जिंदगीसे छुटकारा - १

0
0

काम संपल्यावर रोजच रात्री उशीरा स्टेशन भागात चक्कर मारुन चहा पिण्याचा माझा अनेक वर्षांचा रिवाज. दिवसाचं काम संपलेलं असल्यानं मन कसं हलकं असतं पण अंग मात्र अगदी आंबुन गेलेलं असतं. अशोकच्या गाडीवरचा गरमगरम आलं घातलेला मसाला चहा पिला की कसं एकदम फ्रेश वाटतं.

त्या दिवशी पण असाच रात्री अकरा साडे-अकरा वाजता काम संपवुन हाफिसातुन बाहेर पडलो अन गाडीला किक मारुन स्टेशनला जायला निघालो. सरळ रस्त्यानं न जाता सहजच साधु वासवानी चौकातुन राईट टर्न मारला अन सेंट्रल बिल्डिंगकडे वळालो. विचार होता जाता जाता ससुन मधे नाईट ड्युटीला कोण कॉन्स्टेबल आहे ते बघावं अन त्याला पण चहा प्यायला बरोबर घेऊन जावं. हो म्हणजे एकतर चहाला कंपनी पण होईल अन झालंच तर पिल्या चहाला जागुन तो कॉन्स्टेबल रात्री काही मोठं लफडं आलंच तर लगेच फोन करुन कळवेल पण.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्री गाडी चालवताना लागणारा वारा जरा बरा वाटत होता. सेंट्रल बिल्डींगसमोरच्या त्या गल्लीतुन रात्री उशीरा जाणं बहुधा सगळे सरळमार्गी लोक टाळतात अन गेलेच तर सुसाट वेगानं जातात कारण त्या गल्लीत वेश्या अन हिजड्यांचा सुळसुळाट असतो. कधीमधी चुकार लोकांना लुटण्याच्या घटना पण तिथं घडल्यात. पण मी स्वतःला सरळमार्गी वगैरे समजत नाही अन तसेही स्त्री किंवा पुरुष वेश्या वगैरे लोक सहसा माझ्या वाटेला जात नाहीत. त्यामुळं आपला आरामात मोटरसायकल चालवत होतो.

सेंट्रल बिल्डींगच्या समोरच सेंट्रल हॉटेल आहे - नाक्यावरचं इराण्याचं हॉटेल. दिवसभर परिसरातल्या सरकारी कार्यालयं, ससुन हॉस्पीटलमधे खोळंबलेल्या लोकांकरता चहा, बनपाव्-पट्टी सामोसा वगैरे घेऊन क्षुधाशांती करण्यानं मोक्याचं ठिकाण. रात्री आठ-नऊ वाजले की तिथलं गिर्‍हाईकांची वर्दळ कमी होते अन वेटर लोकांची आवराआवर सुरु होते. साडे नऊ, दहा वाजले की शटर खाली ओढलं जातं अन त्यानंतर त्याच्या कट्ट्यावर सुरु होते पोरींची वर्दळ.

या मुली सगळ्या धंदेवाल्या - ताडीवाला रोड, येरवडा, हडपसर, कॅम्प भागात रहाणार्‍या अन पोटाची गरच म्हणुन धंदा करणार्‍या. त्यातलीच एखादी सीनीयर, बोलभांड मुलगी - वयामुळं जिच्याकडं गिर्‍हाईकं कमी येतात अशी - आंटीचा रोल करते.
इथली धंद्याची पद्धत वेश्यावस्तीतल्यापेक्षा वेगळीच. पोरी दिवसभर त्या अगदी खानदानी बायांसारख्या वावरतात अन रात्र पडली की धंद्याला कट्ट्यावर उभ्या रहातात. तिथंही त्यांचं दिसणं अन वावर जरा डीसेंट. मेकप म्हणजे चेहर्‍यावर फिरवलेला पावडरचा पफ अन लिपस्टीक. केस वगैरे व्यवस्थित विंचरलेले. कपडे पण शहाजोग - अंगभर साड्या, पंजाबी नाहीतर गेलाबाजार जीन्स टी शर्ट. सरावलेल्या मुली रस्त्यावरुन ठुमकत चालत रहातात अन नवीनच धंद्यात उतरलेल्या अंधार्‍या भागात उभ्या रहातात, ओळख पटु नये म्हणुन. काही मुली तर स्कार्फने तोंड झाकतात कुणी ओळखु नये म्हणुन. पण दोन्हीकडे भडक वासाच्या, डोकं उठवणार्‍या हिना, इंटीमेट सारख्या अत्तरांचा वापर समाईक. येणारे जाणारे मुलगी बघुन गाडी हळू करतात, मुलगी ठुमकत संथपणे गाडीजवळ जाते, दोघं रस्त्याच्या कडेला उभं राहून बोलतात जणु अचानक रस्त्यात भेटलेले परिचितच. अन सौदा पटला की दोघं त्याच गाडीवरुन/ गाडीत बसुन सुसाटत जातात - तिथल्याच एखाद्या चद्दरपलट लॉजमधे. अगदीच धंदा मंद असेल तर उद्याचा दिवस कसा घालवायचा या चिंतेनं घायकुतीला आलेल्या मुलींचा `शुकशुकाट' सुरु होतो पण तो देखील जरा दबुनच.

सेंट्रल बिल्डींगच्या कोपर्‍यावरुन वळण घेण्याकरता मी वेग बराच कमी केला होता तेव्हा सेंट्रल हॉटेलच्या कट्ट्यावर तीन चार पोरी बसलेल्या होत्याच. मी वळण घेताना कुणीतरी शुकशुक केलं त्यातही नवीन काहीच नव्हतं पण तेव्हढ्यात, "अरे उसे मत सिग्नल देना. वो हमारा भैय्या है," असं दबक्या आवाजात कुणीतरी म्हणलेलं कानावर आलं अन मी चमकलो. मला बुधवारपेठेतल्या बर्‍याच मुली भैय्या म्हणतात, राखी पौर्णिमेला सगळ्या मिळुन राखी पण पाठवतात पण इथे मला कोण भैय्या म्हणतंय असा प्रश्न पडला अन करकचुन गाडीला ब्रेक मारला. तशीच गाडी वळवली अन मुली बसल्या होत्या तिथे गेलो.

"अभी कौन बोला," माझा जरा कडक आवाजातला प्रश्न? "क्या अनाप शनाप पुछ रहा है रे हीरो? मतलब की बात कर सीधा," एकीनं खुसखुसत परतप्रश्न केला. बहुतेक तिला मी वळुन आलो याचा अर्थ गिर्‍हाईक आलं असा वाटला असेल. "ज्यादा चु चपड मत कर. सीधा बता मुझे भैय्या किसने कहा," मी. त्यावर तिनं माझीच फिरकी घ्यायचा प्रयत्न केला, "मैने तो नही बोला. यहां मै भैय्या को नही सैय्या को ढुंढने आती. जिसकी जेबमे माल वो माल मेरे पास आनेतक के लिये सैय्या," ती.

या उनाड मैनेची टिंगल-टवाळी ऐकण्याच्या मुडमधे मी अजिबात नव्हतो. त्यामुळं साहजिकच माझा आवाज जरा चढला होता. ते पाहुन मागे झाडाआड अंधारात उभी असलेली अन स्कार्फनं तोंड झाकुन घेतलेली मुलगी समोर आली. "तु बोली क्या मुझे भैय्या," मी विचारलं त्यावर तिनं फक्त मान हलवली. "कौन है तु? पहचानती है मुझे? रुमाल हटा," मी. तिनं थोडे आढेवेढे घेतले पण मी हटत नाही म्हणल्यावर रुमाल हटवला अन.....

माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डोकं गरगरलं. छातीतुन जीवघेणी कळ आल्यासारखं झालं. मी बघतोय ते सत्य की भास हेच कळेना. ती मीना होती.....
क्रमशः

ओ, च्यायला अशा वेळेला क्रमशः

1

ओ, च्यायला अशा वेळेला क्रमशः टाकताना लाज कशी वाटत नाहि हो? उगाच टेन्शन वाढवुन ठेवतात.
पुढचा भाग लवकर येउदे, प्लीज, प्लीज, प्लीज, प्लीज, प्लीज

+१

2

अशा वेळी क्रमशः नको ...
लवकर टंका !!!

+१ खरचं पुढचा भाग लवकर

3

+१

खरचं पुढचा भाग लवकर टाका.......

च्यायचा घो क्रमशः च्या !!

4

च्यायचा घो क्रमशः च्या !!

पुणेरी ... पटकन् हो ... !

- (अभी ना भैय्या ना सैय्या.. ओन्ली खवय्या) टारझन

पुढे.

5

Sad

पुढे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान

6

सुरुवात छान आहे. पुढचे भाग येऊ देत लवकर.

भैय्या

7

भैय्या या शब्दानी जोडलेले नात्याची संवेदनशीलता व सैय्या या शब्दानी जोडलेली व्यवहारकुशलता याचा सुरेख संगम.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वाचतो आहे.

8

पुढचा भाग लवकर येऊद्यात.
नेहमीप्रमाणे वेगळ्याच विषयाला स्पर्श करणारी दास्ताँ असेल अशी सुज्ञ अपेक्षा आहे, आपल्या लेखनात ती नेहमीच आम्हाला दिसली आहे.

वाचतो आहे ...

वाचतो आहे

9

पुढचा भाग लवकर टाका ..

हे क्रमश: फारच वाइट ..

पुढे?

10

पुढे?

असंच...

11

माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डोकं गरगरलं. छातीतुन जीवघेणी कळ आल्यासारखं झालं. मी बघतोय ते सत्य की भास हेच कळेना. ती मीना होती.....
पुणेरीइतकं नाही, पण थोडंसं हे विश्व पाहूनही आणि मीना कोण हे माहिती नसूनही वाचताना हे असंच काहीसं होत गेलं.

पुढचा भाग

12

पुढचा भाग कधी...?

चेतन

अवांतरः याचा पण संबंध ओकसाहेबांच्या नाडिशी तर नाहि ना... wink

सही

13

वाचतोय..

पुणेरी, श्रामो हे लोक क्रमशःची शिकार अथवा माती करत नसल्याने निश्चिंत आहे.

आगदी आगदी

14

हेच म्हणतो. सहजरवांशी सहजासहजी सहमत


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

आमचा पम्या निराश करत नाही!!!

15

आमचा पम्या निराश करत नाही!!! वाचतोय.

पुढचा भाग कधी??? नेहमी

16

पुढचा भाग कधी???
नेहमी प्रमाणे एक वेगळाच विषय असेल असे वाटते.


-निखिल

प्रसनदा... एक प्रश्न

17

प्रसनदा...

एक प्रश्न ...लेखातील उल्लेखिलेला कार्यकाल पंधरा वर्षापुर्वीचा वाटतो....कारण आताच्याला सटर-फटर लॉजवरच सगळ काय मिळते...लॉज बुक करताना खुद्द मालक/अटेन्डंट विचारतो ईतर काही सोय हवी आहे का ?

साधारणपणे...

18

१९९७-९८ चा काळ असेल तो. उत्तरार्धाशीही सहमत.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

ऑत्तिच्या...

19

हे पुण्यातही सुरु झालंय???

ह्यावरुन माझा मुंबईचा अनुभव आठवला..
कॅपजेमिनीत ट्रेनिंग द्यायला मी मुंबईला गेलो होतो, तेव्हा जवळपासच्या एकाही हॉटेलात बुकिंग मिळालं नव्हतं. रिक्षावाल्यानं LBS रस्त्यावरुन पार चेकनाक्यापर्यंत समोर दिसणारी सगळी हॉटेलं दाखवली...सगळी गच्च भरलेली.
मग मी ठाण्यात शिरलो....
चेकनाक्यावरच रिक्षा पकडली आणी म्हणलं 'एखादं चांगलं हॉटेल असेल तिकडं घेऊन चल बाबा. सगळ्या सोयी असलेल्या चांगलं हॉटेल बघ रे."

गडी पाच्चकन माझ्या पायाशी थुंकत म्हणाला, "अरे साहब, बैठो बैठो..ऐसे होटल ले चलता हूं..जन्नतसे कम नहीं!" आणि घोडबंदर रस्त्याला गाडी घातली!

बाहेरुन हॉटेल तसं बरं दिसत होतं.. म्हणलं ठीक आहे, आता कुठेतरी रात्री डोकं टेकायला जागाच हवी ना..हे तर हे!
आत गेलो, रिक्षावालाही म्यानेजरच्या नावानं शिरा ताणतच आत आला.
मी आपला शाण्यासारखा काऊंटरवर गेलो,
मॅनेजर : कितना टैम के लिये चाहिये?
मी: पाच दिवस. एसी रुम असेल तर दे रे बाबा..ह्या मुंबैच्या उकाड्यात मरुन जाईन.
मॅनेजर तोंड उघडं टाकून दोन मिनिटं माझ्याकडं बघतच बसला...मग गडबडुन म्हणाला..."मस्त रुम देता हूं ना...इस्पेशल डिस्काउंट भी देंगें ना सरजी|"
आम्ही खुष!
तेव्हढ्यात त्या गड्यानं टेबलावरची घंटी वाजवली...आतुन ७-८ पोरी येऊन लाईनीत उभ्या राहिल्या...
आता भंजाळुन जायचं काम माझ्याकडं आलं! रिक्षावाला म्हणाला, "बोला था ना साहब, साऽऽरी सुविधाएंवाले जन्नत में लेके चलता हूं..."

तोवर म्यानिजरसाहेबः जो चाहो पसंद करलो साब, चाहो तो रोज अलग-अलग भेजुंगा..

मी ल्यापटॉपची बॅग आणि माझी कपड्यांची बॅग असं डब्बल ओझं घेऊन सुस्साट रस्त्यावर!

तेच लोण इकडंही पसरलं की काय?

नको त्यावेळी क्रमशः का

20

नको त्यावेळी क्रमशः का ?

भरभरा पुढचे लिहा बर !

ओ पुनेरी आता घालताय पुढचे भाग

21

ओ पुनेरी आता घालताय पुढचे भाग का उचलु फावडं?
च्यामारी त्या क्रमशःच्या.

(कुनी बेन्याने शोध लावला ते गावलं तर त्यालाच गाडतु आता.)
-ह्याला-गाड त्याला-गाड


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

लवकर लिही रे प्रसनदा...

22

लवकर लिही रे प्रसनदा...

गुडहेवन्स............... एक

23

गुडहेवन्स...............

एक धक्का आणखी?

नक्की काय असावं ह्याखाली दडलेलं ह्याचा अंदाज बांधतोय.

पु.ले.शु.

लवकर

24

लिहा पुढचा भाग.

वाचतोय

25

तुमच्या कथानकांना अंदाज बांधण सोडून दिलंय.. येऊ द्या लवकर

-ऋ


-ऋ

लिहा लवकर ....

26

लिहा लवकर ....

छान

27

छान. पुढील भाग वाचायची उत्सुकता लागुन राहिली आहे.