नियम

0
0

तुम्ही जवळ जवळ सर्व सामान्य नियम तोडत आहात.

आज ईथल्या मालकाने आम्हाला हे वाक्य सुनावले. नियम काय आहेत सांगायची तयारी नाही. पराईव्हसी पॉलिसि अजुन बनत आहे????

हा धागा ही मालकाच्या आग्रहास्तव.
तर मला जाणायचे आहेत ईथले सामान्य नियम. मी अजुन चार ठीकाणीही प्रतिसाद दिल्या नव्हत्या तर लगेच ह्यांच्या धमक्या सुरु... ईथे हुकुमशाही चालत असल्यास माझे खाते त्वरित रद्द करण्यात यावे.
धन्यवाद

तुम्ही मीमवर आल्यापासून

1

संपादित.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

// पटलं तर र्‍हावा, नायतर

2
// पटलं तर र्‍हावा, नायतर दारं उघडी आहेत. //

पा चा म झालाय फक्त...बाकी काही फरक नाही!

जुनी दारु असो चालु द्या

3

जुनी दारु

असो चालु द्या

आर्तबंधु, मी सुद्धा तसा नवीन

4

आर्तबंधु,
मी सुद्धा तसा नवीन सदस्यच आहे. पण इथल्या चर्चा आणि भांडणे देखील खेळीमेळीच्या वातावरणात होतात.
कृपया ते वातावरण तसेच ठेवावे. भांडणे किंवा वाद पुढच्या थराला गेले की काय होते हे इथल्या जुन्या जाणत्या सदस्यांना माहिती आहेच.

हम्म

5

चपला अयवजी दारे

तुम्ही मीमवर आल्यापासून बघतोय

6

तुम्ही मीमवर आल्यापासून बघतोय मी, सततचा तुमचा काहीना काही प्रतिसादातून विचित्र प्रकार करत आहात .

माझे आजवरचे प्रतिसाद

मंगळ, 09/03/2010 - 14:17 — आर्तबंधू
सलाम

सलाम

गुरू, 11/03/2010 - 14:03 — आर्तबंधू
निशब्द केलस मित्रा

निशब्द केलस मित्रा

गुरू, 11/03/2010 - 14:18 — आर्तबंधू
आवडली

आवडली

गुरू, 11/03/2010 - 17:13 — आर्तबंधू
जबर दस्त!!!!

जबर दस्त!!!!

गुरू, 11/03/2010 - 17:14 — आर्तबंधू
काय भारी लिहिले आहे

काय भारी लिहिले आहे ना!!!!
जाम आवडले... मी फॅन झालो तुमचा...

गुरू, 11/03/2010 - 17:18 — आर्तबंधू
अरे वा!!!! तुमच्या लेखातुन

अरे वा!!!! तुमच्या लेखातुन बरेच काही शिकायला मिळाले

गुरू, 11/03/2010 - 16:52 — आर्तबंधू
छान कविता... नावाच्या मागे

छान कविता...
नावाच्या मागे प्रा लावण्याबद्दल एवढा खल का???
सगळे लेक्चरर लोक तर लावतात

गुरू, 11/03/2010 - 16:54 — आर्तबंधू
बरी जमलिए

बरी जमलिए

ह्या पैकी कोणत्या प्रतिसादात आक्षेपार्ह लिहिले होते????

गुरू, 11/03/2010 - 17:20 — आर्तबंधू
तिनही भागातले फोटो

तिनही भागातले फोटो छान!!!
तुमचेच आहेत ना???

ह्या माझ्या प्रतिसादावर तुमचा प्रतिसाद
माझ्या मते संग्राम ने फोटोवर

माझ्या मते संग्राम ने फोटोवर आपले नाव दिले आहे !

* वाद उकरुन काढण्याची इच्छा तुमच्या काही प्रतिसादामधून दिसून येत आहे व तुमचा वावर येथे विचित्र पध्दतीने चालू आहे. ह्या कडे आमचे लक्ष आहे. असो.

बदलाल ही अपेक्षा.

ह्यातली भाषा, मग्रुरी बघा आणि काय ते सांगा मला... ह्यातले कोणते प्रतिसाद तुम्हाला आक्षेपार्ह वाटले???? माझ्या मतानुसार वाद तुम्ही उकरुन काढला आहे... पदाचा माज उगाच दाखवत नका जाउ...

यमनियम काय आहेत असा धागा

7

यमनियम काय आहेत असा धागा काढणा-या एका सदस्याची आठवण झाली. पब्लिकने त्याचा बोळा सुरनळी करुन योग्य ठिकाणी घातला त्याची आठवण म्हणुन नावाच्या मागे पुढे काड्या लावुन फिरत असतो हल्ली. असो.

धन्यवाद अवलिया, एखाद्या

8

धन्यवाद अवलिया,
एखाद्या सदस्या बद्दल काय झाले हे सुचवण्याचे कारन काय??
माझेही तेच करायचे आहे का???

तुम्हीही त्या सदस्यासारखे करत

9

तुम्हीही त्या सदस्यासारखे करत आहात असे तुम्हाला वाटते का ?

तो सदस्य कोण व काय करत होता

10

तो सदस्य कोण व काय करत होता सांगितले तर कळेल..

तशी विचारणा करणारा वेगळा धागा

11

तशी विचारणा करणारा वेगळा धागा काढा म्हणजे आपोआप प्रतिसाद येवुन माहिती मिळेल.

आयला

12

एवढा मोठा इतिहास?
काय उद्योग नाही काय अवलिया?

बंधु

13

बंधु सर्वसाधारण पणे नवीन संकेतस्थळावर गेल्यावर प्रथम वाचक म्हणुन रागरंग पहातो. नंतर हळू हळू तेथील अलिखित संकेतानुसार वा त्या संकेतस्थळाच्या प्रकृती नुसार आपण साद प्रतिसाद द्यायला लागतो. दोन दिवसात एखादे अनुमान काढणे आततायी ठरेल.
खाते आहे म्हणजे लिहिलेच पाहिजे असेही नाही नुसते वाचक म्हणुन ही राहू शकता. कृपया त्रागा करुन घेउ नका. शेवटी हे आभासी जग आहे. यातील जवळीक वा दुरी आपल्या आयुष्यातील प्रश्न सोडवेल असे नाही. अतिसंवेदनशील राहणे इथे परवडत नाही. आपल्या आयुष्यातील मजेशीर किस्से टाका. काही नवीन माहिती टाका. बघा लोक आपले होतात की नाही? इफ यु लाफ द वर्ल्ड लाफ वुइथ यु इफ़ यु क्राय क्राय अलोन.
मतभिन्नता राखुन देखील येथे मार्गक्रमणा होत असते
राजे त्यांना ऎडज्स्ट व्ह्यायला थोडा वेळ द्या


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सहमत आहे काका. * बाकी माझा

14

सहमत आहे काका.

* बाकी माझा वरील प्रतिसाद हा विनोदी होता पण तो जे जुने जाणते आहेत त्यांनाच विनोद समजला असावा wink

* आर्तबंधू तुमच्या मागणी प्रमाणे कार्यवाही चालू केली आहे तुम्ही ही त्या मध्ये सहभाग घेऊ शकता व तुम्हाला कसे नियम हवेत ते सांगितले तर आप्ण ते तयार करु शकतो.

धन्यवाद.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१

15

+१

बाकी माझा वरील प्रतिसाद हा

16

बाकी माझा वरील प्रतिसाद हा विनोदी होता पण तो जे जुने जाणते आहेत त्यांनाच विनोद समजला असावा

आता तुमचा प्रतिसाद खरच विनोदी होता का ते देव जाणे...
पण तसे समजुन चालतो.. त्यातिल विनोद जानुण घ्यायला आवडेल

माझा हा धागा येथुन घालवायचा

17

माझा हा धागा येथुन घालवायचा असल्यास हरकत नाहिए

असू दे हो... एका धाग्यामुळे

18

असू दे हो... एका धाग्यामुळे आपल्या सर्वर वर लोड नाही येत wink

** आता हा पण जोक आहे पण हा कळण्यासाठी तुम्हाला काही काळ येथे काढावा लागेल हास्य


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हॅहॅ

19
एका धाग्यामुळे आपल्या सर्वर वर लोड नाही येत

हॅहॅहॅ ! पन यखांद्या सर्वरमुळे ताग्यावर लोड येतोय


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

भेदा पाषाण आणी काढा पाणी !

20

भेदा पाषाण आणी काढा पाणी !

या वादात पडण्याची इच्छा

21

या वादात पडण्याची इच्छा नव्हती. पण काही गोष्टी सांगाव्याच लागतात म्हणून सांगतो.

पराईव्हसी पॉलिसि अजुन बनत आहे????

मुक्त संकेतस्थळांवर जिथं निःशुल्क सदस्यत्व असतं तिथं सदस्यांना हे विचारण्याचा काहीही अधिकार नसतो. वाटलं तर संकेतस्थळांचे (याच नव्हे इतरही) मालक ठरवतील पॉलिसी आणि करतील जाहीर. नाही वाटलं तर नाही करणार. सदस्यांचा काहीही संबंध नाही त्याच्याशी. त्यांच्या सदस्यत्वामुळं संस्थळ चालत नाही, बंदही होत नसतंच.
(याचाच एक दुसरा भाग - इथं लिहिणारा सदस्य त्याचं लेखन इतरत्रही प्रकाशित करू शकतो, कारण तो इथं बांधलेला नसतो. तसा असता तर त्याला अनन्यता (एक्स्क्लूझिव्हिटी) जपावी लागली असती, बहुतेक संकेतस्थळांचे मालक हे जाणतात म्हणून माझ्यासारखा माणूस एकाचवेळी चार ठिकाणी लेखन प्रसिद्ध करू शकतो).

हा धागा ही मालकाच्या आग्रहास्तव.

यातच बरंच समजून घेण्याजोगं आहे.

तर मला जाणायचे आहेत ईथले सामान्य नियम.

तेच समजावेत जे एखाद्या सरासरी घरात (अपवादात्मक नाही. अन्यथा पटकन कोणी 'गिधाडे'सारखं उदाहरण द्यायचं) असू शकतात.

धमक्या सुरु...

हे सापेक्ष असतं. सबब बोलत नाही.

ईथे हुकुमशाही चालत असल्यास माझे खाते त्वरित रद्द करण्यात यावे.

नाही. तसं असतं तर हा धागा सुरू करण्याचा सल्ला दिला गेला नसता.

++१

22

पुर्णपणे वस्तुस्थितीची जाणिव करुन देणारा आणि संतुलीत प्रतिसाद.

पुर्ण सहमत!

+++++++++++++++१०००००००००००००

23

+++++++++++++++१०००००००००००००००

सहमत........