प्रिमियम सदस्यत्व
"प्रिमियम सदस्यत्व"
तुम्ही वार्षिक शुल्क (रु. ७००) भरून मीमचे प्रिमियम सदस्य होऊ शकता. प्रिमियम सदस्य झाल्यावर तुम्हाला खालील सुविधा मिळतील. प्रिमियम सदस्य होणे न होणे हे पुर्णतः ऐच्छिक आहे. जे नियमित सदस्य आहेत, त्यांना असलेले लेखन, प्रतिसाद व संपर्क असे मुलभुत अधिकार जसेच्या तसे राहतील. ज्यांना प्रीमियम सदस्य होणे आहे त्यांनी मीम व्यवस्थापक/राजे यांच्याशी संपर्क करावा.
०१.लेखन पिडीएफ मध्ये रुपांतरित करा.
०२.लेखामध्ये फाईल संलग्न करण्याची सुविधा
०३.लेखामध्ये, व्यनीमध्ये फाईल संलग्न करायची सुविधा
०४.स्वतः ई-पुस्तक निर्माण करण्याची परवानगी
०५.लेखन अप्रकाशित ठेवण्याची सुविधा
०६.स्वतःचे ठराविक लेखन नष्ट करण्याची परवानगी
०७.सदस्य नाव बदलण्याची सोय (एकदा)
०८.आपल्या ब्लॉगची जाहिरात (विचाराधीन)
०९.व्यनीमध्ये अनेक गोष्टींचा राखीव अधिकार (संलग्न फाईल, फॉरवर्ड व्यनी व व्यनीतून बाहेर पडण्याची सोय)
१०.विशेष लेखन व सदस्य शोध सुविधा
११.वेगळी थीम निवडायचा अधिकार
१२.प्रायव्हेट (पासवर्ड प्रोटेक्टेड) धागा काढण्याचे अधिकार
१३.शुद्धलेखन चिकित्सक
१४.येणाऱ्या नवीन सोयी वापरण्याचा प्रथम अधिकार
१५.मीमवरून मीम सदस्यांना त्यांच्या व्यक्तीगत निरोप्यावर( ईमेल) संपर्काची सोय.*
१६.एसएमएस वरून अद्ययावत माहीती मिळण्याची सोय (फक्त भारतात)
जे प्रिमियम सदस्य आहेत त्यांच्या खात्यात पुढील प्रकारचे
चिन्ह दिसत राहील. प्रिमियम सदस्यत्व देणे/ न देणे याचे अधिकार मीमराठीच्या व्यवस्थापकांकडे राखीव आहेत.
{अतिशय चांगली कल्पना आहे. देऊ}
अतिशय चांगली कल्पना आहे. देऊ केलेल्या सुविधा पाहता मी.म.आणखी एस्क्लुझिव होते आहे ह्याची खात्री पटली.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{>>सुविधा पाहता मी.म.आणखी}
>>सुविधा पाहता मी.म.आणखी एस्क्लुझिव होते आहे ह्याची खात्री पटली.
धन्यु मालक!
something terribly wrong with this country, isn't there?
{मी प्रीमियम सदस्य झालो आहे. }
मी प्रीमियम सदस्य झालो आहे. उत्तम सेवा सुविधा देणार्या मीमसारख्या संस्थळाची मेंबरशिप माफक दरात उपलब्ध झाल्याने मेंबर होणे साहजिकच आहे.
{धन्यु मालक!}
धन्यु मालक!
something terribly wrong with this country, isn't there?
{गविंच्या पावलावर पाऊल ठेवून}
गविंच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हीही या सोयीचा लाभ घेतलेला आहे.
<<उत्तम सेवा सुविधा देणार्या मीमसारख्या संस्थळाची मेंबरशिप माफक दरात उपलब्ध झाल्याने मेंबर होणे साहजिकच आहे.>>> १००% सहमत
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{मी पण... हे संकेतस्थळ नवनवीन}
मी पण...
हे संकेतस्थळ नवनवीन सुविधांमध्ये अशीच वाढ करीत राहो.
मीऽच तो...
{शुभेच्छा }
चांगली कल्पना आहे. शुभेच्छा आहेतच!
यापुढील प्रतिसाद देताना हा धागावाचल्यापासून बोटे कचरत होती मात्र वेळीच खात्री केलेली बरी म्हणून काहीसा छिद्रान्वेशी प्रतिसाद देतो आहे उत्साहावर विरजण घालण्याचा हेतू नाही. गैर वाटल्यास क्षमस्व!:
पैसे घेतल्यावर ठराविक (कबूल केलेल्या) प्रतीची सेवा देणे सेवादात्यावर बंधनकारक ठरते. शिवाय प्रताधिकाराचे वेगळे कायदे लागू होतात (कारण काही युजर्ससाठी फ्रीयुज नाही). (कदाचित वॅट वगैरेही लागू शकतो कल्पना नाही) वगैरे तत्सम कायदेशीर बाबींचा विचार केला असेलच असे समजतो. नसल्यास अश्या बाबतीत सल्ला घेऊन मग हे पाऊल उचलावे असे वाटते.
-ऋ
{- शिवाय प्रताधिकाराचे वेगळे}
- शिवाय प्रताधिकाराचे वेगळे कायदे लागू होतात (कारण काही युजर्ससाठी फ्रीयुज नाही).
--> ह्या योजनेमुळे इथे लिहिणार्यांच्या प्रताधिकारावर नेमका काय परिणाम होईल? हे कोणी नीट समजावून सांगितलं, तर ज्यांना ह्या विषयाची नीट माहिती नाही, त्यांना त्याचा फायदा होईल.
ज्यांनी हे प्रिमियम सदस्यत्व घेतलेले नाही, त्यांचे साहित्य एखाद्या प्रकाशकाने प्रसिद्ध करायचे ठरवले, तर त्यांच्या लेखनावर नक्की कोणाचा हक्क असेल? लेखकाचा की मी मराठी व्यवस्थापनाचा? जर लेखकाचा त्याच्या लेखनावर संपूर्ण अधिकार असेल, तर त्याचे मीमवरील साहित्य प्रकाशित करण्याच्या वेळी मीम व्यवस्थापनाची नेमकी काय भूमिका असेल? ह्या गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक वाटते.
शिवाय असे सदस्यत्व घेतलेल्यांच्या प्रताधिकाराचे स्वरूप नेमके काय असेल, याचाही खुलासा केल्यास इतर मुक्त वापरकर्त्या सदस्यांना असे प्रीमियम सदस्यत्व घ्यावे की नाही हे ठरवता येईल.
इतर गोष्टींबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच मग मीम व्यवस्थापनाने हे पाऊल उचलले असेल असे वाटते.
मीम व्यवस्थापनाला ही नवीन योजना राबवण्यासाठी शुभेच्छा!
अजून तरी मी अशा संस्थळावरील वावराला संपूर्णपणे सरावलेले नाही. त्यामुळे सध्या तरी प्रीमियम सदस्यत्व घेण्याचा विचार केलेला नाही. पण पुढे आवश्यकता भासली तर असे सदस्यत्व घेण्याचा विचार करेन.
एक सूचना - ई-पुस्तक विभागात ज्या साहित्याचा समावेश होतो, ते मीमच्या नेहमीच्या थीमप्रमाणे न दाखवता, पुस्तकाच्या पानाप्रमाणे दिसणारी थीम त्यासाठी वापरली तर अधिक उठावदार दिसेल. ह्या थीममध्ये पुस्तकाची दोन पाने किंवा एकाच पानाचा व्ह्यू निवडण्याची सोय, एखादे पान बुकमार्क करून ठेवण्याची सोय, थोडा मोठा फाँट, वाचकांच्या कॉमेंट ह्या शालेय पुस्तकातल्या धड्याखालच्या प्रश्नावलीसारख्या दिसण्याची सोय अशा सोयी आणि अनेक ई-पुस्तके वाचनखूण म्हणून साठवण्यासाठी प्रत्येक प्रीमियम सदस्याला बुकशेल्फचे पान दिले तर ते खर्या अर्थाने ई-पुस्तक वाटेल.
नीलपक्षी
http://paperquillingandotherarts.blogspot.in/
http://swingsofmind.blogspot.in/
{सर्वात आधी मीमच्या ध्येय}
सर्वात आधी मीमच्या ध्येय धोरणामध्ये सांगितलेले आहे की मीमवर प्रसिद्ध होणार्या कोणत्याही लेखनावर मीम आपला अधिकार सांगणार नाही, त्याचे अधिकार लेखकाचा व फक्त लेखकाचाच राहील.
>>एक सूचना - ई-पुस्तक विभागात ज्या साहित्याचा समावेश होतो, ते मीमच्या नेहमीच्या थीमप्रमाणे न दाखवता
हा मुद्दा आवडला व सूचना पटली, नक्की असे काही करता येतं का यावर विचार करेन.
something terribly wrong with this country, isn't there?
{वेगळी शंका}
माझा प्रताधिकाराविषयी शंका थोडी वेगळी होती. आतापर्यंत हे संस्थळ 'फ्रीयुज' असल्याने अनेक वेळा एखादे चित्र, फोटो, पुस्तकातील उतारा वगैरे देताना प्रताधिकार आड येत नाही कारण अश्या गोष्टी देऊन आर्थिक मिळकत नाही. मात्र आता अर्थकारण मधे आल्यावर अशी चित्रे/फोटो/उतारे देणे प्रताधिकार कायद्यात बसेल का?
-ऋ
{या बद्दलचा नियम मीमराठीच्या}
या बद्दलचा नियम मीमराठीच्या सुरवातीपासूनच लागू आहे.
६. संकेतस्थळावर सदस्यांने सादर केलेले लिखाण / छायाचित्रे / नकाशे / प्रतिक्रिया / प्रतिसाद / खरडी / व्यक्तीगत निरोप / कविता ह्या प्रकारचे लिखाण व अन्य कोणत्याही प्रकारचे लिखाण अथवा कोणत्याही प्रकारे सादर केलेली माहीती ( ह्यापुढे ह्याला साहित्य असे संबोधले जाईल) या बाबत;
६.१ सदस्यांने सादर / प्रकाशीत केलेल्या साहित्याच्या सत्यतेची संपुर्ण जबाबदारी सदस्याची असेल व ह्याबाबत मीम जबाबदार नसेल.
६.२ सदस्यांनी सदर केलेले साहित्याचे मुद्रण अथवा पुर्नमुद्रण / कोणत्याही प्रकारचे मालकी हक्क अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क स्दस्यांचे व केवळ त्या सदस्यांचे असणे आवश्यक आहे, तसे नसल्यास ते हक्क हस्तांतरित केलेले असणे आवश्यक आहे, ही जबाबदारी सदस्यांची असेल व ह्यासाठी मीम जबाबदार राहणार नाही.
६.३ सदस्यांचे साहित्य संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर सर्व मुद्रणाधिकार / प्रतीअधिकार/ पुर्नमुद्रण अधिकार आदी सर्व अधिकार त्या सभासदाचेच राहतील.
६.४ संकेतस्थळावर प्रसिध्द अथवा प्रकाशीत केलेल्या साहित्यामुळे होणार्या कायदेशीर परिणामाची जबाबदरी संबधीत सभासदाची असेल. ह्या बाबत संकेतस्थळाची कुठल्याही प्रकारे जबाबदारी नसेल.
६.५ सभासदत्व रद्द अथवा स्थगित झाल्यावर संकेतस्थळावरील साहित्य मिळवण्याचा सभासदाचा अधिकार ही रद्द अथवा स्थगित करण्यात येईल.
६.६ सभासदांचे वरील सर्व अधिकार लक्ष्यात घेऊन सुध्दा कोणतेही आक्षेपार्ह साहित्य कोणत्याही आणी संबधीत सभासदाला न विचारता अप्रकाशीत करण्याचे अधिकार मीमचे राहतील व ह्या बाबतची कार्य पध्दती निश्चित करण्याचे व तिच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार मीमचे असतील.
६.७ एखाद्या सदस्याचे सदसत्व जर रद्द अथवा स्थगित झाले तर त्याने प्रकाशीत केलेले साहित्य संकेतस्थळावर तसेच राहील. व सदस्यांने केलेल्या सुचनांचा विचार केला जाईल.
something terribly wrong with this country, isn't there?
{वा! हे नेमके आहे! आभार!}
वा! हे नेमके आहे!
आभार!
-ऋ
{राजे ट्रान्सफर डिटेल्स कळव रे}
राजे ट्रान्सफर डिटेल्स कळव रे लगेच
ऋषिकेशचा संशय आधी फेडून टाक रे
कायदा म्हंटलं की अंमळ भिती वाटतेच 
{वाह...}
वाह. रास्त थोड्याफार शुल्कात नवनवीन सुविधा दिलेल्या दिसताहेत.
ज्यांना हव्या आहेत त्यांना अधिकाधिक सुविधा मिळत रहाव्यात,मोफत नसतील जमत तर अगदि सशुल्कही असणे चांगले असेच मला वाटते. सध्या तरी ही सुविधा घेत नाहिये.
--मनोबा
--मनोबा.
करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
रणात आहेत झुंजणारे अजून काही !
विझून माझी चिता युगे लोटली तरीही
विझायचे राहिले निखारे अजून काही !
{आता प्लॅटिनम सदस्यत्व}
मालक,
मस्त निर्णय. तुमचे अभिनंदन. याला प्रतिसाद मिळत राहीलच.
मीम has graduated to the next level.
आता गोल्ड व प्लॅटिनम सदस्यत्व या विषयावर विचार सुरु करा.
म्हंजे आणखी धमाल येईल.
----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell
{राजे आमचा नवीन बिल्ला मिळाला.}
राजे आमचा नवीन बिल्ला मिळाला. धन्यवाद.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{नक्की}
ट्रान्सफर डिटेल्स कळवा...
कळावे,
___मनस्वी राजन
अनुभव… क्षण वेचलेले…
{व्यनी केला आहे.}
व्यनी केला आहे.
something terribly wrong with this country, isn't there?
{अधिकार दिलेले आहेत.}
अधिकार दिलेले आहेत.
something terribly wrong with this country, isn't there?
{अरे वा}
ज्येष्ठ नागरिकांची हाफ तिकिटाची सोय आहे का?
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{नाही उलट ज्येष्ठांनी डब्बल}
नाही उलट ज्येष्ठांनी डब्बल भरून तरूण पिढीला प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा आहे
something terribly wrong with this country, isn't there?
{बिल्ला भाय...}
मला सुद्धा बिल्ला भेटला आहे बर का ...
धन्यवाद राजे...
प्रीमियम सदस्यत्वाची कल्पना भन्नाट आहे.
कळावे,
___मनस्वी राजन
अनुभव… क्षण वेचलेले…
{च्यायला हे माहीत नव्हते}
च्यायला हे माहीत नव्हते !!
@राज ,ट्रान्सफर डिटेल कळविणे
{वही अपना दादाजीवाला बँक.....}
वही अपना दादाजीवाला बँक..... सदा कमीना... काम है पैसा काटाना.. अपना निकम्मा बँक............कोटक महिंद्रा बँक!!
something terribly wrong with this country, isn't there?
{च्यायला हे माहीत नव्हते}
च्यायला हे माहीत नव्हते !!>>>
वाश्या, अधुन मधुन माणसात येत जा जरा
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{वाश्या, अधुन मधुन माणसात येत}
वाश्या, अधुन मधुन माणसात येत जा जरा >>
लागल च्यायला मुळ-मुठे च पाणी याला
{येवु, येवु लोहगावचं पाणी}
येवु, येवु लोहगावचं पाणी प्यायलाही येवु, पण तुम्ही बोलवाल तर खरं
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{मिळाला काय रे?}
मिळाला काय रे?
something terribly wrong with this country, isn't there?
{अरे वा}
हे नविनच!!
अभिनंदन..
{धन्यवाद!}
धन्यवाद!
something terribly wrong with this country, isn't there?
{उत्तम सुविधा.. राजे, प्रथम}
उत्तम सुविधा.. राजे, प्रथम तुला भेटतो आणि लगेच प्रीमियम सदस्यत्व घेतोय रे..
- पिंगू
माझ्यातला मी उरला फक्त व्याकरणापुरता...
{नक्की!}
नक्की!
something terribly wrong with this country, isn't there?
{राजे...कल्पना आवडली.}
राजे...कल्पना आवडली.
विनीता देशपांडे
मी एक अक्षरयात्री..http://vineetadeshpande.blogspot.com
{धन्यवाद!}
धन्यवाद!
something terribly wrong with this country, isn't there?
{या संदर्भात एक ईमेल पाठवलेला}
या संदर्भात एक ईमेल पाठवलेला आहे.
-चाणक्य
{उत्तर दिले आहे}
उत्तर दिले आहे
something terribly wrong with this country, isn't there?