे है आस लगाये....

नाहीतर कसे बसणार?
(पळा आता इकडनं!)

राजे, नियमावली बनवून अतिशय उत्तम काम केलं आहेस. आपणही सगळ्यांनीही नेहेमीप्रमाणे मस्करी तेवढ्यापुरतीच सोडून दिली, मुद्द्यांपुरतेच वाद घातले तर हा धागा उघडायची वेळही येणार नाही.

पुन्हा एकदा, 'मीमराठी.नेट'बद्दल राजेचे आभार. आणि काटेकोर नियमावली बनवल्याबद्दल अभिनंदन!

{त्यांना सुचना दिली आहे.}

त्यांना सुचना दिली आहे. नियमात नसेल तर नक्कीच खाते बंद होईल.


something terribly wrong with this country, isn't there?

{राजे वयाची अट कश्याबद्दल ते}

राजे वयाची अट कश्याबद्दल ते समजल नाही.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{+ १ बाकी सग्ळ्याशी सहमत, पण}

+ १
बाकी सग्ळ्याशी सहमत, पण वयाची अट का thinking
आणि तसही खर वय कोण सांगणार आहे?

{१७ नं}

१७ नंबर लई भारी


प्रकाश घाटपांडे
फलज्योतिष चिकित्सा मंडळ

{तपशीलवार आणि नि:संदिग्ध नियमावली }

अतिशय विचारपूर्वक बनविलेली मुद्देसुद नियमावली वाचून आनंद झाला. इतकी तपशीलवार आणि नि:संदिग्ध नियमावली असणारे मी मराठी हे एकमेव मराठी संस्थळ असावे.

इतक्या उत्तम पायंड्याबद्दल मी मराठीचे व मालकांचे हार्दिक अभिनंदन.

-ऋ


-ऋ

{उद्दिष्टे}

नम्र सुधारणा. उद्दिष्ठे नाही हो मालक उद्दिष्टे.

{धन्यावाद}

मुख्या पानावरच्या डाव्या बाजूच्या खालच्या कोप-यातल्या सूचनेमध्ये सुद्धा बदल करावा.

{हे वरील सर्व नियम लागू झालेले}

हे वरील सर्व नियम लागू झालेले आहेत ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.


something terribly wrong with this country, isn't there?

{५.२ आणि ५.४}

५.२ आणि ५.४ शी असहमत आहे.

बाकी नंतर.

-फुन्सुक

{ओ राजे तुम्ही नाडिकेंद्रात}

ओ राजे तुम्ही नाडिकेंद्रात जाउन भविष्य बघुन आलात काय... thinking

नाडिला पण बंदी घाला (ईलेष्टिक चालेल पण नाडी नको) wink

असो... बाकी नियम एक्दम झ्याक तेव्हढा १८चा सोडुन

चेतन

{नवीन नियम}

मी मराठी ह्या संकेतस्थळाची निर्मिती उत्तमोत्तम मराठी साहित्याला आणि नव्या लेखकांना एक लेखनमंच तसेच त्यांच्या कष्टांचे कौतुक व्हावे ह्या हेतुने झाली आहे. तसेच मी मराठी संकेतस्थळ हे इतर बाकीच्या संकेतस्थळांशी खेळीमेळीचे वातावरण कायम ठेऊन आपापसात सुसंवाद कायम रहावा ह्यासाठीच नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे/राहिल.
ह्याच अनुषंगाने इथुन पुढे मी मराठी ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळावरील चर्चा/वाद्/विसंवाद/मतभेद आदी बाबींचा संदर्भ घेऊन त्याची टिप्पणी इथे करणे व इथे त्यावरुन वादंग माजवणे ह्याला मनाई राहिल ह्याची सर्व सदस्यांनी कॄपया नोंद घ्यावी.
ह्याच धोरणाला अनुसरुन इतर संकेतस्थळावरचे अनावश्यक संदर्भ असलेले प्रतिसाद त्वरित अप्रकाशित करण्यात येतील अशा घोषणा इथे मी मराठी व्यवस्थापन करत आहे.
सदर नियम "खरडफलक" / "बझबझ्झपुरी" ह्या मंचावरही लागु राहिल.
सदस्यांकडुन ह्या नियमाला सहकार्य मिळेल व त्याचे व्यवस्थित पालन होईल अशी अपेक्षा आहे.

२. एखाद्या सदस्याकडुन वारंवार सदर गोष्टी घडत असतील तर त्याला जाब विचारण्यात येऊन मी मराठी व्यवस्थापन सदर सदस्याच्या सदस्यत्वाविषयी गंभीर विचार करेल असे आपल्याला कळवण्यात येत आहे ....

३. नवीन विभाग व त्याची रचना याचे अधिकार मीमकडे राखीव आहेत.

{ज्यांना ह्या नियमाविषयी चर्चा}

ज्यांना ह्या नियमाविषयी चर्चा करायची आहे त्यांनी खव / खफ व व्यनीचा वापर करावा.


something terribly wrong with this country, isn't there?

{५.४ मध्ये योग्यतो बदल}

५.४ मध्ये योग्यतो बदल करण्यात आला आहे, बदल खालील प्रमाणे आहे.


५.४ सदस्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास. अथवा अन्य सदस्यांना खोटी आश्वासने देऊन अथवा भुलथापा मारुन फसवणूक अथवा आर्थिक गैरव्यवहार केल्यास.


something terribly wrong with this country, isn't there?

{नियमावली....}

चला.... या निमित्ताने प्रथमच या धाग्याकडे लक्ष गेले आणि पूर्ण वाचनानंतर नियम किती अभ्यासून तयार करावे लागले असतील याचेही ज्ञान झाले.

नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

इन्द्र पवार...


~~~~~~~~~~~~~~~~
".....वरना जीने के लिए सब कुछ भुला देते है लोग....!!"

{काही नियम अद्ययावत केले आहेत,}

काही नियम अद्ययावत केले आहेत, याची नोंद घ्यावी.


something terribly wrong with this country, isn't there?

{पालन केल्यास काय बक्षीस देणार }

वरील सर्व नियमांचे निरपवादपणे दीर्घकाल पालन केल्यास काय बक्षीस देणार त्ये बी लिवा की !!!

wink


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{मराठीचा अभिमान , आवड चांगल्या}

मराठीचा अभिमान , आवड चांगल्या मार्गांनिच व्यक्त व्हावे यासाठी योग्य नियम.

{सदस्य जर बर्‍याच काळासाठी}

सदस्य जर बर्‍याच काळासाठी ऑफलाइन असेल म्हणजे मीम वर तो सक्रीय दिसत नसेल तर त्यावर काय कारवाई केली जाते.


माझा ब्लॉग http://world97.blogspot.com/

{काही नाही}

काही नाही हास्य


something terribly wrong with this country, isn't there?

{नियमात खालील बदल करण्यात आला}

नियमात खालील बदल करण्यात आला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

५.३ सभासदाने अन्य सभासद / वाचक अथवा अन्य कोणीही सन्मानीय व्यक्ती, पक्ष, संघटना, जाती, धर्म, विविध धर्मातील देव देवता, भारताची राज्य घटना, राष्ट्रगीत, राष्ट्राची मान चिन्हे, राष्ट्र ध्वज, राष्ट्र पुरुष, श्रध्दा व संकेतस्थळ (मीम) ह्याबाबत उपमर्दकारक, अवमानकारक अथवा द्वेषमुलक किंवा भावना भडकवणारे अथवा चिथावणी देणारे, अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचे उदात्तीकरण करणारे, लिखाण केल्यास अथवा अश्या प्रकारचे कोणतेही कृत्य केल्यास अथवा अश्या कृत्यांना प्रोत्साहन दिल्यास.


something terribly wrong with this country, isn't there?

{हम्म आले लक्षात. जपून लिहिले}

हम्म
आले लक्षात.
जपून लिहिले पाहिजे आता wink

अशा सर्व धाग्यांवरुन मी आत्ताच निवृत्ती जाहीर करतो
नियमात लिहिणे जमत नाही हो. त्यापेक्षा न लिहिलेलेच बरे.

जेथे सत्य निदर्शनास आणून द्यायचे तिथे वरील सर्व गोष्टींचा उल्लेख अपरिहार्यच आहे. तेव्हा माझ्या आयडीवर गदा नको यायला. Big smile

आभारी आहे राजे साहेब


भ्रमिष्ट आहे हो मी
भ्रमिष्टपणे मी इथे वावरतो
जानवं काढून ठेवलेला भट

{वरील नियम पुर्वी पासूनच आहे,}

वरील नियम पुर्वी पासूनच आहे, तुम्ही वाचला नसेल. त्यामध्ये फक्त " अंधश्रद्धा व बुवाबाजी " हे दोन शब्द नवीन आले आहेत.


something terribly wrong with this country, isn't there?

{१. वरील सर्व नियम हे}

१. वरील सर्व नियम हे मीमराठीच्या इतर संकेतस्थळांना देखील लागू होतील (उदा, साहित्ययात्री.कॉम) यांची वाचकांनी नोंद घ्यावी.

२. मीमराठी.नेटचे पुर्ण व्यवस्थापन राजे/व्यवस्थापक हेच पाहतात व संकेतस्थळाच्या रूपरेषेपासून सर्वप्रकारच्या तांत्रिक अडचणी देखील राजे/व्यवस्थापक हेच पाहतात तर एखाद्याला अडचण असेल तर त्यांनी राजे/व्यवस्थापक या आयडीला व्यनि करावा किंवा admin@mimarathi.net, info@mimarathi.net या ईमेल वर संपर्क करावा.

धन्यवाद.

व्यवस्थापक

मीमराठी.नेट


something terribly wrong with this country, isn't there?