नियम व पॉलिसी
मी मराठी हे संकेतस्थळ सदस्यांनी सदस्यांसाठी चालवलेले संकेतस्थळ आहे त्यानूसार.
आपल्या नवीन सदास्यांस येथे काही नियम व पॉलिसी असावी असे वाटत आहे तर आपण सर्वांनी मिळून नियम व पॉलिसी तयार करु या.
नियम :
१. ह्या धाग्यावर फक्त नियम व पॉलिसी बद्दल लिहावे.
२. अवांतर प्रतिसाद देऊ नये.
३. ज्यांना कायद्याची माहीती आहे त्यांनी आपल्या माहीतीचा उपयोग करुन नियम व पॉलिसी कसे असावे हे सांगण्याचे कष्ट घ्यावेत.
४. एका प्रतिसादामध्ये एक नियम ह्या पध्दतीने लिहा.
धन्यवाद.

.jpg)
कोणतेही नियम नाहीत हाच
कोणतेही नियम नाहीत हाच नियम.
आपल्या सदसदविवेक बुद्धीने ले़खन, प्रतिसाद लिहावे, विनोदी, खेळकर वातावरण ठेवावे. कधी तरी वैचारीक चर्चा करावी
बस अजुन काय लागते ?
हेच लिहिणार होतो.
हेच लिहिणार होतो.
प्रत्येकाने जबाबदारीने वागावे बास. काही झालेच तर लगेच हमरीतुमरीवर न येता सामंजस्याने समस्या सोडवावी. अजून काय पाहिजे? फक्त अश्लील भाषा आणि वैयक्तिक टीका वगैरेवर मात्र बंदी असावी.
+१
+१
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
कोणत्याही सदस्याने
कोणत्याही सदस्याने व्यवस्थापक/अॅडमीन म्हणुन संवाद साधु नये. त्यासाठी वेगळे खाते असावे.
(ह्या मुळे बरेच गोंधळ रोखता येतात)
सहमत आहे.
सहमत आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मालक / अॅडमिन कोण आहे हे
मालक / अॅडमिन कोण आहे हे सदस्यांना माहितीच नाही अशी परिस्थिती एकदम आदर्श परिस्थिती.
अशीच रहावी अशी अपेक्षा होती
अशीच रहावी अशी अपेक्षा होती पण ह्यांना माहीत हवे असे ह्यांचा सुर आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हॅहॅहॅ
पन नवीन मान्साला मालक समजाय पाहिशेल ना!
एका रेशन दुकानासमोर भली मोठी लाईन लागते. रॉकेल का तांदुळ अस काही मिळणार होते. एक माणुस त्या गर्दीतुन पुढे जायचा प्रयत्न करीत असतो. लाईनीतील काही माणसे त्याला ढकलून मागे मागे सारायचा प्रयत्न करत राहतात. शेवटी तो वैतागतो आन म्हणतो आता मी दुकानच उघडत नाही जा!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
पका काका म्हणजे
पका काका म्हणजे
(विषय दिलेला नाही)
हॅ हॅ हॅ
राजे मीमवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे, पण सर्वर 'The server has reached the user limit, please try after sometime' असा संदेश देतो आहे असे डोळ्यासमोर आले. (जयपाला यखंदा फटू हाय का?)
(अवांतराबद्दल क्षमस्व)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
इतर
मराठी संस्थळाबद्दल इथे फालतु चर्चा किंवा प्रतिक्रीया नकोत
बाकी अवलियानी सांगितले आहेच तसेच ...
आमेऽऽन........
चला..संपलं का चहाच्या पेल्यातलं वादळ?
मिलाव हाथ आणि बंधू, आर्तता सोडुन दंगा करायला या, कसे?
माझे एक मत
नियम चार प्रकारात विभागलेले असावेतः
१. अधिकार [ कोणत्या सदस्यांना (नवे सदस्य, काहि दिवस झालेले सदस्य, संपादक, मालक) कसले अधिकार/सुविधा असतील / असावेत वगैरे ]
२. लेखन स्वरूपा संबंधी नियम [ कोणत्या प्रकारचे लेखन करावे, कोणत्या व कश्या भाषेचा वापर असावा /नसावा, इतर भाषांचा वापर किती कराव वगैरे ]
३. सुरक्षेसंबंधी व कायदेशीरबाबी [ सदस्यांना घ्यायची काळजी, जसे दुवे देताना - चित्रे डकवताना, प्रताधिकार संबंधी वगैरे ]
४. खरडवही व खरडफळ्या संबंधीचे नियम
या चार गोष्टीं पैकी प्रत्येक बाबतीत सदस्यांनी मते नोंदवावित असे सुचवतो
-ऋ
या पुर्वीची चर्चा
या पुर्वीची चर्चा पहा आमचे मत
http://mimarathi.net/node/423#comment-3865
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
सर्वसमावेशक प्रायव्हसी पॉलिसी.....
शक्य तेव्हढ्या लवकर बनवुन इथे सदस्यांपुढं मांडावी हे उत्तम. त्यासाठी हवी ती सर्व मदत करण्यास मी कटिबद्ध आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सायबर ला (कायदा)
या कामी उपयोगी ठरु शकतो अस वाटत तरी आर्तबंधुंनी या विषयी प्रकाश टाकावा अशी विनंती.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
पावसकर नी मेंबर्शीप घेतली की काय रे?
पावसकर नी मेंबर्शीप घेतली की काय रे?
एकदम नियमावली करायला बसलास.
अजुन एक महत्वाच
राजे केवळ १८ वर्षांच्या वरील (आणि सज्ञान) व्यक्तींसाठीच उघड ठेव बाबा तुझ हे संस्थळ
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
जयप्या एकवेळ शारिरीक वय असेल
जयप्या एकवेळ शारिरीक वय असेल रे १८ पण साल बौद्धीक वय कस तापासणार?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
येक्झ्याक्टलि.....
येक्झ्याक्टलि.....
काहीजण फारच 'हळूवार' असतात. त्यांचे काय....???
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
कायद्याने १८
वर्षांच्या वरील व्यक्तींना (अपवाद सिध्द होई पर्यंत) सज्ञान समजण्यात येतअसल्याने कुठेही (भानगडीत हो) हात घतल्यास आणि आडकल्यास ती व्यक्तीच जबाबदार असल्याचे समजण्यात येते.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
संदर्भ
सध्याच्या हॉट टॉपिककडे लक्ष दिलं तर आणखी एकः
जुने विनोद रिसायकल करायचे असतील, जुन्या प्रतिसादांची विडंबनं टाकायची असतील तर संदर्भासाठी जुन्या लिंक्सही द्यावात. म्हणजे नव्यांचे आणि जुन्यांचेही नस्ते गैरसमज होणार नाही.
जुन्यांनीही प्रत्येक नवीन नाव दिसल्यावर लगेच जुन्या दारूचा संशय घेण्याचं कारण नाही आहे.