अस्सल देशी हायकू(?)
अस्सल देशी हायकू(?)
हायकू हा एक मस्त काव्यप्रकार, मुळचा जपानी (असे म्हणतात)
हा प्रकार मला खुप आवडला.
हायकूच्या तंत्राबद्दल पुरेशी माहीती व्हायचीय.
होईल यथावकाश. तोपर्यंत...
अस्सल देशी हायकू(?) सादर.
१)
टीव्ही,मि़क्सर,बाईक जापानी
आता हायकुही जापानीच
फ़क्त बायकू तेव्हडी भारतिय उरली. 
२)
त्याला बघून वेणी थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
सुपारी लागली असेल बहुतेक. 
३)
डांबर,सिमेंट,गिट्टी खायची नसते
आहार शास्त्रात बसत नाही
पोटविकार-तब्बेतीस हानीकारक असते. 
४)
जन्मास घालतांना विधात्याने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
टाळकी की टवाळकी....??
मला टाळक्याची गरज नव्हती... मी टवाळकी निवडला.
काही चुकलय माझं...??? 
५)
आडदांड सोसाट्याचा वारा सुटला तेव्हा
ढगांनी आकाशात गर्दी करून जाळे विणले.
हवेच्या रेट्याने चंद्र घसरला तर तो जमिनीवर पडू नये म्हणुन. 8)
गंगाधर मुटे
.jpg)
जाणकारांनी हायकूबद्द्ल आणखी
जाणकारांनी हायकूबद्द्ल आणखी माहिती द्यावी ..
बाकी कविता नेहमीप्रमाणे उत्तम ...एकदम आवडेश .. येवूद्या अजून
गं.पंत (गंगाधर पंत)
१ नंबर आणि ५ नंबर विषेश आवडाले
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हा हा हा.. लै
हा हा हा..
लै भारी!
ह्यानंतरच्या रडक्या स्मायलीचा अर्थ आम्ही पामरांनी नक्की काय घ्यावा?
धम्या म्हणतो तसेच...
धम्या म्हणतो तसेच...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हायकू हा प्रकार शिरीष पै (प्र
हायकू हा प्रकार शिरीष पै (प्र के अत्रेंची मुलगी) यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे.
चांगला प्रयत्न आहे. काहीतरी वेगळेपण आले.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
हायकू
वा वा हायकू ची दखल उपक्रमाला सुद्धा घ्यावी लागली. पहा http://mr.upakram.org/node/2342
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
वा नविनच प्रकरण आहे हे
वा नविनच प्रकरण आहे हे
-निखिल
जन्मास घालतांना विधात्याने
जन्मास घालतांना विधात्याने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
टाळकी की टवाळकी....??
मला टाळक्याची गरज नव्हती... मी टवाळकी निवडला.
काही चुकलय माझं...??? >>
याक नंबर
धन्यवाद
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
answer this topic
स्पॅम !
संपादित !
एकच शब्द जोडतो..
डांबर,सिमेंट,गिट्टी खायची नसते
आहार शास्त्रात बसत नाही
पोटविकार-तब्बेतीस हानीकारक असते.
"देशाच्याही!"
बाकी वर्हाडी मुटे भौ सारखेच हे जपानी मुटेभौ पण आवडले!!