सुंदर ते ध्यान आणि सजणीचे रूप ...!!!
सुंदर ते ध्यान....!!
(पंढरीचा पांडुरंग आणि संतश्रेष्ट
तुकारामांच्या पायी नतमस्तक होवुन)
.
सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥
कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥
तुळशीहार जणु घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥
कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥
नैवद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥
आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥
राजा शेतकरी बळीराज यावे
संघटीत व्हावे अभयाने..॥७॥
गंगाधर मुटे.
................................................................
सजनीचे रूप ...!!
(पंढरीचा पांडुरंग आणि संतश्रेष्ट
तुकारामांच्या पायी नतमस्तक होवुन)
.
रूपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजणी ॥१॥
म्हणे व्यापारी बरवा। म्हणे पगारी बरवा ॥२॥
शेती बागा त्याचे घरी। परी नको शेतकरी ॥३॥
ऐसे सजणीचे रूप। पदोपदी दिसे खूप ॥४॥
अभय म्हणे कास्तकारा। डोहामधी डुबक्या मारा ॥५॥
गंगाधर मुटे.
-----------------------------------------------------
.jpg)
खरंय!
खरंय!
वाह !!!
क्या बात है !
सुंदर ...
काही प्रश्न -
१ . बरवा म्हणजे नक्की काय ? - नवरा ?
२. मला एक गोष्ट लक्षात येतेय की तुमच्या प्रत्येक कवितेत "अभय" हा शब्द असतोच असतो .. हे नक्की काय ?
माझ्या माहिती प्रमाणे बरवा
माझ्या माहिती प्रमाणे बरवा म्हणजे चांगला.
बाकी कविता उत्तम!!
सहमत.
"बरवा म्हणजे चांगला." - सहमत.
"अभय" हा गझलेच्या भाषेत "मक्ता" आणि भजनांच्या भाषेत "टूक".
कविची ओळख/नांव/टोपण नांव.
जालावरच्या वाढत्या साहित्यचोरी आणि उचलेगिरीवर कवितेत "कवि" कायम राहावा आणि कवितेत शब्दबदल/आशय बदल कोणी करू नये म्हणुन मी हा मार्ग स्विकारला आहे.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
धन्स ...
धन्स ...
पंत, लेखन आवडतंय... तुमच्या
पंत, लेखन आवडतंय... तुमच्या लेखांची / कवितांची वाट बघतो आता.
तो ड लं त.....
मस्त कविता. जीवन जगलेल्यानं जीवनाबद्दल बोलावं तसं वाटलं.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
छान !
छान !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
श्री हरी
काय लिहु ? पंत असेच लिहित रहा याच शुभेच्छा
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
टू इन वन
मस्त फोटो.
टू इन वन.
शेतकरी cum वारकरी.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
धन्यवाद.
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
साजनी
सजनी की साजनी या ला म्ह्त्व हायेच.
कारन रूपये पाहता लोचनी। सुखी झाली ती साजनी ॥१॥ यात असलेला लोचनी मधे जिला समावलेल आहे अशी ती साजनी सुखी झाली आहे कारण रपये अर्थात धन. असा तो धनी ! तो तिच्या प्रेमाचा धनी नाही.
आता सजनी याचा अर्थ सज्जनी असा नसावा! बाकी संत जना बाई च्या अभंगात जनी म्हने असा शेवट असतो. यातील जनी म्हण्जे अर्थातच जनाबाई. जनाबाईचे 'जनी 'हे रुप अर्थातच बोली भाषेचा आविष्कार आहे. यात जनी मधे अंत्याक्षर हे सप्तमी विभक्तीच्या त ई आ मधील ई प्रत्ययाचे मला वाटत नाही. जाणकार अधिक भाष्य करतीलच.
पण या निमित्तानी मला गावाकडील हरिपाठात होणारा मूळ अभंग कानी घुमतो. रुप पाहता लोचनी | सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख (पॉज) झाले हो साजनी ||
पॉज अगोदर टाळाचा एक ठोका व झाले हो साजनी यातील अंत्याक्षरानंतर टाळाचा डबल ठोका ही नादमयया विलक्षण आहे यात मला भावार्थ दडलेला वाटतो. काहींना तो गुढार्थ वाटत असेल. (नॉस्ट्रॅडॅमस च्या सेचुरी तील श्लोकांतील गुढार्था सारखा) शेवटी अन्वयार्थ काढण्यावर आहे.
पंत या निमित्त तुम्ही आम्हाला एका वेगळ्याच विश्वात नेल. आमच्यातील आकार उकार ईकार वगैर विकार दडलेली रुप बाहेर आणलीत. केवळ संमोहनातच ती बाहेर पडु शकतात. या अर्थाने आपण एक गारुड निर्माण केलत
ता.क- हे टंकतानी अनेक अडचनी आल्या राव! यकदा लाईट गेली ,यकदा कॉम्युटर हँग झाल, यकदा टंकनीचे बिटान आडाकल. असो यकचाच पोचल ब्वॉ
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
धन्यवाद.
सजणी = साजणी = प्रिया
पण ण ऐवजी न अशी गडबड झालीच होती.
आपल्या प्रतिसादामुळे ते लक्षात आले. धन्यवाद.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
अहो पंत
अहो पंत तसे नाही. ही गडबड नव्हेच. णी हा प्रमाणीत शब्द आहे व नी हा बोली भाषेतील आहे हे आपण जाणता. अशुद्धतेच्या वा मिमाच्या भयानी नी चे णी करण्याची गरज नाही
आमी बी जिवन शिक्शन मंदिरात शिकेलेल्यो हाय. साजनी व साजणी यात नादमयता व फरक खेड्यातील बोली नी च होतो. हा अभंग गाताना डोळ्यासमोर गावाकडील बाळ मिस्त्री येतात. आनी, पानी ,लोनी या गोष्टी अशुद्ध नव्हेतच. खेड्यात आणी, पाणी ,लोणी हे उच्चार णी या तीव्रतेत केला की तो भटाळला असे म्हटले जाते. एकदा एका विदुषीच्या घरी गेलो होतो तेव्हा टीव्हीवर एक सामाजिक विषयावर परिसंवाद चालू होता. प्राध्यापकाची भाषा आनी पानी लोनी अशा नीकारांतात होती. बाई म्हणाल्या हे लोक किती ही शिकले ना तरी भाषा अशुद्धच. मी बाईंना म्हणालो तुमच लक्ष व्याकरणा कडे होत तर माझ आशया कडे होत.
"काय म्हंतोय त्ये त पघा कि यकदम कशी काय भाषा सुदरन" असे ग्रामीण ढंगात म्हणल्यावर बाईन्नी एकदम चमकुन माझ्याकडं पाह्यल. मग मी त्यांच्याशी प्रमाण भाषेतच बोललो. बाई भाषाशुद्धी आग्रही लेखिका होत्या.
असो तुमी पोष्ट अद्ययावत केल्यानी आमची हवाच गेली
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
हाहाहा
असो तुमी पोष्ट अद्ययावत केल्यानी आमची हवाच गेली
हाहाहाहा... हा कसला चमत्कार म्हणायचा आता?
सहमत.
"काय म्हंतोय त्ये त पघा कि यकदम कशी काय भाषा सुदरन"
आशयापेक्षा व्याकरणाला खुप अवाजवी महत्व देणे, हा खुप मोठ्ठा विषय आहे.
ग्रामिण जीवनाला दाबून ठेवण्यासाठी या गोष्टीचा हत्यारा सारखा वापर केला जात असावा अशी मला शंका आहे.
कधितरी हा विषय आपण स्वतंत्रपणे चर्चेला घेवू.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
नक्की घेउ
विषय घेउ पण मी आपण व्यक्त केलेल्या शंकेत पुर्वी अडकून पडलो होतो. पण नंतर त्यातुन बाहेर आलो. शहरी विरुद्ध ग्रामीण असा संघर्ष माझ्या मनात बराच काळ होता. आता आम्हीच शहरी झालोय काय बोलणार?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
फंटाश्टिक!
पकाकाका, लै लै मस्त!
गंगाधर पंत मस्तच.. अजुन
गंगाधर पंत मस्तच..
अजुन येउद्या
-निखिल
कवच-कुंडले छातीच्या
कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥
पंत....खुप छान कविता करता राव तुम्ही.....सुदंर...
पंत...पंत... तुमच्या कविता
पंत...पंत...
तुमच्या कविता असो, गज़ला असोत...समोरुन दिसताना 'वा वा छान छान' म्हणावं अशाच असतात, पण नीट वाचल्यावर कळतं, अरे, आपण वा! नक्की कशाला म्हणतोय? सादरीकरणाला? गाभा पाहिला तर मात्र कळ उठते!
परिस्थितीचं भेदक वर्णन साजिर्या शब्दांत छानच मांडता तुम्ही! _/\_
सहमत आहे. घाटपांडे काकांचा
सहमत आहे.
घाटपांडे काकांचा प्रतिसाद तर लंबरी हाये.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मस्त
मस्त
आभारी आहे
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.