भटकंती - हरिहरेश्वर (१)

0
0

यंदाच्या पावसाळ्यात हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला होता.अगदी अचानकपणे एका शनिवारी आपण हरिहरेश्वरला जाऊया असं ठरलं.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं.
ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.तसं हरिहरेश्वर पुण्यापासुन १३०कि. मी आहे. मुंबईहुन साधारण २२० कि. मी आहे हरिहरेश्वर. रेल्वेनी जायचं असल्यास कोकण रेल्वेनी माणगावला उतरुन मग एस. टी बस घेऊन पुढे हरिहरेश्वरला जाता येतं. साधारणपणे पुण्याहुन ३तास लागतात.
आम्ही वाटेत थांबता यावं या उद्देशानं कार घेऊन निघालो.
सकाळी लौकर निघाल्यानी संपुर्ण ताम्हिणी घाटानी धुक्याची चादर ओढलेली होती....

ताम्हिणी घाटाचं आकर्षण म्हणजे निसर्गानी मुक्तहस्ताने केलेली उधळण.

वाटेत दिसलेली फुलं -

वाटेत एका ठिकाणी थांबलो होतो त्यावेळी तिथे या अगदी मनसोक्तपणे डुंबत होत्या -

वाटेत थांबुन नाश्ता करुन फिरत फिरत हरिहरेश्वरला पोचलो त्यावेळी दुपारचे १२.३० वाजले होते. फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडलो आणि पहिलं दर्शन दिलं ते एका सरड्यानी -

नंतर एक छोटा बेडुक दिसला. निवांत एका फळकुट्यावर बसलेला -

नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी.

(क्रमशः )

( लेख पुर्वप्रकाशीत )

सुंदर फोटो

1

ते दोन्ही धबधब्यांचे फोटो खुप आवडले. अस वाटत होत के सरळ जाउन त्या धबधब्याखाली उभ रहाव ........आगदी लिरील स्टाईल
दुसरा भाग येउद्या लवकर


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

प्लीऽऽऽज.......... नकोऽऽऽ....

2

प्लीऽऽऽज..........
नकोऽऽऽ.............................
निदान लिरिल स्टाईल फोटो/व्हिडिओ काढून टाकू नये ही णम्र इनंती! Puzzled

Laughing out loud

वाह ! सुरेख फोटो ! आवडले गं

3

वाह !

सुरेख फोटो !

आवडले गं मिंटी !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वाह !!!

4

मस्त फोटो ...
कोकणचा निसर्ग नेहमीच साद देतो ...मला कोकणात फिरायला खूप खूप आवडतं ...

मला ही खुप आवडतं कोकण !

5

मला ही खुप आवडतं कोकण !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छान फोटो. पुढचा भाग कधी ?

6

छान फोटो.

पुढचा भाग कधी ?

मस्तच गं!!! तो बेडुक कस्सला

7

मस्तच गं!!!

तो बेडुक कस्सला भारीये हास्य

येऊ दे लवकर आणखी फोटो हास्य

सुंदर फोटो

8

सुंदर फोटो

अवांतरः हरिहरेश्वर पुण्याहुन १३० किमी नक्कीच नाही. १८० किमी असावे. (माणगावचं १३० किमी आहे)

चेतन

मस्त ....बेडुक काय ? पाण्यात

9

मस्त ....बेडुक काय ? पाण्यात डुंबणारी सासरकडची मंडळी काय ?

सगळेच आवडले

हे फोटु तुम्ही काढले आहेत

10

हे फोटु तुम्ही काढले आहेत का?

मर्कटबंधु

सगळेच फोटु मस्त

11

सगळेच फोटु मस्त


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

सगळे फोटॉ मस्त आहेत. खासकरुन

12

सगळे फोटॉ मस्त आहेत.
खासकरुन बेडुक आवडला. हास्य