महाराष्ट्रातील गड-किल्ले

0
0

विवेक मोडक यांचा रायगड हा लेख वाचताना मला पन्हाळा किल्ल्यावर पाहिलेल्या प्रतिकॄतीची आठवण झाली ...

मला हे माहित नाही की किती गडांच्या अशा प्रतिकॄती आहेत .. पण जर सर्व गडांच्या अशा प्रतिकॄती बनवल्या तर ?
पुरातत्व खात्याला गड-किल्ल्यांची निगा राखताना बरेच कष्ट पडतात, बराच खर्च येतो ..... जर अशा प्रतिकॄती बनवल्या आणि संग्रहालयात ठेवल्या तर त्यातून जे उत्पन्न मिळेल त्याचा उपयोग करून गड-किल्ल्यांची निगा राखता येईल असं वाटतं ..

छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा अरबी समुद्रात प्रस्तावित आहे तिथेच एक संग्रहालय पण बनवणार आहेत .. तिथे असे गड्-किल्ल्यांचे संग्रहालय बनवता येईल ...

याची सुरुवात दिवाळीच्या

1

याची सुरुवात दिवाळीच्या किल्ल्यांपासुन केली तर??
प्रतिकृती बनवणं तितकं कठीण जाउ नये. यासाठी सर्व्हे ओफ इंडिया च्या टोपोशीट्सची मदत घेता येउ शकेल??
जर कोणाला रस असेल तर एका किल्ल्यापासुन सुरुवात करता येईल.

दिवाळीचे किल्ले

2

हो ना ..
दिवाळीत बरीच मंडळे गड्-किल्ल्यांच्या प्रतिकॄती उभारतात पण त्या तात्पुरत्या असतात ...
सर्व्हे ओफ इंडिया च्या टोपोशीट्सबद्द्ल अधि़क माहिती द्या

असेच म्हणतो अधिक माहीतीच्या

3

असेच म्हणतो अधिक माहीतीच्या प्रतिक्षेत.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

टोपोशीट्स साघारणपणे असे

4

टोपोशीट्स साघारणपणे असे असतात
दुवा
यातील कंटूर लाइन्स वरुन आपल्याला प्रतिकृती बनवण्याला सोपं जातं. फार पूर्वी काही प्रतिकृती बनवल्या होत्या. थर्मोकॉल वापरुन.

पण जर सर्व गडांच्या अशा

5

पण जर सर्व गडांच्या अशा प्रतिकॄती बनवल्या तर ?

विचार करण्यालायक मुद्दा...


-निखिल

हम्म.... चांगला मुद्दा

6

हम्म.... चांगला मुद्दा

मुद्दा अतिशय उत्तम! पण कळीचा

7

मुद्दा अतिशय उत्तम!
पण कळीचा प्रश्न असा, की जरी हे काम करायचं म्हणलं, तरी ते कसं करता यावं?
परवानग्या, लाल फिती ह्यांचं काय?

अरे हो ...

8

विमो वर बोलल्याप्रमाणे
>>कंटूर लाइन्स वरुन आपल्याला प्रतिकृती बनवण्याला सोपं जातं
कंटूर लाइन्स वापरून ऑनलाईन प्रतिकॄती बनवण जास्त सोप्प होईल की ...
अगदी थ्री डी वगैरे

गूगल स्केच अप चा उपयोग करता

9

गूगल स्केच अप चा उपयोग करता येईल का??
जाणकार लोकांनी मार्गदर्शन करावे!!

विचार आवडला...

10

विचार आवडला...

छान !!!

11

आज १४ किल्ल्यांची प्रतिकृती - दुर्गसृष्टी लेख पाह्ण्यात आला.

मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूर येथे किल्ल्यांची प्रतिकृती - दुर्गसृष्टी साकारत आहेत.